अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुंद, ऑलरेडी काही लोकं की ज्यांनी ट्रंप निवडून येईल असे सांगितले होते ते त्याला रिपब्लिकन काँग्रेसच इंपिच करेल असे म्हणत आहेत. त्यांच्या मते ट्रंप ची मते खुप लिबरल आहेत. सोशल सिक्युरिटी वाढवायची आहे त्याला. वर आता अ‍ॅफोर्डेबल केअर अ‍ॅक्ट मधल्या काही गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतो आहे. इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग पण वाढवायचे आहे. हे सगळे काँग्रेस मधल्या रिप्स च्या विरोधी आहे.

पण तू म्हणतो ते बरोबर आहे: हे काळच( अ‍ॅक्चुअली ट्रंपच! स्मित ) ठरवेल.. Lol

ते ऐकुन त्याला मत देणार्‍या इव्हँजिलिकल ख्रिश्चिअन्सच्या छातीत धडकले असेल.. >>>>> Lol टोटली!

स्वाती२, मला कळलं नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचय. प्रायमरीजचा त्याच्याशी काय संबंध? बरेचसे वोटिंग हे कँडिडेट बघून गट फिलींग वर केले जाते. म्हणून तर हे कँडिडेट लोकं दणकून प्रचार करतात, थेट वोटरांच्या समोर जाऊन उभे राहतात (रॅलीज). एखादा माणूस पटला की हाऊस मध्ये कोणाची मजॉरिटी आहे वगैरे गोष्टी मॅटर करत नसाव्या. वर चोम्स्कींच्या लेखात दिलय (जे खरं कॉमन नॉलेज आहे) तसं लोकांच्या राग/हेट ची बरोब्बर नस पकडली गेली ट्रंप च्या बेधडक अप्रोच मुळे. दुर्दैवाने बाकी वोटर जे त्याच्या विरोधात मत देऊन शकत होते ते आलेच नाही आणि त्यामुळे आता ही वेळ आली आहे.

वैद्यबुवा,
मला असे म्हणायचे आहे की जे लोकं आहेत ते पार्टीच्या प्रायमरी वगैरे होवून मग इलेक्शन साठी उमेदवार किंवा रिइलेक्शनसाठी उमेदवार असे होते त्यांच्याबाबतीत हाउसमधे मेजॉरिटी हवी म्हणून त्यांना निवडून आणणे एवढेच उद्दिष्ट होते. ट्रंपला आउटसाईडर म्हणून सपोर्ट मिळाला तो प्रेसिडेंशिअल कॅडीडेड म्हणून. पण तो निवडून आल्यावर एकटा थोडाच काही करु शकणार आहे? त्यासाठी पुरेशी मेजॉरिटी हवी एवढे वर्किंग क्लास लोकांना कळते.

स्वाती२, माझा अनुभव उलट आहे. वर्कींग क्लास लोक सिनेट आणि हाऊसच्या निवडणुकांबाबत उदासीन होते. All they cared about was Trump!

शेवटच्या महिन्यात आमच्या भागात गणित भराभर बदलले. मॅन्युफॅक्चरिंग जॉबवाली वर्किंग क्लास मंडळी इथे लोकल लेवलला बरीच अ‍ॅक्टिव आहेत. गावच्या निवडणूका वगैरे लढवतात. त्यामुळे एकंदरीत समज चांगली आहे. ही मंडळी ग्रासरुट लेवलला पोहोचत होती तसे डेमोक्रॅट्सचे अजिबातच नव्हते.

हिलरी क्लिंटनने आपला पराभव मान्य करणारे भाषण निकाल लागला त्या रात्रीच का नाही केले ह्याच्या सुरस आणि खुमासदार कहाण्या बाहेर येत आहेत! खरे खोटे देवालाच ठाऊक.

"त्या" रात्री हिलरीबाई क्लिंटन विजयी होणार ह्या अपेक्षेने मोठा आनंदसोहळा योजला होता. ५ लाख डॉलर्स खर्च करुन एक काचेचे छत बनवले होते. अशी योजना होती की हिलरी स्टेजवर येताच ते भंगणार आणि त्याची शकले होणार. (ब्रेकिंग द ग्लास सिलिंग!) एक व्हाईट हाऊसची सजावट असणारा, राष्ट्रपतीची राजमुद्रा दाखवणारा आलिशान केक बनवला होता. मोठे टीव्ही बसवले होते जेणेकरून पाहुण्यांना तो सोहळा सहज पाहता यावा. हे सगळे क्लिंटन फाऊंडेशनच्या खर्चाने झाले म्हणे.

पण जेव्हा निकालाच्या बातम्या येऊ लागल्या तसा हिलरीचा पारा चढू लागला. ती इतकी संतापली की तिने महागडी शँपेनची बाटली (किंमत $१०००० मात्र!) खास ऑर्डर देऊन बनवलेल्या १५० इंची टीव्हीवर फेकली आणि दोघांचा चुराडा केला. बाकीही बराच विध्वंस झाल्याचे आढळले. काचेचे ग्लास वगैरेचीही तोडफोड झाली.

खुद्द हिलरीची स्थिती हाताबाहेर गेली होती. प्रचंड संतापामुळे ती कुणालाही आवरत नव्हती. ही परिस्थिती बघून पोडेस्टा हा तिच्या प्रचाराच्या प्रमुखाने निर्णय घेतला की हिलरी आज आपला पराभव मान्य करणार नाही आणि तसे निवेदन केले.
मुरब्बी राजकारणी आणि हिलरीचे यजमान ह्या सुमारास सोयिस्कररित्या गायब झाले होते. कुठल्या वेळी पाय काढता घ्यावा ह्याचा त्यांना पुरेसा अनुभव असल्यामुळे ते बरोब्बर निसटले. हिलरीच्या सहकार्यांनाही त्याचा ठावठिकाणा माहित नव्हता असे ऐकिवात आहे!

एका सी एन एन च्या वार्ताहराने ह्या मोडतोडीचे चित्रीकरण केले पण वरिष्टांच्या दबावामुळे हे प्रसारित होऊ शकले नाही.

याउलट परिस्थिती ट्रंपकडे. तिथे विजयसोहळा तर जाऊ द्या, पत्रकार अशी तक्रार करत होते की त्यांना साधी कॉफीही मिळाली नाही!

आता ह्यात भांडवलशाहीचे हस्तक कोण आणि समाजवादी विचारांचे कोण?

शेंन, 'असं म्हणतात बॉ!' छाप पोस्ट्स टाकण्यात काय मजा आहे मला समजत नाही, पण समजा हे खरं असेल तरी काय त्याचं?!

ट्रान्झिशनबद्दल काय मत तुमचं?

Rofl

संपूर्ण कँपेनमधे ट्रंप एव्हढे ताळतंत्र सोडून बोलत व वागत होता तरी एकदाही स्वतःची पातळी खाली न आणणारी हिलरी असं काही करेल यावर खुद्द ट्रंपही विश्वास ठेवणार नाही.

तिनी त्या वेळेला फोनवर कंन्सीड करुन त्याची वाट मोकळी करुन दिली, ग्रेशस्ली!! तेव्हा इस्ट कोस्टवर पहाटेचे ३ वाजत आले होते आणि वेस्ट कोस्ट्वर रात्रीचा एक. तिचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांना ऐकायला मिळावं ह्या हेतूनेच तिनी त्याच दिवशी सकाळी स्पीच दिलं.

ट्रंप निवडून आला तरी त्याच्या ऐवजी तिच्या ग्रेश्सनेसचं जास्त कौतुक झालं. हीच अनेकांची पोटदुखी असणार.

अफवा फॅक्टरी बंद झाली नाही म्हणायची.>> +१

शेंन ची पोस्ट वाचून मला एकदम येव्ढी मोठ्ठी यष्टी त्या म्हैशीला आदळल्यावर ती म्हस मरल नाहीतर काय दुध दील? डायलॉग आठवला Lol आता येवढं अगदी आपल्या खिशात असलेलं यश अगदी निघून गेलं म्हणल्यावर संताप होणारच ना? ती फार संयमाचा पुतळा आहे असं थोडीच आहे (ट्रंपच्या तुलनेत आहेच म्हणा).
त्या वेळी समजा ट्रंप जिंकायचे चान्सेस अगदी आदल्या दिवशी रात्री पर्यंत ७५% आणि हिलरी २५% टक्के असे असते अन इलेक्शन डे च्या दिवशी जर टोटली उलटं झालं असतं ट्रंपनी एखादी ब्लिडिंग तरी उध्वस्त केली असती. Lol

फार फार ड्रामाटिक बोलता बॉ तुम्ही शेंन. Lol

हिलरीचे सार्वजनिक रुप व खाजगीतले रुप ह्यात प्रचंड तफावत आहे.

हिलरीने प्रचंड खर्चाचे दारुकाम योजले होते त्यामुळे असा सोहळाही योजला असणे अशक्य नाही.

असे लिहिण्यामागे उद्देश? दोन घटका मनोरंजन.

एक्झिक्युटिव टिममध्ये ट्रंप त्याची मोठि मुलं आणि जांवयाचा समावेश करण्याच्या प्रयत्नात आहे. ट्रंपची मुलं/जांवई वेल एजुकेटेड, वेल बिहेव्ड आहेत तरीहि लागलीच प्रशासनात त्यांना मोठं पद देणं मलातरी थोडंसं खटकतं. ट्रंप एंपायर मध्ये असणारा त्यांचा सहभाग साहजीक आहे परंतु पब्लिक आॅफिस मध्ये डिवर्स स्टेकहोल्डर्स असताना तिथे निर्णय प्रक्रियेत, अंमलबजावणीत धुसपुस, असहकार वगैरे प्रकार डोकं वर काढु शकतात...

जेएफ्के/आरेफ्के बंधुंचा या बाबतितला ईतिहास जास्त जुना नाहि...

ह्याच्या सुरस आणि खुमासदार कहाण्या बाहेर येत आहेत!>> याचा जो काही एकिव सोर्स आहे त्याची लिन्क तर द्या!

संपूर्ण कँपेनमधे ट्रंप एव्हढे ताळतंत्र सोडून बोलत व वागत होता तरी एकदाही स्वतःची पातळी खाली न आणणारी हिलरी असं काही करेल यावर खुद्द ट्रंपही विश्वास ठेवणार नाही.>>> +१

ऑलरेडी डोकं काढलं आहे असं म्हणत आहेत बातम्यांमध्ये. डायरेक्टली मुलांशी रिलेटेड नाही पण लॉयलिस्ट्स आणि इतर स्ट्रॅटजिस्टांमध्ये. क्रिस्टीची भरपूर मदत झाली होती म्हणे पण आता डावललं त्याला (सध्या तरी). बघू आता.

नवर्याचे अफेअर्स पचवलेली स्त्री काहिही पचवु शकते. ती असे काही तोड्फोड रिअ‍ॅक्ट करेलसं वाटत नाही.

जेएफ्के/आरेफ्के बंधुंचा या बाबतितला ईतिहास जास्त जुना नाहि. >>. आरेफ्के अ‍ॅटर्नी जनरल होता ना? म्हणजेच तो पे रोल वर होता, मग त्याच्या बाबतीत ऑब्जेक्शनेबल काय होतं?

ट्रंपला secret service कडून ६ मिलिअन डॉलर्स मिळाले कँपेनिंगच्या काळात त्याच्या प्लेन मधे त्याला नि त्याच्या कुटूंबियांना संरक्षण देणार्‍या सिक्रेट सर्विस एजंटसच्या तिकिटांच्या खर्चाचे. (आकडा फेडरल इलेक्शन कमिशनने जाहिर केला आहे. आता त्यांच्या इंटिग्रिटीबद्दल कोणालाच कुठल्याच शंका नाहि आहेत Wink ) . पुढे समजा ट्रंप क्लॅन ने ट्रंपचे खाजगी प्लेन वापरले तर परत सिक्रेट सर्विस च्या बजेटमधून त्यांना एजंटसच्या तिकिटाचे पैसे दिले जातील. अर्थात ट्रंप क्लॅन ट्रंपचे खाजगी प्लेन साहजिकच सर्रास वापरते नि अध्यक्षाच्या कुटूंबियांना सिक्रेट सर्विस प्रोटेक्शन देणे हे निर्विवाद गरजेचे आहे ह्यात दुमत नसावे. फक्त ह्यात गोम अशी आहे कि हा पैसा किती असणार हे जाहिर करण्याचे बंधन सिक्रेट सर्विस वर नाही नि हा पैसा taxpayer च्या खिशातून जाणारा आहे.

अर्थात ह्या पूर्ण प्रकाराची जबाबदारी अर्थातच हिलरीवर आहे ह्याची पूर्ण कल्पना मला आहे. ती निवडून आली असती तर हे सगळे प्रकार होण्याची शक्यताच नसती.

>>आरेफ्के अ‍ॅटर्नी जनरल होता ना? म्हणजेच तो पे रोल वर होता, मग त्याच्या बाबतीत ऑब्जेक्शनेबल काय होतं?<<

भाऊ प्रेसिडेंट झाल्यावर, भावाच्या क्रुपेने...

शुगोल,
त्याच्या बाबतीत नाही पण त्यानंतर फेडरल लॉ आला. त्यामुळे प्रेसिडेंट कुटुंबीयांना कॅबिनेटमधे घेवू शकत नाही.

ट्रंपची मुलं/जांवई वेल एजुकेटेड, वेल बिहेव्ड आहेत >>> वेल एज्युकेटेड आहेत, वेल बिहेव्हडच्या बातम्या जरा गुगल केल्या तर कळतील.

बाकी शेंडेनक्षत्रांच्या कुठल्या शेपटीवर हिलरीनं पाय दिलाय कळलं तर त्यांच्या पोस्टसची सुसंगती लागू शकेल. मला आठवतंय तसं अगदी जुन्या मायबोलीत असल्यापासून क्लिंटन दांपत्याचा जहाल शब्दात उद्धार करतात. पण खरंतर आता क्लिंटन्सना सूट द्यायला हरकत नाही. खुद्द ट्रंप आता 'क्लिंटन्स आर गुड पीपल' असं म्हणालाय ;).

राज.. केनेडी फॅमिली वॉज ऑल्वेज अ प्रिव्हिले़ज्ड फॅमिली..स्टार्टींग विथ देअर फादर जोसेफ केनेडी... जो खुप श्रिमंत माणुस व एफ. डी आर च्या वेळेला ब्रिटनमधे अमेरिकेचा अँबॅसेडर होता.. Happy

हॅव्हिंग सेड दॅट्.. रॉबर्ट केनेडी अ‍ॅटर्नी जनरल व्हायच्या आधी (व नंतरही!) ही हॅड सम इंप्रेसिव्ह रेझमे.. तो जस्टिस डिपार्ट्मेंट मधे एक इफेक्टिव्ह वकील होता.. १९५० मधे पॉवरफुलल ऑर्गनाइझ्ड लेबर व त्यातल्या भ्रष्टाचाराला नष्ट करण्यासाठी त्याने जिमी जिमी हाफाशी पंगा घेण्याचे गट्स दाखवले होते. शिवाय १९५० पासुन् अमेरिकन सिव्हिल राइट साठीसुद्धा त्याने वकिल म्हणुन पुढाकार घेतला होता. १९५९ मधे त्याच्या भावाच्या कँपेनचा मॅनेजर होण्यासाठी त्याने जस्टिस डिपार्टमेंट सोडले.

अ‍ॅटर्नी जनरल म्हणुनही त्याचे काम वाखाणण्यासारखे होते.. १९६२ मधे.. जेम्स मेरेडिथ नावाच्या.. (जो मिसिसिपी च्या इतिहासातला पहिला कृष्णवर्णिय माणुस्..जो कॉलेज मधे जाउ इच्छित होता) .. माणसाच्या संरक्षणाला हजारो सैनीक त्याने तिथे पाठवले. तसच १९६४ च्या सिव्हील राइट बिलच्या ड्राफ्टिंग व पास होण्यातही त्याचा सिंहाचा वाटा होता..

(माझ्या मते तो सगळ्यात केपेबल केनेडी होउ शकला असता.)

तस ट्रंपच्या मुलांची किंवा जावयाची अशी कुठलीही वाखाणणी करण्याजोगी कामे माझ्यातरी ऐकिवात आलेली नाहीत.

असो..हे थोडे अवांतर झाले.

ट्रंपची मुलं/जांवई वेल एजुकेटेड, वेल बिहेव्ड आहेत तरीहि लागलीच प्रशासनात त्यांना मोठं पद देणं मलातरी थोडंसं खटकतं >> राज त्यांच्यापेक्षाही बॅनन ला आता आणणे अधिक धोकादायक आहे असे मला वाटते. अगदी नुकतेच ५ Nov ला ट्रंप बरोबरच्या मुलाखतीमधे त्याने IT मधिल एशियन्स च्या (mind you, Asians च्या, immigrants Asians च्या नाही) वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

रॉबर्ट की टेड केनेडी लक्षात नाही, पण यातील एक बांगला देश युद्धाच्या वेळेस भारताचा प्रचंड मोठा समर्थक होता, जेव्हा निक्सन आणि किसिंजर पाकला सपोर्ट करत होते (कारण पाक च्या मदतीने चीन शी राजनैतिक संबंध त्यांना वाढवायचे होते).

असामी, मला आधी कळलच नाही. मला वाटलं "माईंड इट" एशियन्स सारखे "माईंड यु" एशियन्स पण आहेत की काय. Lol
एकंदरित टोटल अगदी व्हाईट सुप्रिमसिस्ट शोभावे असले एकेके नमूने आहेत सगळे. We just have to ride this one out!

>>बॅनन ला आता आणणे अधिक धोकादायक आहे असे मला वाटते.<<

सहमत आणि ती शक्यता कमी वाटतेय. सेनेट ते प्रपोजल धुडकावुन लावेल यात शंका नाहि. ॲट द मोस्ट, बॅनन ट्रंपच्या किचन कॅबिनेट मध्ये असेल...

जवळच्या नातेवाईकांना कॅबिनेट किंवा इतर महत्वाचं पद देण्याला कायद्याने बंदि आहे, तरी त्यातहि पळवाटा आहेतच. बिलने नेमलेलं हिलरीला कुठल्याशा कमिटीवर (आणि त्या कमिटीचं पुढे काय झालं हे माहित असेलंच...) Wink

मुकुंद, फॅमीली मेंबर्स प्रेसिडेंटच्या इनर सर्कल (डिसीजन मेकिंग प्रोसेस) मध्ये असणे डझंट जेल विथ दि ॲडमिनीस्ट्रेशन - हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता... Happy

Pages