अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

People are saying that Trump does cocaine to stay alert. I'm not saying it, but people are saying it. I don't know if it's true, but that's what I'm hearing, I mean look at him and all the sniffing. That's just what I'm hearing.

भाचा Lol

पण काल लेस्टर होल्ट आवडला. मस्त हँडल केलं दोघांनाही. बरेचदा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सोडून भलतीकडेच निघाले तर परत आणलं त्याने.

पण काल लेस्टर होल्ट आवडला. मस्त हँडल केलं दोघांनाही. बरेचदा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सोडून भलतीकडेच निघाले तर परत आणलं त्याने.>>>> हो, पण ओबामाच्या बर्थसर्टीफिकेटवरच्या प्रश्नांना ट्रंपनं काय आणि कसं उत्तर दिलं पाहिलं ना? Happy

भाचा Lol .... ट्रेव्हर नोव्हाने स्निफलिंग वर रुडी गुलियानीचे शब्द वापरत सिक्सरच मारलाय.

पण ओबामाच्या बर्थसर्टीफिकेटवरच्या प्रश्नांना ट्रंपनं काय आणि कसं उत्तर दिलं पाहिलं ना? स्मित >> well त्याने "your president" असे म्हटल्यवर अजून काय अपेक्षित होते तुला वेगळे ?

"your president" >> अगदी अगदी. पण होल्ट ने त्याला दोनदा परत तिकडे नेले.

ट्र्न्प! रागा पेक्षा बरी कॉमेडी करतो अस माझ मत झालय, मधेच एका प्र्श्नाच्या उत्तरात म्हणे Pennsylvania ave वर मी प्रॉपर्टी घेतलिय तेव्हा i will go there one way or other!
ओबामाच्या बर्थ सर्टिफिकेटचा मुद्दा म्हणजे शेन्डा ना बुडुख त्या चर्चेला, अरे उगाच काय? काहिही काय मुद्दे आणताय्?झाली त्याची ८ वर्ष, चालला तो आता तुमच बोला ( काय दिवे लावणार?)

"your president" >> हे मह्त्वाचे ह्यासाठी कि त्यातून बिरबलाची एखाद्या माणसाची मातृ भाषा शोधण्याची क्लूप्ती आठवली. अगदीच Freudian slip झाली त्याच्याकडून.

. . . . . आजच्या presidential debate मधे डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी फेडरल रिझर्व्हवर जे ताशेरे ओढले त्यावरून पुढील चार वर्षात अमेरिकेने कोणत्या दिशेने जायला हवं ह्याबाबत ट्रम्प ह्यांना निश्चित अशी मतं आहेत हे स्पष्ट होतं. Happy Happy
http://supersamir.blogspot.in

बुवा, +१

आणि प्रत्येक गोष्ट बॅड ट्रेड डील्स नाहीतर हॅविंग बॅड पीपल इन अवर कन्ट्री हू शुडन्ट बी हिअर आणि हिलरी आणि इतर राजकारण्यांनीं ने गेल्या ३० वर्षांत काहीच कसं केलेलं नाही इकडे येऊन थांबते.

नाहीतर मी कसा स्मार्ट (टॅक्स का भरला नाही त्याचं हे उत्तर), मला कसा बिझीनेस करता येतो आणि मी कसा प्राऊड आहे.

परत एकदा बर्याच अनफोर्स्ड एरर्स करुन ट्रंपने कालचं डिबेट जिंकायला हिलरीला मदत केली.

१. हाउसिंग मार्केट क्रॅश, मिनिमल टॅक्स पेमेंट ह्यावरचा त्याचा रिस्पाॅंस एक बिझिनेसमन म्हणुन ठिक होता पण वल्नरेबल हि होता - विरोधकांनी आउट आॅफ काॅंटेक्स्ट स्पिन/ट्विस्ट करण्याकरता
२. बरेच मुद्दे ट्रंपचा विकनेस/विकपाॅइंट असलेले चर्चेत आणले गेले (उदा: ओबामा बर्थर, विमेन कांडिसेंडिंग, इन्कम टॅक्स इ.) ॲंड हि डिडंड डिफेंड देम वेल
३. अपार्ट फ्राॅम ईमेल स्कॅंडल, ट्रंप वुडहॅव/कुडहॅव/शुडहॅव ब्राॅट अप बेनगाझी, क्लिंटन फाउंडेशन प्ले-टु-प्ले एटसेट्रा; मिस्ड अपाॅर्च्युनिटी, बिगटाइम...

>>> २. बरेच मुद्दे ट्रंपचा विकनेस/विकपाॅइंट असलेले चर्चेत आणले गेले (उदा: ओबामा बर्थर, विमेन कांडिसेंडिंग, इन्कम टॅक्स इ.) ॲंड हि डिडंड डिफेंड देम वेल
ते कसं काय डिफेन्ड करणार?! Proud

चर्चा रीग्ड, moderator रीग्ड वरून आता मायक्रोफोन रीग्ड वर आलेत साहेब. मायक्रोफोन बसवणाऱ्या माणसाला म्हणे रात्रीची शांत झोप लागली नसेल! Biggrin
बाकी पेन्सिल्व्हानिआ ave वर मी आधीच जागा घेऊन ठेवली आहे हा बंपर विनोद होता.
राज, बर्थर चा मुद्दा मला बरोबर आठवत असेल तर आधी ट्रंपने काढला (बट आय मे बी रॉंग)
विमेन कांडिसेंडिंग, आय टी हे मुद्दे हिलरीने एकदम फोर्सने मांडले. का नाही मांडणार?
हिलरी अभ्यास करत होती म्हणून आठवडाभर फिरली नाही ला हिलारीचं उत्तर एकदम हजरजवाबी होतं.

बुवा, सशल +१ एकच उत्तर आणि भयानक (वरवरचा) आत्मविश्वास आणि प्रचंड attitude.
हिलरी काल ट्रंप बोलताना काही तरी भलतं बोलला की हसत होती ते भारी आवडलं. हसू दाबून हसत होती.

ट्रंपने कालचं डिबेट जिंकायला हिलरीला मदत केली >> राज +१

१) टॅक्स पेमेंट ह्यावरचा त्याचा रिस्पाॅंस एक बिझिनेसमन म्हणुन ठिक होता >> तो एका देशाचा प्रेसिडेंट करता डिबेट करत होता, चेंबर ऑफ कॉमर्स चा अध्यक्ष म्हणून नाही त्यामुळे त्या ठिकाणी तो प्रतिसाद अजिबात बरोबर नव्हता. आणि इतरही काही कँडिडेट्स नी आधी ऑडिट चालू असताना टॅक्स जाहीर केलेले आहेत. इव्हन आयआरएस नी पण त्यात काही हरकत नाही असं सागितलेलं असताना तो टॅक्स जाहीर करत नाही म्हणजे हिलरी म्हणते आहे तसे कुठे तरी नक्की पाणी मुरते आहे !
२) ओबामा बर्थर >> त्याने सरळ सरळ माफी मागून पुढे होणे अपेक्षित आहे. सारवासारव केली तर तो अजूनच वाईट दिसेल. आणि काल दिसलाही.
३) क्लिंटनने शांत राहून बरोबर त्याच्या विरोधातले पॉइंट्स मांडले, पण तो प्रेशर खाली गडबडून तिच्या विरोधातले मुद्दे मांडू शकला नाही. त्याच्या १९७० मधल्या लॉसूट चा मुद्दा तिने मांडला तसा त्यालाही तिच्या फाऊंडेशन्चा मांडता आला असता पण त्याने ती वेळ दवडली.

हां म्हणा काहीही झालं तरी त्याचे पाठीराखे त्यालाच सपोर्ट करणार त्यामुळे काय उपयोग Lol

कालच्या चर्चेत हिलरी चुका झाल्या तर माफी मागते (बेंगाझी) हा मुद्दा एकदा हिलरीने आणि अनेकदा ट्रंपने (black comment) अधोरेखित केला.
ट्रंपने केलेल्या चुकांचा पाढा वाचून तो त्या acknowledge करत नाही हे ही प्रकर्षाने समोर आलं.

>> त्यामुळे काय उपयोग

त्याला सपोर्ट करायचं ज्यांनीं पक्कं ठरवलेलं आहे तिकडे उपयोग नाही पण किमान स्विंग व्होटर्स आणि जे व्होट च करणार नाहीत त्यांच्यावर योग्य तो इम्पॅक्ट होईल ही आशा.

>>तसे कुठे तरी नक्की पाणी मुरते आहे !<<

आॅब्विय्स्ली; आ बैल मुझे मार हि लक्झरी त्याच्याकडे नाहि. आणि टॅक्स डिटेल्स पब्लिश करणं मॅंडेटोरी नाहि, तर यापुढेहि तो टोलवाटोलवी करत राहणार...

ओबामा बर्थर - मला वाटतं हा इशु क्लिंटन कॅंपेनने सर्वप्रथम रेज केला, ट्रंप जस्ट पिगीबॅक्ड आॅन इट. आय कुड बी राॅंग...

त्यांनी जरी उपस्थित केला असेल तर लगेच सोडून दिला, पण ट्रम्प नी मात्र तो 2011 ते 2016 तसाच लावून धरला . 2011 मध्ये बर्थ सर्टिफिकेट मिळाले असताना ही !! आणि आता सोडून देताना त्याची माफीही ।मागितली नाही. हे रेसिस्ट असणेच आहे, अजून काही नाही!

>>> ओबामा बर्थर - मला वाटतं हा इशु क्लिंटन कॅंपेनने सर्वप्रथम रेज
अहो, हा क्लेम केव्हाच डिस्प्रूव्ह झाला की!

आता सोडून देताना त्याची माफीही ।मागितली नाही. हे रेसिस्ट असणेच आहे, अजून काही नाही! >> +१ आत्ता अचानक का सोडला? तर म्हणे मी लावून धरला म्हणून ओबामाने बर्थ certi दिलं. अरे ते देऊन ५ वर्षे झाली. तू आत्ता अचानक का सोडलास? तर हिलरीने मागितलं तर दिलं नाही मी मागितलं तर दिलं बर्थ सर्टी. मी ह्याव आहे आणि त्याव आहे. अरे झाली चूक तर हे असं बोलतो अध्यक्ष....
वारे वा.

>>हा क्लेम केव्हाच डिस्प्रूव्ह झाला की<<

टाॅकिंग पाॅइंट वाज - हौ/व्हाय बर्थर इशु केम फाॅरवर्ड...

होल्टरचा प्रश्न हा होता.

LESTER HOLT (MODERATOR): Mr. Trump, for five years, you perpetuated a false claim that the nation's first black president was not a natural born citizen. You questioned his legitimacy. In the last couple of weeks you acknowledged what most Americans have accepted for years, the president was born in the United States. Can you tell us what took you so long?

[...]

I just want to get the answer here. The birth certificate was produced in 2011. You continued to tell the story and questioned the president's legitimacy in 2012, 2013, 2014, 2015, as recently as January. So, the question is what changed your mind?

अजून काही संशयाला वाव नको असेल तर हे बघा
http://www.mcclatchydc.com/news/politics-government/election/article1028...
Blumenthal ने काय लिहिले होते ते अ‍ॅशर ने दिलय.

हिलरीचे फॅक्ट्स आणि पास्ट वगैरे एक मिनिट बाजूला ठेवून फक्त डिबेट परफॉर्मन्स बद्दल बोलायला गेलं तर हिलरीनी टोटली शाळा घेतली ट्रंपची. अगदी शार्प काँट्रास्ट वाटला त्या दोघांना एकत्र बोलताना बघून! एखाद्या सिझन्ड पॉलिटिशियन शेजारी एखाद्या नवख्या स्टुडंटला (ज्याला अभ्यास वगैरे करण्यात आजिबात रस नाही) उभं केल्यागत वाटत होतं. एकच वाक्य दोन दोन वेळा रिपिट करणे, कुठल्याही मुद्यात आजिबात म्हणजे आजिबात थोडं सुद्धा खोलवर न शिरणे, वाक्यात अगदी मिनिंगफूल शब्द न टाकता फिलर्स टाकणे, ३-४ मुद्दे ज्या मध्ये त्याला थोडीफार गती आहे त्या मुद्द्यांवर आपली गाडी घुम फिरके परत आणणे, ही सगळी ससेहोलपट बघून डिबेटची तयारी(?) कशी करु नये ह्यावर बहुतेक लोकं निबंध लिहू शकतील.
डिबेटला सुरवात झाली तेव्हा मी अगदी पाटी कोरी ठेवून बघायला सुरवात केली होती, म्हणलं काय सांगा? ट्रंपला सुर गवसेल आणि कदाचित त्यातला खरा बिझनेसमन (इफ रियली देअर वॉज वन) बाहेर येऊन काही मुद्दे इफेक्टिवली मांडेल तर कसलं काय? नॉट इवन रिमोटली क्लोज!
आता तर मला ओबामा विषयी आदर दुणावला कारण ८ वर्षापुर्वी तो तसा नवखा होता! आय गेस हारवर्ड लॉ डिग्री असणे म्हणजे माणूस थोडातरी स्पेशल असावा बहुतेक. Proud

आता तर मला ओबामा विषयी आदर दुणावला कारण ८ वर्षापुर्वी तो तसा नवखा होता! आय गेस हारवर्ड लॉ डिग्री असणे म्हणजे माणूस थोडातरी स्पेशल असावा बहुतेक. >>> बुवा ओबामा आणि ट्रंप??? हटकेश्वर, हटकेश्वर (तोही तिकडे कपालबडवती करत असेल Wink )

बुवा ओबामा बराच सरावलेला होता - तो ते सिनेटर वगैरे तर होताच पण अगदी आधीपासून ते कम्युनिटी ऑर्गनायझर वगैरे अनुभवही होता. आता अध्यक्षीय निवडणुक हा वेगळा मामला असला तरी दुसर्‍यावर कुरघोडी करताना पॉलिटिकली कसे बोलावे वगैरेचा चांगला अनुभव होता त्याला. हिलरीला ही होताच. ट्रम्प ला तो अनुभव नाही. कंपन्यांच्या सभांमधे बोलताना आपण जे बोलतो ते पब्लिक ऐकते अशी सवय असेल त्याला.

बुवांच्या पोस्टीला (ओबामाचा मुद्दा सोडून) अनुमोदन.
सगळ्यात भारी म्हणजे हिलरीने ट्रंपच्या आदळआपटीकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्याला जे मुद्दे मांडायचे होते ते व्यवस्थित मांडले. ती ट्रंप बोलत असताना एकदाही मध्येच बोलली नाही. तिने अधेमधे टाकलेले पंचेस भारी होते!
मॉडरेटर थोडासा ढिल्ला पडला असं मला वाटलं. ट्रंप बर्‍याच वहावत जाऊनही त्याला लायनीवर आणत नव्हता.

Pages