Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://money.cnn.com/2016/11/
http://money.cnn.com/2016/11/18/news/donald-trump-wall-street-journal-li...
इम्पीचचा अर्थ हा आरोप ठेवणे
इम्पीचचा अर्थ हा आरोप ठेवणे असा आहे. तेव्हा बिल क्लिंटन हा इम्पिच झाला होता ह्यात शंका नको. अशा प्रकारे आरोप ठेवला जाणे हेही सोपे नसते. हाउस जुडिशियल समितीने बिल क्लिंटनवरील आरोपात पुरेसे तथ्य आहे असे ठरवून इम्पिचमेंट केले.
त्याला मुख्य आरोपातून सिनेटने निर्दोष मुक्त केले. ह्यात प्रचंड राजकारण होते. ह्यात दोषी आणि निर्दोषीपणापेक्षा कुठल्या पक्षाकडे ताकद आहे ते जास्त महत्त्वाचे होते.
https://www.yahoo.com/news/ri
https://www.yahoo.com/news/ringside-steve-bannon-trump-tower-president-e...
हे खुपच भारी आर्टिकल आहे बॅनन आणि त्याच्या थिंकिंग बाबत. I think this is the first account (from the horse's mouth) on what the brain of the trump camp was thinking when we all thought their campaign was faltering. If Trump would've lost, all this would've just been smoke because the loss would've proven it wrong. But now, since Trump won, there is indeed a lot (if not all) of truth to it.
I think we all agree that not just Clinton's message was not appealing enough to the broader audience, she in fact didn't even cover the broader audience. President Obama said that too.
This guy Bannon does seem like he's getting carried away with his vision but his analysis of the situation during the campaign was probably dead on and its very interesting to read. Its indeed a lesson for both parties. He calls out both parties and that's pretty much, has been Trump's focus from the beginning.
He was not too popular to begin with and unfortunately, people from the republican party didn't mince words in criticizing him and then he said fxxk you to them too and kept marching on, morphing into this new force that was very appealing to a demographic that was apparently missed and miffed by both parties.
Bannon's account of how he thinks the Clinton era (democratic pary) and the Reagan era (Republican Party) connection to the American common man was lost is really interesting to read!
I have said it before, after this election it was proven that media cannot really influence the outcome of elections as much as they think they can but now I don't think so. It's not that media does not have the power, it absolutely does but only if it decides to really investigate by combing through their entire audience and not just the one's that make the most noise and are visible. Read about the metrosexual bubble he talks about in the article and you'll know what I am talking about. I cannot agree more about the concept of that bubble because honestly, people like us are a part of that.
Finally, does understanding this mean anything to us? I think if you care about your world view then it does because our world view shapes our key decisions in life. I can't really pin point what decisions but I strongly feel that it's important that we really know what the world around us really looks like or represents because otherwise we would've continued to live in this bubble that the Trump presidency has thankfully burst for us.
आपल्या आवडीचा उमेदवार निवडून
आपल्या आवडीचा उमेदवार निवडून ...............त्यांना बालवाडीत बसवण्याचा आचरटपणा का?
पटले.
अहो, कसाहि असेल ट्रंप, रेसिस्ट, आणि काय, काय? आता तुम्ही नसाल तसे. पण अहो, जर लोकशाही आहे, आणि कायदेशीर रीत्या तो निवडून आला आहे तर त्याचा अर्थ या देशातले लोक त्याच्या सारखेच आहेत!
हिलरी निवडून न येण्याची कारणे यावर ग्रंथ लिहीता येईल. असे चुका करणारे लोक कसे निवडून येतील?
असे म्हणतात की खरे तर तिला ट्रंपपेक्षा जास्त मते मिळाली, पण इलेक्टोरल कॉलेज मधे ट्रंपला २७० पेक्षा जास्त मते मिळाली म्हणजे घटनेप्रमाणे, कायद्याने तो निवडून आला. आता त्या इलेक्टोरल कॉलेज पद्धतीला शिव्या देण्यात काय अर्थ?
बदलायची असेल निवडणुकीची पद्धत तर बदला, वैध मार्ग आहेत.
मी वर घटना बदलण्याबद्दल लिहीले होते, ते शेंडेनक्षत्र यांची टिंगल करण्यासाठी नव्हे. त्यांचे अनेक मुद्दे मला पटतात.
एकूणच घटनेतील बर्याच गोष्टींमागील कारणे कालबाह्य झाली आहेत त्या गोष्टी बदलायला हव्यात असे माझे मत आहे.
हिलरीला ट्रंपपेक्षा जास्त मते
हिलरीला ट्रंपपेक्षा जास्त मते मिळाली आहेत आणि त्यामुळे खरे म्हणायचे तर तीच जेती आहे असे हिलरी समर्थक अनेक वेळा म्हणत आहेत. पॉप्युलर व्होट आणि इलेक्टोरल व्होट ह्यांच्यातील विसंगती हे त्यामागचे कारण.
ट्रंपचे ह्याला उत्तर असे की आम्ही आमची व्यूहरचना जिंकण्यासाठी जे काही करायला लागेल त्या प्रकारे केली होती. इलेक्टोरल व्होटचा नियम असल्यामुळे पैसा आणि अन्य प्रचार यंत्रणा त्या दृष्टीने वापरली. जर पॉप्युलर व्होटचा नियम असता तर आम्ही तशी व्यूहरचना केली असती आणि तीही निवडणूक आम्हीच जिंकलो असतो!
दुर्दम्य आत्मविश्वास.
जाता जाता: ट्रंप युनिव्हर्सिटी केस २.५ कोटी डॉ देऊन सेटल करण्यात आली.
http://mobile.nytimes.com/201
http://mobile.nytimes.com/2016/11/20/us/politics/jared-kushner-donald-tr...
ट्रंप युनिव्हर्सिटी केस २.५
ट्रंप युनिव्हर्सिटी केस २.५ कोटी डॉ देऊन सेटल करण्यात आली. >>> चला, असा नाही तर तसा , गुन्हा मान्य केला.
त्यात काय? गुन्हा झाला तर
त्यात काय? गुन्हा झाला तर झाला. तसेहि त्याच्या जावयाचा बाप चक्क तुरुंगात जाऊन आला आहे - गुन्हे केले म्हणून! दंडहि भरावा लागला, पण अगदी थोडा.
ते जुने झाले. आता सध्याचे बघा - ट्रंपने फोर्ड मोटर कंपनी ला अमेरिकेतला प्लांट बंद करण्या पासून थांबवले.
(आता काही लोक म्हणतात, त्यांच्या युनियनच्या वाटाघाटीत आधीच ठरले होते की प्लांट बंद होणार नाही, पण नवीन उत्पादनवाढ मेक्सिकोत होईल. त्यात काही बदल झाला नाही. ते काही असो, पण तुम्हाला माहितच आहे की हिलरी नॅस्टी आहे, आणि लायर पण)
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=JUWSLlz0Fdo
सॅटरडे नाईट लाइव्ह. अलेक बाल्डविन पुन्हा एकदा ट्रंपच्या रुपात!
इथल्या बहुतांश वाचकांना तरी हे आवडेल ह्याची खात्री आहे!
== ट्रंप युनिव्हर्सिटी केस
==
ट्रंप युनिव्हर्सिटी केस २.५ कोटी डॉ देऊन सेटल करण्यात आली. >>> चला, असा नाही तर तसा , गुन्हा मान्य केला.
==
किंवा असेही म्हणता येईल की फिर्यादी पक्षाला फक्त पैशातच रस होता. न्याय, शिक्षा वगैरेमधे नव्हता, नाही का?
हेही पहा:
https://www.youtube.com/watch?v=vKOb-kmOgpI
ट्रंपच्या संकटातून वाचण्याकरता एक अभिनव उपाय! कॅनडाला जायची गरज नाही!
फिर्यादी पक्षाला फक्त पैशातच
फिर्यादी पक्षाला फक्त पैशातच रस होता. न्याय, शिक्षा वगैरेमधे नव्हता >> मग ट्रंपला न्यायात रस नाही वाट्टं? आधी तर म्हणत होता, सेटल करता येईल, पण करणार नाही म्हणून.
== फिर्यादी पक्षाला फक्त
==
फिर्यादी पक्षाला फक्त पैशातच रस होता. न्याय, शिक्षा वगैरेमधे नव्हता >> मग ट्रंपला न्यायात रस नाही वाट्टं? आधी तर म्हणत होता, सेटल करता येईल, पण करणार नाही म्हणून
==
राष्ट्रपतीपदाची जबाबदारी असताना ही नसती खुसपटे गळ्यात का बांधा? त्याने देशाचेच नुकसान होणार असा विचार केला असेल त्याने. तेवढे तत्त्वाशी तडजोड करण्याचे तारतम्य आहे त्याच्याकडे. माझ्या माहितीनुसार फिर्यादी पक्षाकडे काही देशाची जबाबदारी नाही. त्यांची काय सबब आहे म्हणे?
>> तेवढे तत्त्वाशी तडजोड
>> तेवढे तत्त्वाशी तडजोड करण्याचे तारतम्य आहे त्याच्याकडे
मग ट्विटर वरची भांडाभांडी/वनअपमनशिप करण्याची चढाओढ कधी सोडून देणार तो?
असे असू शकते ना की फिर्यादी
असे असू शकते ना की फिर्यादी पक्ष झगडून थकलाय, ट्रंप कडे केस लढवायला रिसोर्सेस आहेत तसे या मंडळींकडे नाहीत आणि न्याय मिळेल अशी खात्रीही नाही. ट्रंपने केले तर देशासाठी तत्वाशी तडजोड आणि फसगत झालेल्यांनी केले तर लगेच पैशत रस आहे न्यायात रस नाही. किती तो पक्षपात!
त्यांची काय सबब आहे
त्यांची काय सबब आहे म्हणे?
कुणाला ट्रंप आवडत नसेल, पण आता बरेच लोक म्हणतात, त्याला राष्ट्रपतीपदाची कामे करू द्यात. तो यशस्वी झाला तर अमेरिका यशस्वी होईल, त्याला गुंतवून ठेवलेत तर देशाचे काम कोण करणार? मग अमेरिकेचे नक्कीच नुकसान.
लोक त्याच्या मागे लागले कारण त्याच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला. जर एक वर्षात बेकायदा लॅटिनो ची संख्या कमी झाली नाही, देशातील मुसलमान किंवा इतर कुणि घातपाती कारवाया करणे बंद किंवा कमी केले नाही, भिंत बांधली किंवा नाही तरी बेकायदा लोक घुसणे कमी झाले नाही तर हेच लोक त्याच्या विरुद्ध जातील.
अर्थात सध्या तरी ट्रंप व त्याचे चमचे बेधडक सरासर वेडीवाकडी विधाने करतात, जसे फोर्ड मोटर कं बद्दल, तसे करतच रहातील. पण सत्य जास्त वेळ लपून रहात नाही.
मग ट्विटर वरची
मग ट्विटर वरची भांडाभांडी/वनअपमनशिप करण्याची चढाओढ कधी सोडून देणार तो? >>
माझ्या माहितीनुसार फिर्यादी पक्षाकडे काही देशाची जबाबदारी नाही > >
== ट्रंप युनिव्हर्सिटी केस
==
ट्रंप युनिव्हर्सिटी केस २.५ कोटी डॉ देऊन सेटल करण्यात आली. >>> चला, असा नाही तर तसा , गुन्हा मान्य केला.
==
फक्त फिर्यादी पक्षाला संशयाचा फायदा आणि ट्रंपला काहीही नाही हा पक्षपात नाही का? ट्रंपवर देशाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे हे विधान अतिरंजित वाटते का आपणाला?
===
मग ट्विटर वरची भांडाभांडी/वनअपमनशिप करण्याची चढाओढ कधी सोडून देणार तो?
==
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षाने ट्विटर वापरण्याविरुद्ध कुठला कायदा आहे का? कोर्टात केस लढवणे आणि ट्विटरवर टिवटिव करणे ह्यात सारखाच वेळ आणि कष्ट खर्च होतो का?
माइक पेन्सला त्या कुठल्याशा नाटकाच्या कलाकारांनी लेक्चर देणे हा प्रकार खरोखर निंदनीय आहे. स्वतःचे पैसे खर्च करुन करमणूक करण्याकरता आलेल्या लोकांना आयते सावज आले आहे असे समजून आपल्या राजकीय दृष्टीकोन लादणे हे व्यावसायिकतेचे लक्षण नाही. आपण ट्रंपच्या या ट्वीटबद्दल बोलत असाल असे समजतो. मलाही हा प्रकार संतापजनक वाटतो.
जर ट्रंपला शीघ्रकोपी आणि सूडबुद्धीने वागणारा समजत असाल तर त्याने मिट रॉमनीला मोठ्या मनाने कॅबिनेटकरता विचारले तेही विचारात घ्या.
आहो मोठ्या मनाचं काये
आहो मोठ्या मनाचं काये ट्र्म्पला. From what I read, he wants him because he definitely looks and plays the part of being from the establishment. Plus he needs someone who is known and respected in the international community. All his other choices are being criticized for being hardliners.
थोडक्यात काय? नावडतीचे मीठ
थोडक्यात काय? नावडतीचे मीठ अळणी! कुणालाही नेमा मग तो वा ती मवाळ असो, जहाल असो, प्रस्थापित असो वा क्रांतिकारी विचारांचा/ची असो. ट्रंपने नेमला असेल तर त्याला नाक मुरडणे, नावे ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य मानायचे! धन्य आहे!
ओबामानेही आपला मुजोरपणा दाखवला. ओबामाने जेव्हा बुशकडून सूत्रे हातात घेतली तेव्हा बुशने मोठ्या मनाने असे म्हटले की मी अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीवर टीका करणार नाही. एकीकडे बुशचा मोठेपणा मान्य केला. पण मी मात्र तसे काही करणार नाही असे सांगितले.
कदाचित असे सुचवायचे असेल त्याला की मी इतका महान की बुशने माझ्यावर टीका करण्याचे टाळले मात्र ट्रंप इतका क्षुद्र आहे की मी तसे काही करणार नाही!
>>जर ट्रंपला शीघ्रकोपी आणि
>>जर ट्रंपला शीघ्रकोपी आणि सूडबुद्धीने वागणारा समजत असाल तर त्याने मिट रॉमनीला मोठ्या मनाने कॅबिनेटकरता विचारले तेही विचारात घ्या.<<
सहमत. कॅंपेन दरम्यानचे त्याचे हेवी क्रिटिक निकि हेली (रि) आणि तुलसी गब्बार्ड (डे) यांच्या बरोबर देखील बोलणी चालु आहेत...
थोडे दिवस थांबा - काही
थोडे दिवस थांबा - काही जानेवारीनंतर एक दोन महिन्यात तो मुसलमानांना सुद्धा माफ करून आग्रहाने बोलावेल, काही झाले तरी सौदी अरेबिया कडे भरपूर पैसे आहेत, तिथे येमेनच्या हद्दीवर वाळूची भिंत बांधायचे काम मिळेल त्याला.
काही दिवसांनी तो हिलरीला पण साडी चोळी चा अहेर करणार आहे म्हणे.
हे दोन्ही मला माझ्या ट्वीटर वर व इ-मेलवर वाचले, इथे फक्त लिहितो आहे काय वाचले ते. (I am just saying - like Cruz's father was seen with Kennedy's assassin)

झक्की
झक्की
अरे काय हे, डबल ढोलकिसारखं?
अरे काय हे, डबल ढोलकिसारखं? छिडकारलं तर उग्रमतवादि आणि दोस्तीचा हात पुढे केला तर संधीसाधु - काय केजरीवालगिरी चालवलीय इथे सुद्धा?..
ट्रंपजींची मराठी मुलाखत पाहून
ट्रंपजींची मराठी मुलाखत पाहून खूप भरून आलं
https://www.youtube.com/watch?v=4r6ri_9bXks
शें.न., SNL एपिसोड धमाल होता
शें.न., SNL एपिसोड धमाल होता
सध्या लेट नाईट कॉमेडियन्सचे एपिसोड्स यूटयुबवर शोधून शोधून बघत आहे.
शेवटच्या डिबेटमधे ट्रंप
शेवटच्या डिबेटमधे ट्रंप म्हणाला की मी निवडणूकीचा निकाल मान्य करीनच असे नाही. त्यावरून मोठा गदारोळ झाला.
माध्यमातील प्रत्येकाने त्याला प्रवचन दिले. लोकशाही परंपरा, निवडणुकीत मिळालेला मतदारांचा कौल, जनमताचे श्रेष्ठत्व वगैरे सगळ्या विषयांना हात घालणार्या भाषणांचा सुकाळ होता. हिलरीनेही वाहत्या गंगेत हात धुवून ट्रंपवर टीकेचा भडिमार केला होता.
पण आज काय होते आहे? जिल स्टाईनसारख्या पडेल उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेन्सिल्व्हेनिया ह्या राज्यात पुनः मतमोजणीची मागणी करत आहे.
आता कोण मतदारांचा कौल अमान्य करत आहे बरे? कुठे गेल्या त्या थोर्थोर लोकशाही परंपरा?
लोकांस सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण ह्या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव म्हणायचा का हा?
किती लोकांना खात्री वाटते की पुनर्मोजणीनंतर ह्या तिन्ही राज्यातील निकाल बदलून हिलरीला जेतेपद मिळेल?
ट्रंपने निकी हेली, एलेन चाउ ह्या सारख्या अल्पसंख्य गटातील स्त्रियांना महत्त्वाच्या पदावर नेमण्याकरता विचारपूस सुरु केली आहे. स्त्रियांना तुच्छ मानणारा, त्यांना उपभोग्य वस्तू मानणारा वगैरे प्रतिमा असणार्या माणसाकडून असे वागणे सुखद आश्चर्य नाही का? (ज्यांचे तसे मत होते त्यांच्याकरता)
(ज्यांचे तसे मत होते
(ज्यांचे तसे मत होते त्यांच्याकरता) >> कॅरॅक्टर सर्टीफिकीट देण्याची घाई का इतकी ? इतकी वर्ष जे केले आहे त्याची भरपाई आहे हि असेही म्हणू शकतो.
== कॅरॅक्टर सर्टीफिकीट
==
कॅरॅक्टर सर्टीफिकीट देण्याची घाई का इतकी ? इतकी वर्ष जे केले आहे त्याची भरपाई आहे हि असेही म्हणू शकतो.
==
भरघोस मतांनी निवडून आल्यावर पापाची भरपाई करण्याचे कारण काय? जर तो खरोखरच वाईट वृत्तीचा असता तर आता मी मला हवे तसे वागायला मोकळा आहे असा विचार त्याला करता आला असता. पण तसे काही दिसत नाही. ह्याचा अर्थ माध्यमांनी आणि त्याच्या विरोधकांनी ट्रंपला काळाकुट्ट खलनायक म्हणून रंगवला होता तो अतिरंजित होता असेच वाटते आहे.
ही पापाची भरपाई उतराई वगैरे काही नसून मूळात साप साप म्हणून भुई धोपटायचा प्रकार चालवला होता तो निरर्थक असल्याची पावती आहे.
आता कोण मतदारांचा कौल अमान्य
आता कोण मतदारांचा कौल अमान्य करत आहे बरे? << अहो पण तो मतदारांचा'च' कौल आहे हे बघण्यासाठीच पुनः मतमोजणी आहे ना?
== अहो पण तो मतदारांचा'च' कौल
==
अहो पण तो मतदारांचा'च' कौल आहे हे बघण्यासाठीच पुनः मतमोजणी आहे ना?
==
ह्याला काही अंतच नाही. प्रत्येक मोजणीनंतर असा प्रश्न विचारता येईल. आपल्या मनाजोगता निकाल येईपर्यंत पुनर्मोजणी करत रहाणार का? हे काही पाकिटातल्या नोटा पुन्हा पुन्हा मोजण्याइतके सोपे काम नाही. अत्यंत खर्चिक, वेळखाऊ, किचकट काम आहे. त्यातील कायदेशीर खाचाखोचा संभाळत हे सगळे करायला लागते.
खरोखर मतमोजणीत गडबड असल्याचा काही पुरावा तरी आहे का?
असला रडीचा डाव कशाला खेळत आहे हिलरी?
Pages