अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टर्कि पोलिसानेच केलेली रशीयन राजदूताची हत्या, आय्सीसचा हस्तक पाकिस्तानी निर्वासिताने लोकसंहाराच्या हेतुनेच गर्दित घातलेला ट्रक, स्वित्झरलंडमध्ये अशाच प्रकारची दुर्घटना. या पार्श्वभूमीवर निर्वासितांवर कडक निर्बंध (एक्स्ट्रीम वेट्टिंग) घातले जावे या मताशी तुम्हि कितपत सहमत आहात...

लेपो आणि सिरिया मधील परिस्थिती रशियामुळे उद्भवली आणि त्याचा धडा इ. मुळे त्या पोलिसाने राजदूताला मारलं यात रेफ्युजीचा संबन्ध नाही. रेफ्युजी कडक निर्बन्धामुळे आयसिस करत असलेल्या बुद्धिभेदाचं फावेल.
जर्मन हल्ला आत्ताच जर्मनीत केला कारण अ‍ॅन्ग्ला मर्कलला अजुन तरी ८०% पाठिंबा आहे, तो कमी होउन लिबरल सरकार येउ नये. हा हल्ला टेरर आहे पण तो रेफ्युजीनी केला असं जाहिर केलं का?

निर्वासितांवर कडक निर्बंध (एक्स्ट्रीम वेट्टिंग)
फक्त निर्वासितांवरच का सगळ्यांवरच?
extreme vetting म्हणजे नक्की काय? येणार्‍याची माहिती कुठे मिळणार? जिथून आले ती जागा, तिथली लोकवस्ती उद्ध्वस्त झालेली. कसे कळणार त्याच्याबद्दल काही?

त्यातून पाकीस्तानी लोक तर अतिशय हुषार आहेत नि त्यांना सर्व प्रकारे मदत करीन असे ट्रंप म्हणाला. मग त्या लोकांना येऊ द्यावे की नाही?
अरे हो, ट्रंप म्हणाला नाही का? म्हणजे त्याला काही अर्थ नाही,
अजून तो शपथ घेऊन राष्ट्राध्यक्ष झालेला नाही, तोपर्यंत तो काय वाट्टेल ते बोलेल, करेल त्याला काही अर्थ नाही.

त्यानंतरहि तो म्हणेल मी यंव करीन नि त्यंव की आपण फक्त टाळ्या वाजवायच्या, कसे करणार हे विचारायचे नाही.

८०% सपोर्ट? कुठे वाचलंत, माझ्या वाचनात ४०-५०% च्या रेंजमध्ये सपोर्ट आहे/होता जो आता अजुन खाली जाईल.

तो हल्लेखोर पाकिस्तानी इमिग्रंट/रेफ्युज होता. हल्लीच्या काळातले योरपमधले हल्ले रेफ्युज संदर्भातले आहेत, इंक्लुडिंग टर्कि...

राजदूताला तो पोलिस अलेप्पोचा रहिवासी होता का तुर्कस्तानचा? सिरियात समजा रशियाने उच्छाद केला तर त्याचा राग तुर्की पोलिसाला का यावा की आपला जीव धोक्यात घालून तो राजदूताचा खातमा करायला उद्युक्त झाला? त्याचे कोणी जवळचे नातेवाईक त्यात मेले होते का निव्वळ मुस्लिमांकरता जिहाद म्हणून तो शहीद झाला?
हा पोलिस स्वतः निर्वासित नसला तरी कुठल्यातरी देशात मुस्लिम मेले म्हणून डोके भडकावून घ्यायला तयार होता. असा अतिरेकी बंधुभाव बाळगणारा निर्वासित अमेरिकेत येणारच नाही आणि त्याचे डोके फिरुन तो असेच काही कृत्य करणार नाही ह्याची खात्री देता येत नाही.

जर्मनीच्या हल्ल्याची पूर्ण माहिती मिळालेली नाही. पण प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानी वा अफगाणी माणसाचा संबंध होता. पण आता त्याला पुराव्याअभावी सोडून दिले आहे. आनंद आहे! पण आयसिसने त्या ड्रायवरचा "आमचा सैनिक" असे म्हणून गौरव केला आहे त्यावरून काय ते ओळखा!

एकंदरीत अरबी देशातून निर्वासित घाऊक पातळीवर आणणे धोक्याचे आहे हे यातून अधोरेखित होते आहे. यादवीने ग्रासलेल्या देशात लोकांची पार्श्वभूमी तपासणे मोठे अवघड काम आहे. खोटी कागदपत्रे, खोटे दाखले, खोटी नावे ह्यातून केवळ चांगले लोक निवडता येणे अशक्य आहे. ट्रंपने अशा प्रकाराला तीव्र विरोध दाखवला आणि हिलरीने प्रचंड पाठिंबा. हिलरी हरली आणि ट्रंप जिंकला त्यामुळे अमेरिकन लोकांना अशा प्रकारे घाऊक आयात पसंत नाही हे उघड आहे.

८०% आज सकाळी एनपीआर वर ऐकलं.
आता शोधल्यावर काही ठिकाणी गेल्या एप्रिल मध्ये इतका होता असं दिसतय. आता १२ ट्क्यानी खाली आला असं ही दिसलं. माय बॅड.

<खरे म्हणजे नाही. आजिबात निश्चित नाही. जोवर ट्रंप शपथ घेत नाही तोपर्यंत कसलीही निश्चिंती नाही. >

मग जपानी पंतप्रधान इत्यादींना भेटायची घाई काय आहे?

स्वतःची टीम कशाला जाहीर केलीय?

शपथ घेतली रे घेतली, की त्याला आता कोणत्याही क्षणी इंपीच केलं जाऊ शकतं असं लिहायला लागाल ना?

(अगदीच राहावलं नाही.)

==
मग जपानी पंतप्रधान इत्यादींना भेटायची घाई काय आहे?
==
अहो जपानी पंतप्रधानांनी प्रयत्न करुन ट्रंपची भेट घेतली अशी माझी माहिती आहे. तेव्हा ट्रंपला घाई नसावी.

==
स्वतःची टीम कशाला जाहीर केलीय?
==
कदाचित ट्रंपला खात्री असेल, मला नाही. प्रत्येक पावलावर डेमोक्रॅट्स आणि अन्य विरोधक काहीतरी अडथळे आणणार ह्याची मला खात्री आहे. इतक्या निवडणुका पाहिल्या आहेत पण इलेक्टर लोकांना निकाल बदलायला सांगता येतो हे पहिल्यांदा कळले ते ट्रंपच्या निवडणुकीच्या निमित्तानेच.

==
शपथ घेतली रे घेतली, की त्याला आता कोणत्याही क्षणी इंपीच केलं जाऊ शकतं असं लिहायला लागाल ना?
==
होय, ती टांगती तलवार आहेच. प्रश्नच नाही. इतका तीव्र विरोध असल्यामुळे कधी कुठे घोडं अडेल हे सांगता येत नाही. खुद्द रिपब्लिकन पक्षातही ट्रंपच्या पाठीत खंजीर खुपसायची कुठलीही संधी न दवडणारे अनेक ब्रुटस आहेत.

अर्थात आपले मत वेगळे असल्यास स्वागत आहे..

अहो जपानी पंतप्रधानांनी प्रयत्न करुन ट्रंपची भेट घेतली अशी माझी माहिती आहे. तेव्हा ट्रंपला घाई नसावी. >>> Lol
अगदीच रहावलं नाही. बाकी चालू द्या.

बाळंत झाल्यावरही लगेचच ती पुन्हा प्रचारात उतरली. हे सगळे होत असताना ट्रंप निवडून येणारच ह्याची शाश्वती नव्हती. पण तिने आणि तिच्या भावंडांनीही प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कष्ट केले होते. ट्रंपच्या मुलाबाळांचा सहभाग जगजाहीर असतानाही लोकांनी ट्रंपला निवडून दिले आहे. तेव्हा निवडून देणार्‍यांना ट्रंपच्या मुलांचा राजकारणातली लुडबुड वा सहभाग खटकला नाही. मग आता तो तुम्हाला का खटकावा?>>>>>>> किती बाळबोध विचार असावेत त्याला काही सीमा? हे बघा, निवडून दिलं म्हणजे काय त्या सगळ्यांना हे मुद्दे मान्य आहेत असा सोयिस्कर अर्थ तुम्ही काढत आहात. ह्या निवडणुकीत ज्यानी कमी चुका केल्या त्याला जास्त मतं मिळाले आहेत असं झालं आहे. राहिला प्रश्न कॅम्पेन मधल्या इन्वॉल्वमेंटचा तर कँपेन मध्ये सल्ला मसलत आणि नंतर अ‍ॅक्चुअल पॉलिसी मेकिंग मध्ये सल्ला मसलत ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. आता कँपेन संपून खरा राज्य कारभार संभाळावा लागणार आहे आणि त्या करता ज्यांना राज्याचा कामात अनुभव आहे त्यांनाच फक्त इन्वॉल्व केलं पाहिजे अशी साधी अपेक्षा आहे. अनुभव नसलेल्या माणसाशी सल्ला मसलत करणे म्हणजे अक्षरशः महत्चाच्या निर्णयांमध्ये छापा की काटा करण्यासारखे आहे.

राज, टर्की मधल्या हल्ल्यांला थोडी वेगळी पार्श्वभुमी आहे ना? अलेप्पो मध्ये रशियाची इन्वॉल्वमेंट ह्या मुद्द्याशी निगडित आहे ती हत्या. बाकी निर्वासितांचे कडक वेटिंग हे बहुतेक आता अनिवार्यच आहे पण ते करुन सुद्धा अशा घटना घडणारच नाही ह्याची हमी मिळेल असं नाही वाटत. एकंदरित अवघड प्रश्न आहे हा फारच.

कालची अगदी ताजी बातमी आहे, ट्रम्प चे मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे असे तीन प्रथितयश अशा डॉक्टरांनी पत्र लिहुन विद्यमान प्रेसिडेंट बराक ओबामा यांना कळविलेआहे.ते ही २० जानेवारी २०१७ च्या अगोदर तपासणी करुनच , कारभार हस्तांतरण करा असा सल्ला दिल्याचे समजले. आता बोला ?

==
किती बाळबोध विचार असावेत त्याला काही सीमा? हे बघा, निवडून दिलं म्हणजे काय त्या सगळ्यांना हे मुद्दे मान्य आहेत असा सोयिस्कर अर्थ तुम्ही काढत आहात
==
अहो, आम्ही सगळे ट्रंप मतदार बाळबोध मुद्देच बघूनच मते देतो आणि नेते निवडतो. क्लिष्ट, जटिल, किचकट आकडेवारी सांगून लोकांची दिशाभूल करणारे हरले हो!

==
ह्या निवडणुकीत ज्यानी कमी चुका केल्या त्याला जास्त मतं मिळाले आहेत असं झालं आहे
==
हे अगाध सत्य आपल्याला कसे उमजले बरे? मला वाटले की ट्रंपने चांगला प्रचार केला, चांगले मुद्दे मांडले जे लोकांना भावले. आपली व्यूहरचना अचूक केली ज्यायोगे योग्य संख्येत इलेक्टर मिळतील म्हणून तो जिंकला. आता तुम्हीच बरोबर आणि मी चूक हे कसे सिद्ध करायचे?
आता त्याला कमी चूक करणारा म्हणायचे का जास्त बरोबर वागणारा म्हणायचे हे ग्लास अर्धा रिकामा का अर्धा भरलेला ह्याप्रकारचे तात्त्विक वगैरे आहे. ह्याला ठोस उत्तर मिळणे अशक्य. लोकांनी आपापली मते मांडायची इतकेच.

ट्रंपबरोबर ट्रंपच्या कुटुंबियांचा प्रचारात मोठा सहभाग होता. त्यामुळे यशाचे फळ त्यांनाही मिळाले तर इतके वाईट वाटायला नको.

==
त्या करता ज्यांना राज्याचा कामात अनुभव आहे त्यांनाच फक्त इन्वॉल्व केलं पाहिजे अशी साधी अपेक्षा आहे.
==
तुम्ही अपेक्षा हव्या तेवढ्या ठेवा. ट्रंप त्याला हवे ते करायला स्वतंत्र आहे. कायदा काही असे म्हणत नाही की फक्त राज्यकारभार हाकायचा अनुभव असणारेच राज्यकारभार करायला नेमता येतील. त्यामुळे जे काही नियम आहेत तेच पाळायला तो बांधिल आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करायला काही तो बांधिल नाही. उलट निवडणूकीच्या प्रचारात तो असेच म्हणत होता की प्रस्थापित लोकांना डच्चू देऊन नव्या लोकांना संधी दिली पाहिजे आणि लोकांना ते पटत असावे असे वरकरणी तरी दिसते आहे.

==
कालची अगदी ताजी बातमी आहे, ट्रम्प चे मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे असे तीन प्रथितयश अशा डॉक्टरांनी पत्र लिहुन विद्यमान प्रेसिडेंट बराक ओबामा यांना कळविलेआहे.ते ही २० जानेवारी २०१७ च्या अगोदर तपासणी करुनच , कारभार हस्तांतरण करा असा सल्ला दिल्याचे समजले. आता बोला ?
==

मी तर असेही ऐकले आहे की प्रत्येक ट्रंप मतदाराची मानसिक संतुलन तपासणी करावी आणि सखोल तपासणीनंतर त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे आढळल्यास त्यांचे मत रद्द करावे अशी एक पिटिशन कुण्या एका धडाडीच्या पुरोगामी कार्यकर्त्याने दाखल केली आहे. (त्यामुळे मीही चांगल्या मानसोपचार तज्ञाच्या शोधात आहे. कुणी चांगला माहीत असेल तर जरूर कळवा!) आता बोला!

इलेक्टरवर आधारित लोकशाही व्यवस्था देशाच्या ज्या संस्थापक मंडळींनी सुचवली त्यांचेही मानसिक संतुलन ठीक होते की नाही ते तपासले पाहिजे. कारण ज्या व्यवस्थेत ट्रंपसारखा माणूस निवडून येतो ती निर्माण करणारे लोक डोक्याने धडधाकट असतील असे वाटत नाही!

अतिरेकी बंधुभाव बाळगणारा निर्वासित अमेरिकेत येणारच नाही
अमेरिकेत कुणि यायला कशाला पाहिजे? सँडि हूक शाळेत जाऊन मुलांना मारणारा गोरा अमेरिकनच होता. मागे ओक्लाहोमा ला सरकारी इमारतीत बोंब फोडून मुलांना मारणारा गोरा वास्प अमेरिकनच होता. आता सुद्धा ट्रंपचा तिरस्कार करणारे अनेक जण गोरे वास्प आहेत, त्यातल्या कुणाचेहि डोके फिरू शकते.

अमेरिकेतील मुस्लिम लोकांची संख्या आणि मुस्लिम अतिरेक्यांनी केलेले हल्ले आणि त्यातील बळी. याउलट अमेरिकेतील गोर्‍या लोकांच्या लोकसंख्येचे प्रमाण आणि त्यातील कुणी अतिरेकी हल्ले करुन मारलेले लोक ह्या प्रमाणात कमालीची विसंगती दिसत नाही का?
मुस्लिम लोक अमेरिकेच्या लोकसंख्येच्या १/१०० आहेत. गोरे लोक जवळजवळ ७०/१००आहेत म्हणजे मुस्लिमांच्या ७० पट. मग गेल्या २० वर्षातील अमेरिकेतील अतिरेकी हल्ले पाहिले तर मुस्लिम अतिरेक्यांनी केलेले इतके जास्त का?
आणि असे असताना मुस्लिम निर्वासित आणण्याचा आततायीपणा कशाला? शिवाय गोर्‍या अमेरिकनांनी धर्मापासून प्रेरणा घेऊन केलेले हल्ले तर आणखीच कमी. ओक्लहोमा वा सँडी हूक वा अन्य हल्ले हे धर्माने प्रेरित नव्हते. मुस्लिमांचे जवळजवळ सगळे अतिरेकी हल्ले धार्मिक होते.

इलेक्टरवर आधारित लोकशाही ........... ट्रंपसारखा माणूस निवडून येतो ती निर्माण करणारे लोक डोक्याने धडधाकट असतील असे वाटत नाही!

ती पद्धत १७८७ साली अंमलात आली. In a direct election system the North would outnumber the South,whose many slaves could not vote. ... But the Electoral College .... instead let each Southern state count it slaves, albeit with a two-fifths discount, in computing its share of the overall count.

Electoral College defendants argue that it serves to check the passions of ordinary voters, pointing to Alexander Hamilton's view in the Federalist Paper, that the Electoral College would help ensure "that the office of the President will never fall to the lot of any man who is not in an eminent degree endowed with the requisite qualifications."

Akhil Amar, a Yale law professor, as quoted by John Conyers Jr. in today's Star Ledger.

आता काळे लोकहि मतदान करू शकतात, त्यांचे मत २/५ ऐवजी पूर्ण एक मानले जाते. तरी हॅमिल्टन च्या म्हणण्याप्रमाणे केवळ बहुमता ऐवजी any man who is not in an eminent degree endowed with the requisite qualifications. निवडला जाउ नये हे तत्व बरोबर आहे.

फरक इतकाच आहे की दोन्ही पार्ट्यांनी या कॉलेजच्या सभासदांच्या वैयक्तिक मतावर कायद्याने बंदी आणली म्हणजे शेवटी स्टेट मधले बाळबोध मुद्देच बघूनच मते देतो आणि नेते निवडतो. क्लिष्ट, जटिल, किचकट आकडेवारी न समजणारे असे लोक ज्याला मत देतील त्यालाच इलेक्टोरल कॉलेजमधल्या सगळ्यांनी मत दिले पाहिजे. असा तो कायदा पार्ट्यांनी केला. मग वैयक्तिक रीत्या जरी त्या कॉलेजच्या सभासदाला वाटले की माणूस राष्ट्राध्यक्ष होण्याच्या लायकीचा नाही तरी त्याला मत दिलेच पाहिजे!

शिवाय बर्‍याच बाळबोध मतदारांना जर ट्रंप जर eminent degree endowed with the requisite qualifications आहे, असे वाटत असेल तर प्रश्नच नाही. कारण requisite qualifications नक्की काय? १७८७ सालचे विचार आजच्या पेक्षा वेगळे होते. आज वाट्टेल ते खोटे आरोप करणे, अतिशयोक्तिपूर्ण वर्णने करून शक्य नाही ते करून दाखवीन अश्या थापा मारणे असले चालते. मागल्या निवडणुकीत रॉमनी च्या लोकांना एका वार्ताहराने म्हंटले अहो तो जे बोलला ते खोटे आहे, जरा खरे खोटे तपासून मग विधान करा तर त्या रॉमनीच्या माणसाने म्हंटले आम्हाला खरे खोटे बघायला वेळ नाही, निवडणूक जिंकायची आहे म्हणून असे बोलतो. तेंव्हा बिचारा रॉमनी हरला कारण बहुतेक लोक बाळबोध नव्हते. आता अक्कल नसणे, बेताल बोलणे, वागणे हे चालते, त्याला मते मिळतात.

म्हणजे जे झाले त्याला शेवटी कायद्याचा आधार आहे असे म्हणायचे कारण आजकालच्या बाळबोध विचार करणार्‍या, आकडेवारी न समजणार्‍या लोकांचे राज्य आहे हे. इथे असेच होणार.

एक वेळ कट्टर मुसलमान इतर लोकांचे धर्म मान्य करेल, पण अमेरिकन लोक जे १७७६- १७८९ या कालखंडा ला धरून बसले आहेत ते सोडणार नाहीत.

आत्तापर्यंत निवडणुकीच्या वेळी ट्रंपने अनेक विधाने केली.

त्यातली खालील तीन आता तो मागे घेत आहे
१. हिलरीसाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमून, तिला तुरुंगात टाकीन - हे करणार नाही.

२. इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्ती इतक्यात करणार नाही.

३. ड्रेन द स्वांप आता करणार नाही (झाले असावे बहुतेक).
आणखी काय काय करणार किंवा होणार नाही कुणास ठाउक?

शेवटी काय, बेधडक थापा माराव्या, खोटी आश्वासने द्यावी नि निवडून यावे अस गेली काही वर्षे चालू आहे, कारण बाळबोध मुद्दे बघणारे लोक जास्त. अक्कलवाले कमी.

खोटे बोलणे हे चूकच नाही. खोटे दिवाळे काढून लोकांचे पैसे बुडवायचे नि स्वतः मात्र श्रीमंत व्हायचे हे कायद्याने करता येते. जो करतो तो हुषार.

>> मानसिक संतुलन<<

निवडणुका होईपर्यंत ठिक होतं पण एकदा निकाल लागल्यानंतरहि आपलंच घोडं दामटुन हे सगळे जोकर्स (सेलेब पकडुन) मानसीक संतुलन ढळल्याची चिन्हं दाखवतायत. ट्रंप निवडुन आला तर कॅनडाला मायग्रेट होणारे व्हुपी गोलबर्ग, माय्ली सायरस इ. नी अजुन इथला तंबु हलवलेला नाहि. लोकशाहिच्या नावाखाली तमाशा करणार्यांना "आता आवरा" म्हणायची वेळ आलेली आहे.

बाकि ट्रंपसाहेबांनी कामाचा सपाटा लावलेला आहे, सूत्रं घ्यायच्यां १ महिना अगोदरच. युनायटेड टेक नंतर आता बोइंग, लाॅखी मार्टिन त्याच्या रेडारखाली आलेले आहेत. आज सकाळी डाऊ ने २०के पास केला. तिथे रशियाने ओबामा ॲडमिनिस्ट्रेशनला उघडपणे कोल्ड शोल्डर दिला. त्यांच्या राजदुताच्या हत्येनंतर पुटीन आय्सीस विरुद्ध एकटा आणि आॅलआउट जायची शक्यता आहे - ट्रंप ओवल आॅफिसमध्ये पाय टाकण्यापुर्विच...

करता ज्यांना राज्याचा कामात अनुभव आहे त्यांनाच फक्त इन्वॉल्व केलं पाहिजे अशी साधी अपेक्षा आहे.
का? काय फरक पडतो?
बुश २ च्या वेळी छेनी, रम्सफेल्ड, पॉवेल, बोल्टन इ. ना अनेSSक वर्षांचा राज्यकारभार करण्याचा अनुभव होता, मग अफगाणीस्तान, इराक इथे काय केले त्यांनी? २००८ ची अर्थिक मंदी का आली?

२०००...

आणि निष्पन्न काहीहि नाही!
नेहेमीचेच आहे मायबोलीवर.
प्रत्येक प्रश्नावर कुठलीतरी एक बाजू घेऊन वचावचा भांडायचे, बोंबाबोंब करायची, २००० प्रतिसाद झाले की धन्य धन्य!! मायबोली असल्याचे सार्थक.

==
आणि निष्पन्न काहीहि नाही!
==
हे कसे ठरवलेत? लोकांचे मतपरिवर्तन नाही झाले तरी निदान दुसर्‍या बाजूचे मत कळते हे कमी नाही. आपले मत मराठीत कसे मांडावे ह्याकरता थोडा विचार करावा लागतो. दुसर्‍याच्या मताचे खंडन करायला बातम्या, लेख धुंडाळावे लागतात. हे सगळे व्यर्थ आहे असे मानायला मी तयार नाही. लोकशाहीत प्रत्येक मतदाराने असे करणे अपेक्षित असते. त्याला अशा चर्चेमुळे मदत होते. ही काही शेवटची निवडणूक नाही (बहुधा!) तेव्हा एक जागरुक मतदार बनण्याकरता अशा चर्चा खारीचा वाटा उचलत असतात. त्याला इतके तुच्छ का मानत आहात?

==
प्रत्येक प्रश्नावर कुठलीतरी एक बाजू घेऊन वचावचा भांडायचे, बोंबाबोंब करायची, २००० प्रतिसाद झाले की धन्य धन्य!!
==
आपल्याला हे सगळे इतके क्लेषकारक वा निरर्थक वा कटकटीचे वाटत असेल तर आपण इथून रजा का घेत नाही? आम्ही आपली उणीव मनाला लावून घेणार नाही ह्याची खात्री बाळगा!

ही काही शेवटची निवडणूक नाही (बहुधा!) >> त्या बहुधाला जाम हसतोय. ते ही शेंन तुमच्याकडून आलेल्या बहुधाला. काही म्हणा गेल्या २-३ पानांवर शेंन तुम्ही तलवारीने बाबुराव आपट्यांसारखी रणधुमाळी जरा कमी करून थोडं लाईट विनोदी लिहायला सुरुवात केलेली दिसते. गुड.
डीसीला जाताय का पुढच्या महिन्यात?

*

>> सगळे इतके क्लेषकारक वा निरर्थक वा कटकटीचे वाटत असेल तर आपण इथून रजा का घेत नाही? आम्ही आपली उणीव मनाला लावून घेणार नाही ह्याची खात्री बाळगा!

शेंडेनक्षत्र, तुम्ही एकाच पोस्ट मध्ये किती काँट्राडिक्टरी बोलून गेलात. आधी म्हणता अशा चर्चा होणे हे अतिशय हेल्दी आहे. आणि लगेच परत असे टोकाचे उद्गार काढता? :|

जोवर इथे सगळे जण आपापली मते योग्य तर्‍हेने मांडत आहेत तोपर्यंत असे टोकाचे उद्गार का बरं काढावे?

==
शेंडेनक्षत्र, तुम्ही एकाच पोस्ट मध्ये किती काँट्राडिक्टरी बोलून गेलात. आधी म्हणता अशा चर्चा होणे हे अतिशय हेल्दी आहे. आणि लगेच परत असे टोकाचे उद्गार काढता? :
==
मी काय विसंगत बोललो बरे? मूळ प्रतिसादकर्त्याने इथले लिहिणे निरर्थक आणि वाचाळ आहे असे मत मांडले आहे. ज्याला हा धागा, हा विषय, त्यावर मत मांडणे इतके निष्फळ आणि व्यर्थ वाटते त्याने पुढचे तर्कसंगत पाऊल उचलावे आणि इथे पाऊलही टाकू नये असे माझे मत मी मांडले. ह्यात विसंगत काय आहे?
ज्याला इथे मत मांडणे हा वेळेचा अपव्यय वाटतो आहे त्याने (वा तिने) तो अपव्यय टाळावा असे मी सुचवले आहे. ह्यात काय विसंगती आढळली ते जरा तपशीलात जाऊन (शक्यतो बाळबोध पद्धतीने!) समजवा.

असो. नुकतेच वाचले:

हिलरीने एकच निवडणूक तीन वेळा लागोपाठ हरण्याचा विक्रम केला आहे!
१. मुख्य निवडणूक हरली,
२. दोन की तीन राज्यात पुन्हा केलेली मतमोजणी, त्यात ती हरली आणि
३. इलेक्टरांची निवडणूकही हरली.

शेंन , पुरे की राव ! किती मीठ चोळताय जखमेवर !

एक कुतुहल : सँर्डर्स असता तरीही ट्रंपलाच मत दिले असते का ?

इथे पाऊलही टाकू नये असे माझे मत मी मांडले. ह्यात विसंगत काय आहे?

विसंगत काहीहि नाही. तुमचे काहीहि चुकले नाही.
तुमची बरीच मते मला पटतात व मी वेळोवेळी अनुमोदन दिले आहे.
पण मला चांगला शहाणा मतदार बनायला तुमच्या किंवा इथे लिहिणार्‍यांच्या कुठल्याहि मताचा काहीहि उपयोग नाही.
म्हणून मी माझ्यापुरते लिहीले. उगाच लोकांनी इथे लिहावे की नाही याबद्दल नाही.

जर बाळबोध विचार असतील, जास्त खोलात जाऊन विचार केला तर ते क्लिष्ट वाटते, अश्यांना तर्कसंगत लिहीण्यातले काय समजणार? म्हणून मला इथली चर्चा नुसती गंमत वाटते,

जर बाळबोध विचार असतील, जास्त खोलात जाऊन विचार केला तर ते क्लिष्ट वाटते, अश्यांना तर्कसंगत लिहीण्यातले काय समजणार? >> हम छोडेग्गा नहि जी एकदम Lol

अमेरिकेतील मुस्लिम लोकांची संख्या आणि मुस्लिम अतिरेक्यांनी केलेले हल्ले आणि त्यातील बळी. याउलट अमेरिकेतील गोर्‍या लोकांच्या लोकसंख्येचे प्रमाण आणि त्यातील कुणी अतिरेकी हल्ले करुन मारलेले लोक ह्या प्रमाणात कमालीची विसंगती दिसत नाही का? >>>>
हे विचार पुरोगामि आणी शेखुलर लोकांना कधीच पटनारे नाहित.. सुज्ञास सांगणे न लगे अशी म्हन आहे ..
आता हीच तथाकथीत पुरोगामि आणी दाढी कुरवाळनारि जनता
आताच बंगाल मधे शिव मंदिर पाडण्यासाठि गेलेल्या दाढि वाल्या बद्द्ल मौन बाळगुन आहे बरका ?

Pages