अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बोले तो क्या काय ? माणसे कायदे माणसांसाठी करतात. कायदा हि दगडावरची रेघ नसतो. खास करून अमेरिकेमधे (तरी) फेडरल, स्टेट, लोकल लॉ एकमेकांशी विसंगत असू शकतात. तेंव्हा कायदयाचा बडगा दाखवताना सारासार विचार करायला हरकत नसावी.<<

कायच्या काय युक्तिवाद. कायद्याचं उल्लंघन सारासार विचार करुन व्हायला लागलं तर कायदे हवेतंच कशाला (जे सपोझेडली सारासार विचार करुनच बनवलेले असतात)? समाजात लाॅ ॲंड आॅर्डर मेंटेन आणि देशाचं हित जपण्या करता कायदे आणि त्यांची अंमलबजावणी अपेक्शीत असते, असा माझा तरी समज आहे...

शेंडे तुमची " पण आम्ही जर एखादे अपत्य जन्मास घातले तर त्याला रीतसर अमेरिकन नागरिकत्व मिळेल आणि मग आम्ही इमोशनल ब्लॅकमेल करुन बेकायदा असलो तरी जन्मभर लोकांच्या नाकावर टिच्चून अमेरिकेत राहू शकतो" हि विधाने तुमचे एकंदर मनुष्य, समाज ह्याबाबतीमधले विचार स्पष्ट करतो, म्ह्णूनच म्हटले होते कि तुम्हाला समजावणे हे मला शक्य नाही. तुम्हाला (तुमच्या बाजूला) अँकर बेबीचे कुटूंब तोडणे हा प्रकार कायद्याची अमंलबजावणी करणारा नि क्षम्य वाटतो तसाच इतरांना वाटणे जरुरी नाही हे लक्षात घ्या. (राज कायद्याची सारासार विचार बुद्धी गहाण न टाकता अमलबजावणी ह्याबद्दलचे माझे पोस्ट ह्या संदर्भात बघ). तसेच पॅरेंटने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मुलांना भोगावी लागू नये ह्याबाबत कोणाचेच दुमत नसावे, जे इथे आडमुठेपणाने केल्या जाउ शकलेल्या कायद्याच्या अमलबजावणीने होउ शकते.

याचं सोल्युशन काय? सर्वाना मान्य होईल असा मध्यममार्ग काढणं हे वाटतं तितकं सोपं नाही. >> असुफ हे बरोबर आहे पण (अँकर बेबीज च्या संदर्भात) "एखादे कुटूंब कायद्याच्या नावाखाली तोडणे" हा प्रकार मला व्यक्तीशः तीरस्करणीय वाटतो. ह्याउप्पर त्या कुटूंबियांना दंड करून कायदेशीर नागरिक करून घेणे मला जास्त श्रेयस्कर वाटते. पुढे कोणी येउन असा गैर फायदा घेउ नये ह्यासाठी वॉल बांधणार आहेतच Wink

"समाजात लाॅ ॲंड आॅर्डर मेंटेन आणि देशाचं हित जपण्या करता कायदे आणि त्यांची अंमलबजावणी अपेक्शीत असते, असा माझा तरी समज आहे..."

राज .. तुझ्याशी १०० % सहमत. Happy

पण असामी अँकर बेबीज लॉ बद्दल अस म्हणत असावा( अस मला वाटत) की अमेरिकेत जन्माला आले त्यात त्या बेबीज चा काय दोष? त्यांची त्यांच्या पालकांपासुन ताटातुट का करायची? व शेंडेनक्षत्र व असुफ म्हणातात त्याप्रमाणे जर सगळे त्या कायद्याचा फायदा घेत असतील तर कोण तसे फायदा घेतात हे ठरवायचे कसे व कोणी? दॅट्स व्हेअर स्लिअपरी स्लोप स्टार्ट्स! साधी गोष्ट आहे.. आज जे अनेक भारतिय अमेरिकेत एच वन व्हिसा वर आहेत त्यांना जर इथे मुले झाली व ८-१० वर्षांनी त्यांचा व्हिसा संपला तर? ते त्यांच्या मुलांसाठी इथे राहु इच्छित असतील तर तश्या फॅमिलिज चे काय करायचे?

समजा अस म्हटल की डेमोक्रॅटिक पार्टी ठरवेल की अश्या लोकांचे काय करायचे तर रिपब्लिकन्स मानणार नाहीत अँड व्हाइस व्हर्सा..बर हाच कायदा नाही तर इलिगल इमिग्रेशनच्या संदर्भात बायपार्टिसन एफर्ट्स करुन एखादे काँप्रिहेंसिव्ह इमिग्रेशन बिल तयार करा म्हटले तर २०१२ पासुन कॅपिटल हिलवरची " गँग ऑफ एट " हॅज गॉन नोव्हेअर.. अशी कॅपिटल हिलवरची पॉलिटिकल रिअ‍ॅलिटी आहे.

राज..आणी असामी केंद्र, राज्य व सिटी चे लॉज सारखे असतीलच असे नाही हे जे म्हणतो आहे ते खर आहे..ते वाचुन तुलाच नाही पण पुष्कळ लोकांना तुला वाटले तेच वाटले असेल की लॉज पाळायचे नाहीत तर बनवले कशाला? त्यात लॉ ब्रेक करण्याचा प्रश्नच येत नाही राज..... राज.. तु जरा १७८६ ते १७९० दर्म्यान जे रॅटिफिकेशन ऑफ कॉन्स्ट्युट्युशन झाले त्याचा इतिहास वाचुन बघ ..मग तुला कळेल की अमेरिकेत राज्य सरकार केंद्र सरकारच्या प्रत्येक लॉला बांधील नाही...फार मनोरंजक व आय ओपनिंग इतिहास आहे तो.. फाउंडिंग फादर्सनी फार विचार करुन अमेरिकन कॉन्स्ट्युट्युशनचे लिखाण व नंतरचे त्याचे स्टेट बाय स्टेट रॅटिफिकेशन केले आहे. त्याच संदर्भात मॅडिसन विरुद्ध हॅमिल्टन यांच्यातल्या तेव्हा झालेल्या वादाबद्दलही वाच.. त्यानंतर तुला कळेल की अमेरिकेत राज्ये व केंद्र सरकारमधे नेहमीच असा अविश्वास का ते व बरेचशे ("बरेचशे" हा शब्द अधोरेखीत वाचावा ) केंद्र सरकरचे नियम राज्य सरकार व सिटी सरकार मानेलच असे नाही याच कारण ते. (तशी कॉन्स्ट्युट्युशननेच राज्य सरकारांना मुभा दिली आहे.)

आणी शेंडेनक्षत्र.. तुमच्या विनंतीला मान देउन... तुम्ही कधी गेस्ट वर्कर प्रोग्रॅमबद्दल( पार १९४२ च्या ब्रासिरो प्रोग्राम पासुन ते एच वन... ते एच १ ए आणी एच १ बी पर्यंत! ) ऐकले आहे का? नसेलच याची मला खात्री आहे नाहीतर तुम्ही मला असा प्रतिप्रश्न केलाच नसता की हे इलिगल वर्कर्स आधी लिगली कसे आले होते म्हणुन.. आता त्याबद्दलची आकडेवारी माहीत करुन घ्यायची तसदी तुम्ही घेणार का की नवनीत गाइडसारखे त्याचेही रेडीमेड उत्तर हवे?

असामी .. माझे पोस्ट लिहुन मी पोस्ट करेपर्यंत तुझे पोस्ट आले होते.. सॉरी फॉर स्पिकिंग ऑन युअर बिहाफ! Happy

एकदम माहितीपुर्ण पोस्ट आहेत मुकुंद! एरवी ह्या विषयांवर वाचन वगैरे होत नाही त्यामुळे फारशी माहिती नाहीच.

असामी, वरची १४:५४ वाली पोस्ट पण पटली. वरकरणी लॉजिकल वाटणारा पण तितकासा बरोबर विचार नाहीये तो मुलं जन्माला घालून नंतर इमोशनल ब्लॅ़कमेलिंगचा.

===
नसेलच याची मला खात्री आहे नाहीतर तुम्ही मला असा प्रतिप्रश्न केलाच नसता की हे इलिगल वर्कर्स आधी लिगली कसे आले होते म्हणुन.. आता त्याबद्दलची आकडेवारी माहीत करुन घ्यायची तसदी तुम्ही घेणार का की नवनीत गाइडसारखे त्याचेही रेडीमेड उत्तर हवे?
==

आता हे टोमणे कशासाठी. तुम्ही दावा केलात ना की बहुतेक बेकायदा लोक हे मुळात कायदेशीररित्याच आलेले आहेत. जर तु म्ही दावा केला तर पुरावाही तुम्हीच द्यायचा. साधी गोष्ट आहे. मी का बरे शोधावा तो? तो माझा मुद्दाच नाही.

हेच १ वर असताना मूल जन्मले तर ते बेकायदा मातापित्यांचे नाही. कारण त्यांचे त्या वेळेस असणारे अस्तित्त्व हे कायदेशीरच होते.
पण जर त्या आईबापांचे अपत्य जन्माच्या वेळचे अमेरिकेतले अस्तित्त्व कायदेशीर नसेल तर अशा अपत्याला आपोआप नागरिकत्व दिले जाऊ नये. असे माझे मत आहे. उगाच वाटेल ते फाटे फोडून भावनेला का हात घालता?

समजा मी बेकायदा घुसखोर आहे आणि मूल जन्माला घातल्याने माझ्या बेकाय्देशीरपणाला कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग सुलभ होत असेल तर मी सर्व प्रयत्न करुन एक अपत्य तरी जन्माला घालीनच. कारण तो एक सोपा राजमार्ग उपलब्ध आहे.

आणि हो, कुटुंबाची ताटातुट होत्ये म्हणून टाहो फोडणार्‍यंकरता. मुलाला आपल्या मायदेशात नेऊन तो प्रगल्भ झाल्यावर अमेरिकेत रीतसर सोडून यायचा मार्ग आहे की. अनेक एच वन बी वर आलेले लोक मुलाबाळांसहित अमेरिकेतून भारतात जातात आणि मुलगा शिकून सवरून झाले की (किंवा शिकायलाही) अमेरिकेत येतो असे अनेक वेळा झाले आहे.

त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी म्हणजे कुटुंबाची ताटातूटच असे सरधोपट समीकरण उराशी बाळगायची काही गरज नाही.

अनेक एच वन बी वर आलेले लोक मुलाबाळांसहित अमेरिकेतून भारतात जातात आणि मुलगा शिकून सवरून झाले की (किंवा शिकायलाही) अमेरिकेत ये >> anchor baby संदर्भात असलेले लोक H1 वर आलेल्या लोकांसारखे आरामात मायदेशात परत जाऊन त्यांच्या मुलांना हव्या तेव्हढ्या हव्या तशा (जशा इथे उपलब्ध होतील तशा) संधी उपलब्ध करून त्यांना परत इथे पाठवू शकतील असे वाटत असेल तर आपण वेगळ्या ग्रहांवर राहतो असे म्हणायला हवे.

>>त्यात लॉ ब्रेक करण्याचा प्रश्नच येत नाही राज...<<

अरे बाबा मी फेडरल लाॅ च्या संदर्भात ते बोलत होतो. घटनेत राज्ये, लोकल गवर्निंग बाॅडिजना काहि प्रमाणात स्वायत्तता दिलेली आहे ती चांगली गोष्ट आहे परंतु त्याचा पुढे गैरवापर केला जाईल याची फाउंडिंग फादर्सना कल्पना नसावी - सॅंक्च्युअरी सिटीजंच्या संदर्भात तरी असं म्हणता येईल.

ॲंकर बेबी हा थोडा ट्रिकी इशु आहे. फोर्टिंथ अमेंडमेंटनुसार बर्थराइट सिटिझनशिप लिगल पेरेंट असणार्यांनाच दिली गेलेली आहे. अमेंडमेंटचा मूळ उद्देश सिविल वाॅर नंतर गुलामांना फुल सिटिझनशिप द्यावी हा होता. काळाच्या ओघात त्याचं इंटरप्रिटेशन समहौ बदलत गेलं आणी आता हा इशु आपल्या समोर आॅं वासुन उभा आहे.

निवडणुक प्रचारात म्हटल्याप्रमाणे ट्रंप आपल्या मर्जीतले सुप्रिम कोर्ट जज नेमुन यावर रुलींग देउन हा इशु निकालात काढु शकतो, कुठलंहि बिल/अमेंडमेंट पास न करता...

>>त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी म्हणजे कुटुंबाची ताटातूटच असे सरधोपट समीकरण उराशी बाळगायची काही गरज नाही.<<

शेंन, सहमत. उद्या एखाद्या खुन्याला जन्मठेप/फाशी देउ नका, कुटुंबाची ताटातुट होते असं म्हणशील का, असामी?..

उद्या एखाद्या खुन्याला जन्मठेप/फाशी देउ नका, कुटुंबाची ताटातुट होते असं म्हणशील का, असामी?.. >> हि चर्चा अँकर बेबी संदर्भात सुरू आहे ना राज ?

>>हि चर्चा अँकर बेबी संदर्भात सुरू आहे ना राज ?<<

गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार दिलेल्या शिक्शेमुळे होणार्या कोलॅटरल डॅमेजची चिंता/काळजी अप्रस्तुत आहे - हा माझा मुद्दा... Happy

पब्लिक, कोणी ते ट्रम्प, जो बायडेन आणि ओबामा चे मीम्स फिरत आहेत ते वाचलेत का? धमाल आहेत.
इथे काही आहेत.
http://www.bbc.com/news/election-us-2016-37972626

इतरही बरेच आहेत. हे माझे फेवरिट्स.

Joe- "I showed Trump the drone strike controls in your top left drawer."
Barack- "That's an etch-a-sketch."
Joe- "Yup."

biden: cmon you gotta print a fake birth certificate, put it in an envelope labeled "SECRET" and leave it in the oval office desk
obama: joe

biden: I have given him the nuclear button control
obama: that was our game boy, Joe
biden: damn right it was

हो धमाल आहेत, त्यातला पासपोर्ट, बर्थ सर्टीफिकेट वाला (फा तु लिहिलेल अर्धाच आहे) नि मिशेल २०२० हे जबरदस्त आहेत.

आणि हो, कुटुंबाची ताटातुट होत्ये ...........मुलगा शिकून सवरून झाले की (किंवा शिकायलाही) अमेरिकेत येतो असे अनेक वेळा झाले आहे.

अहो ते सगळे कायदे, सुव्यवस्था, लोकशाही असलेल्या श्रीमंत, अश्या भारत देशातील, सुशिक्षित लोकांच्या बाबतीत घडते.
आजकाल भारतातलेक्लोक एकदम इंटरनॅशनल झाले आहेत, कुणिहि कुठेहि जाऊन रहातो. नसला व्हिसा म्हणून परत पाठवले तर भारतात पण (थोडे जास्तच) सुखात रहातील, नाहीतर दुसर्‍या मुलाकडे ऑस्ट्रेलिय, सिंगापूर वगैरेला जातील.
मेक्सिकन, लॅटिन अमेरिकन लोकांच्या बाबतीत सर्व एकदम विरुद्ध आहे, तर भारतीयांचे उदाहरण देऊ नका.

पण जर त्या आईबापांचे अपत्य जन्माच्या वेळचे अमेरिकेतले अस्तित्त्व कायदेशीर नसेल तर अशा अपत्याला आपोआप नागरिकत्व दिले जाऊ नये. असे माझे मत आहे. उगाच वाटेल ते फाटे फोडून भावनेला का हात घालता?

१०० टक्के पटले. नागरिकत्व म्हणजे जबाबदारीची गोष्ट आहे. बरेच हक्क असतात.

नागरिकत्व नसले तरी गरज असेल तर राहू देत इथे, टॅक्स, सोशल सिक्युरिटी भरा, कायदे पाळा.
आणि ही गरज आहे हे कोण ठरवणार?

हे सगळे अत्यंत स्वार्थी, देशाचा जराहि विचार न करणारे लोक. अश्या बेकायदा लोकांना कमी पैसे देऊन त्यांच्याकडून कामे करून घ्यायची नि फायदा लाटायचा अश्या वृत्तीचे लोक.

आणि ते सगळे कायदेशीर अमेरिकन,नागरिक, दोन तीन पिढ्या तरी इथेच रहाणारे, असे लोक. त्यांना कोण थांबवणार? ते थांबले तर आपोआप बेकायदेशीर घुसखोरी बंद होईल.

मूर्खपणाचा अजुन एक नमुना
http://www.foxnews.com/us/2016/11/14/university-michigan-cancels-plan-to...

मिशिगन विद्यापीठाने ट्रंपच्या विजयामुळे "उध्वस्त" झालेल्या विद्यार्थ्यांना प्ले डो, बुडबुडे निर्माण करणारी खेळणी आणि चित्रे रंगवण्याची पुस्तके देण्याची योजना केली होती. ती रद्द केली. धन्य झालो!

त्याऐवजी पॅसिफायर आणि डायपर पुरवणार आहेत का हे कळू शकले नाही अद्याप!

आपल्या आवडीचा उमेदवार निवडून आला नाही तर असे उद्विग्न व्हा आणि मानसोपचार करुन घ्या याऐवजी खंबीर रहा, लोकशाहीवर विश्वास ठेवा, लोकशाही मार्गाने आपला विरोध व्यक्त करत रहा हे शिकवणे उचित नाही का? आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जे पुरेसे प्रगल्भ आहेत त्यांना बालवाडीत बसवण्याचा आचरटपणा का?

आणि पुरोगामीत्व आणि सहिष्णुतेचे माहेरघर असणार्‍या सॅन् फ्रॅन्सिस्कोत पहा काय घडते आहे ते
http://abcnews.go.com/Politics/wireStory/san-francisco-teachers-union-of...

फखरा शाह नामक उदारमतवादी स्त्रीने जी शिक्षिका आहे, असा फतवा काढला ट्रंप विरोधी फतवा काढला आहे.
काही शेलकी वाक्ये: शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रंपला शिव्या द्याव्याशा वाटल्या तर त्याला प्रोत्साहन द्यावे, त्याला थांबवू नये.

अशा प्रकारे प्रशिक्षित झालेले शालेय विद्यार्थी लोकशाही मूल्ये अंगीकारतील ह्यात शंकाच नको!

बुवा Lol असे नग दोन्ही बाजूंकडून आहेत. FB वरच्या स्पॉन्सर्ड लिंक्स बघत जा.

एखाद्या नगाचे वेडपटपणा करणे समजू शकतो पण एक जबाबदार विद्यापीठ किंवा अन्य शिक्षण संस्थांचे प्रमुख ज्यांच्यावर अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते ते इतके मूर्ख आणि आचरटपणाचे वर्तन करतात तेव्हा चिंता वाटते.

अजून ट्रंपने सत्ता हातात घेतलीच नाही तरी ह्यांना रम्य ते बालपण आठवू लागले, प्रत्यक्ष निर्णय अमलात येऊ लागतील तेव्हा किती पुस्तके रंगवतील आणि बुडबुडे उडवतील ह्याची कल्पनाच केलेली बरी!

ज्यांची मुले कॉलेजात असतील त्यांनी अडगळीच्या खोलीतून दुपटी, पाळणे, दुधाच्या बाटल्या काढायला सुरवात करावी. बाबागाडी असेल तर तीही साफसूफ करावी!

शेन तुमचा मुद्दा मान्य की लोकशाही आहे आणि निर्णय मान्य करा. पण नसतात सगळेच लोक आपल्यासारखे खंबीर, मग त्यांनी सामुदायिक आत्महत्या वगैरे न करण्याकरता असे उपाय चांगले असतात. आता मी काय सायकॅट्रिस्ट नाही पण प्रत्येकाला कुठल्याही नावडत्या बातमीपासून दूर करण्याकरता इतर गोष्टींमध्ये मन रमवणे ही बरोबर गोष्ट आहे.

आता तुमचे म्हणजे - विद्द्यार्थ्यांनी पुस्तकं रंगवली तरी ती वाईट - आणि विरोधात मोर्चे काढले तरी ते वाईट. म्हणजे काहीही केलं तरी कॉलेजातले विद्द्यार्थी तुमच्या दृष्टीने वाईटच ना. मग राहू देत ना Lol

असे नग दोन्ही बाजूंकडून आहेत >>> ८ वर्षे दुसर्‍या बाजूचे कुठली ही गोष्ट घडली तरी " थँक्स ओबामा " ऐकत आलोच आहे. आता हे ऐकू Lol

रडणे संपणार नाही - आणि विरोधही

==
शेन तुमचा मुद्दा मान्य की लोकशाही आहे आणि निर्णय मान्य करा. पण नसतात सगळेच लोक आपल्यासारखे खंबीर, मग त्यांनी सामुदायिक आत्महत्या वगैरे न करण्याकरता असे उपाय चांगले असतात.
===
निवडणुकीच्या भयंकर निकालामुळे विद्यापीठातले तमाम (आय मीन बहुतांश) विद्यार्थी आत्यंतिक निराशेमुळे आत्महत्येच्या उंबरठ्यापर्यंत पोचले होते आणि त्यावर हा आणीबाणीचा उपाय करणे आवश्यक होते हे खरे असेल तर मला बिनशर्त मान्य आहे.
फक्त हा निष्कर्ष विद्यापीठाने कुठल्या चाचण्या घेऊन घेतला होता ते जरा सांगता आले तर पहा.
पूर्वीही अनेकदा दोन्ही पक्षांवर पराभवाची पा़ळी आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्यात एक बाजू हरली अशी ही पहिलीच निवडणूक नव्हे. पूर्वी किती पराभवांमुळे विद्यापीठ वा शाळांत सामूहिक आत्महत्या झाल्या होत्या?

https://thinkprogress.org/this-isnt-just-a-photo-of-ivanka-trump-it-s-a-...

मलाही थोडा विश्वास बसायला लागला आहे की ट्रंप कदाचित स्वतःला इम्पिच करुन घेइल. त्याला प्रोटोकॉल माहित नाही आणि तो तसदी पण घेत नाही माहित करुन घ्यायची. बाकी इथे तर वाटतय काही प्रोटोकॉल आहे तरी का, प्रेसिडेण्ट इलेक्ट बद्दल? मला तर वाटतं ट्रंपच्या प्रेसिडन्सी मध्ये प्रोटोकॉलचे लूपहोल्स सुद्धा दिसून येतील.
अवघड आहे खरच, काय त्या इवान्काचं क्वालिफिकेशन म्हणे तिथे असायचं?

बुवा इम्पिच कोण करणार पण ? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? तसेही ट्रंप गेला नि पेन्स आला तर 'घी देखा पर बडगा नहि देखा' अशी स्थिती होईल. त्यामूळे आपला पाठिंबा तरि ट्रंपलाच. तो बोलेल तेच करेल ह्याची खात्री नसल्यामूळे प्रत्यक्षात काय करेल हे नेहमीच सस्पेन्स असेल.

बिल क्लिंटन इम्पीच नाही झाला (ह्यातली संपूर्ण टेक्निकॅलिटी मला कळत नाही पण त्याने सेकण्ड टर्म पूर्ण केली ना प्रेसिडन्ट म्हणून?) तर ट्रम्प का बरं होईल? Happy

असामी +१ !! रिपब्लिकन काँग्रेस ला त्यांच्यासारखाच असणारा पेन्स नक्कीच जवळचा वाटणार. ट्रंप निम्मा लिबरल आहे त्यामुळे त्याचे काही पॉलिसी निर्णय आतापासूनच काँग्रेस ला न आवडणारे आहेत. त्यामुळे त्याने काही वेडेवाकडे केले की लगेच इंपिच करतील.

Pages