निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जागु, मस्त फोटो. हिला मर्यादा वेल सुद्धा म्हणतात.
हिच्या पुढे समुद्र येत नाही. Convolvulaceae

साधना मी चुकून अमर्याद वेल केल आहे. मर्यादा वेलच नाव आहे.
वर्षा गोकर्ण सुंदर. सध्या सगळीकडे खुप बहर आला आहे गोकर्णाला.

परवा वयम हा कोशोरांसाठी असलेला दिवाळी अंक चाळला त्यात नकला करणारे किटक आणि खोडकर पक्षी अस काहीतरी नाव असलेला लेख वाचला. गंमत वाटली वाचून त्यात फोटोसकट दाखवले आहे. एक कासव मगरीसारखा दिसतो आणि तो मासे वगरे मगरीसारखा जबडे उघडून खातो. एक कोळी लाल मुंगळ्यांसारखा रुप धारण करतो त्याच्या पायांनाच तो सुळे बनवतो मुंग्यांसारखे त्यामुळे मुंगी समजून त्यावर कोणी हल्ला करत नाही. टिटवी अंडी घालताना कोल्ह्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून त्याला दूर दुर पळून कशी दिशाभूल करते ते लिहील आहे. झाडावरच्या आळ्या कसा झाडांसारखाच रंग परीधान करतात. मधेच पान खाल्लेले दिसले की पक्षांना समजते की पानावर किड आहे म्हणून ह्या किडी बाजूने पाने कुरतडतात व आपल्याला दडून ठेवतात.

अमृता आहाहा खुप्च छान ग. मला हे झाड पाहून नेहमी लहानपणीची आठवण येते आणि मी नेहमी लिहीते. ही फुले गोळा करण्यासाठी मी सकाळी अंधारात जायचे दिवा घेऊन. कारण नंतर गावातील मुली येऊन ही फुले घेऊन जायच्या. माझ्या घराच्या शेजारीच झाड होते त्यामुळे सुगंध मस्त दरवळायचा. रोज ह्या फुलांच्या वेण्या करायच्या आणि मैत्रिणींना, शाळेतील बाईंना न्यायच्या, स्वतःही माळायचे. संध्याकाळी ही वेणी कोमेजली की पाण्यात टाकली की पुन्हा ताजी व्हायची. फुलेही पाण्यात ठेवल्यावर नव्याने उमलायची. ह्या झाडांची पाने पूर्वी हारामध्ये गुंफायचे म्हणून आम्ही त्याला हाराच्या पानांची फुले म्हणायचो. ह्याचे नाव आकाश मोगराही आहे.

वॉव अमृता. सुवास पोचला.

डोंबिवलीत आयरे रोडवर पाटकर शाळेजवळ हे झाड आहे अजून. तेव्हा शाळा नव्हती आम्ही लहान असताना. चाळ होती एक आणि त्याच्या दारात हे झाड. पहाटे मी आणि मैत्रीण फुलं गोळा करून आणायचो आणि गजरा गुंफायची याचा.

सुप्रभात.
आज माझ्याकडे ह्या दोन्ही रंगाच्या कोरंटीची फुले फुलली आहेत.
1509071290490.jpg

Varache sarv foto mast aahe.Tam rutachy photo mule kaal avachit tapakalelya foolache nav kalale.Andhar Hota mhanun zad nit so sale nahi.

Has pahaa aalashi prani.lolatlolat vadhatoy.IMG_20171026_092140.jpg

जागू,
दिवाळी अंकातील कथा मस्तच गं Happy

देवकी,
ते झाड बघुन अस काहीस वाटत मला..

Image result for laying in grass on elbow

दिवाळी अंकातील कथा मस्तच गं
धन्यवाद टिना.

देवकी मला एकदम लहानपणीची आठवण आली. आमच्या वाडीतही असेच लोळत असलेले एक झाड होते. त्याची एक फांदी तरती असल्याने हलायची. मी त्या फांदीला पाळणा म्हणूनच वापर करायचे. त्यावर झुलत बसायचे. त्यावर अभ्यास करायचे. बोट बोट पण त्यावरच खेळायचे.

मस्त गप्पा!!!

अमृता मस्त फोटो!!

माझ्या कडे सोनटक्का फुललाय! ३ वर्षा च्या प्रतिक्षेने.... Happy
धन्स जागु, तु सल्ला दिलास म्हणुन मी सोनटक्याची कंद टब मधे शिफ्ट केले होते आणि ५, ६ महिन्यात फुलं आलीत..

सोनटक्याची फुलं पाहुन अंजुताताईं ची आठवण आली... Happy

लव यु सायु. सुवास पोचला. माझ्याकडे दोन वर्षच फुलला. आता नाहीये. सोसायटी कुंड्या ठेऊन देणार नाहीये आता, असं चाललंय बरेच दिवस, त्यामुळेच जीव जास्त कशात गुंतवत नाहीये. रंग काढायला सुरुवात नाही केली अजून, तो केला की काढणार. खाली गॅलरी पाठीमागे जागा आहे कोपऱ्यात, तिथे ठेऊ का विचारणार तेव्हा, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर राहतील.

धन्स अन्जु ताई... Happy
सायु सोनटक्का छान झाला आहे.+ Happy
अंजूताई इन्डोअर प्लांट लावा मग.+१००

Pages