Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्युलियन असान्ज बुधवारी की
ज्युलियन असान्ज बुधवारी की बुधवार पर्यंत हिलरी ला कायतरी मोठा धक्का देणार अशी बातमी पाहण्यात आली.
फा, २०१६ मधला विष्लेशकांचा
फा,
२०१६ मधला विष्लेशकांचा आणी पंडितांचा अंदाज चुकीचा ठरण्याचा पॅटर्न म्हणतोय मी.
Make America Great Again !
विकु बरोबर आहे. पण दोन्ही
विकु बरोबर आहे. पण दोन्ही ठिकाणी हरणार्या बाजुचे समर्थक ती बाजू जिंकणार असा विचार करत होते किंवा काही विरोधक त्यांंच्या मतानी काही फरक पडणार नाही अशा भ्रमात होते. अजून तरी हिलरीचे समर्थक ती जिंकणारच आहे या भ्रमात नाहीत असे दिसते आहे. उलट डिबेटच्या आधीच्या आठवड्यात तर सगळे हरतीये का असे गॅसवर होते
डोनाल्ड ट्रंप - "ग्रॅब देम
डोनाल्ड ट्रंप - "ग्रॅब देम बाय द पु*!"
ट्रम्पची भाषा खुपच खालावलेली
ट्रम्पची भाषा खुपच खालावलेली आहे, आजची प्रसिद्ध झालेली रेकॉर्ड तर हद्द झाली, भाषेमधे (विचारान्मधे) किती निचतम मर्यादा असायला हवी? वर या पेक्षा वाईट बिल क्लिन्टन बोलत असे (शुन्य पुरावा) अशी मखलाशी. तो जरी बोलत असला तरी त्यामुळे याच्या भाषेचे समर्थन होत नाही.
नजिकच्या काळात खुप मोठी उलथापालथ झाली नाही तर अनेक वर्षे कुठलाही टॅक्स न भरणे, आजची प्रकाशित झालेली रेकॉर्ड ट्रम्पला महागात पडेल असे वाटते.
अमेरिकन मतदारानबद्दल मोठी सहानुभुती आहे... फार मोठ्या मतदार वर्गाला दोन्ही उमेदवार खुप आवडत नसले तरी तो निवडुन यायला नको म्हणुन हिलरी चालेल अशी दयनिय परिस्थिती आहे.
>>. फार मोठ्या मतदार वर्गाला
>>. फार मोठ्या मतदार वर्गाला दोन्ही उमेदवार खुप आवडत नसले तरी तो निवडुन यायला नको म्हणुन हिलरी चालेल अशी दयनिय परिस्थिती आहे.>> सहमत.
बाप रे! काल रिलीज झालेला
बाप रे! काल रिलीज झालेला व्हिडिओ !!

मला वाटलं मेलनीला जाग आली पण
मला वाटलं मेलनीला जाग आली पण काळझोप आल्यावर एक एक रात्र वैरीण झाली आहे.
तिचा खुलासा नीट (*like how you should read a contract paper डॉळ्यात तेल घाल:न वाला वाला))वाचला. धन्य तो टृम्प आणी धन्य त्याचे टृम्प कार्ड. अॅमेन ऊप्सी ओमाय्गॉड
आजचे डीबेट मुलांना पाहू
आजचे डीबेट मुलांना पाहू द्यावे काय?
(No subject)
अमितचा तो बाफ कुठे गेला
अमितचा तो बाफ कुठे गेला पापाचा घडावाला ? घडा भरला माझ्या मते
<<आजचे डीबेट मुलांना पाहू
<<आजचे डीबेट मुलांना पाहू द्यावे काय? स्मित>>
----- सहमत. बिल क्लिन्टन च्या दिशेला ट्रम्प वळणार... धुळवड होणार.
परवाच्या "पॉलिसी बद्दल डिस्कशन होत नाही" अशी तक्रार ट्रम्प महाशय करत होते... काय बोलेल याचा अन्दाज बान्धणे अशक्य आहे.
आणलाय वर तो बाफ, मै
आणलाय वर तो बाफ, मै
पण आज असान्ज टींमने कागदपत्र
पण आज असान्ज टींमने कागदपत्र वगैरे प्रकाशात आणली ती तिचे सपोर्टर्स आणि विरोधक वाचण्याएवढा वेळ आहे का कुणाकडे?.
आज मुलांनाच काय घरातल्या इंग्रजी न कळणार्या ज्ये.ना. ड्बेट ऐकायला बसवलं तरी एकही प्यादं पूढे सरकरणार का गाडं?

सी एन एन वर हॉवर्ड स्टर्न शी
सी एन एन वर हॉवर्ड स्टर्न शी बोलताना पास केलेले कामेन्ट्स पण पब्लिश झालेत!!!
रिपब्लिकन सपोर्टर्स चा काय प्रॉब्लेम आहे नक्की? १७ जणांतून हाच त्यांनां त्यांच्याकरता योग्य नेता वाटला, जो अमेरिकेला ग्रेट बनवण्याच्या गप्पा करतो?? रिपब्लिकन सपोर्टर्स ची/ट्रम्प सपोर्टर्स ची नेतेपदाची व्याख्या काय आहे नक्की??
बेसलेस अॅरोगन्स ड्रिव्हन प्रिटेन्शियस पॅशन????
>>> रिपब्लिकन सपोर्टर्स
>>> रिपब्लिकन सपोर्टर्स ची/ट्रम्प सपोर्टर्स ची नेतेपदाची व्याख्या काय आहे नक्की??
अँडी बोरोविट्झचे सटायर नेहमीप्रमाणे चोख आहे: (दुवा)
As the crisis at the top of their ticket deepened on Sunday, there were increasing calls from Republican officials to replace a man who hates women with a man who hates both women and gays.
...
Moreover, he said, the man’s record as governor of Indiana demonstrated that he hated women “in a more appropriate way” than the current Republican standard bearer. “The only female body part he ever focussed on was the uterus,” the official said.
बारा वर्षांपुर्विचं असलं तरी
बारा वर्षांपुर्विचं असलं तरी ट्रंपचं ते संभाषण निषेधार्ह आहे.
नाउ, एव्हरी प्रेसिडेंशियल कॅंडिडेट हॅज ए स्किलेटन इन दि क्लाॅजेट; अमेरिकन पिपल विल जज हिम बेस्ड आॅन हौ हि हॅंडल्स डिफिकल्ट सिचुएशन्स - दॅट्स लिडरशिप क्वालिटी. टुनाइट्स डिबेट इज क्रिटिकल फाॅर बोथ ट्रंप ॲंड हिलरी. लेट्स सी हु प्रिवेल्स...
https://presidentialopenquest
https://presidentialopenquestions.com/questions/14210/vote/
Please vote.
बारा वर्षांपुर्विचं असलं तरी
बारा वर्षांपुर्विचं असलं तरी ट्रंपचं ते संभाषण निषेधार्ह आहे. >> राज तुमचे फाल्कन्स १५-१ जावोत
बेस्ट ट्वीट

the 33,000 emails probably were from groupon or
I'm a Muslim, and I would like to report a crazy man threatening a woman on a stage in Missouri. #debate
>> राज तुमचे फाल्कन्स १५-१
>> राज तुमचे फाल्कन्स १५-१ जावोत<<
यु बेट! फाल्कन्स हॅव दि बेस्ट आॅफेंस इन द लीग...
प्रायमरी मध्ये कॅनडाची हेल्थ
प्रायमरी मध्ये कॅनडाची हेल्थ केअर सिस्टीम वर्क होत होती. काल युटर्न घेऊन ती वर्क करणं बंद झालं म्हणे.
बरं, काही हजार कॅनेडीअन नागरिक नॉन इमर्जन्सी प्रोसिजर्स करायला बाहेर जातात हे खरं आहे. पण ते अमेरिकेत का इतर कुठल्यादेशांत याचा डेटा उपलब्ध नाही. ट्रंपने अमेरिकेत महागड्या दरात शस्त्रक्रिया करायला येतात हे चक्क ठोकून दिलेलं विधान आहे.
काही प्रोसिजर्स साठी लॉंग वेट हा प्रॉब्लेम नक्कीच आहे, पण देशात राहणाऱ्या सर्वांना समान हेल्थ केअर, कुठलीही अट न घालता नक्की मिळणारी हेल्थ केअर हे सत्य आहे. ओबमाकेअर यायच्या वेळी टोरोंटोच्या एका डॉक्टरला सिनेट कमिटी समोर प्रश्न विचारताना एका रिप. ने प्रश्न विचारला होता की गेल्या वर्षी वेटिंग लिस्ट वरचे किती पेशंट मृत्यू पावले? त्यावेळी त्या डॉक्टरनी मार्मिक उत्तर दिलेले. ती म्हणालेली, की त्याची मला नक्की माहिती नाही, पण दरवर्षी ४५००० अमेरिकन नागरिक इन्शुरन्स नसल्याने मरण पावतात हे मला माहित आहे.
ट्रंप ओबामाकेअर रिप करणार, त्यावर काय होऊ शकतं ते हिलरीने छान सांगितलं. येरे माझ्या मागल्या !! बरं सिन्गल पेअर सिस्टीम ही sandersची कल्पना होती मला वाटतं. क्लिंटन सिंगल पेअर करणार असं वाचलेलं आठवत नाही.
<<काही प्रोसिजर्स साठी लॉंग
<<काही प्रोसिजर्स साठी लॉंग वेट हा प्रॉब्लेम नक्कीच आहे, पण देशात राहणाऱ्या सर्वांना समान हेल्थ केअर, कुठलीही अट न घालता नक्की मिळणारी हेल्थ केअर हे सत्य आहे.>>
-------- पुर्णत: सहमत...
१५ ऑक्टोबरला ट्रम्प
१५ ऑक्टोबरला ट्रम्प Republican Hindu Coalition ने आयोजित सभेत आपले मौलिक विचार मान्डणार आहे. मलाइका अरोरा, प्रभुदेवा, श्रिया शरण असे बॉलिबुडचे दिग्गज कलाकार आपली कला सादर करतील असे रेडिफ वर वाचले.
http://www.rediff.com/news/report/all-set-for-trump-to-address-desis-in-...
NJ आणि आसपासच्या परिसरात रहाणारे आणि ट्रम्प विचाराने भारावलेले मायबोलीकर त्वरा करा आणि आजच तिकीट राखुन ठेवा. कोण-कोण जाणार आहेत ?
मोजकी तिकीटे शिल्लक आहेत.
मधे एक कार्टून प्रसिद्ध झाले
मधे एक कार्टून प्रसिद्ध झाले होते, त्यात कार्टुनिस्ट नवर्याला त्याची बायको येउन सांगते - "that trump joke you had written just happened". आज टोटली तसेच झाले. त्याच्यावर गेले २-३ दिवस जे आरोप होत आहेत त्याबद्दल तो असे काहीतरी उद्गार काढेल असे मी इथे गमतीने लिहीणार होतो. त्याआधी बातम्या पाहायला पॉलिटिको उघडले, तर साहेब खरेच तसे म्हंटले सुद्धा
“Believe me, she would not be my first choice—that I can tell you,”
http://www.politico.com/story/2016/10/donald-trump-vitriol-229819
थोडक्यात, "ती महिला सुंदर
थोडक्यात, "ती महिला सुंदर असती तर मी तिला सेक्सुअली हॅरॅस केले असते !"
धन्य !
कॉन्ट्रापॉझिटिव्ह "जर मी तिला
कॉन्ट्रापॉझिटिव्ह "जर मी तिला हॅरास केलं असेल, तर ती सुंदर असली पाहिजे" असा येतो हो विकु, तुम्ही कॉन्व्हर्स खपवायचा प्रयत्न करू नका.
आता बायकांना त्रास देणे यात
आता बायकांना त्रास देणे यात सुद्धा ट्रंप म्हणतो माझीच लाल! मी फक्त सुंदर बायकांना त्रास देतो!! आणि देतोच!
कारण मी एकदम strong, virile and red blooded American आहे. त्याहि बाबतीत माझ्याहून जास्त कुणीच नाही!!! तर मलाच मत द्या.
पुढील सर्व निवडणुकीत,निवडून येण्यासाठी गलिच्छ वर्तणूक, खोटे बोलणे, संशयास्पद वर्तणूक, पुरावे लपवणे, दुसर्याला शिव्या देणे इ, सर्वात महत्वाचे असेल. बाकी इतर गोष्टीत लक्ष द्यायला कुणालाच फुरसत नाही नि पैसा नाही. फक्त आयसिस च्या नावाखाली कुठेतरी जाऊन कुठेतरी जाऊन युद्ध करायचे - फक्त पाकीस्तान नि सौदी अरेबिया सोडून!
धन्य अमेरिका!
असेच चालू राहिले तर बहामनी राज्याचे जसे पाच तुकडे झाले तसे अमेरिकेत सुद्धा गोरे ख्रिश्चन, लॅटिनो,ज्यू, चिनि व भारतीय नि मुस्लिम अश्या लोकांची पाच राज्ये होतील. ५० वर्षांनी कुणि जिवंत असतील तर पहाच. नाहीतर आपल्या मुलाबाळांना सांगून ठेवा, हे भविष्यमेका मायबोलीकराने वर्तवले होते.
ट्रम्पला काल $ १.१ दशलक्षचे
ट्रम्पला काल $ १.१ दशलक्षचे डोनेशन Republican Hindu Coalition ने दिले. छान स्टेज शो सादर केला होता असे वाचले.
स्टेज शो मधे नाच गाण्याचा सान्स्कृतिक कार्यक्रम सुरु असतो. अचानक दोन (नखशिकान्त झाकलेले) अतिरेकी कलाकारान्वर हल्ला करतात, मग त्या कलाकारान्ना ओलिस ठेवले जाते. अमेरिकन सिल्स पराक्रम गाजवुन अतिरेक्यान्ना न्युट्रल करतात, शेवट ओलिसान्ची सुटका करुन गोड केला जातो. मग ट्रम्प महाशय दोन मोलाचे विचार मान्डतात. मोदी यान्च्यावर स्तुतीसुमने...
मायबोलीकरान्पैकी किती लोक हजर होते या कार्यक्रमाला ?
http://www.cnn.com/2016/10/16
http://www.cnn.com/2016/10/16/opinions/trump-would-run-america-like-trum...
.............................
................................
Pages