अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज डिबेटच्या दिवशी शेंडेनक्षत्र उगवतील का? Proud

आजविषयी काही चर्चा नाही इथे?

ती अ‍ॅक्सेस हॉलिवूड ची क्लिप आल्यापासून ते गायब आहेत Lol

आज जरा अवघड आहे. हिलरीच्या विरोधात जास्ती वातावरण आहे. पण तिचे ते भाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे फुसका बार वाटतोय. फार फार तर काय कळले - की हिलरी एक पॉलिटिशियन आहे. Lol तिला सगळ्यांना बरोबर घेऊन निर्णय कसे घ्यायचे ते कळते. आणि कधी कुठे काय बोलावे याचे तारतम्य आहे. काही झालं तरी लोकं तुलना ही बरोबरीची करत नहीयेत ना. म्हणजे हिलरी पुढचे टारगेट खुप मोठे आहे, तर ट्रंप कडून फक्त सुरळीत डिबेट पार पाडावी अशी अपेक्षा आहे.

हो आज शेवटचे.

लोखो, फॉक्स पाहा. त्यातील कव्हरेज नुसार ट्रम्प वगैरे चा काहीच प्रॉब्लेम सध्या आस्तित्वात नाहीये. हिलरीच्या इमेल्स, बिल क्लिंटन वरचे आरोप ई यावरच सगळे कव्हरेज सुरू आहे. हिलरी किती डेंजरस आहे याचीच चर्चा सुरू आहे. याउलट एमएसएनबीसी वर आता ट्रम्प चा डोलारा कोसळायला एक काडी बाकी आहे असे सुरू आहे. तेथे हिलरीच्या इमेल्स बद्दल काय बोलतायत ते पाहतोय.

एकूण ओपन बॉर्डर्स हा एक मुख्य इश्यू असेल चर्चेचा असे दिसते. ट्रम्प वरचे आरोप आता डेम्स वर बिल क्लिंटनवरच्या आरोपांमधे बॅकफायर करायचा प्रयत्न दिसत आहे. तसेच हिलरीने पूर्वी डिफेण्ड केलेला एक रेप आरोपी, यावर. तो आरोप खरा असेल तर गंभीर आहे. हे सगळे हिलरी कसे डिफेण्ड करते ते आज बघायला हवे.

त्यात ट्रम्प साहेबांनी एक गुगली टाकला आहे (ओके. अमेरिकन भाषेत "कर्व्हबॉल"). मुख्य डिबेटच्या आधी अर्धातास काहीतरी स्वतःचे भाषण टाईप आहे. बहुधा फेसबुक वर लाइव्ह.

परवा मी हे डिबेट मुलांना पाहू द्यावे काय असे गमतीने विचारले होते. आता सीएनएन सिरीयसली सांगत आहेत Happy
http://www.cnn.com/2016/10/07/health/presidential-debate-parents-childre...

फा, तू मुलांना चालेल का विचारलेस आणि डिबेट मध्ये पहिलाच प्रश्न त्याच धर्तीवर विचारला गेलेला. की युथवर काय परिमाण होतो यावर काही विचार केलाय का टाईप.

ओह. मी ते दुसरे डिबेट पाहिले नव्हते.

बाय द वे ही डिबेट्स यावेळेस पॉप्युलर इव्हेण्ट्स झाली आहेत. रीगल सिनेमाज त्यांच्या थिएटर्स मधे दाखवत आहेत आज Happy
http://www.wfsb.com/story/33426455/regal-cinemas-to-show-final-president...

लेकिच्या टिचर ने डिबेट बघितलल्यावर एक्ष्त्रा क्रेडिट देणार आणि होम्वर्क पास वैगरे काहितरी पण अस्णार आहे, आता ग बया ? काय कराव ? तिला त्या व्हिडियो विषयी काही माहिती नाहिये फक्त ट्रम्प फार क्रेझी आहे वैगरे अस काहितरी म्हणत होती त्यामुळे तु हिलरीलाच वोट दे म्हणे !

डिबेट मधे शेवटचा मुद्दा Fitness to be the president असणार आहे म्हणे. दोन्ही कॅण्डिडेट्स नी तो कसा येउ दिला माहीत नाही Happy

जे (अजुनही) ट्रंपचे समर्थक आहेत ते त्यांच्या मुलांना काय कारण सांगत असतील? सहज मनात आलं.
New Hampshire south border la kasa aala?

हिलरी सुप्रीम कोर्ट पॉइण्ट ला गडबडली. उगाच रो वि. वेड, गे मॅरेज आणले मधे. पण वीमेन्स राइट्स च्या वेळी ठामपणे बोलली. मात्र सर्वात हॉरिबल उत्तर - तिच्या ओपन बॉर्डर्स मुद्द्याचा खुलासा तिने आधी बरोबर केला होता ("I was talking about energy trade"). पण नंतर त्यात देशभक्ती आणली. "हे विकिलीक्स रशियाने हॅक केलेल्या डोक्युमेण्ट्स वरून आले आहेत, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करा" - हा टिपिकल राइट विंग मेसेज असतो. हिलरीला ते वापरताना पाहून आश्चर्य वाटले.

पुतिन च्या मुद्द्यावर सुद्धा ट्रम्प सरस ठरतो आहे डिबेट मधे असे दिसत आहे.

हिलरीचे सर्वात ठाम आणि योग्य उत्तर सेकण्ड अमेण्डमेण्ट वर होते. गन ओनरशिप बद्दल.

मात्र ट्रम्प कोणते "जस्टिसेस" अपॉइण्ट करणार आहे? एकच तर जागा रिकामी आहे.

ट्रम्प पेटलेत की आज. अर्थात तो जे बोलतो आहे त्यात मुद्दे/अर्थ काहीच दिसत नाहियेत.>>> तो कायम पेटलेलाच असतो. त्याच्या बोलण्यात कसलाही अर्थ शोधायला जाऊ नये. मुद्द्यांऐवजी गुद्द्यांवर येतो.

नवीन ट्रम्प लॉजिकः "ते त्या बायकांचे आरोप चुकीचे आहेत, कारण ते ऐकल्यावर मी माझ्या बायकोची माफीसुद्धा मागितली नाही"

नवीन ट्रम्प लॉजिकः "ते त्या बायकांचे आरोप चुकीचे आहेत, कारण ते ऐकल्यावर मी माझ्या बायकोची माफीसुद्धा मागितली नाही"
<< हो, ऐकलं Uhoh

ते सोडा नि हे वाचाच.. अफाट आहेत
http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-book-report_us_58085172...

तसेच हिलरीने पूर्वी डिफेण्ड केलेला एक रेप आरोपी, यावर. तो आरोप खरा असेल तर गंभीर आहे. हे सगळे हिलरी कसे डिफेण्ड करते ते आज बघायला हवे. >> फा हिलरी कोर्टाने अपॉईंट केलेली वकिल होती नि त्या मुलिचा जवाब तिच्या आईने घोटवून घेतलेला होता असे प्रकरण होते.

नवीन ट्रम्प लॉजिकः "ते त्या बायकांचे आरोप चुकीचे आहेत, कारण ते ऐकल्यावर मी माझ्या बायकोची माफीसुद्धा मागितली नाही" >> पेन्स शी बोलत नाही तो हे कळले होते, आता बायकोशी पण बोलत नाही असे दिसतेय. ती पब्लिकली काय बोलते ? हा काय बोलतो. ? अरे कमीत कमी ते तरी सिंकमधे ठेवा कि रे.

मी रीपब्लीकन्सना पाठिंबा देणे समजू शकते, रीपब्लीकन असणे समजू शकते. पण ट्रंपला पाठिंबा देणे आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकरणात बचाव करणे - विशेषतः बायकांनी - आकलनापलीकडले आहे.

हा माणूस अध्यक्षिय निवडणुकीचा अंतिम उमेदवार बनू शकतो हेच फार धोकादायक आहे. आणि याला इथपर्यंत आणणारे लोक आपल्या आजूबाजूला वावरतात हे भितीदायक आहे.

हिलरीचा पर्फॉर्मन्स आवडला काल!! बरेच वेळा ट्रम्प ला ठोकले तिने.
पुतिन च्या मुद्द्यावर सुद्धा ट्रम्प सरस ठरतो आहे डिबेट मधे असे दिसत आहे. >>>> अ‍ॅक्चुअली ते पपेट वाले उत्तर बेस्ट होते.
ट्रम्प कडे कसलाच सॉलिड मुद्दा नव्हता, नुस्ताच बेसलेस आरडाओरड करत होता. त्याचा ३० इयर्स काय केले वगैरे अटॅक उलट हिलरीला फायद्यात पडला.

एकूण फॉल आउट मधे ट्रम्प चे निवडणुकीचा निकाल जो काही असेल तो मान्य करणार का यावर "तेव्हा बघू" छाप उत्तर सर्वात जास्त काळ चर्चेत राहील असे दिसते. लिण्डसी ग्रॅहॅम पासून अनेक रिपब्लिकन्सनी ही याचा विरोध केला आहे.

ट्रम्प कडे कसलाच सॉलिड मुद्दा नव्हता, नुस्ताच बेसलेस आरडाओरड करत होता. >>>> त्याच्याकडे मुद्दे कधी होते? कालच्या डिबेटमधेपण हिलरीला 'नॅस्टी वुमन' म्हणणे, पुतीनला 'धिस पर्सन' आवडत नाही म्हणणे (पुतीन म्हणजे अमेरेकन जनता आहे का त्याच्या मताला महत्व द्यायला?), शेवटच्या स्टेटमेंतमधे स्वतःच्या अजेंडाबद्दल वा पॉलिसीबद्दल न बोलता हिलरी कशी वाईट आहे हेच सतत बोलत रहाणे... अ‍ॅबॉर्शनवर तर अगदीच का ही ही बोलला. आणि निवडणुकीच्या निकालाबद्दल तेव्हा काय ते सांगेन?? Uhoh Lol

ह्या माणसानं अमेरीकन निवडणूकीचं जगात जे काही हसं केलंय त्याला तोड नही.

हिलरी काय भन्नाट आकडे फेकीत होती, ते पहाण्यासारखे होते. त्याविरुद्ध ट्रम्प कडे नुसते ' गोलमाल ' बरळणे होते. त्याने एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिले नाही. प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी, हिलरी कशी खराब आहे, बराक ओबामा यांच्यासहीत, हिलरी ने अमेरिकेची कशी वाट लावली आहे, हेच सांगण्यावर त्याचा भर होता. हिलरी चे मत " बॉर्डर ओपन ठेवणे " याचा अर्थ , कोणालाही सरसकट अमेरिकेत प्रवेश मिळणार असा होतच नाही. हिलरी क्लिंटन बोलत असतांना, मधुन मधुन , ती कसे खोटे सांगत आहे असे बोलण्याची ती संवय जुनीच आहे. तीनेवेळा तर त्याला पाण्याचा घोट घ्यावा लागला, या उलट हिलरी चा आत्मविश्वास, त्याच्या फालतू बोलण्यावर सुचक हंसणे, डिबेटच्या मर्यादा सांभाळणे, अमेरिकेपुढे असलेले नेमके प्रश्न म्हणजे मध्यमवर्गीयांचे वेतन वाढविणे, कर्जात वाढ न करणे,शिक्षणाच्या खर्चाबाबत सवलती देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे,उत्पन्न वाढविण्यासाठी बड्या कंपन्यांना व उद्योगपतींना जादा कर लावणे, महिला व लहान मुलांसाठी कल्याणकारी योजना राबविणे इ.इ.याबाबत तीचे म्हणणे , मतदारांना आकर्षित करणारे होते. ट्रम्पच्या लंपट्पणाबद्दल्,त्याचे नाकारणे हास्यास्पद वाटले. हिलरी वर , बिल क्लिंटनच्या भानगडीचा वार , ट्रम्प कडून फारसा जोरात झालाच नाही. मॉडरेटर सुद्धा हिलरी पेक्षा , ट्रम्पला जास्त बोलण्याची संधी देत होता असे जाणवत होते. थोड्क्यात तिसर्‍या वादविवादात सुद्धा , हिलरीनेच बाजी मारल्याचे दिसून आले.

>> पुतीनला 'धिस पर्सन' आवडत नाही म्हणणे

धिस पर्सन तो हिलरी ला म्हणाला ना. धिस नंतर एक पॉज होता. बहुतेक त्याच्या स्टाईल ने तो एकहाद दोन शिव्या हासडणार असावा पण वेळेत आवर्लं स्वतःला.

ट्रंपला स्वतःवर कंट्रोल ठेवता येत नाही हे परत एकदा सिद्ध झाले. हिलरी एव्हढे ऑबव्हिअस एग करत होती नि शेवटी तो फसलाच. डिबेटच्या सुरूवातीला निर्विकार चेहर्‍याने वावरायचा सल्ला त्याला कोणी दिला ? त्याला 'आहे ते न लपवता बोलणेच' नीट जमते. उगाच टॅक्ट्फुली बोलणे, मुद्देसूद बोलणे वगैरे मागे गेला कि सगळेच गंडते त्याचे.

Here is what I think about supreme court
Here is what supreme court thinks about me

ह्या उत्तरांमधेच दोन्ही उमेदवारांमधला फरक स्पष्ट होतो.

धिस पर्सन तो हिलरी ला म्हणाला ना. >>>> हो गं, पण पुतीनला हिलरी न आवडण्याचा काय संबंध? हे अमेरीकेच्या निवडणुकीचं डिबेट आहे ना? अमेरीकेची रशियासंबंधातली धोरणं वगैरेवर बोलावं की जरा. नुसतंच 'पुतीनला मी आवडतो तर अमेरीका रशिया संबंध सुधारतील' ??? हे तर सेरा पेलीनच्या 'माझ्या बॅकयार्डमधून रशिया दिसतो' याच्या वरताण झालं.
तसा ओबामाही पुतीनला आवडत नाही. ट्रंपला तर तो स्वतः सोडून बाकी कुण्णी कुण्णी आवडत नाही. सगळे दुष्ट, नॅस्टी लोक भरलेत जगात.

Pages