अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओबामा हा निवडणुकीचे ..................... पहातो आहे की काय अशी शंका येते आहे.

फक्त चौकशी व्हावी असे ओबामा म्हणतो नि त्याला रिपब्लिकन पार्टीतल्या लोकांचा पाठिंबा आहे.
भडकले म्हंटल्याबद्दल सॉरी, क्षमस्व.

आज ट्रंपची अजून एक अग्निपरीक्षा : सामान्यतः इलेक्टर मत देतात ते आपापल्या राज्यातील मतदारांचा कौल पाहूनच. कुणी आजवर आपले वेगळेच मत दिलेले नाही. निवडणूकीतील हा टप्पा अस्तित्त्वात आहे हेही इतके दिवस जाणवले नव्हते. पण ट्रंपच्या बाबतीत सगळेच वेगळे असते. त्यामुळे इथेही नाट्यपूर्णता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा आहे! निर्णय उलटणार की काय अशी शंका येण्याइतपत वातावरण तंग आहे. बघू या.

शेंन, >>कुणी आजवर आपले वेगळेच मत दिलेले नाही >> हे खोट आहे. https://en.wikipedia.org/wiki/Faithless_elector नजीकच्या भूतकाळात एकापेक्षा जास्त इलेकटर पलटलेले नाहीत, पण आजवर असे अनेक इंसिडन्स झाले आहेत. आत्ताही पब्लिकली एकच इलेक्टर मत बदलणारे असं दिसतंय, खरं काय ते कळेलच काही तासात.

ओके. माझे म्हणणे असे की ह्या इलेक्टरच्या मतदानात आजवर कधीही मतदारांचा कौल बदललेला नाही. राज्याने अ उमेदवाराला कौल दिला आणि इलेक्टरांनी मात्र ब उमेदवाराला पसंती दिली असे झालेले नाही. एखादा इलेक्टर टोपी फिरवत असेल पण पूर्ण राज्याचे इलेक्टर तसे करताना दिसलेले नाहीत.
दुरुस्तीबद्दल आभार.

परवाच्या 'टेक' मीटिंग मधे ट्रम्प ची मुले का बसली होती? त्यांची काही बॅकग्राउण्ड आहे, की नवीन अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन मधे त्यांचा काही रोल आहे?

सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते!
म्हणूनच ट्रंप किंवा त्याची मुले कुठल्याहि क्षेत्रात सर्वज्ञ आहेत. खुद्द ट्रंपसुद्धा म्हणाला होता - सर्व जनरल्स पेक्षा त्याला आय्सिस ची जास्त माहिती आहे(?!),

त्याच्या मुलांची इन्वॉल्वमेंट टोटली समजते का असेल ते. त्याला विश्वासू, खंदे असे कोणी सपोर्टर असतील तर त्याची मुलच. त्याला ऑलमोस्ट दुसरा ऑप्शनच नाहीये पण त्या नादात तो नियम मात्र धाब्यावर बसवत आहे.

तो नियमच काय सगळी घटनाच बदलणार आहे, आणि त्याला रिपब्लिकन काँग्रेसचा पाठिंबा मिळेल.
बारक्याला एके ४७ चालवायला शिकवा. पुढल्या वर्षी परीक्षेत विचारतील, उगाच त्याचा पहिला नंबर चुकायला नको.

काही मुद्दे असे
१. अजून ट्रंप राष्ट्रपती झालेला नाही. अजून बरेच सोपस्कार व्हायचे आहेत. त्यामुळे ही सरकारतर्फे आयोजित केलेली नाही.
२. तंत्रजगतातील नेत्यांशी झालेली भेट ही अनौपचारिक होती. त्यामुळे निवडणूकीच्या प्रचारात सहभागी असणारे लोक ट्रंपच्या वतीने उपस्थित होते. माईक पेन्सही होता.
३. बहुतेक तंत्रजगत हे ट्रंपविरोधी आहे. त्यांना असे सांगणे की आता मी निवडून आलेलो आहे त्यामुळे आवडो किंवा नावडो आपल्याला एकत्र काम करावे लागणार आहे आणि माझ्या बाजूने मी तयार आहे. अशा प्रकारचा एक समेटाचा प्रस्ताव ह्यातून ट्रंपला द्यायचा असावा आणि त्याला दुसर्‍या बाजूने प्रतिसाद दिला.
४. ह्यात कुठलेही सरकारी धोरण, कर वा नियम ह्यासंबंधीचे कायदे ठरल्याचे मला तरी माहीत नाही. तेव्हा त्याच्या मुलांच्या उपस्थितीमागे अनुचित काय वाटते? सरकार स्थापन झाल्यावरही हे होत असेल तर मला नक्कीच खटकेल. पण आजवरतरी तसे झालेले नाही.
५. ट्रंपकडे कुणीही विश्वासू व्यक्ती नाही म्हणून मुलांना बोलावले हा निष्कर्ष आततायीपणाचा वाटतो. इथे विश्वासू व्यक्तींनाच प्रवेश होता असे काय घडले? जेफ बेझोस वा लॅरी पेज वा टिम कूक हा सशस्त्र हल्ला करणार होते का? ही काही अफझलखान आणि शिवाजी भेट नाही.

इथे ट्रंपने कुठले नियम धाब्यावर बसवले आणि तो कुठले कायदे बदलणार आहे आणि त्याकरता एक ४७ चालवता येणे कसे फायद्याचे असेल ह्याबद्दल जास्त तपशील कळला तर आवडेल!

नो आयडिया. त्याची मुले तेथे असणे ऑड वाटले म्हणून विचारले इतकेच. पण तुम्ही आता विचारून सांगतो म्हणताय म्हणून थांबलो Happy

चला ! अजून एक लढाई ट्रंपसाहेबांनी जिंकली. आता तो राष्ट्रपती बनण्याची शक्यता जअअअरा वाढली आहे!

http://www.cnn.com/2016/12/19/politics/electoral-college-donald-trump-vo...

ट्रंपच्या बाबतीत कुठे माशी शिंकू पाहेल सांगता येत नाही. शपथविधीच्या दिवशी त्याचा लिमो ड्रायवर कुठल्यातरी नियमावर बोट ठेवून त्याला सोहळ्यापर्यंत न्यायलाच नकार देईल किंवा निषेध मोर्चा असल्यामुळे शपथविधीच रद्द होईल असेही शक्य आहे!

>>ट्रंपच्या बाबतीत कुठे माशी शिंकू पाहेल सांगता येत नाही. शपथविधीच्या दिवशी त्याचा लिमो ड्रायवर कुठल्यातरी नियमावर बोट ठेवून त्याला सोहळ्यापर्यंत न्यायलाच नकार देईल किंवा निषेध मोर्चा असल्यामुळे शपथविधीच रद्द होईल असेही शक्य आहे!<<

इट एंट ओवर अंटिल दि फॅट लेडि सिंग्ज?.. Lol

नियम शोधावे लागतील Lol पण जपानच्या पंतप्रधानांशी बोलताना तिथे इवान्का ट्रंप उपस्थित होती. काय संबंध? ते काही शिळोप्याच्या गप्पा नव्हते मारत. ट्रंप स्वतः निवडून आलेला आहे पण त्याच्या मुलीचं काय क्वालिफिकेशन आहे?

अहो त्याला आता निवडून दिले आहे ना? रिपब्लिकन पक्ष त्याच्या मागे आहे ना? त्याला वाटले तर तो घटना सुद्धा बदलू शकेल. उगाच आता रडून काय फायदा?

माझ्या मते हिलरी नि डेमोक्रॅटिक पक्षाने अत्यंत निष्काळजीपणे वागून ही निवडणूक हातची घालवली. जे जे घडले ते सर्व त्यांच्या निष्काळजी पणा मुळे घडले. हिलरीने खाजगी इ-मेल सरकारी कामासाठी वापरली. जरी तो गुन्हा शाबित झाला नाही तरी असल्या बाईच्या हाती सत्ता द्यावी का? आज जरी काही झाले नाही, तरी उद्या या बाईने असलेच काहीतरी केले नि नको ती माहिती चीन, रशियाला खरच मिळाली तर?

या डेमोक्रॅटिक पक्षाचे हॅकिंग केले, त्याबद्दलहि एक गोष्ट वाचण्यात आली, खरी आहे की माहिती नाही, पण विश्वसनीय वाटते. निष्काळजीपणा. रिपब्लिकन लोकांच्या बाबतीत, ट्रंपच्या बाबतीत तसे का झाले नाही? ट्रंपचे काँप्युटर का हॅक झाले नाहीत? प्रयत्न नक्कीच झाले असतील.

खरे तर लोकांना लिबरल लोकांचा कंटाळा आला आहे.

निवडून आलेल्या पण अद्याप सत्ताग्रहण न केलेल्या राष्ट्राध्यक्षाकरता काही कायदे असतील, त्याने अन्य राष्ट्रप्रमुखांना भेटताना संभाळायची पथ्ये याकरता काही मार्गदर्शक सूत्रे असतील आणि त्याचा ट्रंपने भंग केला असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई जरूर करावी. पण तशी नसतील तर उगाच ऊर बडवण्यात काय अर्थ आहे?

नसतील तर, म्हणजे आहेत की नाही हे तुम्हाला पण माहित नाहीये. मग तुम्ही कशाला बळच माझ्या विचारलेल्या प्रश्नांना उरबडवेपणा म्हणत आहात? जरा दमानी घ्या. Lol
त्याचा एकंदरित स्वभाव आणि अ‍ॅटिट्युड बघता तो नियम दुसरा पर्याय नाही म्हणून पाळेल पण साधे शिष्टाचार वगैरेची अपेक्षा त्याच्याकडून करायला नकोच. इन एनी केस, तसं त्यानी केलं म्हणजे तो राज्य करण्यास लायक नाही म्हणायच्या लायकीचं वर्तन नाहीये हे पण आधी सांगतो. दॅट शिप हॅज सेल्ड. तो सत्तेवर आलेला आहे.
ते इलेक्टोरल कॉलेजस बद्दलचा पण मुद्दा मला वाटतं फार ताणला जात आहे. इलेक्टर्स नी त्याला निवडू नये वगैरे म्हणणे टोटल वेडेपणा आहे. शेवटी लोकांनी ही प्रोसेस फॉलो केली जाईल हे गृहित धरुन ट्रंप ला म्हणून मतं दिलेली आहेत. असं त्यांचा घात केला तर मग खरोखर प्रोसेस वरचा विश्वास उडेल लोकांचा.
आता फक्त ४ वर्ष वाट बघणे आणि ट्रंपला फेअरली ट्रिट करणे येवढच हातात आहे आणि योग्य पण आहे.

>>माझ्या मते हिलरी नि डेमोक्रॅटिक पक्षाने अत्यंत निष्काळजीपणे वागून ही निवडणूक हातची घालवली. जे जे घडले ते सर्व त्यांच्या निष्काळजी पणा मुळे घडले......<<

हा हा; हाइंडसाइट इज २०/२०. आम्हि सुरुवातीपासुन हेच सांगत होतो पण तेंव्हा बहुतेक हिलरीबाईंची दुर्गेच्या रुपात घटस्थापना झालेली होती... Lol

मग तुम्ही कशाला बळच माझ्या विचारलेल्या प्रश्नांना उरबडवेपणा म्हणत आहात? जरा दमानी घ्या. >> सहमत. शेंडे - इथे प्रत्येक जण "आम्च्या हिल्रीवर काय अन्याय झाला आहे" मोड मधे लिहीत नाहीयेत. तेव्हा प्रत्येक प्रश्नावर ट्रम्प ला डिफेण्ड करायची गरज नाही. काही ऑड दिसले नेहमीपेक्षा वेगळे तर त्याबद्दल इथे लिहीले जाणारच.

==
तेव्हा प्रत्येक प्रश्नावर ट्रम्प ला डिफेण्ड करायची गरज नाही. काही ऑड दिसले नेहमीपेक्षा वेगळे तर त्याबद्दल इथे लिहीले जाणारच.
==
अहो ऑड आहे की नाही याबद्दलच तर मतभिन्नता आहे. (ट्रंप विरोधकांना काय ट्रंपचे केस आणि त्वचाही ऑड दिसत आल्या आहेत. तेवढ्या जोरावर तो राष्ट्राध्यक्ष बनू नये म्हणणारेही असतील.) ट्रंपने इवांकाच्या जोडीने जपानी पंतप्रधानाला भेटताना कुठला शिष्टाचार मोडला ते जाणून घ्यायचे आहे. तो केवळ निर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहे. त्याकरता काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का की केवळ प्रस्थापित माध्यमे उर बडवून घेतायत म्हणून आम्हीही तेच करायचे? असा प्रश्न आहे.
अलीकडच्या काळात प्रचंड उद्योगपती असणारा राष्ट्रपती झालेलाच नाही त्यामुळे उद्योगपतीचा खाजगी उद्योग आणि त्याचे अध्यक्षपद ह्याची सांगड कशी घालायची ह्याचा हिशेब आता हळू हळू जुळवावा लागेल. त्यामुळे प्रत्येक वेळी "अमेरिकन लोकशाहीची पायमल्ली" म्हणून आक्रोश करायची गरज नाही. काही वेळा ती खरोखरची चूक असू शकते, काही वेळा ती चूक आहे असा खोटा समज असू शकतो तर कधी जाणून बुजून केलेली चूक असू शकते. ट्रंपने केले म्हणजे मुद्दाम मुजोरपणाने केलेली चूकच आहे अशी आगाऊ समजूत करून घेणे माझ्या मते चूक आहे.

मग तुम्ही तुम्हाला ऑड वाटले नाही तर तसे सांगा. इथे ज्यांनी लिहीलेले आहे त्यातली सर्वात टोकाची मते एकत्र करून बाकी सर्वांच्या प्रतिसादावर ती कशाला मारताय? पहिला ऑड वाटण्याचा उल्लेख सोडला, तर तुमच्या पोस्ट मधे लिहीलेली एकही गोष्ट मी म्हंटलेलो नाही.

त्याकरता एक ४७ चालवता येणे कसे फायद्याचे असेल ह्याबद्दल जास्त तपशील कळला तर आवडेल!
अहो जरा समजून घ्या. ट्रंपने पूर्वीच म्हंटले होते की सँडी हूकच्या शाळेत जे हत्याकांड झाले ते टाळता आले असते जर सर्व शिक्षकांना बंदुका दिल्या असत्या तर.
म्हणून जरा एक पाऊल पुढे टाकून म्हंटले, शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाहि बंदूक द्यावी.
तुम्ही जसे ट्रंपच्या मनात काय असेल ते आपणहून सांगता, तसेच आम्ही पण.
मला फक्त ट्रंपशी व्यवहार केलेले एक दोघे जण माहित आहेत ते त्यांचा अनुभव सांगतात त्यावरून लिहीतो.
शिवाय कुणि ट्रंपच्या बाजूने बोलले की त्याला विरोध करायचा अशी फॅशनपण आहे गेले वर्षभर. त्यातलाच हा भाग एव्हढे गंभीरपणे घेऊन नका इथले लिखाण. ही मायबोलीची साईट आहे. इथे कुणि काही बोलले तरी त्याचा ढिम्म परिणाम होत नाही खर्‍या जगात.
बहुतेक हिलरीबाईंची दुर्गेच्या रुपात घटस्थापना झालेली होती... हाहा
तुमचा जसा ट्रंप विठोबा तशी हिलरी इतरांची दुर्गा. बरे झाले आपण हिंदू आहोत. आपल्याला कितीहि देव करता येतात. ख्रिश्चन असतो तर जीझसच फक्त बाकी कुणि चालत नाही! जसे सध्या फक्त ट्रंपचेच बरोबर इतरांचे नाही असे काही लोक करताहेत तसे.

==
मग तुम्ही तुम्हाला ऑड वाटले नाही तर तसे सांगा. इथे ज्यांनी लिहीलेले आहे त्यातली सर्वात टोकाची मते एकत्र करून बाकी सर्वांच्या प्रतिसादावर ती कशाला मारताय? पहिला ऑड वाटण्याचा उल्लेख सोडला, तर तुमच्या पोस्ट मधे लिहीलेली एकही गोष्ट मी म्हंटलेलो नाही.
==
मायबोलीवरील एखाद्या पोस्टीला प्रतिसाद देणे तितकेसे पद्धतशीर नाही. तेवढ्या सुविधाही नाहीत. त्यामुळे एक जातिवंत ट्रंप विरोधक म्हणून तुम्हाला निवडले आणि सगळा प्रतिसाद मी तिथेच दिला. पण आपला तो मुद्दा नसेलच तर मनावर घेऊ नये. ज्यांचा आहे ते घेतील.

यामुळे एक जातिवंत ट्रंप विरोधक म्हणून तुम्हाला निवडले >>> पण इथेच तर गोची आहे. मी ट्रम्प विरोधक जेव्हा कॅम्पेन चालू होती तेव्हा होतो. आता एक प्रेसिडेण्ट म्हणून तो काय करतो यावर लिहीतोय. आता "विरोधक" म्हणून लिहीत नाही. त्याने काही चांगले केले तर तारीफ आणि न आवडण्यासारखे केले तर टीका - हे दोन्ही समर्थक वा विरोधक अशी पूर्वग्रहदूषित भूमिका न घेता करता येते आणि तेच मी करतोय.

टीका - हे दोन्ही समर्थक वा विरोधक अशी पूर्वग्रहदूषित भूमिका न घेता करता येते आणि तेच मी करतोय.

हे असले आता चालणार नाही. अबकी बार ट्रंप सरकार असल्याने, ट्रंपवर टीका केली तर He attacked me असे म्हणून तुमच्यावर ट्वीट लिहील. शिवाय त्याच्या मते पाकीस्तानी लोक अत्यंत हुषार असल्याने, तुम्ही पाकीस्तानी नसलात तर तुम्ही मूर्ख असे म्हणायला तो मोकळा.

बाकी मी अजूनहि ट्रंपच्या बरळण्याला (तसेच वाटते त्याचे बोलणे मला) फारशी किंमत देत नाही. अत्यंत हलक्या मनाचा माणूस आहे तो. लहान सहान गोष्टीत फुशारकी मारतो नि महत्वाच्या गोष्टींबाबत वाट्टेल तशी अतिरेकी विधाने करतो.असली विधाने निवडणूकी पूर्व केली तर समजू शकते, पण त्याला अजून निवडणुकीचीच झिंग आहे,

त्याकरता काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत का की केवळ प्रस्थापित माध्यमे उर बडवून घेतायत म्हणून आम्हीही तेच करायचे?>>>>> दर वेळी मार्गदर्शक तत्वे कशाला पाहिजे आहेत? इतकी मोठी पोस्ट मिळाल्यावर थोडी स्वतःची अक्कल पण वापरायला पाहिजे ना? उद्या बिल गेट्स नी बोर्ड मिटिंगच्या वेळी त्याच्या बायकोला किंवा मुलीला समोर बसवून घेतले तर शेअरहोल्डर काय म्हणतील? मुलीशी सल्ला मसलत करुन तुम्ही निर्णय घेता का? असेल तर तिचं काय क्वालिफिकेशन आहे? हा उर बडवायचा म्हणून विचारलेला प्रश्न नसून एकदम योग्य आहे आणि शेअरहोल्डरांचा हक्क आहे.
इथेही तसच आहे. अख्खा देश चालवायचा आहे तिथे ट्रंप नक्कीच ह्या अनक्वालिफाईड (मुख्यतः ज्यांना पॉलिसीमेकिंग मध्ये आजिबत अनुभव नाही अशा) लोकांशी सल्ला मसलत करतोय ही चिंतेची बाब आहेच. लोकं बोंब मारणारच कारण ते चूक आहेच. आता फक्त असं आहे, लोकं बोंब मारतात म्हणून लोकांसमोर नाही पण शेवटी पडद्यामागे तो ह्या सगळ्यांनाच हाताशी धरुन राज्य करणार आहे.

==
दर वेळी मार्गदर्शक तत्वे कशाला पाहिजे आहेत? इतकी मोठी पोस्ट मिळाल्यावर थोडी स्वतःची अक्कल पण वापरायला पाहिजे ना? उद्या बिल गेट्स नी बोर्ड मिटिंगच्या वेळी त्याच्या बायकोला किंवा मुलीला समोर बसवून घेतले तर शेअरहोल्डर काय म्हणतील? मुलीशी सल्ला मसलत करुन तुम्ही निर्णय घेता का?
==
पुन्हा सांगतो. ट्रंपने राष्ट्रपतीपदाची सूत्रे हातात घेतलेली नाहीत. त्याला कुठलाही सरकारी धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही. असे असताना तो त्याच्या नातेवाईकांसमवेत कुठल्या देशाच्या प्रमुखाला भेटला तर कुठला नियमभंग झाला आहे? कुठला कायदा मोडला आहे? जर जपानी पंतप्रधान अभिनंदन करायला वा प्रचार कसा करावा ह्याच्या टिप्स घ्यायला आला असेल तर तसे करायला बंदी आहे का? जर इवांका ट्रंप ही ट्रंपच्या प्रचारात जातीने सामिल होती तर ती अशा भेटीच्या वेळेस उपस्थित असली तर गैर काय आहे? तुम्ही हवी तेवढी बोंब मारा. पण जर त्याने कुठला कायदा वा नियम मोडला नसेल तर ह्या बोंबाबोंबीचा काय परिणाम होणार आहे?

लोकशाहीचे तत्त्व आहे की लोकांनी बनवलेले, लोकांचे, लोकांकरता सरकार. प्रत्येक वेळी राजकारण, पॉलिसी ह्यात गाढा अनुभव असणारा माणूसच निवडून येईल असे नाही. लोकांचा कौल जसा असेल तसा माणूस निवडून येणार. लोकशाहीवर विश्वास असेल तर असे बदल स्वीकारलेच पाहिजेत. (तसेही पाहता, अशा मुरब्बी अनुभवी लोकांनी काय दिवे लावले आहेत ते दिसतेच आहे. आणि हो, ओबामा जेव्हा राष्ट्रपती झाला तेव्हा त्याला सरकार चालवायचा वा धोरणे ठरवायचा काय मोठा अनुभव होता?)

बदल स्वीकारलेला आहेच आणि फेअरली ट्रीट केलं पाहिजे हे सुद्धा लिहिलं आहेच वर. फक्त जिथे धडधडीत चूका दिसतात/वाटतात त्या बद्दल जाब विचारला तर तेही गैर नाही.
आता एक मिनिट असं मान्य करु की कॅजुअल कॉन्वर्सेशन आहे पण त्याच्या कँपेनच्या वाटचालीकडे बघता त्याच्या मुलांचा आणि जॅरेड कुशनरचा खुप मोठा इन्फ्लुएन्स असणार आहे डिसिजन मेकिंग मध्ये हे उघड आहे.

बुवा, फा +१

>> ट्रंपने राष्ट्रपतीपदाची सूत्रे हातात घेतलेली नाहीत. त्याला कुठलाही सरकारी धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही. असे असताना तो त्याच्या नातेवाईकांसमवेत कुठल्या देशाच्या प्रमुखाला भेटला तर कुठला नियमभंग झाला आहे? कुठला कायदा मोडला आहे? जर जपानी पंतप्रधान अभिनंदन करायला वा प्रचार कसा करावा ह्याच्या टिप्स घ्यायला आला असेल तर तसे करायला बंदी आहे का?

अहो तो आता "प्रिसिडन्ट इलेक्ट" आहे ना?

अजून काही दिवसांत तो सत्तेची सूत्रं हाती घेणार हे तर आता निश्चीत आहे ना? ह्या सगळ्या मिटींग्ज् ह्या त्या दृष्टीनेच चालू आहेत ना? की तो ट्रम्प टॉवर कुठे आणि कसे बांधावेत ज्यामुळे ट्रम्प एम्पायर ला छान फायदा होईल हे डिस्कस करण्यासाठी ह्या अशा लोकांनां भेटतो आहे किंवा हॉलिडे सीजन आहे तर गिफ्ट एक्क्ष्चेन्ज करता म्हणून?

लोकशाही आहे तर लोकशाही मार्गाने प्रिव्हिलेज्ड असलेल्या लोकांनां (ज्यात नेपोटिजम ला स्थान नाही) घेऊन का भेटत नाही तो अशा लोकांनां?

मुलांच्या हाती स्वतःच्या कम्पनी ची सूत्रं देणार ना तो? मग ट्रम्प एम्पायर च्या लोकांनां हे स्पेशल प्रिव्हीलेजेस् का म्हणे?

==
अजून काही दिवसांत तो सत्तेची सूत्रं हाती घेणार हे तर आता निश्चीत आहे ना?
==

खरे म्हणजे नाही. आजिबात निश्चित नाही. जोवर ट्रंप शपथ घेत नाही तोपर्यंत कसलीही निश्चिंती नाही.

==
ह्या सगळ्या मिटींग्ज् ह्या त्या दृष्टीनेच चालू आहेत ना? की तो ट्रम्प टॉवर कुठे आणि कसे बांधावेत ज्यामुळे ट्रम्प एम्पायर ला छान फायदा होईल हे डिस्कस करण्यासाठी ह्या अशा लोकांनां भेटतो आहे किंवा हॉलिडे सीजन आहे तर गिफ्ट एक्क्ष्चेन्ज करता म्हणून?
==
जोपर्यंत ट्रंप अधिकृतरित्या राष्ट्रपती बनत नाही तोपर्यंत तो एक नागरिक आहे. आणि एक नागरिक म्हणून त्याला जेवढे स्वातंत्र्य असायला हवे ते मिळायला काय हरकत आहे? जपानी पंतप्रधानाशी जी काही बातचीत झाली तिचा तपशील उपलब्ध नाही. त्यामुळे निवडून आल्याबद्दल अभिनंदन आणि हवापाण्याच्या गप्पा इतका मर्यादित बेत असणे अशक्य नाही. तुम्हाला काही जास्तीची माहिती आहे का की ह्या भेटीत अमुक काहीतरी चर्चिले गेले होते म्हणून?
इवांका ट्रंप ही ट्रंप प्रशासनात कुठलीतरी भूमिका बजावणे शक्य आहे असे म्हटले जात आहे. तसे असेल तर तिने अशा राजकीय भेटीत सहभागी असणे चूक कसे? इवांका ट्रंप ही गर्भवती असतानाही ट्रंपच्या प्रचारात होती. बाळंत झाल्यावरही लगेचच ती पुन्हा प्रचारात उतरली. हे सगळे होत असताना ट्रंप निवडून येणारच ह्याची शाश्वती नव्हती. पण तिने आणि तिच्या भावंडांनीही प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कष्ट केले होते. ट्रंपच्या मुलाबाळांचा सहभाग जगजाहीर असतानाही लोकांनी ट्रंपला निवडून दिले आहे. तेव्हा निवडून देणार्‍यांना ट्रंपच्या मुलांचा राजकारणातली लुडबुड वा सहभाग खटकला नाही. मग आता तो तुम्हाला का खटकावा?

Pages