अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घडण्यात ट्रंपने पुढाकार घेतल्यामुळे ट्रंपविरोधकांना ही घटना आवडणे अवघड आहे. काहीतरी खुसपट काढले जाईलच. पण इथे कंपनीबरोबर त्यात काम करणार्‍या कामगारांचाही फायदा आहे हे दुर्लक्षित करता येणार नाही.

केवळ पैसे वाचवायला अमेरिकेच्या बाहेर दुकान उघडणे हे तितकेसे किफायतशीर नाही असे जाणवू लागले तरी बराच फायदा होईल. जर बाकीचे देश उद्योग आपल्याकडे यावेत म्हणून झटत असतील तर असलेले उद्योग टिकावेत म्हणून ट्रंप झटत असेल तर चूक काय?

निवडणूकीत दिलेले एक आश्वासन पाळून ट्रंप एक अत्यंत घातक आणि अनिष्ट पायंडा पाडत आहे हे मात्र खरे!

१००० तरी जॉब राहिले हे उत्तमच झाले फक्त "गवर्मेंटचा जिकडे तिकडे हस्तक्षेप नको, small federal government " फुटकळ वगैरे मुद्द्यांचे काय झाले इथे ? Wink

==
फक्त "गवर्मेंटचा जिकडे तिकडे हस्तक्षेप नको, small federal government " फुटकळ वगैरे मुद्द्यांचे काय झाले इथे?
==

सरकारी हस्तक्षेप नको असे ट्रंप सरसकट म्हणालेला नाही. वाट्टेल त्या बाता करु नका. सीमेवर भिंत बांधणे, बेकायदा घुसखोरांची उचलबांगडी, परक्या मालावर कर, आयसिसचे उच्चाटन हे सरकारी हस्तक्षेपाशिवाय शक्यच नाही. आणि हे सगळे मुद्दे त्याच्या आश्वासनात होते.

नवे उद्योग उघडताना विशेषतः छोट्या उद्योगांना अनेक वेळा अडवले जाते. तो हस्तक्षेप कमी करण्याबद्दल तो बोलला होता.

सदर कॅरियरच्या प्रसंगात केंद्रीय सरकारचा आकार वाढल्याचे माझ्या तरी निदर्शनास आलेले नाही. मुळात केंद्रात ट्रंप सत्तास्थानी नाहीच त्यामुळे त्याच्याकडे हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही. तेव्हा हे वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग कशाला? जे काही करायचे ते पेन्सने राज्यपाल म्हणून केलेले आहे.

अरे त्या carrierची parent कंपनी बघा कोण आहे, united technologies. आर्मी सप्लाईज हा मेन धंदा. It's a no brainer what must have happened in the background.

त्याबद्दलच्या बातम्यांच्या हेडलाइन्स फॉक्स आणि सीएनेन वर एकाच वेळी साधारण अशा होत्या :
फॉक्स - "POETUS" meets happy employees at carrier company after saving 1000 jobs.
सीएनेन - Trump claims to have saved Carrier jobs, visits the company
Happy

सरकारी हस्तक्षेप नको असे ट्रंप सरसकट म्हणालेला नाही >> ट्रंप ज्या पार्टी साठी निवडून आला आहे त्यांचा हा स्टान्स आहे.

मुळात केंद्रात ट्रंप सत्तास्थानी नाहीच त्यामुळे त्याच्याकडे हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही. मुळात केंद्रात ट्रंप सत्तास्थानी नाहीच त्यामुळे त्याच्याकडे हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही. तेव्हा हे वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग कशाला? जे काही करायचे ते पेन्सने राज्यपाल म्हणून केलेले आहे. >> कमाल आहे "हे घडण्यात ट्रंपने पुढाकार घेतल्यामुळे .... " हे वरचे हिलरी ने लिहिलेले कि काय ? ह्या डीलचे क्रेडीट घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कँडीडेट्ची धावाधाव सुरु का आहे नक्कि मग ? केंद्रात ट्रंप सत्तास्थानी असल्यासारखेच वागणे सुरू आहे. जर president elect नसता तर त्याच्या पुढाकाराला भीक घालणार होते का कोणी ?

मै Lol

==
ट्रंप ज्या पार्टी साठी निवडून आला आहे त्यांचा हा स्टान्स आहे.
==
ट्रंप प्रस्थापित रिपब्लिकन पक्षापेक्षा खूप वेगळा आहे आणि हे अनेकदा अधोरेखित झालेले आहे. किंबहुना त्यामुळेच तो जिंकला आहे. त्यामुळे त्याच्या पक्षाची धोरणे जशीच्या तशी राबवायला तो बांधिल नाही. प्रस्थापित रिपब्लिकन लोकांनी निवडणूक होईपर्यंत त्याला तीव्र विरोध केला आहे हे मी तरी विसरलेलो नाही. बुश, रॉमनी, लिन्ड्से ग्रॅहम, मॅकेन, निकी हेली, बॉबी जिंदाल, पूर्ण यादी प्रचंड मोठी होईल. तात्पर्य पार्टीचा स्टान्स हा मुद्दा पूर्ण गैरलागू आहे.

==
"हे घडण्यात ट्रंपने पुढाकार घेतल्यामुळे .
==
अहो पुढाकार घ्यायला केंद्रसरकारमधे सहभाग असणे बंधनकारक नाही. पण त्याने तरीही ते केले. "सध्याच्या व्हाईट हाऊसच्या रहिवाशाला" अशा कुठल्याही उद्योगात काहीही स्वारस्य असल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्याबाजूने काही हालचाल होणे अशक्य आहे.

ट्रंपला श्रेय द्यावे का नाही हा मुद्दा आहे का त्याच्या वागण्याने सरकारी हस्तक्षेप होतो हा मुद्दा आहे?
ट्रंपला श्रेय द्यायलाच पाहिजे. कारण तो अशा आश्वासनावर निवडून आला आहे आणि तो ते पाळत आहे. मग त्याकरता उपराष्ट्रपतीच्या सध्याच्या पदाचा वापर झाला तर मला तरी गैर वाटत नाही. आणि नवे सरकार बनलेले नसल्यामुळे केंद्रीय सरकारने इथे काहीही केलेले नाही. दोन्ही मुद्दे बाद आहेत.

इथे एक आठवण करुन दिली पाहिजे. काही वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात सॉलिंड्रा नावाची सौर पॅनेल बनवणरा उद्योग कॅलिफोर्नियात सुरु झाला होता. अनेक दशलक्ष डॉलर करदात्यांकडून घेऊन ह्या कंपनीला आंदण दिले होते. खाशा स्वारीने (अर्थात ओबामा) उद्घाटन सोहोळ्यात उपस्थिती लावून नवे चैतन्य निर्माण केले होते. आता सौर ऊर्जेला चांगले दिवस आले असे अनेक तज्ञ छातीठोकपणे सांगत होते. पण हर हर! हा हंत हंत नलिनी गज उज्जहार! ह्या काव्यपंक्तीप्रमाणे काही दिवसांनी ह्या कंपनीच्या चालकांनी सगळे पैसे खिशात घातले, दिवाळे घोषित केले आणि कंपनी बंद केली. सगळे कामगार बेकार झाले.
नंतर त्या चालकांची हाउसेस मधे पूछ्ताछ झाली त्यावेळेस टेकिंग द फिफ्थ हा प्रकार इतक्या वेळेस झाला की तो एक विनोद विषय झाला. नंतर त्या प्रकरणाचे काय झाले, कोर्टात गेले का? पैशाच्या अपहाराकरता शिक्षा झाली का ? काही नाही. माध्यमांनी हा विषय शांतपणे संपवला.

ओबामाच्या मायडस टच लाभलेल्या कंपनीने काय सौर दिवे लावले ते दिसलेच आहे. इथे निदान प्रस्थापित कंपनी आहे आणि त्यातले निदान काही कामगार उपजिविकेचे साधन टिकले म्हणून समाधानी असतील.

आता ह्याला कॉन्स्पिरसी थियरीची फोडणी देऊन विषय चमचमीत करायचा असेल तर जरूर करा!

>>ह्या डीलचे क्रेडीट घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कँडीडेट्ची धावाधाव सुरु का आहे नक्कि मग<<

कमाॅन गाय्ज, बी पेशंट ॲंड गिव क्रेडिट व्हेर इट्स ड्यु. आणि प्लीज, प्लीज इथे रुदाली गॅंगची शाखा उघडु नका... Happy

दोन्ही मुद्दे बाद आहेत. >> असे तुमचे मत आहे. तुम्ही सोयस्करपणे ट्रंप कँपमधून जे बोलले जाते आहे तेव्हढे बाजूला करून बोलता आहात हे मुद्दे बाद न होता अधिकच अधोरेखित होत आहेत. ट्रंप निवडनूकीच्या आधी काय बोलला होता ह्याची आठवण तुम्हाला करून द्यायला लागते ह्यापेक्षा क्रूर विनोद नसावा हे त्याचे उद्गार. "What you do is you tell them, ‘You move to Mexico, you`re going to pay a 35 percent tax bringing these products that you make in Mexico back into the country.’” he’d use a stick rather than a carrot. इंसेंटिव्ह्ज, टॅक्स ब्रेक देऊन काही होत नाही.

सॉलिंड्रा हे एकमेव बॅकरप्ट झालेली कंपनी आहे का ? ती स्वत ओबामा चालवत हो ता असा तुमचा दावा आहे का ? फक्त ओबामा नि हिलरी हि नावे धरली कि प्रत्येक मुद्द संपतो का ? ट्रंपच्या किती कंपन्या बॅकरप्ट झाल्या आहेत ह्याची कल्पना तुम्हाला असेल अशी आशा धरतो. ७ मिलीयन हे ट्रंप किंवा पेन्स त्यांच्या खिशातून देणार आहेत का ?

राज क्रेडीट द्यायची गरजच पडत नाहीये इथे शे.न. आधीच हिसकावून बसलेलेले आहेतच Wink

असामी, दो आय कोटेड यु इट वाॅज ए जेनरीक कमेंट. तिथे मोदि शिंकले तरी प्रदुषणाची सुनामी येते. कंस्ट्रक्टिव क्रिटिसीजम इज आॅल्वेज वेलकम, आॅल आयॅम सेइंग इज लेट्स किप द बंच आॅफ व्हायनर्स ॲट बे... Happy

हॅविंग सेड धिस, आयॅम इगर टु वाॅच चायनीज रिॲक्शन टु ए डायरेक्ट डायलाॅग वीथ टैवान. होप ट्रंप इज नाॅट टेकिंग टु मच स्टफ आॅन हिज प्लेट इन फर्स्ट १०० डेज...

==
ट्रंप निवडनूकीच्या आधी काय बोलला होता ह्याची आठवण तुम्हाला करून द्यायला लागते ह्यापेक्षा क्रूर विनोद नसावा हे त्याचे उद्गार. "What you do is you tell them, ‘You move to Mexico, you`re going to pay a 35 percent tax bringing these products that you make in Mexico back into the country.’” he’d use a stick rather than a carrot. इंसेंटिव्ह्ज, टॅक्स ब्रेक देऊन काही होत नाही.
==

ट्रंपने असे कुठेही म्हटले नाही की मी फक्त आणि फक्त धमक्याच वापरून कंपन्याना स्थलांतरापासून परावृत्त करेन. मी एक सौदा करणारा व्यापारी आहे आणि मी ते कौशल्य वापरून हवे ते साध्य करीन असे त्याचे म्हणणे होते. आणि त्याचे वर उद्धृत केलेले वाक्य कॅरियरकरता खास उद्देशून असेल असे वाटत नाही. तेव्हा त्यात क्रूर वा प्रेमळ असा कुठलाही विनोद नाही.

योग्य ती इन्सेन्टिव असतील तर अपेक्षित परिणाम होतो ह्याची खात्री बाळगा.
===
१. सॉलिंड्रा हे एकमेव बॅकरप्ट झालेली कंपनी आहे का ?
२. ती स्वत ओबामा चालवत हो ता असा तुमचा दावा आहे का ?
३. फक्त ओबामा नि हिलरी हि नावे धरली कि प्रत्येक मुद्द संपतो का ?
४, ट्रंपच्या किती कंपन्या बॅकरप्ट झाल्या आहेत ह्याची कल्पना तुम्हाला असेल अशी आशा धरतो
५.. ७ मिलीयन हे ट्रंप किंवा पेन्स त्यांच्या खिशातून देणार आहेत का ?
===
क्रमाने उत्तरे देतो.
१. नाही. पण जवळजवळ १ अब्ज डॉलर करदात्यांनी दिलेली ही एकमेव कंपनी असावी. सरकारने हे पैसे त्वरित उपलब्ध करुन द्यावेत ह्याकरता जो बायडन ह्यांनी मोठा पुढाकार घेतला होता. अर्थातच त्यात काही स्वार्थ नसेलच!

२. ओबामा चालवत नव्हता तरी कुठेतरी पाणी मुरते आहे इतपत संशय येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्याला पैसे पुरवणार्‍या लोकांचे हितसंबंध ह्या कंपनीशी होते हे वॉशिंग्टन टाइम्सच्या एका लेखात म्हटले आहे. काइसर हा एक ओबामाला पैसे पुरवणारा दाता. त्याने ह्या कंपनीत पैसे गुंतवले होते. करारात त्याने अशी मेख मारुन ठेवली होती की जर कंपनी दिवाळखोर झाली तर सरकारचे पैसे परत करण्याआधी काइसरचे पैसे आधी परत केले पाहिजेत. ही काही सरळ सोपी गोष्ट नाही. सरकारने इतके पैसे दिलेले असूनही करारात मात्र सरकारला दुय्यम भूमिका ह्यामागे काहीतरी काळेबेरे आहे आणि त्याचे संबंध ओबामाशी आहेत असे दिसते आहे. बेकायदेशीर नसले तरी अनैतिक तरी आहेच.

३. नाही. पण असा मुद्दा बर्‍याचदा हुकुमी एक्का ठरतो! ओबामा सरकारच्या पुढाकाराने जवळजवळ ०.५ अब्ज डॉलरच्या करदात्यांच्या उत्पन्नाचा चुराडा झालेला आहे. आणि कुणालाही शिक्षा झालेली नाही. तेव्हा ट्रंपला शिव्या घालताना हा इतिहासही विचारात घ्यावा. निरर्थक दिवास्वप्नाच्या मागे अब्जावधी पैसे ओतणे जास्त बरे की खरोखर उत्पादन असणार्‍या कंपनीला त्यापेक्षा कितीतरी कमी पैशाचे गाजर दाखवून अमेरिकेत नोकृया टिकवणे चांगले?

४. ट्रंपला करदात्यांनी किती पैसे दिले होते? दिवाळखोरी हा गुन्हा नाही. ती एक आर्थिक खेळी आहे. ती पूर्णपणे कायदेसंमत आहे. स्वतःच्या पैशाने उभारलेल्या उद्योगाचे दिवाळे काढायला लागले तर लगेच त्याची सॉलिंड्राशी तुलना होत नाही.

५. आजिबात नाही. पण ज्यांच्या नोकर्‍या टिकणार आहेत ते सगळे काही ट्रंप वा पेन्सचे मतदार, नातेवाईक वा फंडदाते नाहीत. त्यामुळे करदात्यांच्या पैशाने करदात्यांचेच भले होत असेल तर ते सॉलिंड्रापेक्षा कितीतरी चांगले नाही का?

हा तो लेखः

https://www.washingtonpost.com/blogs/the-fix/post/solyndra--explained/20...

ह्यात असेही म्हटले आहे की जवळजवळ ४ अब्ज डॉलर इतके करदात्यांचे पैसे ओबामाच्या ऊर्जा मंत्रालयातील लोकांच्या कंपन्यांना दिले गेले.

आता टंपजी निवडून आले आहेत. त्यांना पुरेसा अवधी द्यायला हवा. त्यानंतरच त्यांच्याबद्दल बोलता येईल. त्यांना वेळ तरी द्या. त्याआधीच ट्रंपद्वेषातून टीका करत बसण्याने काय होणार आहे ?

==
आता टंपजी निवडून आले आहेत. त्यांना पुरेसा अवधी द्यायला हवा.
==

इतकी घाई नको. अजून ट्रंपच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब व्हायचे आहे. तो शपथ घेईपर्यंत ट्रंप राष्ट्रपती बनेल ह्याची खात्री देता येत नाही. पुढचा अडथळा हा प्रत्येक राज्याच्या इलेक्टरने जनतेने निवडलेल्या नेत्याला मान्यता देणे हा आहे. जर विस्कॉन्सिन, मिशिगन वा फ्लोरिडाच्या इलेक्टर गटाने त्या त्या राज्याचा निर्णय अमान्य केला तर निर्णय बदलू शकतो. असे पूर्वी कधी घडलेले नाही. पण आताही घडणार नाही अशी शाश्वती नाही. कारण ट्रंप हा उच्चभ्रू लोकांना आवडत नाही. त्याची निवड रद्द करण्याची कुठलीही संधी ते दवडणार नाहीत. दोन आठवड्यात ह्याचा निकाल लागेल. मग कदाचित तो राष्ट्रपती बनण्याची शक्यता थोओओडी वाढेल.

गंमतीची गोष्ट अशी की शेवटच्या डिबेटमधे त्याने जे संदिग्ध विधान केले त्यावरून तो जनतेचा निर्णय सहजासहजी मान्य करणार नाही असे ध्वनित होत होते. त्यावरुन हिलरी, ओबामा आणि अन्य थोर थोर नेत्यांनी त्याला लोकशाही प्रक्रिया, देशाची उज्ज्वल परंपरा, शांततापूर्ण हस्तांतरण ह्या विषयावर पु. लंच्या भाषेत सांगायचे तर "टॅण टॅण टॅण" असे व्याख्याने दिली आहेत. पण आता हिलरी उलट निवडणूकीच्या निकालापुढे प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

तात्पर्य ८ नोव्हेंबरला अमेरिकेचे भविष्य निश्चित झालेले नाही. अजून बरेच उपचार बाकी आहेत.

तात्पर्य ८ नोव्हेंबरला अमेरिकेचे भविष्य निश्चित झालेले नाही. अजून बरेच उपचार बाकी आहेत.
हे बरोबर असले तरी तसे काही होईल असे मला वाटत नाही. वैयक्तिक मत. कारणे काहीहि असोत.

परंपरा बदलायला अनेक वर्षे लागतात. ट्रंपसारखे लोक तो बदल लवकर घडवून आणू शकतात. तो यशस्वी होवो, अमेरिकेचे भले होवो. (माझे पण भले होवो), इथल्या राजकारणातील बर्‍याचश्या परंपरा मोडल्या तर जरा बरेच होईल.

अजूनही लोक निवडणूकीचा निर्णय सहजासहजी मान्य करताना दिसत नाहीत. आता रशियन हॅकर्सनी निवडणूकीवर प्रभाव टाकून निर्णय फिरवला असे काहींचे मत बनताना दिसत आहे.

काही इलेक्टर्स तरी आपले मत फिरवणार हे नक्की. जर त्यामुळे निवडणूकीचा निर्णय उलटला तर काही तरी उत्पात होणार असे वाटते.

डेमोक्रॅट्स आणि अन्य विरोधक निमूट निर्णय मान्य का बरे करत नाहीत? जर ट्रंप हा त्या पदाकरता अनुचित असेल तर आणखी चार वर्षांनी संधी मिळणारच आहे. मग असले रडीचे डाव कशाला?

लोकशाही परंपरेचे नि प्रक्रियेचे ट्रंपला भरपूर डोस पाजणारे ज्ञानी लोक स्वतःची पाळी येताच कोरडे पाषाण का बरे बनतात?

काही इलेक्टर्स तरी आपले मत फिरवणार हे नक्की.
मला असे वाटत नाही. पक्षांमधे प्रचंड वैर निर्माण झाले आहे. डेमोक्रॅट्स नी जे केले ते सगळे फार वाईट होते अशी सर्व रिपब्लिकन लोकांची खात्री आहे. ट्रंप या व्यक्तीबद्दल काहीहि मत असले तरी तो रिपब्लिकन पक्षातील लोकांना संमत असे धोरण ठेवणार म्हणून पक्षाचा प्रतिनिधी राष्ट्राध्यक्ष असावा हे महत्वाचे आहे.
प्रश्न एकट्या ट्रंपचा नाही - सुप्रिम कोर्ट, रिपब्लिकन पक्षाचे धोरण यांचा आहे.

त्यातून माझे स्वतःचे मत असे आहे की ट्रंप हा कामकाजात फारशी ढवळाढवळ करणार नाही, त्याने निवडलेले लोक यांच्यावर सोपवून तो नुसता निर्णय घेईल, नि तो कितीही आडमुठ्ठा असला तरी सिनेट, काँग्रेस इ सर्व मिळून त्याला विरोध करू शकतील, नाहीतर तेच त्याला इम्पिच करतील असे अभूतपूर्व काहीतरी घडेल.

रशियन हॅकर्सनी निवडणूकीवर प्रभाव टाकून निर्णय फिरवला >>> हे खरे असण्याच्या शक्यतेवर ट्रंप स्वतः शिक्कामोर्तब करतो आहे असं वाटतं. कारण कालच त्यानी ज्याला "सेक्रेटरी ऑफ स्टेट" चा संभाव्य उमेदवार म्हणून निवडले त्याचे रशिया आणि पुटिन बरोबर घनिष्ट संबंध आहेत.

==
कारण कालच त्यानी ज्याला "सेक्रेटरी ऑफ स्टेट" चा संभाव्य उमेदवार म्हणून निवडले त्याचे रशिया आणि पुटिन बरोबर घनिष्ट संबंध आहेत.
==
हा पुरावा म्हणून कोर्टात टिकेल का? एवढ्या पुराव्याच्या जोरावर निवडणूकीचा निकाल रद्द ठरवता येईल का? ह्याहून काही ठोस पुरावा मिळाला तर पहा.

हा पुरावा म्हणून कोर्टात टिकेल का? एवढ्या पुराव्याच्या जोरावर निवडणूकीचा निकाल रद्द ठरवता येईल का? ह्याहून काही ठोस पुरावा मिळाला तर पहा. >> शेडे +१ ह्यामुळेच एफबीआय जी पुरावे आणि कोर्टात टाकणारी आर्ग्युमेंटला महत्त्व देते आणि सी आय ए जी इंटेलिजन्स वर लक्ष ठेवते त्यांचा व्ह्यू वेगवेगळा आहे. कोन्ग्रेशनल कमिटीसमोर काही होतंय का बघुया.

गुगल, फेसबुक, अ‍ॅपल, टेस्ला आणि इतर टेक हेड्स उद्या ट्रंपला भेटायला वाड्यावर चाललेत. बघुया इमिग्रेशन, विसा , कोर्पोरेट tax, एन्क्रिप्शनवर काय बातम्या येतायत.

http://www.huffingtonpost.com/entry/trump-intelligence-briefing_us_584d6...

मला प्रश्न पडला आहे की काही बदल आहे अथवा नाही, काही दखल घेण्यायोग्य आहे अथवा नाही हे ठरवणं कोणाचं काम आहे? आतापर्यंतचे प्रेसिडन्ट्स स्मार्ट नव्हते काय?

>>“I don’t have to be told the same thing in the same words every single day,” Trump said in an interview airing on “Fox News Sunday.” “I don’t need to be told ... the same thing every day, every morning ― same words. ‘Sir, nothing has changed. Let’s go over it again.’ I don’t need that.”<<

बर्याचदा ब्रिफिंगचं स्वरुप वर म्हटल्यासारखं असल्यास आय काइंडा अग्री विथ हिम. माॅर्निंग स्टॅंडअप लिडरशीप मिटिंग्जमध्ये हाॅट टाॅपिक्स व्यतिरिक्त काहि अजेंडावर असतं का? आणि नविन हाॅट टाॅपिक नसल्यास मिटिंग होते का?..

आतापर्यंतचे प्रेसिडन्ट्स स्मार्ट नव्हते काय?
छे: छे:, ट्रंपपेक्षा कुणीच जास्त हुषार नाही. शिवाय त्याने स्वतःच सांगितले की तो हुषार आहे, याहून आणखीन पुरावा कशाला? काय दखल घेण्याजोगे आहे हे त्याचे सल्लागारच ठरवतील. आणि काय करायचे ते करतील, नाहीतर You are fired म्हणून तो त्यांना हाकलून देईल.की एक एपिसोड संपला अप्प्रेन्टिसचा. Proud

त्याचे रशिया आणि पुटिन बरोबर घनिष्ट संबंध आहेत.
म्हणूनच संशयाला जागा आहे, त्यात निवडणुकीवर परिणाम झाला नसला तरी रशियानी जे केले तसे पुनः होऊ देणे एकूणच देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. म्हणून चौकशी करा म्हणताहेत. तेच बघायला ओबामा सांगतो आहे.

शेंडे, असे ट्रंपसारखे लगेच भडकून जाऊन ट्वीट करू नका.
अजून असे कुणीच म्हंटले नाही की केवळ त्याचे रशिया आणि पुटिन बरोबर घनिष्ट संबंध आहेत, म्हणून निवडणूक रद्द करा.
जर खरेच परिणाम झाला नाही असे वाटत असेल तर भडकता कशाला, करू दे काय चौकश्या करायच्या ते, अजून काही दिवस आहे ओबामाच प्रेसिडेंट नि त्याचे सर्व हक्क शाबूत आहेत, तुम्ही काय वाट्टेल ती टीका करा.
काही दिवसात तुमच्या हाती सत्ता आली की लग्गेच काय करायचे ते करा.
शहाणपणा असेल तर ट्रंपने जरा गप्प बसून स्वतःची कामे करावी. आता निवडणूक संपली आता कुणाला शिव्या देणे, खोटे आरोप करणे हे बंद करावे.

शेंन, तो पुरावा नाही पण पॅटर्न म्हणून उपयोगी पडू शकतो. असो. मला कायद्याचं ज्ञान नाही.

काही नाही तरी कन्फर्मेशनसाठी ( कॅबीनेट पोस्टच्या) आड येऊ शकेल.

सशल >> +१

राज, नक्की किती हॉट झालं की करणार अटेंड? बर्निग हॉट टॉपिक रोज नसणार हे खरच आहे. रिपीटीटीव्ह मध्ये वेळ जात असेल तर त्यावर काही सोल्युशन काढणार का बंद करणे हेच फक्त सोल्युशन आहे?
प्रत्येक प्रेसिडंटची वेगळी स्टाईल असते जसे ओमाबा प्रिफरस इन रिटन फॉर्म बुश ब्रीफिंग प्रिफर करायचा असं ऐकलं. एका आठवड्यात राईट ऑफ करणं हे पेंडयुलमचं दुसरं टोक झालं.

आय्ला, ब्रिफिंग बंदच करुन टाका असं कुठे म्हणतोय तो? फक्त नविन काहि असेल तर ब्रिफ करा असं म्हणतोय, त्यात काय चुक आहे. प्रेसिडेंटचा तोच वेळ दुसर्या एखाद्या महत्वाच्या कामाकडे वळवता येउ शकतो...

फक्त नविन काहि असेल तर ब्रिफ करा असं म्हणतोय, त्यात काय चुक आहे.
काहीच नाही. असले निरर्थक, वेळ घालवणारे प्रघात बंद पाडलेच पाहिजेत. नुसताच प्रेसिडेंटचा नव्हे तर जे ब्रिफिंग करायला लोक जमले असतात त्यांचाहि वेळ जातो. त्यातून गरज वाटली तर मी एक मिनिटाच्या अवधीत हजर राहू शकेन असे त्याने म्हंटलेच आहे.
काही मॅनेजर हँड्स ऑन असतात, काही नसतात, त्यात काय नवीन.

उगाच ट्रंपने काही म्हंटले की त्यातून काहीतरी भलतेच अर्थ काढायचे नि ओरडा करायचा हे विरोधी पक्षाचे धोरण असते. ओबामालाहि रिपब्लिकन लोकांनी, विशेषतः फॉक्स न्यूज ने हेच केले. त्यालाच राजकारण म्हणतात - राजकारण नि देशाचे भले होईल असे राज्य चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
ट्रंपने जर ट्वीट करणे बंद केले नि इतर गोष्टीत लक्ष घातले तर बरे - जे विरोधात असतील त्यांचा समाचार घ्यायला फॉक्स न्यूज आहेच, शिवाय इतरहि, शेंडेनक्षत्र, राज वगैरे. ट्वीट करण्यापेक्षा एखादे ब्रिफिंग परत ऐकले तर काही वाईट नाही.

==
शेंडे, असे ट्रंपसारखे लगेच भडकून जाऊन ट्वीट करू नका.
==
मायबोलीवर प्रतिसाद देणे ह्याला ट्वीट म्हणू लागले का आजकाल? हे नविनच. आणि मी भडकलो आहे हे कसे ठरवलेत? मी भडकलेलो वगैरे नाही. काळजी नसावी.

==
शेंन, तो पुरावा नाही पण पॅटर्न म्हणून उपयोगी पडू शकतो. असो. मला कायद्याचं ज्ञान नाही.
==
अहो पॅटर्न म्हणून वापरायला ते काही विणकाम वा भरतकाम आहे का? उद्या कोणी म्हणेल की ट्रंप जगाचा नकाशा उघडून रशियाकडे निरखून बघत होता म्हणून निवडणूक रद्द करा.

==
जर खरेच परिणाम झाला नाही असे वाटत असेल तर भडकता कशाला, करू दे काय चौकश्या करायच्या ते, अजून काही दिवस आहे ओबामाच प्रेसिडेंट नि त्याचे सर्व हक्क शाबूत आहेत, तुम्ही काय वाट्टेल ती टीका करा.
==
पुन्हा तेच. मी भडकलेलो नाही. गरजही नाही त्याची. ओबामा हा निवडणुकीचे पावित्र्य जपावे म्हणून हे उद्योग करत आहे की खाजवून खरूज काढण्याचा हा उबग आणणारा प्रकार आहे ह्याविषयी मला शंका वाटू लागली आहे. जातीने निवडणूकीत प्रचारात उतरून ट्रंपविरुद्ध प्रचंड गरळ ओकणारा ओबामा काही ना काही तरी खुसपटे काढून ही निवडणूक रद्द करू पहातो आहे की काय अशी शंका येते आहे. निकाल जाहीर झाल्यावर मारे तोर्यात आवडो वा नावडो, मी शांततापूर्ण हस्तांतरण करण्याकरता बांधिल आहे वगैरे व्याख्याने झोडणार्‍या खोटारड्या माणसाचे पितळ आता उघडे पडू लागले आहे असे वाटते.

अहो, शें न, जरा सा. ज्ञा. वाढवा. एकसारखी गोष्ट / कृती वारंवार केली की त्याला पॅटर्न म्हणतात. एखाद्या वीक पुराव्याला पुष्टी देण्यासाठी वर्तणुकीतला पॅटर्न उपयोगी पडतो. बाकी तुम्हाला विणकामाची सवय दिसतीय हां! तोच पॅटर्न बरा आठवला तुम्हाला! Wink

आणि निवडणूक रद्द म्हणत असाल तर माझं वैयक्तिक मत आहे की, नको! पुन्हा निवडणूक नको. ट्रंपच्या बेताल वक्तव्यांचे झाले तेवढे अत्याचार बास झाले. चांगलं काम केलं तर तो ४ वर्षे तगेल. नाहीतर स्वतःच्याच करणीनी जाईल बाराच्या भावात.

Pages