Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी, थॅन्क्स. पाहिली लिन्क.
असामी, थॅन्क्स. पाहिली लिन्क.
नवीन काहीच दिसत नाहीये. फक्त नवीन इमेल्स मिळाल्याने नव्याने चौकशी करत आहेत इतकेच.
हिलरी तिच्या प्रायव्हेट इमेल सर्वर च्या वापराच्या बाबतीत Extremely careless होती हा निष्कर्ष आधीच एफबीआय ने डिक्लेअर केलेला आहे. तो गेले अनेक दिवस पब्लिक न्यूज मधे आहे. आता फक्त त्या वीनर च्या लॅपटॉप वर तिच्या इमेल्स मिळाल्या आहेत. या नवीन इमेल्स मधून काही निघते हा हे बघायला चौकशी पुन्हा उघडली आहे.
इतकेच फक्त या बातमीत आहे. अगदी फॉक्स वरची बातमी पाहिली. म्हणजे जरा काही असते तर आत्तापर्यंत ज्यांनी नक्कीच त्यातून काहीतरी बाहेर काढले असते अशा साइट वरही इतकीच बातमी आहे.
http://www.foxnews.com/politics/2016/10/29/abedin-weiner-electronic-devi...
एकूण हिलरीचे कँपेन "Ambush" करण्याचा प्लॅन दिसतोय. जे मुळात हिलरीला सपोर्ट करत आहेत त्यांचे मत यातून बदलण्याची अजिबात शक्यता नाही.
बाकी ट्रम्प साहेब म्हणतायत बिगर दॅन वॉटरगेट! कशाचा कशाशी संबंध नाही. त्या इमेल्स मधे काय आहे हे एफबीआयलाच माहीत नाही अजून. मुळात आधी रिव्यू केलेल्या इमेल्स पेक्षा या वेगळ्या आहेत की नाही हे ही माहीत नाही. पॉलिटिकोच्या बातमीत असे दिसते की या इमेल्स थेट हिलरीकडून आलेल्या नाहीत. हुमा अबेदिनच्या आहेत. पण ट्रम्प कॅम्पेन यात ऑलरेडी काहीतरी सापडलेले आहे अशा थाटात आरोप करत आहेत.
हिलरीची कॅम्पेन याला कशी काउण्टर करते ते बघू आता. आत्तापर्यंत फक्त "त्या इमेल्स मधे काय आहे ते उघड करा" असे एफबीआयला आव्हान दिलेले आहे.
लिंगपिसाट वीनरच्या माजी पत्नी
लिंगपिसाट वीनरच्या माजी पत्नी हुमाताईंनी शपथेवर सांगितले होते की मी सगळ्या संबंधित इमेल्स एफ बी आयच्या स्वाधीन केल्या आहेत. हा खोटारडा दावा होता हे सिद्ध झाले.
एफ बी आय ही ओबामाच्या अखत्यारीत येते. आणि ओबामा हिलरीच्या बाजूचा आहे हे लक्ख सत्य आहे. तेव्हा तो त्याची यंत्रणा वापरुन हे प्रकरण दाबणार. सरकारी वकील लोरेटा लिन्चबाईनी तसा प्रयत्न केलाही.
प्रत्यक्षात काय घडले ह्याचा फक्त अंदाज करता येईल. खरे बाहेर येणे अवघड आहे. कदाचित खालच्या एफ बी आय अधिकार्यांनी ज्यांनी हे प्रकरण तपास केले त्यांनी असेच दाबून टाकणे चालू राहिले तर घाऊक राजीनाम्याची धमकी दिली असेल. आणि कोमीने शरणागती पत्करुन कारवाईची घोषणा केली असेल.
कदाचित हे दाबणे प्रकरण कोमीवरच शेकेल असे त्याला वाटले असेल आणि म्हणून ही तोंडदेखली कारवाई केली असेल.
कदाचित नव्या, जास्त घातक विकीलिक्सच्या पोलखोली थांबवायला हे केले गेले असेल.
एकंदरीत हे सरकार पूर्णपणे हिलरीच्या बाजूने आहे. त्यांनी इमेल प्रकरणाची पुरेशी चौकशी केलेली नाही. जाणीवपूर्वक हात आखडता घेतला आहे.
हिलरीला एक प्रकारचा महाराणीगंड आहे हे ह्यातून स्पष्ट होते आहे. सर्वसामान्य लोकांना गोपनीय माहिती बाळगताना जी पथ्ये पाळावी लागतात जे नियम पाळावे लागतात ते मला लागू नाही कारण मी त्यांच्यापेक्षा खूपच वरची आहे असा जो गंड आहे तो राष्ट्राध्यक्ष बनल्यावरही असणार आहे आणि तो लोकशाहीला मारक आहे. इतके दिवस राजकारण करुनही लोकशाहीच्या तत्त्वांना तिलांजली देण्यात ज्या बाईला काडीचाही संकोच वाटत नाही त्या बाईला जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाहीचे प्रमुखपद देणे हा शहाणपणा नाही..
हिलरीला खिंडीत गाठून हल्ला
हिलरीला खिंडीत गाठून हल्ला करुन तिची पंचाईत केली जात आहे असा कांगावा केला जात आहे. कुणी गाठले तिला खिंडीत? तिच्याच पापांनी. हरतर्हेचे प्रयत्न करुन तिने आपली पापे झाकण्याचा प्रयत्न केला पण अशी ना तशी ती उघडकीस येत आहेत आणि तिला जाब विचारत आहेत.
लिंगपिसाट वीनरच्या माजी पत्नी
लिंगपिसाट वीनरच्या माजी पत्नी हुमाताईंनी शपथेवर सांगितले होते की मी सगळ्या संबंधित इमेल्स एफ बी आयच्या स्वाधीन केल्या आहेत. हा खोटारडा दावा होता हे सिद्ध झाले. > सिद्ध झालेसुद्धा एव्हढ्यात ? विनरची ईमेल्स बघायचे वॉरंट पण नव्हते कालपर्यंत. कोमी ला सुद्धा माहित नसलेल्या गोष्टी इथे बाहेर येत आहेत. ऐकीव सोर्सेस जोरात आहेत बुवा.
काय गम्मत आहे पहा. कोमींनी
काय गम्मत आहे पहा. कोमींनी हिलरीला क्लिन चीट दिल्यावर हिलरी कॅंपेनने त्यांचा कर्तव्यदक्श अधिकारी वगैरे बोलुन गौरव केला, डंकेकि चोटपर. आणि आता तेच कोमी खलनायक ठरवले जात आहेत, त्यांच्या टायमिंगवर प्रश्न विचारले जात आहेत.
वक्त वक्त कि बात है...
==एकूण हिलरीचे कँपेन "Ambush"
==एकूण हिलरीचे कँपेन "Ambush" करण्याचा प्लॅन दिसतोय. जे मुळात हिलरीला सपोर्ट करत आहेत त्यांचे मत यातून बदलण्याची अजिबात शक्यता नाही.
==
जनमत चाचण्या काही वेगळेच सांगत आहेत. हिलरीने गेल्या आठवड्यात घेतलेली आघाडी झपाट्याने आटलेली दिसत आहे. जर हिलरीला समर्थन करणार्यांचे मत बदलले नसेल तर हे आकडे का दिले जात आहेत? का आता एबीसी न्यूज फितुर होऊन ट्रंपच्या पक्षात गेली?
http://abcnews.go.com/Politics/clinton-trump-turnout-critical-poll/story...
राज असे आहे ना कि हा अतिशय
राज असे आहे ना कि हा अतिशय सेंसिटिव्ह प्रश्न आहे लक्षात येत असतानाही अतिशय अपुर्या माहितीवर आधारीत पब्लिक डीस्कोजर करणे हे फारसे जबाबदारीचे नाही. "Comey said the FBI “cannot yet assess” whether the material “may be significant” and that he “cannot predict how long it will take us to complete this additional work.”" ह्यातली कमीत कमी पहिली गोष्ट पुरी करून ते पत्र पाठवणे योग्य ठरले असते. The FBI typically does not release information about an ongoing investigation and it yet does not have the foggiest idea what is in these emails. Use of words like ‘appears’ or ‘could be’ or ‘maybe’ or other conditional speech in such a important matter हा नक्कीच टीके चा मुद्दा आहे.
असो, Comey now owes it to the American people to announce his assessment before the election, no matter what.
>>Comey now owes it to the
>>Comey now owes it to the American people to announce his assessment before the election, no matter what.<<
दॅट्स नाट गोइंग टु हॅपन बिफोर ११/०८.
बाय गोइंग अगेंस्ट द पाॅलिसी ॲंड रेझिंग ए रेड फ्लॅग नाव, कोमी मे बी ट्राइंग टु कवर हिज *स फाॅर नाॅट डुइंग ए थरो जाॅब अर्लियर...
आॅल्सो, अनलेस देर इज सब्स्टॅंशल स्टफ इन दोज ईमेल्स (बियाॅंड रिजनेबल डाउट्स), हि वुडंट हॅव टेकन धिस ड्रॅस्टिक स्टेप...
"एफबीआय ने नव्याने मिळालेल्या
"एफबीआय ने नव्याने मिळालेल्या इमेल्स उघडून बघण्याची परवानगी मागितली" यापेक्षा या बातमीत काहीही नाही.
त्यातून शंकाकुशंका काय वाट्टेल त्या काढता येतील. उद्या ट्रम्प असेही म्हणेल की हिलरी व बिन लादेन एकमेकांच्या संपर्कात होते. किंवा हिलरीने सद्दाम ला आधीच कल्पना दिली की हल्ला होत आहे.
पण फॅक्ट ही आहे की त्या इमेल्स मधे काय आहे ते एफबीआयला सुद्धा माहीत नाही. मुळात त्या इमेल्स "नवीन" आहेत हे ही माहीत नाही. केवळ त्या लॅपटॉप वर सापडल्या म्हणजे हिलरी त्याबद्दल खोटे बोलत होती असे होत नाही. इथे जवळजवळ सर्वजण इमेल्स वापरतात. तिने हुमा व इतरांना इमेल केली. एफबीआय ने मागितल्यावर तिच्या इमेल सर्वर वरून कॉपीज दिल्या. त्यानंतर आता हुमाच्या लॅपटॉप वर सापडल्या. त्या मूळ मेल्स च्या कॉपीज असू शकतात. त्या तशा नाहीत हे गृहीत धरून हिलरीला अपात्र ठरवण्याची घाई केली जात आहे.
आणि हिलरी ला या शंकेवरून अपात्र ठरवायचे असेल तर कोणाला निवडायचे? गर्व से कहो हम ग्रॅबर, ग्रोपर है ला?
आॅल्सो, अनलेस देर इज
आॅल्सो, अनलेस देर इज सब्स्टॅंशल स्टफ इन दोज ईमेल्स (बियाॅंड रिजनेबल डाउट्स), हि वुडंट हॅव टेकन धिस ड्रॅस्टिक स्टेप... >> There is no also, or unless here, that's the point of criticism against him. FBI did not even had warrant to look into contents of emails (at least did not until that letter was sent). That's what makes it very unusual. He is simply covering his a** and that's all.
कोमीचे वाक्य असे होते, "एका
कोमीचे वाक्य असे होते, "एका वेगळ्या केसचा तपास करत असताना एफ बी आयला अशा काही इमेल्स सापडल्या आहेत ज्यांचा ह्या (हिलरीच्या) केसशी संबंध असावा असे सकृतदर्शनी आढळले आहे".
कोमी अगदीच ढिसाळ आणि नालायक आहे ही शक्यता नसेल तर हा तथाकथित सकृतदर्शनी पुरावा पुरेसा भक्कम असला पाहिजे ज्यामुळे कोमीने हे धाडस दाखवले असावे.
जर हा पुरावा कमकुवत असता वा संशयाला जागा असती तर कोमीने अशी जोखीम पत्करली नसती अन्यथा त्याची राजकीय आत्महत्या ठरली असती.
कोमीचे वाक्य असे होते, "एका
कोमीचे वाक्य असे होते, "एका वेगळ्या केसचा तपास करत असताना एफ बी आयला अशा काही इमेल्स सापडल्या आहेत ज्यांचा ह्या (हिलरीच्या) केसशी संबंध असावा असे सकृतदर्शनी आढळले आहे". >>> यस. तेवढीच आहे फक्त मूळ बातमी. यापेक्षा काहीही नाही.
बाकी सगळा सब्जेक्टिव्ह अॅनेलिसीस. तो डेम्स त्यांना फेवरेबल पद्धतीने करत आहेत, ट्रम्प वाले त्यांना फेवरेबल पद्धतीने. पण "मटेरियल चेंज" म्हणतात, तो काहीच नाही.
कोमीच्या इन्वेस्टिगेशन मधुन
कोमीच्या इन्वेस्टिगेशन मधुन काहि बाहेर पडो अथवा ना पडो; डॅमेज इज डन टु हिलरी कॅंपेन (आता काहि डायहार्ड हिलरी समर्थक म्हणतील - नो बिगी, इट्स नाट गोइंग टु मुव ए निडल. ॲंड दॅट्स ओके, आय अंडरस्टॅंड...
).
ट्रंप कॅंपेनने हे कोमी कार्ड नीट हाथाळलं आणि ट्रंपबाबाने हि येत्या ९ दिवसांत काहितरी बरळुन स्वत:च्याच पायावर धोंडा पाडुन घेतला नाहि तर "आब के बाॅर ट्रंप साॅरकाॅर" पहायला मनाची तयारी करुन ठेवा...
Undecided voters बद्दलच्या
Undecided voters बद्दलच्या बातम्या वाचून बिल मार म्हणतो तशीच शंका आली. नक्की कोण आहेत हे अनडीसायडेड वोटर्स आणि ट्रम्प बद्दलच्या बातम्या, त्याचे महान विचार, त्याच्या स्टाफची वक्तव्ये हे सगळे होउन ते अजून अनडिसायडेड कसे आहेत?
जे ट्रम्प सपोर्टर्स आहेत ते सोडा. त्यांच्याबद्दल काही नाही. पण जे कधी काळी कुंपणावर होते, ते इतक्या दिवसांनंतर अजून कुंपणावर कसे काय?
हा तथाकथित सकृतदर्शनी पुरावा
हा तथाकथित सकृतदर्शनी पुरावा पुरेसा भक्कम असला पाहिजे >> तसे असते तर हे पुढचे शेपूट जोडायची गरज लागली नसती त्याला.
After receiving a briefing from his investigative team, he agreed “to allow investigators to review these emails to determine whether they contain classified information.”
अगदी सिनेटर ग्रासली नि जॉह्नसन सारख्या कट्टर हिलरी विरोधकांनासुद्धा हे विचित्र वाटले आहे नि त्यांनी अधिक स्पष्टीकरणाची मागणी केली आहे ह्यातच आले.
==ट्रम्प बद्दलच्या बातम्या,
==ट्रम्प बद्दलच्या बातम्या, त्याचे महान विचार, त्याच्या स्टाफची वक्तव्ये हे सगळे होउन ते अजून अनडिसायडेड कसे आहेत?
==
असेही विचारता येईल की हिलरीचा खोटारडेपणा, स्वार्थीपणा, उन्मत्तपणा, नीचपणा, ढोंगीपणा, भ्रष्टाचारीपणा, माजोरडेपणा हे सगळे पाहूनही लोक त्रिशंकू अवस्थेत का आहेत?
असो. मला वाटते राजकारण ह्याविषयाचा तिटकारा असणारे लोक केवळ कर्तव्यबुद्धीने मतदान करत असणार. शेवटच्या काही दिवसात त्यांचे जे मत बनेल त्यावर ते काय ते ठरवत असणार. कदाचित अत्यंत वरवरच्या कारणांकरता ते आपल्या आवडीचा उमेदवार निवडत असतील. कुणाचे कपडे चांगले आहेत, कुणाचा आवाज बरा आहे, माझ्या गावात कोण आला होता इ. इ. असे अनेक लोक अमेरिकेत आहेत ज्यांना कुठले मुद्दे आहेत, त्यावर कुठला उमेदवार काय म्हणतो आहे ह्याचे सोयरसुतक नाही.
अशी एक आशा आहे की असले नग संख्येने कमी असावेत. इंटरनेट, फेसबुक व अन्य सोशल नेटवर्कमुळे अशा पाण्यात राहून कोरड्या राहिलेल्या लोकांशी सख्या हळूहळू कमी होत असावी.
ह्या निवडणुकीत असाही एक विचारप्रवाह आहे की दोघेही उमेदवार एकाच माळेचे मणी आहेत. एकाला झाकावा आणि दुसरीला काढावे, काही फरक पडत नाही. खरे तर असा विचार करणारा एक गट नेहमीच अस्तित्त्वात असतो.
तर अशा प्रकारचे लोक कुंपणावर असावेत असा एक अंदाज.
हिलरीला एक प्रकारचा
हिलरीला एक प्रकारचा महाराणीगंड ....................... लोकशाहीचे प्रमुखपद देणे हा शहाणपणा नाही..
पटते.
हे असले करणार्या बाईला राज्यकारभारातल्या गोपनियतेचे मह्त्व माहित तरी आहे का?
नि हिला कसे सुधारणार? एकूणच अगदी बिल राष्ट्राध्यक्ष असल्यापासून या मंडळीला स्वतःबद्दल इतका गर्व आहे, की ते कसलाहि विचार करत नाहीत.
पण काय आहे की ट्रंपहि काही कमी नाही. त्याच्यात इतर अनेक दुर्गुण. मुख्य म्हणजे त्याचे राजकारणातले, परराष्ट्र संबंधातले घोर अज्ञान - नुसताच माचो पणा! तो म्हणतो तसे करणे शक्य आहे यावरहि बर्याच जणांचा विश्वास नाही.
कठीण आहे.
सिनेमात बच्चन व धर्मेंद्र ची
सिनेमात बच्चन व धर्मेंद्र ची मारामारी सुरु असेल तर बच्चन खाली पडतो तेव्हा धर्मंद्र च्या फॅन्स ना आनंद होतो व धर्मेंद्र खाली पडतो तेव्हा बच्चन च्या..
इथेही तीच गंमत आहे. आपल्या उमेदवाराला सोयीची ब्रेकिंग न्यूज आली की उत्साहाने बीबी वर आणतात.
अर्थात दोन्हीचेही समर्थक आपापली मते हिरिरीने व सभ्यतेचे संकेत पाळूनच मंडत असल्याने वाचायला मजा येते.
ह्या बातमीमधले रीडचे कोमीला
ह्या बातमीमधले रीडचे कोमीला लिहिलेले पत्र वाचा. फा तू बोललेलास तसे एव्हढ्या लगेच खरे होईल वाटले नव्हते
http://www.huffingtonpost.com/entry/harry-reid-james-comey-clinton_us_58...
त्यातून शंकाकुशंका काय
त्यातून शंकाकुशंका काय वाट्टेल ............... कल्पना दिली की हल्ला होत आहे.
काही भरंवसा नाही, म्हणेलहि तो.
रीड ने पण म्हंटले आहे की एफ बी आयला ट्रंप नि रशिया यांच्या संबंधाची माहिती आहे नि ती माहिती ते गुप्त ठेवत आहेत - तसा पुरावा काही नाही, पण बोलायला काय जाते?
हा का शिकलेला, श्रीमंत नि प्रगत देश आणि तिथले नेते? दारू प्यायल्ले लोक याहून जास्त संयमित असतात. जो जास्त खोटे बोलेले नि लोकाना फसवेल तो जिंकला - जणू काही टीव्ही शो च चालला आहे.
अति जास्त अनिर्बंध शासन नि अति जास्त आर्थिक विषमता यातून राष्ट्रात यादवी माजते असे ग्रीक लोकांनी पूर्वीच लिहून ठेवले आहे. भारतात १९ व्या शतकाच्या सुरुवातीला असेच झाले होते म्हणून ब्रिटिशांना सगळा भारत जिंकून घेणे जमले. पण आता या अमेरिकेला कुणि सुधारणे शक्य नाही. माझे भविष्य की अमेरिकेचे तुकडे पडतील, ते पन्नास वर्षांच्या आधीच खरे ठरणार की काय?
हा हा हा. डायरेक्टर कोमी योर
हा हा हा. डायरेक्टर कोमी योर इंटग्रेटि इज अनक्वेश्चनेबल ॲज लाॅंग ॲज...
राज माझ्या तुटपुंज्या
राज माझ्या तुटपुंज्या माहितीप्रमाणे कोमीचे नॉमिनेशन GOP ने block केले होते नि त्याच्यासाठी फिल्डींग लावणारे बराकराव ओबामाभाऊ नि डेम होते. त्यावेळी कोमीच्या apolitical stance चा बराच गवगवा झाला होता.
राज - 'इलेक्शन इज रिग्ड अनलेस
राज - 'इलेक्शन इज रिग्ड अनलेस आय विन इट' प्रमाणेच की
हा! आॅल ॲम सेइंग इज - अब आया
हा! आॅल ॲम सेइंग इज - अब आया उंट पहाड के नीचे...
हिलरीची अजून एक फसवेगिरी.
हिलरीची अजून एक फसवेगिरी. डिबेटच्या आधी विचारले जाणारे प्रश्न मिळवून प्रतिस्पर्ध्यावर मात करणे.
डॉना ब्राझिल ह्या सी एन एन च्या राजकीय विश्लेषकाच्या मदतीने हिलरीबाईंनी हा रडीचा डाव खेळला. बर्नीशी डिबेट होती तेव्हा सगळे प्रश्न आधीच जाणून घेतले. डॉना ही कट्टर डेमॉक्रॅट समर्थक आहे. विकीलिक्सच्या कृपेने हे गलिच्छ गुपित उघडकीस आले. ईमेलमधे उल्लेख केलेले प्रश्न जसेच्या तसे डिबेटमधे विचारले गेले तेव्हा लोकांची खात्री झाली.
याविषयी प्रश्न विचारले असता डॉनाबाईने उलटाच हल्ला केला की रशियाने हॅक केलेल्या गोष्टींबद्दल बोलावे अशी त्यांची लायकीच नाही. शिवाय मी असे काही केले नाही वगैरे सांगितले.
सी एन एन ला काही हे पटलेले दिसत नाही. त्यांनी डॉनाबाईला डच्चू दिला आहे.
पण असला रडीचा डाव खेळून नामांकन मिळवलेल्या हिलरीला डच्चू मिळणार का नाही हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे.
आपले राजकीय वजन वापरुन असले अश्लाघ्य शॉर्टकट मारणार्या या बाईच्या प्रामाणिकपणाबद्दल काय बोलणार?
कोमींनी हातघाईवर येउन परवा जो
कोमींनी हातघाईवर येउन परवा जो बाॅंब टाकला त्यामागे एफबिआय एजंट्सचा विद्रोह होता अशी बातमी येतेय. कोमींच्या हिलरीला क्लिनचीट देण्यामागे कितीजणांचे हितसंबंध गुंतलेले होते ते जनते समोर येईलंच...
भयंकर विश्वासार्ह साइट दिसतेय
भयंकर विश्वासार्ह साइट दिसतेय ती. नावच असे आहे की शंकेला जागाच नाही. 'नॅचरल न्यूज'. पेज उघडले की पॉप अप्स येतात नॅचरल गोष्टींचे. स्वतःच्याच आधीच्या "बातम्या" लिन्क म्हणून नवीन "बातमी"त देतात. याच पानावरच्या एका "संदर्भात" ही ओळ दिसली. इतकी बेधडक माहिती देणारी साइट खरीच असली पाहिजे.
The simple truth is that the entire democrat party is a massive criminal cartel
बरं यांच्या बातमीचा सोर्स काय, तर हा:
According to multiple sources in the independent media -- now the only remaining "free press" in America --
फारएन्ड, ती मूळ बातमीच
फारएन्ड, ती मूळ बातमीच (एफबिआय एजंट्सचा विद्रोह) खोटि आहे अशी तुमची धारणा आहे कि काय?
तसं असेल तर नाॅक योर साॅक्स आॅफ ॲंड प्रुव इट राॅंग...
अजून कोठे वाचली तर काही
अजून कोठे वाचली तर काही म्हणता येइल. केवळ या लिन्क वरून खरे मानायचे तर सगळी डेमोक्रॅटिक पार्टी ही गुन्हेगारांची गँग आहे हे ही खरे मानावे लागेल :).
मला हिलरीला डिफेण्ड करण्यात काही इंटरेस्ट नाही. पण आरोपात तथ्य आहे की नाही, त्यातले न्युआन्सेस काय आहेत ते समजून घेण्यात आहे.
कमाल आहे! बातमी इतर कुठे
कमाल आहे! बातमी इतर कुठे वाचली नाहि म्हणुन ती खोटी? आॅब्वियसली यु नीड टु कॅचप ए लाॅट विथ करंट न्युज...
Pages