अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉजर आइल्स ला त्याने बाजूला ठेवला नाही हे सोडून. >> हे एकमेव कारण पुरेसे आहे रे फा. तू एकदा रॉजर आइल्स चे लीळाचरित्र वाचच. अर्ध्या गोवर्‍या स्मशानात पोहोचलेल्या असतानाही हे कसे सुचू शकते ह्याची कमाल आहे.

वाचतो. मला फक्त फॉक्स ने त्याला हाकलला एवढेच माहीत आहे. आणि फॉक्स ने हाकलला म्हणजे किती वाईट अवस्था असेल याची कल्पना आली Happy

विकु आणि स्वतः ट्रंप तर एकपत्निव्रता राजाचे अवतार आहेत ना , त्यांनी प्रत्येक स्त्रीला आपल्या मातेसमान मानले आहे. तिच्याकडे कधीही बघितले ही नाही Lol

रॉजर आईल्स पुरेसा असेल तर बिल क्लिंटन का नाही ? >> क्लिंटन ने इतरांनी 'हे' करा असे कल्चर तयार केले नाही नि आईल्सने नेमके तेच नि तेव्हढेच केलेय. ट्रंपची त्याबद्दलची प्रतिक्रिया तुम्हीच शोधा म्हणजे हा प्रश्न पडणार नाही.

ट्रंप तर एकपत्निव्रता राजाचे >> Happy स्वतःच्या पोटच्या पोरिबद्दल काय बोलला हे ऐकल्यावर अर्थात आईल्स त्या बाजूला असणे फारसे अशक्यप्राय नसावे.

स्वतःच्या पोटच्या पोरिबद्दल >> हो कालच त्याचा त्याची पोरगी १ वर्षाची असतानाचा व्हिडीओ पाहिला. किळसवाणा प्रकार होता.

>>एकदा रॉजर आइल्स चे लीळाचरित्र वाचच.<<

वर बिलीबाॅयचा उल्लेख झालेला आहेच तरी - जानी, जिनके घर शीसेके होते है, वो दुसरोंके घरोंपे पत्थर उठाया नहि करते... Lol

>>मला आहे ॲज अ वुमन.<<

मला ट्रंपच्या भूतकाळातील चूकांचं समर्थन अजिबात करायचं नाहि, परंतु तुम्हाला हिलरीचा भूतकाळ, एस्पेश्यली स्त्रियांच्या बाबतीतला, ॲक्सेप्टेबल आहे का? - ॲज ए वुमन...

जानी, जिनके घर शीसेके होते है, वो दुसरोंके घरोंपे पत्थर उठाया नहि करते... >> राज move on buddy. विकु ने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर वाचा. परत एकाने केले म्हणून दुसर्‍याने केलेले समर्थनीय होते ?

समर्थनीय नाहि, आयॅम फ्लॅबरगास्टेड बाय दि आॅडेसिटी टुॅ ब्रिंगप राॅजर एल्स इंटु दि इक्वेशन, दॅट्स आॅल...

रॉजर एल्स ने केलेला सेक्सुअल हॅरॅस्मेंट प्रकार निशेधार्ह आहेच, पण माझ्या मते त्याने फॉक्स न्यूज वरून इराक युध्हाचा उन्माद पसरवला ते जास्त निषेधार्ह आहे. आपण इराक युद्धाला विरोध केला असे अभिमानाने सांगणार्‍या ट्रंप ला हे शोभते ?

आयॅम फ्लॅबरगास्टेड बाय दि आॅडेसिटी टुॅ ब्रिंगप राॅजर एल्स इंटु दि इक्वेशन, दॅट्स आॅल... >> Are you Rip Van Winkle or what ? बिल चे प्रताप डिबेटमधे आणण्याबद्दल सूतोवाच कोणी केलय ? Why is Roger's participation off-limit here ?

नोप, आय डोंट लिव इन फेरि टेल्स, कॅंट से सेमथिंग अबौट यु Lol

यु ब्राॅटप राॅजर एल्स इन द डिस्कशन (प्रिवीयस पेज). नौ, व्हेदर इट्स आॅफ लिमीट आॅर नाॅट, आय डोंट केर. आय जस्ट होप हिलरी डझंट डु द सेम मिस्टेक इन डिबेट्स अदरवाय्ज आल बेट्स वुड बी आॅफ...

आणि मग ह्या माठाड लोकांचे काय करावे म्हणता? मतदानाचा हक्क काढून घ्यावा का? मग सांगा ओबामाला तसा ठराव पास करायला!
मुळीच नाही. माठाड असणे नि रहाणे हा अमेरिकन लोकांचा मूलभूत हक्क आहे, तो आणि गन बाळगणे. आणि काही दिवसांनी मारुवाना वापरणे, वगैरे. ते सगळे एकवटले की त्याचे परिणाम काहीहि असोत.

माठाड असूनहि, केवळ आरडा ओरडा करून, खोटे बोलून, सिद्ध झालेल्या गोष्टींना नाकारून, प्रतिस्पर्ध्याला नको त्या शिव्या देऊन, स्वतःचेच म्हणणे परत परत ओरडून सांगणे नि सरळ उत्तर न देता काहीतरी पाल्हाळ लावणे यालाच डिबेट म्हणायचे नि पुनः माईकच ठीक नाही, असली कारणे सांगायची - एव्हढेच फक्त मी ऐकतो ट्रंपबद्दल.
मी ओबामाकेअर, कॉमन कोअर, काढून टाकीन, ही पॉलिसी नव्हे, त्याला बदली काय नि कसे करणार?

लोक ट्रंपला पाठिंबा देतात यावरून तो महान आहे असे म्हणायचे तर मिडिया, मॉडरेटर त्याच्या विरुद्ध का आहेत? ओबामा हिलरीसाठी प्रचार करतो मग बुश, रॉमनी, मॅकेन, रायन, मकॉनेल सारखे रिपब्लिकन दिग्गज का येत नाहीत ट्रंपसाठी प्रचार करायला?

दोन्ही बाजूला भरपूर दोष आहेत. इ-मेल, बेन गाझी, नि मागे जायचे ठरवले तर हिलरीचेहि अनेक दोष आहेत.

पण प्रतिकूल परिस्थिती ही एकट्या ट्रंपलाच नाही, तर ओबामा, हिलरी दोघांनाहि होती, आहे

आता प्रश्न असा आहे की दोघांपैकी प्रेसिडेंट व्हायला कमी धोकादायक कोण?

>>> विकु आणि स्वतः ट्रंप तर एकपत्निव्रता राजाचे अवतार आहेत ना , त्यांनी प्रत्येक स्त्रीला आपल्या मातेसमान मानले आहे. तिच्याकडे कधीही बघितले ही नाही हाहा

धनि, असे स्वल्पविराम गाळू नयेत - अर्थ बदलतो वाक्याचा! Proud

======साक्षात राष्ट्रपती आपले उद्योग सोडून, बायकामुलांसमवेत ट्रंपविरोधी आघाडी उघडून प्रचार करत आहे! >>> नेहमीच करतात. हे सगळे रेग्युलेटेड आहे. त्या त्या वेळच्या अध्यक्षाने निवडणुकीकरता किती वेळ द्यायचा वगैरे सगळे ठरलेले असते. प्रत्येक अध्यक्षाला चौथ्या/आठव्या वर्षी हा उद्योग असतो.
==
http://www.npr.org/2016/07/05/484817706/looking-back-at-a-century-of-pre...

गेल्या शंभर वर्षात विद्यमान राष्ट्रपतीने भावी उमेदवाराकरता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचार केल्याचे उदाहरण नाही असे एन पी आर म्हणत आहे फॉक्स नाही!
बिल क्लिंटन हा गोरच्या प्रचाराकरता फिरकलाही नव्हता. जॉर्ज डब्ल्यू बुश हा मॅकेनच्या प्रचाराकरता फिरकलाही नव्हता.
ओबामा मात्र सहकुटुंब हातघाईची लढाई असल्यागत प्रचार करतो आहे. थोडक्यात हा प्रकार दुर्मिळ आहे. हे डेस्परेशन म्हणावे की उत्साह ते आपणच ठरवायचे!

ओबामाची कारकीर्द अशी काही दैदीप्यमान नव्हती की त्याने प्रचार केल्याने फार उजेड पडेल. कदाचित उलटाही परिणाम होऊ शकतो. लोक ओबामाला विटले असतील तर पुन्हा ह्याच्याच प्रमाणे वागणारा उमेदवार कशाला हवाय? असा विचार करणारेही असतील.

हिलरी वारंवार आपल्या नवर्‍याच्या कर्तृत्वाचा टेंभा मिरवायला विसरत नाही. अगदी डिबेटमधेही ही जपमाळ जपली गेली. ज्या क्लिंटनने मोनिका लुईन्स्की सारख्या कायद्याने प्रौढ पण वयाने, अनुभवाने, हुद्द्याने कमी असणार्‍या स्त्रीशी आपली उच्चस्थान वापरुन संबंध ठेवले, अनेक स्त्रियांशी लफडी केली ह्याला सेक्सुअल हॅरॅसमेंटच्या पुढचे पाऊल म्हणता येईल. बलात्कार, विनयभंग असले प्रकार. असली लफडी पैसे देऊन दाबण्यात क्लिंटन दांपत्य आघाडीवर होते. पॉला जोन्स, हुआनिटा रॉडरिगस ह्या महिलांचे आवाज दाबून टाकण्यात आलेले आहेत.

तर अशा स्त्रीने ट्रंपच्या वागण्यावर टीका करणे म्हणजे नागड्याने उघड्याला हिणवण्यापैकी आहे!

न्यू जर्सीमधील ट्रंपच्या चहात्यांसाठी एक अपूर्व संधि

https://twitter.com/usahindus4trump

Music Masti & Dance - Bollywood/Tollywood/Punjabi extravaganza
Guest speaker - Donald Trump.
October 15, 2016
, 12 Noon onwards -PNC Bank Arts Center, Exit 116 & Garden State Parkway, Holmdel, NJ.
For the benefit of Victims of terror particularly KashmirPandits and refugees from Bangaladesh

तर अमेरिकेतल्या हिन्दूंनो, जागे व्हा नि आपल्या देशबांधवांचे ऐकून ट्रंपला बहुमताने निवडून द्या.

वॉल स्ट्रीट जर्नल ने गेल्या १५० वर्षात एकाहि डेमोक्रॅटला एंडॉर्स केले नव्हते, पण यंदा त्यांचा पाठिंबा हिलरीला.
बरेचसे दिग्गज रिपब्लिकन ट्रंपसाठी प्रचार करायला पुढे येत नाहीयेत. मिडिया तर त्याच्या विरुद्धच.

डिबेट घेणार्‍यांनी त्याचा माईक मुद्दाम खराब ठेवला -

पण रिपब्लिकन नि वॉल स्ट्रीटला काय कळते? अमेरिकन मिडियाला काय कळते? सगळे वाईट्ट आहेत. पक्षपाती आहेत.

भारतीयांना विचारा! ते ट्रंपला त्याच्या जन्मापासून ओळखतात. त्याच्या सर्व व्यवहारांची त्यांना इथ्थंभूत माहिती आहे, त्याने केलेले सर्व कायदेशीर आहे, अनैतिक काही नाही. बिझनेस मधे तो बृहस्पतीच.
शिवाय रशियाच्या पुटिनचा देखील ट्रंप फाष्ट फ्रेंड आहे.

अश्या बिचार्‍या ट्रंपवर अन्याय करत आहेत. अश्या वेळी आपण हिंदूंनी ट्रंपला पाठिंबा दिला पाहिजे. तो स्वतः बिचारा सध्या अहोरात्र वेनिझुएलाच्या माजी विश्वसुंदरीविरुद्ध व रोझी ओ डॉनेल विरुद्ध एकट्याने लढा देत आहे. ते सुद्धा हिलरी वाल्यांनी म्हंटले म्हणून. नाहीतर तो स्वतःहून कुणाविरुद्ध वाईट बोलत नाही, कुणाला नावे ठेवत नाही.

अश्या वेळी आपणच त्याच्या बाजूने लढले पाहिजे.

विकु, म्हणजे मॅक्रोइकॉनॉमिक ट्रेण्ड असतो तसे मॅक्रोसोशल का? पण कोलंबियात चालले आहे ते धार्मिक नाही. तेथीलच बंडखोर ग्रूप्स आहेत. वरकरणी नक्षलवाद्यांसारखे वाटतात. खूप माहिती नाही.

Pages