अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

११ नोव्हेंबरचा बिल मारचा कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने पाहिला होता. पण निराशा पदरी पडली. तोच फॉर्म्युला. सगळे ट्रंपविरोधक जमवून मतदार लोकांचे कसे चुकले ह्याचीच चर्चा जास्त. आपले काय चुकले ह्या विषयाला नगण्य महत्त्व. कुठल्यातरी परंपरावादी पाहुण्याला आमंत्रित केले असते तर काय वाईट झाले असते?

बिल मार हा काही (त्याच्या नावडत्या) लोकांना उद्देशून तुम्ही आपल्याच जगात राहून तेवढेच खरे आहे असे मानू लागला आहात असे म्हणत असे (पीपल इन द बबल). तो स्वतःच आता आपल्या बुडबुड्यात रममाण होतो आहे असे वाटते.

नाही म्हणायला त्याने नॉट माय प्रेसिडेंट ह्या आंदोलनावर जोरदार टीका केली एवढीच काय ती आशादायक गोष्ट.

कधी नव्हे ते मी बिल मार दीर्घकाळ सुट्टीवर जात आहे म्हणून आनंदात आहे!

गेल्या शंभर वर्षात कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने भावी राष्ट्राध्यक्षाकरता हिरीरीने प्रचार का केला नाही ह्याचे कोडे ओबामाला आता उलगडले असेल!

ट्रंपवर मनसोक्त विनोद करुन, उपस्थित (व अनुपस्थित) लोकांना खळखळून, पोट धरधरून हसवून दोन घटका करमणूक केली खरी पण अशा प्रकारे उघड उघड शत्रुत्व पत्करून त्याने ट्रंपला आव्हान दिले आहे. त्याची लेगसी (जी काही असेल ती) आता धोक्यात येताना दिसत आहे.

ट्रम्प चे ६० मिनिट्स वरचे भाषण कोणी पूर्ण ऐकले/पाहिले का? मी एक दोन क्लिप्स पाहिल्या.

मायनॉरिटी अ‍ॅटॅक्स बद्दल कॅमेर्‍याकडे पाहून "STOP IT" म्हण्टला आहे. जे लोक करत आहेत त्यांना उद्देशून.
http://www.cnn.com/2016/11/13/politics/donald-trump-60-minutes-first-int...

सेम सेक्स मॅरेजेस बद्दलः
"It's irrelevant because it was already settled. It's law. It was settled in the Supreme Court. I mean it's done," Trump said.

He added: "These cases have gone to the Supreme Court. They've been settled. And I'm -- I'm fine with that."

क्लिंटन्स बद्दलः
"I don't want to hurt them," Trump said of the Clintons, noting he'd spoken to both Hillary and Bill Clinton since his victory. "They're good people. I don't want to hurt them.

"सेण्टर" कडे वळण? असे असेल तर वेलकम चेंज.

हो, मी पाहिली पूर्ण मुलाखत. निवडणूक लढवणारा ट्रम्प आणि हा ट्रम्प ही दोन निराळी माणसं असावीत असं वाटलं बघताना!!
ही तू वर दिलेली उदाहरणं, ओबामाकेअरमधल्या चांगल्या प्रोव्हीजन्स कन्टीन्यू करण्याचं सूतोवाच, बाकी प्रश्नांवरचा कॉशस स्टान्स (मी पूर्ण माहिती मिळवेन आणि मगच ठरवेन), याशिवाय संपूर्ण बॉडी लॅन्ग्वेज, पिच ऑफ द व्हॉइस, टोन ऑफ कॉन्व्हर्सेशन हे अत्यंत 'नॉर्मल', ईव्हन जेन्युइन वाटत होते! ते जे एक 'ॲग्रेशन' सतत जाणवायचं त्याच्याकडे बघताना ते नव्हतं.
आत्मप्रौढी सबड्यूड होती.

आता मला वाटतंय क्लिंटनचा वेळ ओबामासारखाच GOP house and senate मुळे फुकट जाण्यापेक्षा ही इष्टापत्ती ठरण्याचे चान्सेस आहेत.

मी थोडाच वेळ पाहिली पण मलाही बोलण्या चालण्यात फरक वाटला खूपच. पूर्वीचा इलेक्शन टॉक म्हणजे एक शो होता की आताचा शो आहे हे कळेना Happy

हो कॅम्पेन मधला अ‍ॅग्रेसिव्हनेस एकदम गेला आहे. आता "प्रेसिडेन्शियल" Happy

GOP house and senate मुळे फुकट जाण्यापेक्षा ही इष्टापत्ती ठरण्याचे चान्सेस आहेत. >>> स्वाती, तुझ्या तोंडात साखर पडो. मी ती मुलाखत पाहिली नाहीये. आता नक्की पाहीन.

हिलरीच्या इमेल आणि अन्य प्रकरणाची पूर्ण नि:पक्षपातीपणाने चौकशी झाली पाहिजे आणि एक कणभरही गैरप्रकार झाला असेल तर तिला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.

ट्रंपचा सौम्यपणा हा दुबळेपणा ठरू नये अशी इच्छा आहे.

हिलरीबाई (आणि त्यांचे निस्सिम भक्त) गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज होत्या ह्याचे हे उदाहरण पहा
http://dailycaller.com/2016/11/14/heres-a-photo-of-hillary-signing-copie...

ट्रम्पची मुलाखतीचा काही भाग बघितला, मला काहीच आस्चर्य वाटले नाही.

तो निवडणुक जुमला होता... क्लिन्टन आणि ते मित्र आहेत, त्यान्ना हर्ट करणार नाही, त्यान्च्या अनुभवाचा झालाच तर देशाच्या भल्यासाठीच वापर करेल.

वॉलला काही जागेवर कुम्पण असणार आहे.... थोडा मवाळ झाला आहे.

स्तुत्य बदल आणि हे होणे अपेक्षितच होते.

>>स्तुत्य बदल आणि हे होणे अपेक्षितच होते.<<

काय हे उदयशेट, निकालाच्या आधि ट्रंपला झोडपुन शेंन आणि माझी चांगलीच खेचलीत... Proud

स्वाती, सहमत. ट्रंपमधला हा बदल असाच राहो आणि नक्कीच स्वागतार्ह आहे.
शेंडेनक्षत्र, आता ट्रंप हिलरीला जेलमध्ये टाकण्यापेक्षा जॉब्जवर फोकस करणं महत्वाचं आहे आणि तिला जेलमध्ये टाकायचं की नाही ह्यावर विचार करेन म्हणतोय.

<<काय हे उदयशेट, निकालाच्या आधि ट्रंपला झोडपुन शेंन आणि माझी चांगलीच खेचलीत... फिदीफिदी>>
----- मी ट्रम्पला झोडपले नाही. माझी अमेरिकन मतदारान्साठी मोठी सहानुभूती होती. उलट मायबोलीवर ट्रम्पचे अभिनन्दन करणार्‍यात मी पहिला (कुठे तरी पहिला आलो :स्मित:).

>>> आता मला वाटतंय क्लिंटनचा वेळ ओबामासारखाच GOP house and senate मुळे फुकट जाण्यापेक्षा ही इष्टापत्ती ठरण्याचे चान्सेस आहेत.
--- संपूर्ण सहमत. (गेल्या वर्षी, अन्य एका संस्थळावर, असाच युक्तिवाद केला होता :))

शिवाय थोडा पुढचा विचार केला, तर २०२०च्या निवडणुका ह्या जनगणनेच्या वर्षात येत असल्याने अधिक महत्त्वाच्या आहेत. (२०१०च्या निवडणुकीतल्या जेरीमँडरिंगमुळे रिपब्लिकनांना एक दशकभर हाऊस ताब्यात राखता येईल, अशी चिन्हं आहेत.)

ट्रंपमधला हा बदल २०२० पर्यंत असाच राहो ही इच्छा! Wink

(२०१०च्या निवडणुकीतल्या जेरीमँडरिंगमुळे रिपब्लिकनांना एक दशकभर हाऊस ताब्यात राखता येईल, अशी चिन्हं आहेत.)>>> डेम्सनं आत्तापासून काम करायला सुरुवात केली तर २०२० मधे हाऊस ताब्यात घेता येईल. २०१८चं मला खरं वाटत नाही.

http://www.computerworld.com/article/3140711/it-careers/trumps-election-...

ह जेफ सेशन्स माणूस एच १ बि प्रोग्रॅम ला महागात पडणार आहे. फ्युचर कॅप कमी करायला बघतील पण सध्या आहे त्याचं काय करतील काय माहित. एच १ बि इएडि ला पण त्यानी विरोध केलेला आहे.

>>> २०१८चं मला खरं वाटत नाही.
--- खरंय. जेरीमँडरिंग आणि अन्य कारणांमुळे हाऊसमध्ये साधं बहुमत मिळवायचं असेल, तर डेमोक्रॅट्सना किमान ५८ ते ६०% मतं मिळवणं भाग आहे.

"“I come from the white working class and I am deeply humiliated that the Democratic Party can’t talk to the people where I came from.”

आणी

"“We are going to say to Mr. Trump, ‘If you have the courage to actually stand up to the big money and trust of the billionaire class... if you have the courage to, in fact, develop policies to improve lives for working people, count us in,’” Sanders said.

बर्नी सँडर्स आज सी. बी एस. धिस मॉर्निंग वर...

प्रायमरी मधे त्याला कोणी निट पाहीले व ऐकले असेल तर त्याच्याइतके जेनुइन पॅशन फॉर मिडल क्लास अँड ऑर्डिनरी पिपल.. कोणीच दाखवले नव्हते.. म्हणुन तो इतका पॉप्युलर होता. पण इस्टॅब्लिश्ड डेमोक्रॅटिक पार्टी वॉज हँगिंग देअर हॅट ओन्ली ऑन मायनॉरिटीज..दे थॉट दॅट्स देअर ट्रंप कार्ड! ( नो पन इंटेन्डेड!)..ओन्ली टु फाइंड आउट.. दे वेअर राँग!

राज...माझे ट्रंपबद्दल मत बदलण्याबद्दल.... मी माझ्या इथल्या पहिल्याच पोस्ट मधे लिहीले होते की अमेरिकेत बरेच जण वॉशिंग्टन मधले सेनेटर्स व काँग्रेसमेन त्यांच्या सिट्सकडे सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीसारखे बघतात व त्याप्रमाणे वागतात त्याला कंटाळले आहेत..त्यातले बरेच जण ट्रंपकडे तो वॉशिंग्टन आउट्साइडर असल्यामुळे तो ती परिस्थिती बदलेल या आशेने बघत आहेत व म्हणुन त्याला त्यातले बरेच जण मत देउन निवडुन आणतील. पण गंमत अशी आहे की ९८ टक्के तेच काँग्रेसमेन व तेच सेनेटर्स जनतेने निवडुन परत वॉशिंग्टनमधे पाठवले आहेत.. त्यामुळे व्होटर्सचे हे बायपोलर वागणे बुचकाळ्यात टाकणारे आहे.(.इफ दे रिअली वॉन्टेड टु चेंज द वे वॉशिंग्टन वर्क्स!).. डु दे रिअली थिंक ट्रंप अ‍ज अ‍ॅन आउट्साइडर्..अलोन.. कॅन चेंज द वॉशिंग्टन? अँड इफ ही डझ.. देन हॅट्स ऑफ टु हिम!

ट्रंपची मुलाखत पाहिली, फार म्हणजे फारच सेन्सीबल बोलला. इतका की शंका यावी. हा शहाणपणा २०२० पर्यंत तरी टिकून रहावा. पण I have doubts. त्याचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता it's a matter of time. संधी दिली आहे, त्याला मिळाली आहे, आशा आहे की तो खरंच जनहिताची कामं करेल. तसं झालं तर माझा फायदा होईल आणि मग ट्रंपची इथे येऊन मी स्तुती करेन ;).

गे मॅरेजबद्दल सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला म्हणतोय, पण याबद्दल आणि hb2 बद्दलचा निर्णय ट्रंप जो कोणी जज नेमेल त्यावरून ठरेल असा अंदाज आहे. मोस्टली राईट विंग कडे झुकणारा किंवा रीप्बलिकन जज नेमला जाईल. त्यामुळे याचे निर्णय रीपब्लिकन्सना हवे तसे लागण्याची शक्यता आहे. ट्रंप मुळात रीप्बलीकन नाही. त्यामुळे सिनेट, हाऊस, आणि प्रेसिडेंट यांचं एकमत कसं होणार, किती वेळा होणार, कुठल्या कुठल्या बाबतीत होणार बघणं रोचक ठरेल. त्याला मनासारखं काम करू दिलं नाही तर हा बाबा काय करेल? जी जी आश्वासनं निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, ते शब्द हळू हळू बदलत आहेत. आश्वासनांची १००% पूर्तता करणं अशक्यच असतं, पण त्याच्या मतदारांना ते पटेल का?

>>त्यामुळे व्होटर्सचे हे बायपोलर वागणे बुचकाळ्यात टाकणारे आहे<<

सेनेट, हाऊस रिपब्लिकन्सकडे असल्यामुळे ओबामाचे काय हाल झाले ते सर्वश्रुत आहे. ती चूक टाळण्यासाठीच मतदारांनी ट्रंपला रिपब्लिकन कंट्रोल्ड हाऊस/सेनेट गोल्ड प्लॅटर वर दिलेलं आहे, असं म्हणायला वाव आहे. आणि आतातर ट्रंपला विरोध करणारे काॅंग्रेसमनहि दोस्तीची भाषा करायला लागले आहेत...

मतदारांनी ट्रंपला रिपब्लिकन कंट्रोल्ड हाऊस/सेनेट गोल्ड प्लॅटर वर दिलेलं आहे, असं म्हणायला वाव आहे.>>>>> ज्या मतदारांनी त्याला निवडून आणला आहे त्यातल्या बर्‍याच मतदारांना इतकं डोकं असेल असं नाही वाटत.

सँडर्स मला आवडला होताच पण ते नशीबात नव्हतं.

>> ज्या मतदारांनी त्याला निवडून आणला आहे त्यातल्या बर्‍याच मतदारांना इतकं डोकं असेल असं नाही वाटत

बुवा +१. एव्हढा फार फेच्ड विचार मतदारांनीं केला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते.

(पण असं म्हणणं आणि हिलरी चं बास्केट ऑफ डिप्लोरेबल्स म्हणणं सिमीलर होईल ना? Happy डेमोक्रॅट्स्/हिलरी सपोर्टर्स च्या अशा एलिटीस्ट विचारांनींच ही (एलेक्शन रिझल्ट) वेळ आणली ना?)

इलेक्शनला उभं राहिलं की अशा गोष्टी मनात आल्या तरी बोलायचं नसतं हा गोल्डन रुल हिलरीनी तोडला, असं म्हणावं तर सगळे इस्टॅब्व्लिश्ड गोल्डन रुल्स तोडण्यावरच अख्खी कँपेन बेतली आणि जिंकून आला.
तो बोलताना आता पुष्कळ हम्बल्ड वगैरे वाटत आहे पण डज दॅट मॅटर? व्हॉट मॅटर आर हिज चॉईसेस फॉर कि पोजिशन्स इन हिज अ‍ॅडमिनिस्ट्रेशन. बॅनन , सेशन्स, जुलियानी आणि मायरॉन इबेल हे चॉईसेस डोंट शो अ स्पेक ऑफ ह्युमिलिटी बट अंडर्स्कोअर्स व्हॉट हि बिलिव्ज इन.
मला तर ती इलेक्शनची रात्र आता गेम ऑफ थ्रोन्स मधला रेड वेडिंगचा एपिसोड वाटत आहे.
http://www.ecowatch.com/noam-chomsky-trump-2093271018.html
इथे ते बांग्लादेश मध्ये लोकं विस्थापित होत आहेत राझिंग सि लेवल्स मुळे, तो मजकूर बघून ट्रंप "What? So how does that matter to me and America?" असं म्हणताना डोळ्यापुढे येतोय. Lol तो आणि त्याचे बडीज हे सगळे अत्यंत शॉर्ट साईटेड आणि हम बोलेसू कायदा छाप लोकं आहेत. इंट्रेस्ट असल्यास बॅनन, सेशन्स वर लेख वाचून बघा इतर ठिकाणी. This victory has potential to really change the course of America's history (not in a good way).

>>ज्या मतदारांनी त्याला निवडून आणला आहे त्यातल्या बर्‍याच मतदारांना इतकं डोकं असेल असं नाही वाटत.>> इतके कमी नका हो लेखू. काम होण्यासाठी सगळे ताब्यात हवे एवढे त्यांना कळते. आमच्या इथे स्ट्रेट रिपब्लिकन वोटिंग करणार ना म्हणून खूप आधीपासून फोन येत होते. लोकांना बुश, क्रिस्टी वगैरे प्रेसिडेंट म्हणून नको होते. बाकी सेनेटर वगैरे साठी प्रायमरी होतीच की.

अंजली , वैद्यबुवा.. सहमत.

राज.."सेनेट, हाऊस रिपब्लिकन्सकडे असल्यामुळे ओबामाचे काय हाल झाले ते सर्वश्रुत आहे ".. तु असा सेंसीबल बोलतोस म्हणुन तुझे बरेचसे विचार मला पटतात.

पण मी बायपोलर यासाठी म्हणत होतो की वॉशिंग्टन मधे चेंज हवा, तिथल्या बम्सना ते निष्क्रिय आहेत म्हणुन काढुन टाकायला ह्वे, तिथल्या गाळाचा( स्वांप) निचरा करायला हवे असे बोलल्यामुळे त्याच्या सपोर्टर्सनी त्याला निवडुन आणले असे मला वाटले ( व फेव्हरेबल ट्रेड्स करुन जॉब्स परत आणुन देइन्,इलिगल इमिग्रंट्सना हाकलुन देइन यासोबत) . ट्रंप व्होटर्स इतके भोळे आहेत का की त्यांना असे वाटते की फक्त हिलरी व डेमोक्रॅट्सच लॉबीज कडुन पैसा घेतात? तेच फक्त वॉशिंटनमधले बम्स व गाळ( स्वांप) आहेत? रिपब्लिकन्स नाहीत? याचा अर्थ फक्त हिलरीला एकटीलाच त्यांनी वॉशिंग्टन इनसाइडर म्हणुन स्केपगोट केल.

पण अंजली म्हणते त्याप्रमाणे ट्रंप टिपिकल कंझर्व्हेटिव्ह रिपब्लिकन प्रेसिडंटसारखा वागतो की नाही ते अजुन कोणीच ठामपणे सांगु शकणार नाही. ऑलरेडी तो बोलुन गेला आहे की गे मॅरेज इश्यु इज अ नॉन इश्यु फॉर हिम. ते ऐकुन त्याला मत देणार्‍या इव्हँजिलिकल ख्रिश्चिअन्सच्या छातीत धडकले असेल.. पुढे जाउन अजुन काय काय तो असे बोलेल व करेल याची त्यांना काळजी वाटु लागली असेल. तो जर असाच लिबरल बोलु व करु लागला व अ‍ॅज प्रॉमिस्ड मिशिगन्,ओहायो व पेनसिल्व्हानियामधले जॉब्स जर परत आले नाहीत तर तिथल्या लोकांना व इव्हँजिलिकल ख्रिश्चन रिपब्लिकन्सना लवकरच बायर्स रिमोर्स वाटायला वेळ लागणार नाही.

खर म्हणजे ज्याचे पुर्ण आयुष्य न्यु यॉर्कसारख्या पुरोगामी राज्यात गेले व जो तिथे त्याचे संपुर्ण आयुष्य प्लेबॉयसाखे जगला..त्याच्याकडुन इव्हँजिलिकल व ट्रॅडिशनल रिपब्लिकन्सनी..तो ट्रॅडिशनल कन्झरव्हेटिव्ह ख्रिश्चन माणसा सारखा वागेल व करेल अशी आशा बाळगणे फारच भाबडेपणाचे ठरेल असे मला तरी वाटते.

पण बघुया हळु हळु काय होते ते..ज्यांना जसा पाहीजे होता तसा चेंज मिळाला की नाही हे काळच( अ‍ॅक्चुअली ट्रंपच! Happy ) ठरवेल..

Pages