Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रंपला तर तो स्वतः सोडून
ट्रंपला तर तो स्वतः सोडून बाकी कुण्णी कुण्णी आवडत नाही. सगळे दुष्ट, नॅस्टी लोक भरलेत जगात. >>>> त्याच लाइन वर रिग्ड इलेक्शन मुद्यावर हिलरीने त्याला मस्त उत्तर दिलं
राष्ट्रपति पदाचा "उमेदवार कसा
राष्ट्रपति पदाचा "उमेदवार कसा असु नये!" या साठी उदाहरण म्हणुन तो पर्फेक्ट आहे >>+ ९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
प्रो लाईफ असणे म्हणजे काय वर,
प्रो लाईफ असणे म्हणजे काय वर, अॅबॉर्शन मुद्यावर, ३० वर्षे काय केले वर, रेफ्युजीना मी असंच सोडू शकत नाही वर, इमिग्रेशन साठी मी फॅमिली तोडू शकत नाही आणि अनेक मुद्यांवर हिलरीने दणदणीत प्रतिसाद दिले. २ दिवस दूर राहून केलेली तिची तयारी दिसत होती.
प्रचंड विनोदी स्टाईल आहे ती. त्यावर केलेल्या पॅरडी बघायला मजा येईल आता.
ट्रंप येण्याचा काही चान्सच नाही.
ट्रंप ते माईक्चं बोंडूक तोंडात घालून रॉंग रॉंग म्हणत होता ते मिस करणार पण.
ट्रंप येण्याचा काही चान्सच
ट्रंप येण्याचा काही चान्सच नाही. >> धाकल्या बुशबद्दल पण असेच म्हणत होते रे लोक, एकदाच काय दोनदा आला निवडून च्यामारी तो
.. बेमट्या जगात मूर्खांची कमी नाही लक्षात ठेव.
मला 'सेकंड अमेंडमेंट' नि 'रो
मला 'सेकंड अमेंडमेंट' नि 'रो अँड वेड' बद्दल हिलरी ओपनली घेतलेला स्टान्स आवडला. कुठेही कसलिही लपवालपव नव्हती, तसही फक्त ह्याच मुद्द्यांवरून जे मत देणार आहेत त्यांची मते बदलण्याचा चान्स शून्य आहे. कुंपणावरचे बदलतील अशी आशा.
जगात मूर्खांची कमी नाही
जगात मूर्खांची कमी नाही लक्षात ठेव.>>
होय ओ, अगदी इकडे भारतातच बघा कि.
ट्रम्पोबा निवडून येणार. मग त्याची वटवट कमी होणार. भक्तच फाजील बडबडत राहणार. अगदी असंच असंच होणार!
बेमट्या जगात मूर्खांची कमी
बेमट्या जगात मूर्खांची कमी नाही लक्षात ठेव.
अमेरिकेत तर जगातल्या इतर कुठल्याहि देशात (अगदी भारत, चीन, इंडोनेशिया) नसतील एव्हढे भरले आहेत नि त्यांच्याजवळ खूप पैसे आहेत. म्हणून तर जगातल्या अगदी कुठल्याहि देशातला माणूस इथे येऊन पैसे कमावतो नि इथले नागरिक वेल्फेअर वर जातात.
एक किस्सा आठवतो - १९८५ मधे भारतात गेला असताना माझ्या मित्राने एका जुन्या मित्राला विचारले, तुझी मुले कशी कायआहेत, शाळा कॉलेजात त्यांचे कसे चालले आहे? तर तो मित्र म्हणाला मोठा ठीक आहे, होईल काहीतरी इंजिनियर, किंवा डॉक्टर पण लहान मुलगा अगदीच आभ्यास करत नाही, जेमतेम पास होतो, त्याचे काही खरे नाही, त्याला अमेरिकेलाच पाठवावे लागणार!!
मला 'सेकंड अमेंडमेंट' नि
मला 'सेकंड अमेंडमेंट' नि 'कार्ल अँड रो' बद्दल हिलरी ओपनली घेतलेला स्टान्स आवडला. >>> (रो वि वेड म्हणायचे आहे का?) - हो मला ही, विशेषत: सेकण्ड अमेण्डमेण्ट बद्दल. कॉमन सेन्स अॅप्रोच होता. सध्याच्या प्रोसेस मधले धोकेही बरोबर हायलाइट केले.
इमिग्रेशन साठी मी फॅमिली तोडू शकत नाही आणि अनेक मुद्यांवर हिलरीने दणदणीत प्रतिसाद दिले. >>> हो इथेही फर्म वाटली. लॅटिनो वोटर बेस जो २००८ पासून डेमोक्रॅट्स कडे आलेला आहे त्याला अॅड्रेस करत होती बरोबर.
विशेष्तः सेकन्ड अमेन्डमेन्ट
विशेष्तः सेकन्ड अमेन्डमेन्ट आणि अबॉर्शन हे मुद्दे ट्रम्प ला हात देण्यासाठी आणले गेले असावेत पण त्याचा फायदा हिलरीने पुरेपूर घेतला. तिची त्यांवरची पोझिशन जी ट्रम्प ने ट्विस्ट करून त्याच्या सपोर्टर्स समोर सांगायला वापरली होती ती तिला क्लिअर करता आली.
प्लॅन्ड पेरेन्टहूड अगदी कितीतरी सुशिक्षित रिपब्लिकन वोटर्स ना सुद्धा काय आहे, काय करतात काहीही माहित नाही, ते नुस्ते अबॉर्शन करणारे बेबी किलिंग मॉन्स्टर्स एवढेच त्यांना माहित आहे. ते लोक कॅन्सर रिसर्च वगैरेही करतात असे ऐकल्यावर माझ्या एका कलीग चा विश्वासच बसेना.
(रो वि वेड म्हणायचे आहे का?)
(रो वि वेड म्हणायचे आहे का?) >> हो. मी अजून एक मुद्दा लिहित होतो कि कार्ल रोव्हबाजूला फेकला गेलाय त्यात गोंधळ झाला. पण तो विषय नंतर कधीतरी.
धर्माच्या नावाखाली अबॉर्शन ला विरोध करणार्यांना ट्रंप सारखा सैल कॅरॅक्टरचा माणूस चालतो हाच मूळात दुटप्पीपणा आहे.
तो ही एक फॅक्टर आहेच. ट्रम्प
तो ही एक फॅक्टर आहेच. ट्रम्प खरा कॉन्झर्वेटिव्ह, रिपब्लिकन ही नाही. काल तो जे काही बोलला ती त्याची स्वतःची जेन्युइन मते आहेत असेही नाही. इथे पडला तर २०२४ मधे डेमोक्रॅट्स कडून सुद्धा उभा राहील तो
२०२४ तो फक्त 'त्या क्षणी
२०२४
तो फक्त 'त्या क्षणी त्याला जे सुचेल ते बोलणारा माणूस' आहे. त्या मागे कुठलीही ठाम वगैरे भूमिका असते असे मला वाटत नाही. अगदी असलीच तर "त्यातून माझे भले कसे साधता येईल" ह्यापलीकडे विचार करण्याची त्याची क्षमताच नसावी. निव्वळ ह्या कारणामूळे त्याला 'तो आधी काय बोलला होता' ते त्यालाच नंतर नक्की आठवत नसावे. फक्त त्याची बिन्धास्त पणे मागचा पुढचा विचार न करता मनात येईल ते मनात न ठेवता बोलून टाकायची सवय मला कौतुकास्पद वाटते.
ट्रंप च्या कॉमिक व्हॅल्यू चा
ट्रंप च्या कॉमिक व्हॅल्यू चा मी जबरा फॅन झालोय.
"धर्माच्या नावाखाली अबॉर्शन ला विरोध करणार्यांना ट्रंप सारखा सैल कॅरॅक्टरचा माणूस चालतो हाच मूळात दुटप्पीपणा आहे." - सेकंड अमेंडमेंट - गन पझेशन वगैरे गोष्टी अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडून, तो अमेरिकेच्या संस्कृतीचा कणा आहे वगैरे सांगणारे लोक, जेव्हा इमिग्रेंट्स च्या विरोधात बोलतात, तेव्हा त्यात तितकाच दुटप्पीपणा वाटतो. ३-४ पिढ्यांपूर्वी ह्यांचे पूर्वज बोटीवर सामान लादून अमेरिकेत आले, तेव्हा कितीजण ग्रीन कार्ड घेऊन आले होते? अॅबॉर्शन च्या मुद्द्यावर सरकारने भुमिका घेणं हाच प्रकार संतापजनक आहे.
मला रिपब्लिकन्स चं भांडवलशाही आर्थिक धोरण मात्र पटतं. समाजवाद ही माझ्या मते भोंगळ कल्पना आहे.
मला रिपब्लिकन्स चं भांडवलशाही
मला रिपब्लिकन्स चं भांडवलशाही आर्थिक धोरण मात्र पटतं. समाजवाद ही माझ्या मते भोंगळ कल्पना आहे.
भांडवलशाही आर्थिक धोरण - पण असे भांडवलशाही किंवा समाजवादी असे लेबल्स लावलेली धोरणे उपयोगाची नाहीत. गेल्या वीस पंचवीस वर्षातल्या आर्थिक धोरणामुळे सध्या श्रीमंत लोक अधिक श्रीमंत झाले. पण जे धंदे वाढले त्यात सर्वसाधारण, कमी शिक्षण (पुस्तकी किंवा व्होकेशनल) असलेले लोक ग्लोबलायझेशन मुळे मेले, ग्लोबलायझेशन करण्यापूर्वी निर्यात वाढेल एव्हढाच एक विचार झाला होता, त्यामुळे इथल्या लोकांच्या नोकर्या जातील याचा विचार केला होता का?
पूर्वी सुद्धा अमेरिकन लोकांना जगातल्या लोकांपेक्षा जास्त पगार मिळे, पण तेंव्हा अमेरिकन तंत्रज्ञानाला पर्याय नव्हता, तसल्या मशिन्सवर, त्या पद्धतींनी काम करणे इतर एक दोन देश सोडल्यास इतर कुणाला जमलेच नसते. पण परिस्थिती बदलत होती, त्यामानाने अमेरिकेने आपले तांत्रिक सामर्थ्य वाढवणे, अधिक शिकलेले लोक निर्माण होतील अशी व्यवस्था करणे हे काही केले नाही. आता अमेरिकन लोकांच्या इतके दर्जाचे किंवा त्याहून जास्त दर्जाचे काम करणारे लोक भारत चीन कुठेहि मिळतात, पुनः परवडतील अश्या दराने, त्यामुळे त्यांचा खर्च कमी होतो, उत्पन्न वाढते, नफा वाढतो, इथले स्टॉक होल्डर्स अधिक श्रीमंत होतात, काही भारतीय, चिनी श्रीमंत होतात पण सर्वसाधारण अमेरिकन जनता अधिकाधिक गरीब होत रहाते.
त्यातून परवडत नाही एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर वेल्फेअर, पेन्शन प्लॅन्स करून पैशाची वाट लावली. त्यात श्रीमंतांवरचे कर कमी केले, नि कमी पैसेवाले तर टॅक्स भरूच शकणार नाहीत, किंवा नोकर्या गेल्याने इन्कम कमी झाल्याने खूप कमी टॅक्स भरतात. मग आज १५ ट्रिलियन उद्या १७ ट्रिलियन कर्ज नि शेकडो बिलियन डॉलर्स नुसते व्याजापोटी भरावे लागतात. नि आवश्यक गरजा पुरवण्याइतके पैसे उरत नाहीत, उदा. लष्कर, शिक्षण, रस्ते दुरुस्ती इ.
नि अनिर्बंध भांडवलशाही करून २००८ मधे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली.
हे झाले आर्थिक धोरण. मध्यपूर्वेतले राजकारण तर विचारूच नका इतके वाईट. लोकांनी काय वाट लावली देशाची आंतर्राष्ट्रीय राजकारणात?
तर रिपब्लिकन, डेमोक्रॅट, भांडवलशाही, समाजवादी इ. लेबले असलेले उपाय उपयोगाचे नाहीत. सद्यःपरिस्थितीबद्दल वाईट वाटणारे अनेक लोक आहेत. मग ते ट्रंपच्या मागे लागतात, कारण तो आशा दाखवतो की तो अमेरिका ग्रेट करेल, सध्याचे राजकारणी वाईट नि मूर्ख आहेत वगैरे बोलतो.
बोलणे सोपे आहे, उपाय करणे कठीण.
दुर्दैवाने ट्रंप किंवा हिलरी या दोघांच्यातहि वैयक्तिक दोष अनेक,
एव्हढे सगळे सुधारण्याइतके चांगले नि हुषार लोक आहेत कुठे?
त्यातून समा़ज धर्माबाबतीत, घटनेबाबत अंधश्रद्ध, रेसिस्ट इ. घटनेला दुरुस्त्या शक्य आहे, पण दुसर्या दुरुस्तीला हात लावणे कुणाचीहि ताकद नाही.
अगदी तीनशे वर्षापूर्वीचा भारत! पण आता कोण येणार या देशात?
https://www.yahoo.com/news/tr
https://www.yahoo.com/news/trump-booed-as-he-rips-into-clinton-at-cathol...
हिलरीचं भाषण उपरोधीक/विनोदि
हिलरीचं भाषण उपरोधीक/विनोदि पेक्शा पोलिटिकल जास्त वाटलं. याउलट ट्रंपचे पंचेस मस्त होते, एक "करप्ट" उल्लेख असलेला सोडुन. हिलरीवरचा "पार्डन मी" जॅब अफलातुन...
मला दोघांचेही विनोद आवडले.
मला दोघांचेही विनोद आवडले. ह्याचं रिपोर्टिंग बरंच बायस्ड वाटलं.
सगळ्यात सुंदर reaction
सगळ्यात सुंदर reaction गुलियानीची होती हिलरीच्या She is 4' वर. चुकवू नका.
पहिल्यांदा ऐकल्यावर माझा
पहिल्यांदा ऐकल्यावर माझा सुद्धा व्हादफ मोमेंट झाला होता, रुडी जुलियानीसारखा. कारण फोर र्हाइम्स विथ समथिंग...
कुछ भी राज, मी जिम मधे ऐकली
कुछ भी राज, मी जिम मधे ऐकली क्लिप ओपन TV वर नि असे काहीही confusion झाले नाही. कदाचित ट्रंपबाबत विनोद असल्यामूळे तुमच्या अपेक्षांचे बार भलतीकडे वळले असावेत
शक्यता आहे, जुलियानी ॲंड आय
शक्यता आहे, जुलियानी ॲंड आय वर आॅन सेम फ्रिक्वेंसी पर्हॅप्स...
हे भाषण खेळीमेळीचे असावे असा
हे भाषण खेळीमेळीचे असावे असा संकेत आहे. स्वतःवर जास्त विनोद करणे. भाषण विनोदी असले तरी शेवट गंभीर असतो. ओबामा व मॅक्केन चे मस्त होते.
ट्रंप ने बोचरी राजकिय विधाने करून विरस केला. शिवाय त्विटर वरही कुरकुर केली.
अरे सही आहे हे.. बेस्ट.
अरे सही आहे हे.. बेस्ट.
हे भाषण खेळीमेळीचे असावे असा
हे भाषण खेळीमेळीचे असावे असा संकेत आहे. स्वतःवर जास्त विनोद करणे. भाषण विनोदी असले तरी शेवट गंभीर असतो. ओबामा व मॅक्केन चे मस्त होते.>> +१
ह्यावेळेच इलेक्शन हीस्टॉरिकली स्टुप्ड टु लो लेवल आहे आणी दोन्ही उमेदवारनी अतिशय खालच्या पातळिवर उतरुन एकेमेकावर आरोपप्र्त्यारोप केलेत अस बर्याच व्रुत्तपताच म्हणण आहे.
स्ट्यॅच्यु ऑफ लिबर्टिची कॉमेन्ट आणी ट्रन्प ची कॅथलिक कॉमेन्ट मला अजिबात आवडली नाही .. ( एखाद्या स्मारकाला अशी नाव ठेवण् हा प्रकार भारतात झाल असत काय रण माजल असत याचा विचारच न केलेला बरा)
गेले दोन आठवडे ट्रंप हरणार
गेले दोन आठवडे ट्रंप हरणार अशी खूणगाठ बांधली होती आणि नैराश्याने ग्रासलो होतो. पण एफ बी आयच्या कृपेने ट्रंपच्या छावणीत पुन्हा थोडे चैतन्य संचारले आहे.
लैंगिक विकृतांचे मुकुटमणी शोभणारे आणि हिलरीचा उजवा हात असणार्या हुमा अबेदीनचे पती अँथनी वीनर ह्यांच्या फोनमधे हिलरीच्या मेल सापडल्या म्हणे! "तसला" फोन हाताळण्याकरता किती जंतुनाशके वापरायला लागली असतील त्याची कल्पनाच केलेली बरी! असो.
हुमाबाईंचे मनःपूर्वक आभार! अशाच नवनव्या इमेल्स उघडकीस येवोत आणि अमेरिकन लोकांचे डोळे उघडोत!
जाता जाता: ट्रंप साहेबांनी अत्यंत दयनीय हिंदीत "अब की बार ट्रंप सरकार" म्हटल्याचे ऐकून धन्य झालो! आपल्या हिंदी सिनेमात एखादा श्वेतवर्णीय व्हिलन "हम टुमे खाटाम कर डेगा" वगैरे डायलाग म्हणतो ते अगदीच विपर्यस्त नसतात असे लक्षात आले!
हे नक्की काय निघाले आहे
हे नक्की काय निघाले आहे इमेल्स चे कोणी सांगा जरा. अजून वाचले नाही पूर्ण - एफबीआय ने चौकशी पुन्हा ओपन केली आहे इतकेच टायटल वाचले आहे.
फा हे बघ
फा हे बघ http://www.vox.com/2016/10/28/13458382/fbi-hillary-clinton
जे लोक बायस नको म्हणून प्रेसिडेंशियल टर्म वर्षभर बाकी असताना सुप्रिम कोर्टाचा जस्टीस उमेदवार बघू इच्छित नाहीत ते अशा 'नरो वा कुंजरोवा' पत्रावर उड्या मारून निकाल जाहिर करतात हे खरच गम्मतीशीर आहे.
पूर्णपणे हिलरीच्या बाजूने
पूर्णपणे हिलरीच्या बाजूने असणारे सरकार आणि एफ बी आय असताना "त्या" उघडकीस आलेल्या मेलांमधे नक्की काय मजकूर आहे हे निवडणुकीच्या आधी उघड करेल असे वाटत नाही. पण इतक्या उघड उघड पक्षपाती असणार्या सरकार आणि सरकारी यंत्रणानाही दडपून टाकणे अवघड झाले असावे असे काहीतरी असणार. एफ बी आय चे अनेक अधिकारी अशा प्रकारे हिलरीच्या प्रकरणावर पांघरूण घालण्याच्या विरुद्ध होते पण उच्चपदस्थांच्या दबावामुळे त्यांना गप्प बसावे लागले असे ऐकिवात आहे. विकृतवीर वीनरच्या तपासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे झाकले गेलेले उघड्यावर आले आणि अशाच दाबलेल्या अधिकार्यांनी पुरेसा पुरावा दाखवला असेल म्हणून हे पुन्हा तपासाच्या कक्षेत आले असे मला वाटते.
तथाकथित पुरोगामी माध्यमे ह्यावर लवकरच रंगसफेती करुन ह्यात काही दम नाही म्हणणे शक्य आहे.
खोटारडा ओबामा आणि अॅटोर्नी जनरल त्यांच्या परीने प्रयत्न करुन हे झाकायचा प्रयत्न करणार. पण हे सगळे करण्याकरता पुरेसा कालावधी नाही असे वाटते.
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हिलरीचे प्रकरण एका लैंगिक विकृतीने बरबटलेल्या माणसामुळे उघडकीस यावे हा काव्यात्मक न्याय म्हणावा की काय?
पूर्णपणे हिलरीच्या बाजूने
पूर्णपणे हिलरीच्या बाजूने असणारे सरकार आणि एफ बी आय >> एफ बी आय हिलरीच्या बाजूने आहे ? "असे ऐकिवात आहे.". hmmmmm
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हिलरीचे प्रकरण एका लैंगिक विकृतीने बरबटलेल्या माणसामुळे उघडकीस यावे हा काव्यात्मक न्याय म्हणावा की काय?
≥>>>>
एका लैंगिक विकृत माणुस हिलरीविरुद्ध उभा आहे हे अजून मोठे काव्य आहे
Pages