Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टॉकिंग पॉइंटबद्दलच म्हटलं
टॉकिंग पॉइंटबद्दलच म्हटलं हो.
त्याने तोच क्लेम (हिलरीनेच हे पिल्लू सोडलेलं असण्याचा) कालही करायचा प्रयत्न केलाच की!
ट्रंपकडे जरा साहानुभूतीने पहा
ट्रंपकडे जरा साहानुभूतीने पहा हो. त्याला बिचार्याला मनापासून वाटते की बर्याच गोष्टी सुधाराव्यात. त्याकडे लोकांचे लक्ष जावे ही त्याची खरी तळमळ आहे. तो सांगतो ते केवळ suggestion,or sarcastic or as a joke. कारण तो अजून प्रेसिडेंट झाला नाहीये. हे त्याने मागेच सांगितले आहे.
ट्रंप काय बोलतो नि त्याला नक्की काय म्हणायचे आहे, त्या बोलण्याचा त्याच्या मनात काय संदर्भ आहे, (काही असला तर), हे आपल्याला काय माहित?
आता एखाद्या तीन वर्षाच्या मुलाला तो जगात काय करेल असे विचारले तर तो जे काय बोलेल ते सुसंगत असेल का? त्यातून तो मुलगा स्वतःला सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्न मॅन इ. सर्व हिरोंपेक्षा जास्त समजत असेल तर तो जे बोलतो ते आपण ऐकून घ्यायचे. आपल्याला जरी तो म्हणतो ते शक्य वाटत नसले, चुकीचे असले तरी तो आपला ठामपणे बोलतच रहातो. त्याचे प्रेमळ आई वडील मग आपल्याला समजावून सांगतात की त्याला काय म्हणायचे आहे. नि तो कसा हुषार आहे नि त्याचेच कसे बरोबर आहे ते.
अर्थात तरी त्यात काही अर्थ नसतोच. आपण गंमत म्हणून बघायचे.
नि तरी तो निवडून आला तरी लोकशाही - बहुमताला सर्वांनी मान द्यायचा. आपल्या अपेक्षा काही का असेनात. आपण इथे बोलण्यापलीकडे काय करतो?
ट्रंपसाहेब डिबेटमधे कमी पडले.
ट्रंपसाहेब डिबेटमधे कमी पडले. हिलरीची तयारी जास्त चांगली होती. एकतर आपण फार आक्रमक दादा (बुली) नाही असे लोकांच्या मनावर ठसवावे म्हणून कदाचित बचावात्मक पवित्रा घेतला असेल किंवा तयारी कमी पडल्यामुळे असेल पण ट्रंप फिका वाटला. कितीतरी मुद्दे त्याने वापरलेच नाहीत. कदाचित पुढच्या डिबेटकरता असेल.
पण चर्चेचे संचालन करणारा होल्ट हा चांगलाच पक्षपाती होता. त्याने ट्रंपकरता टाळ्या वाजवणार्या प्रेक्षकांची कान उघडणी केली पण हिलरीकरता टाळ्या वाजवणार्यांकडे दुर्लक्ष केले. ट्रंपला बोलण्यात अडथळा आणणे पाच वेळा. हिलरी शून्य. ट्रंपला इराक युद्धाबाबत विचारले पण हिलरीला इमेल आणि त्यातील गुप्ततेबद्दल काहीही नाही. निदान काही लोकांना तरी हे खटकले असेल अशी आशा!
अशा प्रकारे सर्व बाजूने कोंडी करून ट्रंपची गोची करण्याचा माध्यमांचा कावा पाहून काही कुंपणावरील मतदार त्याला सहानुभूती म्हणून त्याच्या बाजूने जाणे शक्य आहे.
एका तुलनेने तटस्थ रेडियो प्रोग्रॅमवर चर्चा झाल्या झाल्या एक दोन श्रोत्यांनी ही भावना बोलून दाखवल्याचे मी ऐकले.
एकेका भाषणाचे ६ लाख डॉलर घेणार्या बाईने ट्रंपकडे भरपूर पैसे आहेत म्हणून कानपिचक्या द्याव्यात ह्यासारखा विरोधाभास नाही !
ट्रंप लोकांच्या हशा-टाळ्या
ट्रंप लोकांच्या हशा-टाळ्या ह्यावर फीड होतो. तो बरेचदा लोकांनी त्याच्या क्यूज ना पिकप करावे म्हणून वाक्ये- विचार अर्धवट ठेवतो. डिबेटमधे फीडबॅक देण्यावर तत्वतः बंदी असल्यामूळे ट्रंपचे नेहमीचे तंत्र बिघडले नि तो सैरभैर झाला असे vox च्या लेखात दिलय. ते अचूक विश्लेषण वाटते.
त्याच लेखाखाली हि लिंक सापडली जी अजून interesting आहे.
http://www.vox.com/2016/8/18/12423688/donald-trump-speech-style-explaine...
मूळ लेखाची पण लिंक दे ना
मूळ लेखाची पण लिंक दे ना असामी.
हि घे ...
हि घे ...
http://www.vox.com/policy-and-politics/2016/9/27/13068582/donald-trump-d...
धन्यवाद रे
धन्यवाद रे
हिलरी क्लिंटनने ट्रंपला
हिलरी क्लिंटनने ट्रंपला जाळ्यात कसे अडकवले? - http://www.vox.com/policy-and-politics/2016/9/27/13079878/alicia-machado...
त्य अलिश्या मचाडो ची
त्य अलिश्या मचाडो ची क्रेडिबिलीटी धोक्यात आहे ना? ती ब्युटी पॅजन्ट च्या आधीच बुलेमिक अॅण्ड्/ऑर अॅनोरेक्जिक होती.
त्यामुळे तो मुद्दा काही फार काळ तग धरू शकेल असं वाटत नाही.
स असे तर कुठे वाचले नाही
स असे तर कुठे वाचले नाही अजून.
काल मेगन केली च्या शो वर
काल मेगन केली च्या शो वर बघितलं. तीने न्युज पेपर मधला रेफरन्स दाखवला.
१९९७ च्या वॉशिंग्टन पोस्ट मध्ये छापून आलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये तीने तसं म्हंटलं होतं.
मेगन केली च्या शो वर बघितलं
मेगन केली च्या शो वर बघितलं >>
फॉक्स तर हरतर्हेचे प्रयत्न करणारच ना तिला खोटं ठरवायचा ! आता पण काही तरी नविन न्युज दिसतीये फॉक्स वर की तिने कुठल्या तरी जज ला धमकावलं म्हणून.
पण तरीही मेन पॉइंट होता की तो स्त्रीयांचा आदर करत नाही हे दाखवणे आणि ते सगळ्यांना नीट कळले आता. तो उद्देश नीट सफल झाला.
>> सगळ्यांना नीट कळले आता तो
>> सगळ्यांना नीट कळले आता
तो स्त्रीयांचा अनादर करतो हे तर वेल नोन च आहे की. स्वतः मेगन लाच हिणकस बोलला ना तो
>> ना तिला खोटं ठरवायचा
फॉक्स प्रयत्न करणार अर्थातच. पण मुद्द्यात किंवा उदाहरणात दम असेल तरच तो पुरून उरेल ना. एव्हढंच म्हणतेय मी.
वेल नोन आहे, पण तरीही
वेल नोन आहे, पण तरीही कुंपणावर असलेल्या मतदारांत ह्या मुद्यावर मत फिरवणारे असतील तर त्यांच्यासाठी उपयोगी आहे ना.
त्याचसाठी मुद्दमून डिबेट च्या
त्याचसाठी मुद्दमून डिबेट च्या आधी ही अॅड टाकली होती
https://www.youtube.com/watch?v=vHGPbl-werw
पण चर्चेचे संचालन करणारा
पण चर्चेचे संचालन करणारा होल्ट ......................निदान काही लोकांना तरी हे खटकले असेल अशी आशा!
हे खरे आहे.
पण एक प्रश्न, उद्या इराण, रशिया किंवा चीनशी बोलणी असतील तेंव्हा ते पक्षपातीपणा करणार नाहीत, अगदी (ट्रंपने ठरवलेल्या ) नियमाप्रमाणे वागतीलअसे वाटते का? मग त्यांच्या बाबतीत तो नुसताच तक्रार करून रडत बसेल का?
त्यांच्याशी गुप्ततेत बोलणी चालू असताना, ट्रंपच्या बोलण्याला टाळ्या वा़जवणारे लोक आणून ठेवायचे का?
त्याचे बोलणे अमेरिकन लोकांना कळत नाही, त्यातून ते वेडावाकडा अर्थ काढतात असा कांगावा केला जातो, मग इराण, रशिया, चीन असे इंग्रजी मातृभाषा नसलेले लोक त्याच्या असंबद्ध, संदर्भहीन बोलण्याचा अर्थ समजून घेतील का? ते लोक त्यांच्या बाजूने खरे काय वाटते ते बोलतील, ते खोटेहि असेल, (पुष्कळदा असतेच) तेंव्हा ट्रंप मध्येच लाईज, राँग असे म्हणेल,नि त्यासाठी टाळ्या वाजवायला, ओरडायला लोक बरोबर घेऊन जायचे का?
दर वेळी तो खरे काय म्हणतो आहे हे सांगायला शेंडेनक्षत्रासारख्या लोकांना बोलवायचे का?
मग तो कशाला बोलतो? इतर कुणि तरी बोलू दे.
तसे तो काय सांगतो हे त्याला एकट्यालाच माहित आहे असे नाही, बर्याच जणांना तसे वाटते. कारण त्यात ट्रंपने केलेली अतिशयोक्ति सोडली तर थोडे तथ्य आहे. पण हा उगाच वेडीवाकडी विधाने, मुद्दाम खळबळजनक विधाने करून लोकांचे लक्ष मूळ मुद्द्या ऐवजी भलतीकडेच वेधतो, नि मागून लहान मुलासारखा रडतो!
त्याला काय म्हणायचे आहे ते जरूर समजून घ्या,
पण ट्रंपला प्रेसिडेंट करायचे याला विरोध आहे.
दर वेळी तो खरे काय म्हणतो आहे
दर वेळी तो खरे काय म्हणतो आहे हे सांगायला शेंडेनक्षत्रासारख्या लोकांना बोलवायचे का?>>>>>>>>
सही बात! ह्याबद्दल आधी पण चर्चा झालीये. तुम्ही काय बोलता ह्याचा नेमका अर्थ लोकांना काय लागतो हे पहाणे पण तुमचीच जबाबदारी असते. ४-५ किंवा समजा अगदी २५% वेळा लोकांनी तुमच्या मतांबाबत गैरसमज करुन घेतला, ठीक आहे. लोकांचा काहीतरी अजेंडा असेल. पण त्या पेक्षा जास्त वेळा जर लोक गैरसमज करुन घेत असतील तर एकदा अपने गिरेबान मध्ये झाकून बघायला नको का? की दर वेळेस "लोकं मुद्दाम गैरार्रथ काढतात" अशी पुंगाणी वाजवतच राहायची?
मला नाही वाटत पुढच्या डिबेट मध्ये फार काही फरक पडेल. ट्रंपकडे काही ठोस मुद्देच नाहीयेत, त्यामुळे डिबेटमध्ये तो चमकणं शक्य वाटत नाही, अनलेस हिलरीनी काही खुप मोठ्या चूका केल्यातर पण तीही शक्यता दिसत नाही कारण ज्या पद्धतीनी तिनी हँडल केलं पहिलं डिबेट, मला नाही वाटत ती काही चुका करेल. स्विंग वोटर्सना हे सगळं ठळकपणे दिसेल आणि होपफूली हिलरीच्या बाजूनी येतील.
अंजली, त्या पोस्टी मध्ये मी ओबामा आणि ट्रंप अशी तुलना थोडीच करत होतो?
मी म्हणत होतो, की हिलरीचा हा परफॉर्मन्स बघून हे लक्षात आलं की हिलरी एक चांगली डिबेटर आहे. She can definitely hold her own! ह्याच हिलरीशी ओबामानी २००८ मध्ये डिबेट केलय. म्हणून म्हणत होतो, आदर दुणावला. नवख्या माणसाला ती नीट पाणी पाजू शकते हे दिसलं आपल्याला (अर्थात नवखा माणूस ट्रंप आहे आणि अत्यंत आळशी असून विंगिन इट स्पेशल आहे हे खरं असलं तरी) 
अजून एक लिहायचं राहिलं, ते म्हणजे, आता मला हायसं वाटतय की सँडर्स निवडून नाही आला ते! कारण मग मला वाटतं परिस्थिती अवघड झाली असती आणि ट्रंप निवडून यायची शक्यता नक्कीच वाढली असती. सँडर्सचा फिनोमेनन तसा नवीन असला तरीही ओबामा इतका जोरदार नव्हता (ओबामा इलेक्शनला उतरला तेव्हा ८ वर्ष रिपब्लिकन राज्य होतं हाही एक मोठा फॅक्टर होता). हिलरीचा वोटर बेस जास्त इस्टॅब्लिश्ड वाटतो आणि बेटर एक्विप्ड आहे डेमोक्रॅट राज्याला/ओबामाला कंटाळलेल्या लोकांना तिच्यात इंट्रेस्टेड ठेवायला. ह्या ट्रंपच्या इतक्या वेडेपणा नंतर सुद्धा त्याला इतका सपोर्ट मिळून तो इथ पर्यंत आला म्हणजे अमेरिकेत किती माठाड लोकं भरले आहेत ह्याचा अंदाज येतो. सँडर्सच्या वीकर फोर्स पुढे कदाचित हे सगळे याहू/गंग-हो लोकं ट्रंपच्या मुर्ख र्हेटॉरिकला डोक्यावर घेत, नाचत त्याला निवडून देऊ शकले असते!
अमेरिकेत किती माठाड लोकं भरले
अमेरिकेत किती माठाड लोकं भरले आहेत ह्याचा अंदाज येतो.
डब्ल्यू बुशला एकदा निवडून दिले, त्याने इराकचा घोळ घातला तरी त्याला पुनः निवडून दिले तेंव्हाच कळले.
अगदी रेगनच्या बाबतीतहि असेच म्हंटल्या जात होते - पण बुश नि ट्रंप पेक्षा तो चांगला - त्याने योग्य माणसे निवडली होती. बुश चे सल्लागार म्हणजे काय विचारता? त्याच्याहून वाईट!
चर्चेच्या वेळी माईक खराब होता असे रडणारा हा! ९० मिनिटात तो किंवा त्याचे सल्लागार यापैकी कुणाच्याहि लक्षात नाही? त्याच्या लोकांपैकी कुणि माईक टेस्टींग - हेलो हेलो, १-२-३, १-२-३, कॅन यु हिअर मी? वगैरे केले नाही?
असे लोक नि हा आता प्रेसिडेंट बनणार? रशिया, इरण यांच्यासमोर मार खाऊन मग म्हणणार, खोलीत एअर कंडिशनर नव्हता, किंवा माझी खुर्ची कंफर्टेबल नव्हती?
आता बघा पुढच्या डिबेट मधे - कुणि विचारले शिक्षणाबद्दल तुझी काय पॉलिसी आहे की फक्त क्रुकेड हिलरी, लायर हिलरी, मोनिका, पॉला जोन्स, मी अगदी सर्वात हुषार आहे, ओबामा हिलरी वर्स्ट! मी भिंत बांधीन, लोकांना हुषारीने फसवून कामाचे पैसे देणार नाही, टॅक्स भरणार नाही हे नेहेमीचे तुणतुणे वाजवे, मग वरील
"माठाड लोकं ", फॉक्स न्यूज म्हणतील वा वा ट्रंप जिंकला.
>>अमेरिकेत किती माठाड लोकं
>>अमेरिकेत किती माठाड लोकं भरले आहेत ह्याचा अंदाज येतो.
ओबामाला दोनदा निवडून देणारे लोक हे माठाडच होते का अचानक कुठून तरी बृहस्पती आला आणि त्यांना आठ वर्षे पुरेल इतकी विद्वत्ता वरदान म्हणून दिली?
आणि मग ह्या माठाड लोकांचे काय करावे म्हणता? मतदानाचा हक्क काढून घ्यावा का? मग सांगा ओबामाला तसा ठराव पास करायला!
शिक्षणाबद्दल ट्रंपने एक गोष्ट नक्की सांगितलेली आहे. कॉमन कोर नावाचे जो काही भयंकर, अनाकलनीय अभ्यासक्रम बनवला आहे तो रद्द करण्याबाबत तो पाऊले उचलेल. माझ्या मते ते पुरेसे ठोस आहे.
डिबेट आणि परकीय राष्ट्रांची चर्चा यांना एकाच पारड्यात तोलणार्यांच्या विद्वत्तेची कीव करावी तितकी कमी. हे फरक लक्षात घ्या
१. डिबेटमधील दोन्ही उमेदवार हे मतदारांसमोर पर्याय म्हणून उभे असतात. त्यांना लेव्हल फिल्ड मिळणे अत्यावश्यक असते. दोन राष्ट्रांमधे जेव्हा चर्चा होते तेव्हा दोन लोक आपापल्या राष्ट्राचे हित बघत असतात. निदान तशी अपेक्षा असते (आपल्या फाऊंडेशनला किती द्रव्य मिळते आहे हा मुद्दा गौण असला पाहिजे!). मुख्य म्हणजे मतदार अशा चर्चेत कुठेच नसतो. वेळेचे इतके कठोर बंधन असेलच असे नाही.
उगीचच ट्रंप नावडता म्हणून अमुक झाले की तो रडेल, तमुक झाले की तो भेकेल वगैरे निरर्थक भाकिते करु नका.
एका डिबेटमधे तो मागे पडला. ठीक आहे. पुढे चला.
डिबेटमधे सूत्रसंचालन करणारा पक्षपाती असणे हे हिलरीला नक्कीच फायद्याचे ठरले. एकंदरीतच तमाम माध्यमे ट्रंपच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे कदाचित ट्रंप ही निवडणूक हरणे शक्य आहे. बघू या.
अरे सूप वाजवायला सुरुवात झाली
अरे सूप वाजवायला सुरुवात झाली का.
चर्चेपूर्वी सूत्रसंचालक रीग्ड म्हणून expectation manage केलं, आता हरण्याचं management सुरु केलं का? छान छान.
एकंदरीत जनमत चाचण्यात तुल्यबळ
एकंदरीत जनमत चाचण्यात तुल्यबळ लढत आहे असे दिसते आहे. त्यामुळे कुठल्याही क्षुल्लक वाटणार्या कारणाने एक पारडे जड होऊ शकते. कुठल्याही सामान्य व्यक्तीला हे कळू शकते असे मला वाटते. त्यात हरण्याचे म्यानेजमेंट वगैरे कुठुन उपटले? पण सर्वसामान्यतः माध्यमे तटस्थ असतात. ह्या निवडणूकीत ती तशी नाहीत. गरीबांची कैवारी हिलरी निवडणूकीच्या प्रचाराकरता अफाट पैसा ओतते आहे. लाखो लोकांचे (मुख्यतः तिचे मतदार!) आयुष्यातील सगळे उत्पन्न जमा केले तरी मिळणार नाही इतका पैसा ती प्रचारात वापरत आहे. साक्षात राष्ट्रपती आपले उद्योग सोडून, बायकामुलांसमवेत ट्रंपविरोधी आघाडी उघडून प्रचार करत आहे!
अशा प्रतिकूल लढाईत, अनेक घरभेदी असताना ट्रंपच जिंकेल अशी खात्री मला तरी नाही. परंतू फासे इतके विपरित पडलेले असताना तुल्यबळ बनू शकणारा ट्रंप मला तरी कौतुकास्पद वाटतो.
ट्रंप ने त्याचे पेंटींग ट्रंप
ट्रंप ने त्याचे पेंटींग ट्रंप चॅरिटीच्या पैशामधून $१०००० ला विकत घेतले नि ते मग त्याच्या champions grill मधे नेउन लावले अशी बातमी आज वाचली. ह्याला त्याच्या कँपेनकडून उद्या कसा ट्विस्ट दिला जाईल हे वाचणे मनोरंजक असेल.
गरीबांची कैवारी हिलरी
गरीबांची कैवारी हिलरी निवडणूकीच्या प्रचाराकरता अफाट पैसा ओतते आहे. >> ट्रंप ओतत नाही असे म्हणणे आहे का ? आणि मग कँपेन करता जमा केलेले ते मिलियन / बिलियन $ कुठे गेले ? आता कालच फुशारक्या मारत होता ना एका दिवसात १८ मिलीयन जमा झाले म्हणून. शेन तुम्ही असं बोलता की फक्त एकच साईड पैसा ओतते आहे. तसे असेल तर मग हे मिलियन्स काय ट्रंप च्या खिशात गेले का ?
साक्षात राष्ट्रपती आपले उद्योग सोडून, बायकामुलांसमवेत ट्रंपविरोधी आघाडी उघडून प्रचार करत आहे! >> एक माणूस त्याचा कार्यकाल भर त्याच्यावर रेसिस्ट आरोप करत राहिला. वर आता माघार घेऊन माफीही मागितली नाही तर तो प्रचार करेलच. आणि कुठलेही उद्दोग सोडलेले नाहीत. उद्दोग करूनही प्रचारही करतो आहे तो. वर तुमच्या माणसाने तर इतर सगळ्यांवर टिका करून सगळ्यांना वाईट म्हणून आपल्या फाटक्या तोंडाने तोडून टाकले आहे मग कोण येणार त्याच्याबरोबर प्रचार करायला ? ब्रिज बंद करणारा आणि हरलेला मेयर ?
साक्षात राष्ट्रपती आपले
साक्षात राष्ट्रपती आपले उद्योग सोडून, बायकामुलांसमवेत ट्रंपविरोधी आघाडी उघडून प्रचार करत आहे! >>> नेहमीच करतात. हे सगळे रेग्युलेटेड आहे. त्या त्या वेळच्या अध्यक्षाने निवडणुकीकरता किती वेळ द्यायचा वगैरे सगळे ठरलेले असते. प्रत्येक अध्यक्षाला चौथ्या/आठव्या वर्षी हा उद्योग असतो.
मला ट्रम्प लायक उमेदवार वाटत नाही यापलिकडे तो नावडता असण्याचे किंवा त्याचा राग असण्याचे काही कारण नाही. रॅण्ड पॉल मला सेन्सिबल वाटायचा. इव्हन मार्को रुबिओ डीबेट्स मधे चांगला वाटला होता.
शेंडेनक्षत्र , whats your
शेंडेनक्षत्र , whats your opinion about trump supporter ann coulter? Just curious!
ब्रिज बंद करणारा आणि हरलेला
ब्रिज बंद करणारा आणि हरलेला मेयर ? >> गुलियानी ना शुद्ध म्हातारचळ लागलाय असे वाटते. तो ज्या ज्या गोष्टी स्वतः करून मोकळा झालाय त्या इतरांनी करू नये सांगतोय.
"रॉजर आईल्स सारख्या मनुष्याला आपला सल्लागार ठेवणे" ह्या निव्वळ एका कारणासाठी कुठल्या सद्सद्विवेकबुद्धी जागेवर असणार्या माणसाने ट्रंपला मत देता कामा नये.
इव्हन मार्को रुबिओ डीबेट्स
इव्हन मार्को रुबिओ डीबेट्स मधे चांगला वाटला होता >> तो खरं तर जेव्हा त्याने इमिग्रेशन बिल आणले होते तेव्हा आवडला होता. एक लॅटिनो रिप अॅक्रॉस द पार्टी बॉर्डर जाऊन काही तरी करायला बघतो आहे ते चांगले वाटले होते. पण मग प्रायमरी जिंकायच्या नादात तो कुठेतरी भरकटला. सेंटर लेफ्ट किंवा सेंटर राईट असे काही लोकांना आवडेनासे झालेले आहे असे वाटते. कुठे तरी एक्स्ट्रीमच पाहिजे का ?
>>> मला ट्रम्प लायक उमेदवार
>>> मला ट्रम्प लायक उमेदवार वाटत नाही यापलिकडे तो नावडता असण्याचे किंवा त्याचा राग असण्याचे काही कारण नाही
मला आहे ॲज अ वुमन.
सेंटर लेफ्ट किंवा सेंटर राईट
सेंटर लेफ्ट किंवा सेंटर राईट असे काही लोकांना आवडेनासे झालेले आहे असे वाटते. कुठे तरी एक्स्ट्रीमच पाहिजे का ? >>> दुर्दैवाने हो. त्यामुळे अस्सल राजकारण्याने कॅम्पेन मधे एक्स्ट्रीम भूमिका घेउन प्रत्यक्षात सेंटर कडे झुकणारे निर्णय घ्यावेत - अनेकदा ते कॉम्ग्रेस मधल्या दुसर्या पार्टीच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्याकरता तसे फिरवावेच लागतात.
साउथ कॅरोलिना ची प्रायमरी झाली तेव्हा तेथील मूळ भारतीय वंशाची गवर्नर आणि मूळ क्यूबन वंशाचा रूबियो हा अस्सल ख्रिश्चन स्टेट च्या स्टेज वर उभा राहून अमेरिकेतच हे होउ शकते सांगत होता तेव्हा ते चांगले वाटले होते. तो बहुधा २०२० ला येइल पुढे.
स्वाती - यस. मला खूप माहिती
स्वाती - यस. मला खूप माहिती नाही त्याच्या त्या अॅन्गलची. रॉजर आइल्स ला त्याने बाजूला ठेवला नाही हे सोडून. कदाचित हे सगळे रिपब्लिकन्स असेच आहेत हे गृहीत धरल्याने असेल.
Pages