निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वर्षा प्लिज आहो जाहो नको करू.

धन्यवाद पंडीत आणि वर्षा.

हे मागच्या रविवारी खास पाणजे येथे पक्षी बघायला गेलो होतो साधना, आरती आणि मी. पण पक्षी नाही दिसले मात्र हे वन्यजीव खुप बागडत होते. अजून फोटो टाकते हळू हळू.

शोभा छान प्रगती चालली आहे फुलोर्‍यात. फोटो थोडा लांबून काढ म्हणजे क्लियर येईल अजून.

झुरळ पाहिल की आपल्याला घाण वाटते. कोणी त्यापासून पळत तर कोणी त्याला मारण्यासाठी धावतो. पण पाणज्याच्या गवतात हा सुंदर झुरळ मलादिसला आणि मी त्याचा फोटो काढायला सरसावले. छान गवताताच हिरवा रंग घेतलेला आणि चमकता तेजस्वी असा तो झुरळ रानभेंड्याच्या झुडूपावर होता. आता हा झुरळच आहे की वेगळा किटक आहे ते समजल नाही.
DSC06631.JPG

अरे वा!!
मस्तच आहे फोटो.
पण हे झुरळ नक्किच नाही.
त्याच्या सारखाच कीटक असावा.

परवा फेसबुकवर एक पोस्ट पाहीली. त्यात ४ प्रकारच्या गुंजा कळल्या. पूर्ण लाल, लाल आणि काळा ठिपका, पांढ-या आणि काळ्या.
ही लाल आणि काळ्या गुंजांची फुले रानात दिसली.
DSC06578.JPG

जागू
हा पोपट पहाडी पोपट आहे. नेहेमिचा नाही.
त्याच्या पन्खावर लाल रन्ग असतो.
त्याला अलेक्झान्डर पोपट असेही म्हणतात.
मागच्या आठवड्यात आमच्या घराच्या मागच्या झाडावर त्यान्ची जोडी आली होती.

गुन्जान्ची फुले छान!

रानतीळ
DSC06595.JPG

मस्त फोटो सारेच..

जागू त्या किड्याला गावात सोनपाखरु म्हणतात.. आम्ही त्याला पकडून आगकाडीच्या पेटीत बंद करायचो किंवा त्याला दोरा बांधून उडवायचो.. किती दृष्ट होतो Sad

<<जागू त्या किड्याला गावात सोनपाखरु म्हणतात.. आम्ही त्याला पकडून आगकाडीच्या पेटीत बंद करायचो किंवा त्याला दोरा बांधून उडवायचो.. किती दृष्ट होतो <<
हो हो आम्हि पण! त्याच्या डोके आणि धडाच्या मधे जी फट आहे तिथुन दोरा बान्धुन त्याला फरम फरशीवर बसवले कि तो उडाय्चा. मजा वाटायची तेव्हा. Sad
त्याला डबीत ठेवुन, झाकणाला छिद्र पाडुन त्याला पीठ बिठ काहितरी खायला द्याय्चो. एक दोनदा तर अन्डीसुद्धा घातलेली त्याने. !

अरे धागा मस्त पळतोय!
मागच्या आठवड्यात कुक कुक असा १०.३०-११च्या वेळी आवाज आला म्हणून खिडकीत डोकावले.तर ब्भारद्वाजाची जोडी कंपाऊंड्वरून चालत होती.कोकणीत याला कुक्क्कुट कोंबा / कोंभा म्हणतात.तर याला पाहून मस्त वाटले
नवीन झाडे लावली, त्यामुळे असेल पण मधे एकदा एक चिमुकला सनबर्ड फेरी मारुन गेला.बुलबुलाची जोडी भेट देऊन गेली.

माझे मिरचीचे झाड मरुन गेले.त्याआधी त्याच्या अंगावर हिरवे डोळे उमटले होते,पण नाही. गेलेच ते.त्याच्याच बिया रुजल्या आहेत.हळदीचे पाणी फवारायची मी.यावेळी माळ्याचे ऐकायची बुद्धी झाली.

Pages