अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

==
बाकी शेंडेनक्षत्रांच्या कुठल्या शेपटीवर हिलरीनं पाय दिलाय कळलं तर त्यांच्या पोस्टसची सुसंगती लागू शकेल. मला आठवतंय तसं अगदी जुन्या मायबोलीत असल्यापासून क्लिंटन दांपत्याचा जहाल शब्दात उद्धार करतात. पण खरंतर आता क्लिंटन्सना सूट द्यायला हरकत नाही. खुद्द ट्रंप आता 'क्लिंटन्स आर गुड पीपल' असं म्हणालाय
==
कुठल्या शेपटावर? म्हणजे काय? मला एकच शेपूट आहे. तुम्हाला बरीच आहेत का? भाग्यवान आहात! असो.

ट्रंपवर, त्याच्या त्वचेवर, केसावर, त्याच्या कथित मूर्खपणावर इतके विनोद झाले आहेत की त्याचा एक ग्रंथ बनेल. आता थोडी हिलरीच्या जीवावर थोडी गंमत केली तर काआआआही बिघडत नाही.

कुठल्या शेपटावर? म्हणजे काय? मला एकच शेपूट आहे. तुम्हाला बरीच आहेत का? भाग्यवान आहात! असो.>>> छे हो, इतकं कुठलं आमचं भाग्य? आम्हाला एकही शेपूट नाही Wink

आता हिलरी नाही सक्रीय राजकारणात, जे आहेत त्यांच्याबद्दल आणि ते आणणार्‍या पॉलिसीबद्दल, लोकांबद्दल बोलू.

हे असं काही वाचल की मला कधी कधी वाटतं आपण किती मूर्ख आहोत
आपल्याला ही अशी सवलत मिळावी, काढा तिकिटं आणा सगळी फॅमिली भारतातून इथे,
काय करायचेत कायदे कानून, कशाला हवा व्हिसा Happy
होऊ दे खर्च, आपला आणि अमेरिकेचा Happy दोघांचाही

असुफ.. खर म्हणजे इथे मी त्याबद्दल सविस्तर लिहीले तर या बीबीवर खुपच अवांतर होइल पण मला विचारलेस तर मी तुला म्हणेन की १६८ वर्षापुर्वी १८४८ मधे अमेरिकेने मेक्सिकोच्या अल्टा कॅलिफोर्नियाचे( म्हणजे सध्याचे कॅलिफोर्निया,नेव्हाडा,अ‍ॅरिझोना,युटाह,कालोराडो,न्यु मेक्सिको व थोडेसे वायोमिंग! ) आणी टेक्सास प्रदेशाचे जे अ‍ॅनेक्शेशन केले होते त्याबद्दल व मनरो डॉक्ट्राइन बद्दल जरुर वाच..( त्या डॉक्ट्राइनला जेम्स मन्रोचे जरी नाव असले तरी खर्‍या दृष्टिने अलेक्झँडर हॅमिल्टन त्याचा शिल्पकार होता) मग तुच मला सांग कोण कोणाला सँक्चुअरी देत (किंवा दिली आहे! ) आहे ते.. .. Happy

ट्रंपला हा इतिहास माहीत असेल अस मला वाटत नाही...किंवा सोयिस्कर विसरला असेल..

तळटिपः इथे इलिगल इमिग्रेशनचे मी समर्थन करत आहे असा अर्थ कोणी काढु नये.. फक्त इतिहास काय सांगतो ते मला दाखवायचे होते.

दुर्दैवाने या प्रश्नाचे सोपे आणि सर्वमान्य उत्तर नाही.

माझ्या थोड्या फार विनोदी ढंगात लिहिलेल्या प्रतिसादाचा अर्थ इतकाच होता की जर सगळेच इथे परके बाहेरून आलेले आहेत कायमच या देशाच्या इतिहासाप्रमाणे मग २०१६ मध्ये कोणीही आताचे कायदे का पाळावे?
जेव्हा एक खूप मोठा जनसमुदाय हे कायदे सर्रास मोडून वागत आहे

अर्थात मी काही कायदे मोडण्याचे समर्थन करत नाहीये.

१६८ वर्षांपूर्वी जे झाले ते चुकीचे आणि आता जे होतंय तेही तसं चुक च.
शेवटी आता चा कायदा हा आताच कायदा आहे आणि तो मोडला जात आहे यात कोणाला शंका नसावी

पुढे पुढे काय होतंय हे पाहणे रोचक ठरेल

सहमत आणि ती शक्यता कमी वाटतेय. सेनेट ते प्रपोजल धुडकावुन लावेल यात शंका नाहि. ॲट द मोस्ट, बॅनन ट्रंपच्या किचन कॅबिनेट मध्ये असेल. >> राज ब्ल्यूमबर्ग वाचतोस का ? बॅनन ला सिनेटच्या आडही कसे आत आणता येईल ह्यावर सविस्तर विवेचन आहे and it is scary. त्या दिशेने आधीच पावले टाकली गेलेली आहेत.

ट्रंपला हा इतिहास माहीत असेल अस मला वाटत नाही...किंवा सोयिस्कर विसरला असेल..>> मुकुंद ट्रंपच्या किती पाठीराख्यांना माहित असेल हाही कळीचा प्रश्न आहे Wink

>>मग तुच मला सांग कोण कोणाला सँक्चुअरी देत (किंवा दिली आहे! ) आहे ते<<

आयला मुकुंद, तुझं हे लाॅजीक अचाट आहे. १८४८ च्या ट्रिटीत आॅफिशियली अल्टा कॅलिफोर्निया युनियन मध्ये आला. भले त्या पुर्वि तो भाग मेक्सिकोत येत होता याचा अर्थ असा होत नाहि कि भविष्यात बाय डिफाॅल्ट मेक्सिकन्स ना अमेरिकेत बिनदिक्कत प्रवेश मिळायलाच हवा. हे म्हणजे पाकिस्तानींनी भारतात (किंवा वाइस वर्सा) बिनदिक्कत प्रवेश, रेसिडंसी मागण्यासारखं आहे... Happy

मुकुंद ते समजले नाही. मुळात स्टॅनफोर्ड मधे जे लोक शिकत आहेत ते मेक्सिकोतून आलेले इल्लिगल इमिग्रण्ट्स असण्याची शक्यता कमी आहे. इतर व्हिसांवर येथे आलेले व नंतर परत न गेलेले असे किंवा अशांची मुले असण्याची शक्यता जास्त आहे.

असुफ.. तुझे अगदी बरोबर आहे..कायदा सध्याचा आहे व तो पाळलाच पाहीजे हे मान्य आहे...खासकरुन सध्याच्या टेररिझमच्या पार्श्वभुमीवर.

मला फक्त एवढेच म्हणायचे होते देशाच्या सिमा जेते च ठरवत असतात हेच आपल्याला इतिहास शिकवतो अँड टु जस्ट स्पेअर अ थॉट फॉर द लुजर..

राज तुझे बाकीचे बॅननबद्दलचे म्हणणे मला कळले व पटलेही ..माझे उत्तर फक्त तुझ्या.. "भावाच्या कृपेने " या वाक्याला होते..:)

राज्..मी माझा प्रतिसाद लिहुन ठेवला होता पण सेव्ह नव्हता केला.. सेव्हला टिचकी मारली तोपर्यंत तुझा प्रश्न आला.. पण उत्तर मी पहिल्या ओळीतच लिहीले आहे.. दुसरेही वाक्य वाच. तरीसुद्धा.. टु बी क्लिअर..सँक्चुअरी सिटिजचे मी कधीच समर्थन करणार नाही. ( हेच उत्तर फारेंड तुलाही.. इतिहासाचा संदर्भ का दिला त्याचे उत्तर मी वर दिले आहे.. स्टॅनफर्ड मधल्या बॉयकॉटचे समर्थन करण्याचा हेतु त्यामागे नव्हता)

==
मला फक्त एवढेच म्हणायचे होते देशाच्या सिमा जेते च ठरवत असतात हेच आपल्याला इतिहास शिकवतो अँड टु जस्ट स्पेअर अ थॉट फॉर द लुजर..
==

मी पण पुन्हा एकदा तेच म्हणेन की घडाळ्याचे काटे किंवा कॅलेंडरची पाने मागे नेऊन काहीही साध्य होत नाही. उदा. अमेरिकेतील कृष्णवर्णीय मूळ अफ्रिकेतले आहेत म्हणून काही ते परत अफ्रिकेत जायला तयार होणार नाहीत. असो.

अमेरिकेने मेक्सिकोचा प्रदेश घेतला आणि तो जेता होता. पण हरलेल्यांना (म्हणजे मेक्सिकन) अमेरिकेच्या भूमीवर कायदे पाळून यायला कुठलाही प्रतिबंध नाही. योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यास अमेरिकेत यायचा मार्ग मोकळा आहे. तेव्हा स्पेअर अ थॉट फॉर द लूजर ह्या विधानाचीही पूर्तता अमेरिका करत आहे (माझ्या मते).

मला असे वाटते बहुतेक सगळे उदारमतवादी, हिलरी समर्थक "आम्ही बेकायदा घुसखोरी, सँक्चुअरी सिटी ह्या प्रकारांचे समर्थन करत नाही" असेच म्हणतात. मग तरीही ह्या गोष्टी चालवून घेतल्या जातात हे उघड आहे. मग ह्या प्रकाराचे समर्थक नक्की कोण आहेत आणि ते इतके प्रभावी आहेत का की ह्या प्रकाराला विरोध करणार्‍या डेमोक्रॅट्सचे काही चालत नाही?

बॅनन अ‍ॅडव्हायझर असणार आहे - नो कॅबिनेट पोझिशन त्यामुळे त्याला सिनेट कन्फर्मेशन लागणार नाही.

म्हणूनच त्याच्यावर सध्या बेकायदा देणग्या स्वीकारल्याबद्दल आरोप आहेत तरी त्याला काही होणार नाही. त्याला ट्रंपचा पाठिंबा आहे. ज्याचा पाठीराखा हरी, त्यास कोण काय धोका करी! तसेच ट्रंपने काय वाट्टेल ते केले तरी आता चालेल. सहज गंमत म्हणून त्याने भर टाईम स्क्वेअरमधे कुणाचा खून केला तरी कुणाला काही होणार नाही.

बॅनन नंतर आता डेव्हीड ड्यूक ला काही जागा देणार! मग गोरे लोकांची वस्ती वेगळी, नि बाकीच्यांची वेगळी - गोर्‍या लोकांच्या वस्तीत फक्त गुलाम म्हणून बाकीच्यांना जायला मिळेल. म्हणजे कसे - अमेरिका इज ग्रेट अगेन!!

पृथ्वी सपाट आहे, एव्होल्युशन खोटे आहे. बाई मेली तरी चालेल, पण अबॉर्शन नाही, भलेहि तो मुलगा पाच मिनिटाने मेला तरी चालेल!! अशी एकदम अमेरिका ग्रेट बनेल!!

जाम भुक्कड लोक.

मी तर आत्ताच चेंज.ऑर्ग वर सही केली - १० डिसेंबरला इलेक्टोरल कॉलेजने हिलरीलाच मत द्यावे - मिलिय१० लाख मते जास्त मिळाली आहेत!

=पृथ्वी सपाट आहे, एव्होल्युशन खोटे आहे. बाई मेली तरी चालेल, पण अबॉर्शन नाही, भलेहि तो मुलगा पाच मिनिटाने मेला तरी चालेल!! अशी एकदम अमेरिका ग्रेट बनेल!!
==
पळा पळा पळा! आभाळ कोसळतंय! पळा पळा पळा! ट्रंप आला आला आला!
पळा पळा पळा! आता फक्त गोर्‍यांची अमेरिका!
पळा पळा पळा! आता फक्त ख्रिस्ती लोकांची अमेरिका!
पळा पळा पळा! जगबुडी आली रे आली!

"मी पण पुन्हा एकदा तेच म्हणेन की घडाळ्याचे काटे किंवा कॅलेंडरची पाने मागे नेऊन काहीही साध्य होत नाही".. शेंडेनक्षत्र.. मान्य.. पण जे घडुन आहे गेले ते बदलता येत नाही. आणी कृष्णवर्णिय लोकांचे उदाहरण इथे साफ चुकीचे आहे.. असो तो या बीबीचा विषय नाही.. बीबी उगाच भरकटत जाईल.

आणी... डेमोक्रॅटिक पार्टी इलिगल इमिग्रेशनचे समर्थन करतय असे तुम्ही सरधोपट विधान कसे करता? लिबरल्स व कन्झरव्हेटिव्ह्ज मधे त्या इलिगल लोकांचे पुढे काय करायचे या बाबतीत मतभेद आहेत्... ट्रंप ( व सगळी रिपब्लिकन पार्टी! )..त्या मतभेदाचा एकदम कन्व्हिनिअंट अर्थ काढतात की डेमोक्रॅटिक पार्टीला इलिगल इमिग्रेशन पाहीजे, ओपन बॉर्डर्स पाहीजेत्..व्हिच इज फार फ्रॉम द ट्रुथ.. पण इलेक्शन मधे फिअर माँगरिंग साठी तसा प्रोपॉगॅंडा केला गेला.. तुम्हाला अस खरच् वाटत की सगळे डेमोक्रॅट सेनेटर्स व काँग्रेसमन मेक्सिको बॉर्डर वर आरत्या घेउन इलिगल इमिग्रंट्सचे स्वागत करायला उभे आहेत? अजुनही हा देश कायद्यावर चालतो.( व चालेल अशी माफक अपेक्षा आहे)

तुम्ही जे इलिगल इमिग्रंट्स म्हाणता त्यातले बरेचशे कायदेशीर रित्या इथे आले होते पण ओव्हरस्टेड देअर व्हिसा. आता त्यांची मुले इथे जन्माला आली व शाळेत जात आहेत्... ती अमेरिकन सिटीझन्स आहेत...तर अश्या मिलिअन्स ऑफ फॅमिलीज ची ताटातुट कशी करायची यात डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन मधे मतभेद आहेत्...

लो़कांनी इथे इलिगली यावे ,पोरस,ओपन बॉर्डर करुयात, अमेरिकन्-मेक्सिकन भाई भाई असे डेमोक्रॅट्स म्हणतात हे पालुपद निवडणुकीच्या प्रचारात फार इरिटेटिंग वाटत होते व इथेही ते टुमणे इरिटेटींग वाटते हे तुम्ही लक्षात घ्या

आणी तसले इलिगल इमिग्रंट जॉब मार्केट मधे असायला( चिप लेबर मिळते म्हणुन) त्यांना जे सो कॉल्ड स्मॉल बिझनेसमन.. जे स्वतःला रिपब्लिकन म्हणवतात..तेही तितकेच कारणीभुत आहेत ही सुद्धा एक फॅक्ट आहे... त्यांच्यावर धाड टाकण्याच्या गोष्टी करायच्या सोडुन वॉल बांधु आणी यंव करु आणी त्यांव करु अश्या बाता मारायच्या...फुकटचे..कारण नसताना.. हॅलिबर्टनचे तुंबडे भरायला म्हणुन इराक वॉर करुन तिथे लाखोंनी सैन्य पाठवायचे.. व बॉर्डर सिक्युअर नाही म्हणुन थयथयाट करायचा... सगळेच अचाट!

==
तुम्ही जे इलिगल इमिग्रंट्स म्हाणता त्यातले बरेचशे कायदेशीर रित्या इथे आले होते पण ओव्हरस्टेड देअर व्हिसा. आता त्यांची मुले इथे जन्माला आली व शाळेत जात आहेत्... ती अमेरिकन सिटीझन्स आहेत...तर अश्या मिलिअन्स ऑफ फॅमिलीज ची ताटातुट कशी करायची यात डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन मधे मतभेद आहेत्...
==

ह्याची काही आकडेवारी उपलब्ध आहे का? बहुतांश लोक व्हिसा घेऊनच आले पण व्हिसा संपल्यावरही राहिले हे खरे वाटत नाही. शिवाय इथेही कायदा मोडला तो मोडलाच.
जर हे कायदे अनावश्यक अडगळ आहेत असे वाटत असेल तर ते रीतसर बदला ना. आणा बिल आणि करा पास.

मला तर अँकर बेबीचा कायदाही जुनाट वाटतो. अवैधरित्या आलेल्या लोकांना झालेल्या मुलांना केवळ अमेरिकन भूभागावर जन्माला आले म्हणून नागरिकत्व देणे चूक आहे. पण हा कायदा बदलला जाईल असे वाटत नाही.

तमाम सँक्चुअरी सिटीज ह्या डेमॉक्रॅट सरकारे असणार्‍या राज्यात वा शहरातच आहेत असे का?
जर डेमोक्रॅट्स हे कायद्याचे निष्ठावान पाठिराखे असतील तर उत्प्रवसनाचे कायदे धाब्यावर बसवणार्‍या निंदनीय धोरणाचे समर्थन का करतात हे लोक?

तुमचे स्पष्टीकरण आणि ह्या शहरांच्या प्रमुखांची, राज्याच्या राज्यपालांची (जे सगळे डेमो आहेत) वर्तणूक ह्यात इतकी मोठी तफावत का?

मला तर अँकर बेबीचा कायदाही जुनाट वाटतो. अवैधरित्या आलेल्या लोकांना झालेल्या मुलांना केवळ अमेरिकन भूभागावर जन्माला आले म्हणून नागरिकत्व देणे चूक आहे. > > कारण "कायदा माणसांसाठी असतो, माणूस कायद्यासाठी नाही" असे मानणारी लोक पण असतात. उद्या जर तमाम लॅटीनोंनी जाहीर केले कि आम्ही फक्त रिपब्लिकन्सनाच मते देऊ तर दोन्ही पार्टींची ह्याबद्दलची मते १८० डीग्री मधे मधे वळतील, तुम्हाला मान्य असो वा नसो.

शेंडेनक्षत्र,
खरे तर आता घटनाच बदलून टाका- एक घाव दोन तुकडे. उग्गाच हा कायदा बदला नि त्या काञद्यात बदल करा यापेक्षा सरळ घटनाच बदला नि हवी तशी करून घ्या. शक्य आहे, प्रेसिडेंट, काँग्रेस, सिनेट सगळे रिपब्लिकन, शिवाय सध्या चलती आहे तोपर्यंतच हे उरकून घ्या. ते नाही केले तर लवकरच भ्रमाचा भोपळा फुटेल नि मग करता येणार नाही.
शिवाय ट्रंपच्य "धंद्यां" कडे सध्यापर्यंत जास्त लक्ष दिले नाही कारण तो डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन सगळ्यांनाच पैसे देत होता. आता डेमोक्रॅट्स हात धुवून मागे लागतील त्याच्या. तेंव्हा प्रथम घटनाच बदलून टाका - एकदा प्रेसिडेंट म्हणून निवडून आल्यावर पूर्वीचे गुन्हे माफ. मग काय वाट्टेल ते करता येईल. उगाच ओबामा ला जसे छळले तसे व्हायला नको.

तर करता का ट्रंपला फोन? फुकट सल्ला देईन म्हणावे. नाहीतरीब्नोकराम्चे पैसे बुडवण्यात तो पटाईत आहेच, मग आपणच मोठेपणा घ्यावा.

जाउ द्या हो शेंडेनक्षत्र.. तुम्हाला कितीही आकडेवारी दिली किंवा सोर्सेस दिलेत तरी ते पालथ्या घड्यावर पाण्यासारखे होइल याची खात्री आहे त्यामुळे तुमचा व माझाही वेळ फुकट घालवण्यात काही अर्थ नाही.

त्याच काय आहे.. विचारांची व दृष्टिकोनाची देवाणघेवाण करायच्या ऐवजी आपलेच ते खर असा अट्टाहास करुन दुसर्‍यांच्या विचाराला स्वतःला सोयिस्कर वाटेल अशी कलाटणी देउन फक्त स्वतःचेच विचार कसे कायद्याला धरुन व मॉरली राइट आहेत अशी मानण्याची काही जणांची वृत्ती असते. मानुन घ्या..

अशी मॉरली हाय हॉर्सवर बसणारी रिपब्लिकन पक्षातली माणसे..स्वतःच्या खाजगी जिवनात कशी वागतात व कसे हिपोक्रिटिकल आहेत हे जर तुम्हाला कळत नसेल तर कठीण आहे. हा न्युट गिंगरीच.. १९९८ च्या क्लिंटन इंपिचमेंट मधे सर्वात पुढे असलेला..ज्या कारणासाठी तो क्लिंटनच्या मागे हात धूउन मागे लागला होता..त्याच वेळेला तो स्वतः काय करत होता ते जरा सर्च करा.. झालच तर रुडि ज्युलिआनी.. जो हिलरीला बिलच्या चुकांवरुन धारेवर धरत होता..त्याचेही कारनामे बघा.. खर म्हणजे मला तर असच वाटत की बाहेरुन जे असे मॉरली हाय हॉर्सवर बसुन आपण कसे मोरॅलिटीचे पुतळे आहोत असा दिखावा करतात्..त्यांच्याच क्लॉजेट्मधे जास्त जळमटे असतात. वर स्वातीने ज्युलिआनीचे इलिगल वर्कर्स बद्दलचे आर्टिकल दिलेच आहे.

आणी कायद्याचे बोलाल तर..१९९४ पासुन मधली २ वर्षे सोडली तर गेल्या जवळ्जवळ २२ वर्षांपैकी २० वर्षे काँग्रेस रिपब्लिकन्सच्या ताब्यात असुनही एक रिझनेबल इमिग्रेशन रिफॉर्म्स चा कायदा रिपब्लिकन्सना पास करता आला नाही यात खर तर रिपब्लिकन पार्टीचाच षंढपणा दिसुन येतो

जाउ द्या..असामी म्हणतो त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच वेगळा असल्यामुळे या वादाला अंत नाही.

== जाउ द्या हो शेंडेनक्षत्र.. तुम्हाला कितीही आकडेवारी दिली किंवा सोर्सेस दिलेत तरी ते पालथ्या घड्यावर पाण्यासारखे होइल याची खात्री आहे त्यामुळे तुमचा व माझाही वेळ फुकट घालवण्यात काही अर्थ नाही.
==

निदान एक प्रयत्न तरी करून पहायचात! असो. बहुधा अशी कुठलीही खात्रीची आकडेवारी नसावी असे वाटू लागले आहे!

कुठला पक्ष किती ढोंगी आहे ह्यात मला गम्य नाही. मी रिपब्लिकन म्हणजे देव आणि डेमोक्रॅट राक्षस असे समजत नाही. तेव्हा रिपब्लिकनच्या दुष्कृत्याची यादी कशाला देताय? मला सध्या घुसखोरांच्या प्रश्नावर बोलायचे आहे. जर डेमोक्रॅटिक पक्षाचे पाठिराखे बहुतांश कायद्याला मानणारे असतील तर सँक्चुअरी सिटी नामक प्रकार जिथे केंद्राने लागू केलेला देशव्यापी कायदा पायदळी तुडवला जातो हे डेमोक्रॅटिक राज्यातच का घडतात? अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली करणार्‍यांना कोणी स्थानिक डेमोक्रॅटिक नागरिक जाब का नाही विचारत?

बोले तो क्या काय ? माणसे कायदे माणसांसाठी करतात. कायदा हि दगडावरची रेघ नसतो. खास करून अमेरिकेमधे (तरी) फेडरल, स्टेट, लोकल लॉ एकमेकांशी विसंगत असू शकतात. तेंव्हा कायदयाचा बडगा दाखवताना सारासार विचार करायला हरकत नसावी.

==
कारण "कायदा माणसांसाठी असतो, माणूस कायद्यासाठी नाही" असे मानणारी लोक पण असतात.
==

अँकर बेबीच्या संदर्भात माणूस कायद्याकरता का कायदा माणसाकरता हा फरक जरा समजावून सांगता आला तर पहा.

एखादा कायदा चुकीच्या पद्धतीने वापरुन सिस्टिमचा गैरफायदा करुन घेण्यासाठी वापरला जाऊ लागतो तेव्हा त्यात बदल करणे इष्ट असते. कायदा हा काही देवाचा शब्द नाही की त्यात बदलच करु नये.

==
उद्या जर तमाम लॅटीनोंनी जाहीर केले कि आम्ही फक्त रिपब्लिकन्सनाच मते देऊ तर दोन्ही पार्टींची ह्याबद्दलची मते १८० डीग्री मधे मधे वळतील, तुम्हाला मान्य असो वा नसो.
==
तमाम लॅटिनो अमुक एकमुखाने वदणार कसे? आणि जे तसे वदलेत ते एकूण एक लॅटिनोज आहेत की नाहीत हे तपासणार कसे हा एक कुतुहलाचा विषय आहे. असो. ह्या तमाम लॅटिनोच्या खानेसुमारीत आपण मतदान करायला कायदेशीर रित्या लायक लोकच समाविष्ट केले असावेत अशी एक आशा.

मेक्सिकोतील अर्धशिक्षित, अकुशल वा अर्धकुशल कामगार शेती व अन्य कामाकरता आणता यावेत याकरता व्हिसा मिळवणे सोपे करता येईल. केवळ बेकायदा घुसखोरी हाच एकमात्र मार्ग नव्हे. ६-८-९ महिन्याचा व्हिसा योग्य ते शुल्क भरून, कागदपत्रे भरुन चटकन मिळावा याकरता उपाय करणे शक्य आहे.

पण आम्हाला कायद्याची पर्वा नाही म्हणणारे डेमॉक्रॅट अडेलतट्टूपणा करत आहेत.

हा फरक जरा समजावून सांगता आला तर पहा. >> माफ करा, 'अँकर बेबी हे सिस्टीमचा गैरफायदा घेण्यासाठीच जन्माला आलेले आहेत' असे तुमचे मत असल्यामूळे ह्या बाबतीमधे तुम्हाला काहि समजावणे माझ्या कुवतीच्या बाहेर आहे जर तुम्ही रिपब्लिकन डेमॉक्रॅट हे चष्मे काढून विचार करू शकलात तर तुम्हाला स्वतःला लक्षात येईल.

तमाम लॅटिनो अमुक एकमुखाने वदणार कसे? >> तुम्ही तमाम वरती अडकलात ह्यातच तुम्हाला मुद्दा समजला नाही हे साहजिक आहे. सोडून द्या.

"तेंव्हा कायदयाचा बडगा दाखवताना सारासार विचार करायला हरकत नसावी."

हे वाक्य ज्या भावनेने लिहिले आहे त्या भावनेचा सर्रास गैरफायदा दुर्दैवाने घेतला गेला आहे
मी आधी म्हटल्याप्रमाणे, दुर्दैवाने या प्रश्नाचे सोपे आणि सर्वमान्य उत्तर नाही

==
माफ करा, 'अँकर बेबी हे सिस्टीमचा गैरफायदा घेण्यासाठीच जन्माला आलेले आहेत' असे तुमचे मत असल्यामूळे ह्या बाबतीमधे तुम्हाला काहि समजावणे माझ्या कुवतीच्या बाहेर आहे जर तुम्ही रिपब्लिकन डेमॉक्रॅट हे चष्मे काढून विचार करू शकलात तर तुम्हाला स्वतःला लक्षात येईल.
===
हे विधान अत्यंत बिनबुडाचे आणि भावनेच्या भरात केलेले आहे हे उघड आहे. जन्माला येणारे अर्भक नव्हे तर त्याला जन्माला घालणारे प्रगल्भ आईबाप हे सिस्टिमचा गैरफायदा घेत आहेत हे आपणास कळत नाही का? का जाणूनबुजून वेड पांघरुन पेडगावला जाण्याचा प्रकार आहे?

आम्ही दोघे बेकायदा घुसखोर आहोत. पण आम्ही जर एखादे अपत्य जन्मास घातले तर त्याला रीतसर अमेरिकन नागरिकत्व मिळेल आणि मग आम्ही इमोशनल ब्लॅकमेल करुन बेकायदा असलो तरी जन्मभर लोकांच्या नाकावर टिच्चून अमेरिकेत राहू शकतो. यथावकाश अमेरिकेचे नागरिक बनू शकतो असा विचार करणारे दांपत्य. हा तो सिस्टिमचा गैरफायदा घेणे आहे. आले का ध्यानात? ह्यात डेमोक्रॅट वा रिपब्लिकन फरक नाही. कायद्यातील त्रुटीचा गैरफायदा घेणे आहे. ह्या सगळ्या प्रकारात करदात्यांचा पैसा खर्च होत आहे. असा कायदा असल्यामुळे बेकायदा घुसखोरांना एक सोपा मार्ग मिळाला आहे. नव्हे, त्यामुळे अधिकाधिक घुसखोरांना अशा प्रकारे घुसायला उत्तेजनच मिळते आहे.

अमेरिकेचे कायदे पाळले जात नाहीत म्हणून कोणी रागावला तर ते स्वाभाविक आहे

मला दोन्ही बाजू पटतात आणि पटत नाहीत, आणि हे अनेकांचे होत असेल कदाचित

ज्यावेळी हे आर्ग्युमेण्ट केले जाते की आम्ही गुन्हेगार नाही इथे जबाबदारीने राहतो कायदे पाळतो इत्यादी
तेव्हा मूलभूत कायदा तुम्ही मोडला आहे इथे परवानगी शिवाय येऊन हे कसे नजरंदाज करता येईल?
तुम्ही गुन्हेगार आहातच, जरी लौकिकार्थाने तुम्ही आता चोऱ्या दरोडे घालत नाही
(मूळ कायदा बरोबर की चूक, कठोर की अनावश्यक हे मुद्दे गौण)

त्याचवेळी त्यांची ही कुटुंब आहेत, माणुसकी ने सर्वाना वागवायला पाहिजे हे ही बरोबर

याचं सोल्युशन काय? सर्वाना मान्य होईल असा मध्यममार्ग काढणं हे वाटतं तितकं सोपं नाही.

आणि या सगळ्या गोंधळामध्ये सुक्या बरोबर ओलं जळत या न्यायाने लीगल इमिग्रंटस ना सुद्धा त्रास होण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे, हे थेट आपल्याला जाणवणार आहे. तुम्ही कधीही इथे आला असाल तरी.

Pages