अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिलरीने युद्धाला पाठिंबा दिला याबद्दल मलाही प्रचंड राग आहे. एक रिपब्लिकन सिनेटर व डझनभर डेमोकृअ‍ॅट नी विरोध केला होता त्यामुळे आम्हाला बुश ने फशिवलं ही सबाब चुकीची आहे. शिवाय आजही ती किसिंजर ला मानते.

पण तरीही टरंप शेवटी रिपब्लिकन प्रेसिडेंट असेल व गन कंट्रोल, अ‍ॅबोर्शन, क्लायमेट ई वर तो रिपब्लिकन धोरणेच राबवेल ना?

बाकी काही असो, ट्रंपने आज मेडियाचा पोपट केला. ट्रंप काहीतरी वदग्रस्त बोलेल या आशेवर वीसेक मिनिटे लाईव्ह प्रक्षेपण चालू होते.

मग काय हिलरी लॉबिस्टांपासून अलिप्त रहाणार का? >>>

Happy हा सर्क्युलर वाद झालाय आता. तुम्ही युद्धाबद्दलच्या धोरणामुळे हिलरी नको म्हणताय. मग मी लिहीले की त्याहून जास्त जबाबदार लोक सत्तेत येतील. तर तुम्ही म्हणताय की मग हिलरी अलिप्त असेल का? म्हणजे कोणताही पर्याय तितकाच धोकादायक आहे ना? तोच माझा पॉइण्ट आहे. ट्रम्प येण्याने त्यात काही वेगळेपणा येणार नाही. ट्रम्प येण्याने अमेरिकेच्या युद्धखोरीत काहीही फरक पडायची शक्यता नाही. याउलट अनावश्यक आक्रमकता दाखवण्याचे प्रकार होण्याचीच भीती जास्त आहे.

ट्रंप निदान म्हणतो तरी की मला लॉबिस्ट विकत घेऊ शकत नाहीत. हिलरीने इतक्या धडधडीत लॉबींकडून पैसे घेतले आहेत की तिला तसे म्हणणेही शक्य नाही. नेता लॉबिस्टांच्या नियंत्रणाखाली असणे असा मुद्दा असेल तर तिथे ट्रंपचेच पारडे जड आहे. >>>
ट्रम्प जर कोणी डिक्टेटर असता तर हे आर्ग्युमेण्ट ठीक आहे. पण कायदे बनवणारे, पळवाटा इण्ट्रोड्यूस करणारे सगळे सिनेटर्स, रिप्रेझेण्टेटिव्ह्ज त्याच लॉबी वाल्यांच्या खिशात असणार आहेत. एकटा ट्रम्प काय करणार आहे. त्याला खाचाखोचांमधे इंटरेस्ट असता, तर इतकी ढोबळ विधाने त्याने केलीच नसती.

तुम्हाला हिलरीला पर्याय हवा आहे हे ठीक आहे. पण ट्रम्प हा तो पर्याय नाही.

फा Happy

==
हा सर्क्युलर वाद झालाय आता. तुम्ही युद्धाबद्दलच्या धोरणामुळे हिलरी नको म्हणताय. मग मी लिहीले की त्याहून जास्त जबाबदार लोक सत्तेत येतील. तर तुम्ही म्हणताय की मग हिलरी अलिप्त असेल का? म्हणजे कोणताही पर्याय तितकाच धोकादायक आहे ना? तोच माझा पॉइण्ट आहे
==
हा काय प्रकार मला आजिबात कळलेला नाही. ट्रंप आणि हिलरी हे दोनच पर्याय आहेत. हे "जास्त जबाबदार लोक" पर्याय कुठून आला? आणि कोण हे लोक? असो.

सिनेटर आणि काँग्रेसमन लॉबिस्टांच्या खिशात आहेत म्हणून अध्यक्षानेही तसेच असावे असे आपण म्हणत आहात का? ते मला आजिबात मान्य नाही.
अगदी तमाम सिनेटर आणि काँग्रेसमन लॉबिस्टांच्या खिशात असले तरी जर अध्यक्ष खमका असेल तर त्यांना झक मारत तडजोडी कराव्याच लागतील. अध्यक्षाकडे बरीच सत्ता असते. एखाद्या काँग्रेसमनला आपल्या मतदारसंघात रस्ते बांधायला पैसे हवे असतील तर त्याकरता अध्यक्षांशी चांगले संबंध असावे लागतात. नुसता आडमुठेपणा करणे महाग पडू शकते.

जर राष्ट्राध्यक्ष हा प्रस्थापित राजकारण्यांतलाच असावा असे वाटत असेल जसे गव्हर्नर, सिनेटर, काँग्रेसमन इ. तर तसा कायदा करुन घ्यावा. सध्याच्या कायद्याप्रमाणे अध्यक्ष व्हायला तसे काही लागत नाही. आणि एकदा तरी तसा अध्यक्ष व्हावा अशी इच्छा आहे. प्रस्थापितांनी फार काही दिवे लावलेले नाहीत.

ट्रंप आल्याने युद्धखोरीत फरक पडत नाही हे आपले मत मला साफ अमान्य आहे. तसा काहीही पुरावा नाही. हिलरीबाबत युद्धखोरीचे भरपूर पुरावे आहेत. माझ्या लेखी एवढा मोठा फरक पुरेसा आश्वासक आहे. ज्यांना आधीच ट्रंपबद्दल पूर्वग्रह आहे ते त्याला आहेत नाहीत ते सर्व अवगुण चिकटवून काळाकुट्ट (आलंकारिक अर्थाने) रंगवत आहेतच. पण निव्वळ पूर्वग्रह पुरेसा नाही असे मला वाटते.

"जास्त जबाबदार लोक" >>> इराक युद्धाला हिलरीपेक्षाही जास्त जबाबदार लोक. रिपब्लिकन काँग्रेसमेन. ट्रम्प ला मत म्हणजे त्यांना मत. युद्धाच्या कारणावरून हिलरी नाकारली तर हे लोक सत्तेवर येणार आहेत.

सिनेटर आणि काँग्रेसमन लॉबिस्टांच्या खिशात आहेत म्हणून अध्यक्षानेही तसेच असावे असे आपण म्हणत आहात का? ते मला आजिबात मान्य नाही. >>> मी असे म्हणतोय की अध्यक्ष खिशात असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. तो स्वतः कायदे करून ते संमत करून लागू करू शकत नाही. पक्षाची पूर्ण सिस्टीम प्रस्थापित व्यवस्थेपेक्षा वेगळी असेल तरच तुम्हाला (व सर्वांनाच) हवा आहे तो फरक पडेल.

आणि एकदा तरी तसा अध्यक्ष व्हावा अशी इच्छा आहे. >>> तुम्हाला जो बदल हवाय तोच सर्वांना हवाय. एक कोणीतरी आपल्यातला, सामान्य माणूस निवडून यावा आणि या सर्व प्रस्थापितांना घरी बसवावे असे सर्वांनाच वाटते. पण ट्रम्प तो बदल आणणार आहे अशी आशा वाटेल असे त्याने काही केलेले तर सोडाच, बोललेले पण नाही.

==="जास्त जबाबदार लोक" >>> इराक युद्धाला हिलरीपेक्षाही जास्त जबाबदार लोक. रिपब्लिकन काँग्रेसमेन. ट्रम्प ला मत म्हणजे त्यांना मत. युद्धाच्या कारणावरून हिलरी नाकारली तर हे लोक सत्तेवर येणार आहेत.
==
हे काही पटण्यासारखे नाही. सामान्यतः काँग्रेस व सिनेटवर निवडून जाणारे लोक स्थानिक प्रश्नावर निवडून येतात. इराक युद्ध वगैरे मुद्दे फारसे चर्चेत नसतात. दहशतवाद थोडाफार येत असेल पण बाकीचे प्रश्न नोकर्‍या, पाणी, रस्ते हे जास्त कळीचे असतात असे मला तरी वाटते. कदाचित ख्रिश्चन भागात गर्भपाताला विरोध, गे लोकांच्या लग्नाला विरोध वगैरे मुद्देही असतील. पण इराक युद्धाला हिलरीपेक्षा जास्त जबाबदार म्हणजे काय? काँग्रेस आणि सिनेटच्या लोकांना प्रत्येकी एकच मत असते. त्यामुळे जास्त जबाबदारीचे समीकरण अनाकलनीय वाटते. त्याहून जास्त जबाबदार असलेच तर बुश आणि चेनी (आणि कॉलिन पॉवेल किंवा काँडी राईस) आहेत आणि ते कुठेही निवडणुकीच्या रिंगणात नाहीत तेव्हा जास्त जबाबदार लोक कसे निवडून येणार हे मला कळलेले नाही. माझ्यामते काँग्रेस आणि सिनेटच्या निवडणुकीचे समीकरण फारच वेगळे असते असे मला वाटते.

म्हणजे तुम्ही कुठल्या निवडणुका पाहिल्या नाहीत असे म्हणावे लागेल. सिनेट आणि हाऊस च्या निवडणुका या पूर्ण देशासमोर असलेल्या प्रश्नावर लढवल्या जातात. आता इथे पूर्ण रेड स्टेट मध्ये तर सध्याच्या अध्यक्षा विरोधात बोलूनही मी कसा त्याला विरोध केला, काम करू दिले नाही अशा फुशारक्या मारत जाहिराती करतात Lol

अमेरीकेत ट्रम्पच येणार.अमेरीकेत ट्रम्प, भारतात मोदी सामना चुरशीचा होणार.पण यात मोदी अजिंक्य रहाणार. 10 वर्षात नमोंच्या नेत्रुत्वात भारताची अशी प्रगती होईल की अमेरीकन लोक भारतात नोकरीला येतील.

जो राष्ट्रपती इस्लामी दहशतवाद वाईट आहे ........... काहीतरी करेल अशी आशा वाटते.

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला! यया बद्धा प्रधावंति, मुक्तास्तिष्ठंति पंगुवत!
कुठेहि आशा लावून बसायचे झाले.

असामी, अहो ट्रंपने म्हंटले की ओबामा आय्सिस चा फाउंडर आहे, ते उपरोधाने हो. जनतेला उपरोध कळत नाही.

इतकी वर्षे तो बोंब मारत होता ओबामा अमेरिकेत जन्माला आलाच नाही, आता तो ते मान्य करतो. कारण तेंव्हा तो हिलरी म्हणाली म्हणून उपरोधाने तसे म्हणत होता. मेक्सिकन इमिग्रंट हे रेपिस्ट नि गुन्हेगार आहेत, फक्त थोडे चांगले असतील असे तो म्हणत होता. ११ दशलक्ष बेकायदेशीर घुसखोरांना त्यांच्या अमेरिकन नागरिक असलेल्या कुटूंबियांपासून ओढून काढून परत पाठवीन म्हणाला. अतिरेक्यांच्या बायकापोरांना नि त्यांच्या मित्रांना सरसकट मारून टाकीन म्हणाला.
असे बरेच काही काही तो म्हणाला. वरकरणी जरी हे भयानक वाटले तरी ते फक्त प्रायमरीत निवडून येण्यासाठी बोलला, खरे नाही काही, गंमत, उपरोध. आपण ते आक्रस्ताळेपणाने खरे मानायचे नाही.

कदाचित दोन आठवड्यांनी तो सर्व बेकायदेशीर घुसखोरांना नागरिक करा असेहि म्हणेल, म्हणजे ते त्याला निवडून देतील नि तो जिंकेल म्हणून.

बाकी ट्रंप आज एक उद्या एक बोलतो, खोटी विधाने करतो, खोटे आकडे सांगतो ते फक्त धक्कादायक वाटावे, मिडियाचे, लोकांचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून.

तर ट्रंपबद्दल तुम्ही फक्त शेंडेनक्षत्र काय लिहितात ते वाचा, वाद घालू नका. आशा दृढ ठेवा.

सामी, अहो ट्रंपने म्हंटले की ओबामा आय्सिस चा फाउंडर आहे, ते उपरोधाने हो. जनतेला उपरोध कळत नाही. >> अहो मीही ते उपरोधानेच म्हटले होते.

एक सुभाषित आठवले: घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभध्वनीम, येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत.
अर्थात कपडे फाडा, भांडी फोडा, गाढवासारखे आवाज काढा, काहीही करुन आपली प्रसिद्धी करा.

कुठलाही मुद्दा न मांडता निव्वळ आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा करुन, व्यक्तिगत हल्ले करुन काय सिद्ध होणार देव जाणे!

राष्ट्रपती हा केंद्रीय पातळीवरून राज्यांना दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीकरता जबाबदार असतो. मोठे आंतरराज्य रस्ते बनवणे, दुरुस्ती, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात राज्ये ही केंद्राच्या मदतीकरता उत्सुक असतात. असे फंड मिळवायला त्या त्या राज्याचे वा भागाचे प्रतिनिधी राष्ट्रपतीशी चांगले संबंध ठेवतात.

निव्वळ राष्ट्रपतीचे नाक मी कसे ठेचले ह्या आणि अशा फुशारक्यांवर फार काळ मते मिळवता येत नाहीत कधीतरी लोक मूलभूत सुविधांवर बोलू लागतील, कदाचित दुसरा कुठला तरी उमेदवार हे मुद्दे पुढे करुन अहंकारी उमेदवाराला चीतपट करेल. निव्वळ भावनिक मुद्दे फार टिकत नाहीत. विशेषतः रिपब्लिकन पक्षाचे लोक रिपब्लिकन अध्यक्षाला इतके पाण्यात पहाणार नाहीत अशी माझी आशा.

श्वेतवर्णीय, ख्रिस्ती अमेरिकननांनी अल्पसंख्यांना कुठलाही त्रास दिला की थेट ट्रंपला दोष देऊन आकांडतांडव करणार्‍यांना एक प्रश्न:
गेल्या शनिवार रविवारी तीन अतिरेकी जिहादी हल्ले अमेरिकेत झाले. दोन बॉम्बस्फोट (न्यू यॉर्क आणि न्यू जर्सी) आणि एक डोकेफिरू चाकूधार्याने एका मॉलमधे अल्ला हो अकबरच्या आरोळ्या ठोकत अनेकांना भोसकले (मिनेसोटा) हा एक सोमाली मुस्लिम होता. तमाम माध्यमे हा तपशील काळजीपूर्वक लपवून ठेवत आहेत. ह्याला हिलरी आणि ओबामासारखे मुस्लिम लांगूलचालक जबाबदार ठरवायचे का? आणि का नाही?

अहो मीही ते उपरोधानेच म्हटले होते.

बरोबर आहे. मला वाटलेच होते तुम्हाला नक्की समजले असेल.

बाकी ही राष्ट्राध्यक्षीय निवडणूक म्हणजे अमेरिकन राजकारणाचा उपहास, उपरोधच आहे.

ती हिलरी काय नि ट्रंप काय, कुणाला कमी नकारात्मक मते मिळतात त्यावरून ही निवडणूक ठरवावी असे वाटते.

गेल्या शनिवार रविवारी तीन अतिरेकी जिहादी हल्ले ............... ठरवायचे का? आणि का नाही?

तर आता मुसलमानांना इथे येणे बंद करायचे, मग उरले काळे, सध्या त्यांच्यात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे, त्यांचे काय करायचे, बरोबर आहे, एकदा ११ दशलक्ष मेक्सिकन गेले की नंतर काळे पण अफ्रिकेत, अगदी बेन कार्सन पण, नंतर कोण? रशिया, पूर्व युरोपमधून आलेले. कारण त्यांनीहि अतिरेकी हल्ले केले, कारण काय आहे, की ते इथलेच नागरिक असलेले मुसलमान आहेत, त्यांना कुणि बाहेरून येणार्‍या मुसलमानाची गरज नाही. इंटरनेटवरून त्यांना भरपूर चिथावणी मिळते, पैसे नि साहित्य तर अमेरिकेतच मुबलक आहे.

घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभध्वनीम, येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत.

कुणि बरे मडकी फोडली, वस्त्रे फाडली, गाढवावर बसले? हिलरी तर नाही नि ट्रंप पण नाही.

हां आता ट्रंपचे ध्येय मिळवण्यासाठी तो कुठलेहि प्रयत्न कमी करत नाही. गोल जस्टिफाइज द मीन्स. हे त्याचे बोधवाक्य आहे. म्हणून स्वतः श्रीमंत होण्या साठी दिवाळे काढणे, खोट्या युनिवर्सिट्या काढणे इ. धंदे केले, पण पैसे कमावले.

आता त्याचे ध्येय राष्ट्राध्यक्ष होण्याचे आहे. त्यासाठी प्रचार, त्याला पैसे लागतात, पण वादकारक अतिरेकी विधाने केली की मिडिया आपोआप प्रसिद्धी देते. शिवाय प्रतिपक्षाला शिव्या देणे हा तर नेहेमीचाच प्रघात आहे, जास्तीत जास्त बुली पणा करणारे लोक अमेरिकेला आवडतात,
रिपब्लिकन पक्षाला काहीहि करून नवीन सुप्रिम कोर्टाचा जज त्यांच्या पसंतीचा पाहिजे, त्यासाठी राष्ट्रपती रिपब्लिकन पाहिजे, जो कुणि पक्षातला नॉमिनेशन मिळवेल, त्याला पाठिंबा देणे भाग आहे. पुढचे पुढे. ते तर अमेरिकन धोरणच आहे, आज इराकला पाठिंबा, उद्या इराकवर हल्ला. इराणला शस्त्रे द्यायला बंदी, पण काँट्रा ला मदत करण्यासाठी खुश्शाल बेकायदेशीरपणे शस्त्रे पुरवायची हे सगळे अमेरिकन लोकांचेच धंदे.

चालतेच आहे.

अमेरिकेत सुखाने रहायचे तर राजकारण, धर्म, कोर्ट या तीन गोष्टींपासून नेहेमी दूर रहावे. कारण सध्या तरी कुणि मायबोलीकराची त्यात वट असल्याचे ऐकीवात नाही. आपण फक्त जो समोर येईल त्याची टिंगल करून करमणूक करायची. उगाच त्यांच्या नादी लागून आपआपसात वादविवाद घालून कडवटपणा निर्माण करू नये.

तमाम माध्यमे हा तपशील काळजीपूर्वक लपवून ठेवत आहेत. >> मी तरी कालच एन पी आर मधल्या बातम्यांमध्ये हे ऐकले होते. त्यांनी तर उलट मोठा चर्चा असणारा कार्यक्रम केला. त्याच बरोबर सेंट पॉल मधल्या माणसांशी पण चर्चा केली. इव्हन तिथले सोमाली लीडर काय म्हणत आहेत ते पण सांगितले.

अशा बातम्या सांगताना एक तारतम्य ठेवायचे असते की ज्यामुळे एकदम लोक घाबरून जाऊन पळापळ - अनागोंदी माजणार नाही. यामुळे पोलीस आणि फर्स्ट रिस्पाँडर च्या कामावर ताण येत नाही. लगेच उठून हे झालेले वाटते आणि तुम्ही घाबरा आता असे सांगायचे नसते. हा बेसिक कॉमन सेन्स म्हणता येईल.

तारतम्य ठेवायचे असते की ज्यामुळे एकदम लोक घाबरून जाऊन पळापळ - अनागोंदी माजणार नाही. यामुळे पोलीस आणि फर्स्ट रिस्पाँडर च्या कामावर ताण येत नाही.

तारतम्य? ते काय असते? उलट खूप आरडा ओरडा करायचा, मी सांगतोच आहेअसे म्हणायचे, मग पोलीस नि इतर यांच्या कांआट अडथळे आले की दोष ओबामाला नि हिलरीला द्यायचा. मुस्लिमांचे लाङगुल चालन म्हणायचे. म्हणजे आपण आपोआपच शहाणे ठरतो, लोकप्रिय होतो. अशी संधी सोडून राष्ट्राध्यक्ष होण्याचे ध्येय कसे साध्य होणार? तर तारतम्य काय, इतरांनी पाळायचे, मला शिव्या द्यायच्या नाहीत. मी इतरांना दिल्या तर तो आक्रस्ताळे पणा होत नाही, गनवाल्या लॉबीनेच काही (?!) केले तरच हिलरी निवडून येणार नाही असे म्हणायचे.

मी तरी कालच एन पी आर मधल्या बातम्यांमध्ये हे ऐकले होते. >> +१. काल पासून प्रत्येक चॅनेलवर हे ऐकले होते नि त्याबद्दल डिटेल्स येत होते कि. अगदी NFL च्या वेळीसुद्धा मधे ऐकले.

==
अशा बातम्या सांगताना एक तारतम्य ठेवायचे असते की ज्यामुळे एकदम लोक घाबरून जाऊन पळापळ - अनागोंदी माजणार नाही. यामुळे पोलीस आणि फर्स्ट रिस्पाँडर च्या कामावर ताण येत नाही. लगेच उठून हे झालेले वाटते आणि तुम्ही घाबरा आता असे सांगायचे नसते. हा बेसिक कॉमन सेन्स म्हणता येईल.
==
जेव्हा एखादा श्वेतवर्णीय एखाद्या अल्पसंख्य व्यक्तीवर हल्ल करतो तेव्हा हे तारतम्य कुठे जाते? तिथे काही मिनिटात हल्लेखोराच्या जन्मकुंडलीपासून सगळे जाहीर केले जाते. इथे मात्र सगळे कसे हळूवार, सगळ्यांना जपत. का बरे असा दुटप्पीपणा? बरे जाहीर केल्यावर लगेच तमाम श्वेतवर्णीय (अर्थातच ट्रंप समर्थक) समस्त सोमाली बांधवांना ठार मारत आहेत असे काही दिसते आहे का? नाही. मग इतका उशीर का लावायचा?
जेव्हा जेव्हा मुस्लिम अतिरेकी काही करतात तेव्हा ती बातमी मुद्दाम उशीर करुन सांगतात. सॅन बर्नार्डिनोच्या वेळेस व्हाईट सुप्रिमसिस्ट लोकांचा हल्ला आहे असे सांगितले जात होते.

प्रस्थापित माध्यमे ही पूर्वग्र्हदूषित आहेत आणि त्यातून हे असे होते.

जेव्हा एखादा श्वेतवर्णीय एखाद्या अल्पसंख्य व्यक्तीवर हल्ल करतो तेव्हा हे तारतम्य कुठे जाते >> त्यावे ळेसही मी हेच पाहिलेले / ऐकलेले आहे. कोलोरॅडो स्प्रिंग मध्ये जो गोर्‍याने केला होता हल्ला त्यावेळेसही तारतम्याने बातमी दिलेली.

माझ्या मते इस्लाम धर्म, त्यातील कालबाह्य वचने, त्या धर्माच्या ग्रंथात आणि मार्गदर्शक तत्वात जे लिहिले आहे ते ईश्वराचा शेवटचा, अपरिवर्तनीय शब्द आहे असे मानण्याचा ताठरपणा ह्यातून तो धर्म हा अतिरेकाची खाण बनलेला आहे. त्यात कुणीतरी सुधारणा करणे आवश्यक आहे. बाकी सर्व धर्मांत तसे झालेले आहे. कुठला ख्रिस्तीबहुल देश आपले कायदे पूर्णपणे बायबलवर आधारित बनवताना दिसत नाही. अनेक मोठे मुस्लिम देश मात्र शरिया, कुराण हेच प्रमाण मानतात (सौदी, इराण, पाकिस्तान, नायजेरिया, सोमालिया इ.).

सध्याचे अमेरिकन राज्यकर्ते इस्लामी दहशतवाद झाला की अतिरेकी इस्लामीच कसे नाहीत वगैरे घासून गुळगुळीत झालेली निरर्थक वाक्ये म्हणतात. त्यामुळे इस्लाम धर्म हा खूपच ग्रेट आहे पण त्याचे अनुयायी चुकीचा अर्थ लावतात वगैरे लोकांच्या मनावर बिंबवले जातात. पण वस्तुस्थिती तशी नाही. इस्लामचे धर्मग्रंथ हे जुन्या अरबी भाषेत लिहिलेले असतात. त्यात अनेक विसंगती आहेत. बहुतेक मुस्लिम लोकांना ह्या जुन्या अरबी भाषेतील बारकावे माहित नसतात. पण हा धर्म शिकायचा तर तो मूळ अरबीतूनच ह्या अट्टाहासापायी ह्याचे अनुवाद करणे चूक समजले जाते. त्यामुळे कुणीही आपापल्या सोयीनुसार अर्थ लावून तसे वागतो. कुठलीही एककेंद्रित धर्मसत्ता नसल्यामुळे कुणीही उठून अधिकारवाणीने अर्थ लावू शकतो आणि त्याला भरपूर अनुयायी मिळतात. मुस्लिम ब्रदरहूड, अल काईदा, आयसिस हे सगळे अशाच प्रकारे बनले आहेत. पण पॉलिटिकली करेक्टच्या हव्यासापोटी हा मुद्दा कधीच ऐरणीवर येत नाही.

पुन्हा एकदा माझे तुणतुणे, ट्रंप असे कधीही म्हणाला नाही की मुसलमानांना हाकलून द्या. ज्यांचे तसे म्हणणे आहे त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. त्याचे म्हणणे हे मूळ बातमीत पहा.
http://www.cnn.com/2015/12/07/politics/donald-trump-muslim-ban-immigration/

गेल्या तीन दिवसातले अतिरेकी हल्ले हे मूळ परदेशी पण अमेरिकन स्थायिक झालेल्या मुसलमानांनी केले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

प्रस्थापित माध्यमे ही पूर्वग्र्हदूषित आहेत आणि त्यातून हे असे होते.
अगदी बरोबर. पण आजकाल अशी पूर्वग्रहदूषित माणसे अनेक आहेत म्हणून अशी माध्यमे प्रस्थापित होतात. पण आपण तर तारतम्य वापरावे ना? आपल्याला समजते ना की पूर्वग्रहदूषित कोण बोलते आहे.

आपल्याला माहितच आहे, राजकारणी पणा करायचा खोटे बोलणे सर्रास चालते, दोन्ही पक्षात प्रस्थापित माध्यमे ही पूर्वग्र्हदूषित आहेत. दोन्ही उमेदवारांत उणीवा आहेत. .

दोन्ही उमेदवार तितकेच लबाड. आपण तिकडे लक्ष देऊन उगीचच एखाद्याची बाजू घेऊन इथे भांडू नये. इथे लिहायचेच असेल तर निदान एमेसेन्बीसी नि फॉक्स हे दोन्ही चॅनेल्स बघा काही वर्षे, मग कळेल कुठल्या बातमीवर विश्वास ठेवायचा नि कुठल्या नाही.

बोर झालं. हिलरीला पॉलिसी स्टेटमेंट घुसवता नाही आलं काही.
ओबामाचा पण एपिसोड बघितला, मस्त ओबमाकेअर बद्दल बोललाय. Happy

उद्याच्या डिबेटबद्दल उत्सुकता आहे. काय होईल बघू या.
कोणाचे काही अंदाज आहेत का? हिलरी अमुक बोलेल ट्रम्प तमुक बोलेल वगैरे.
कोण कोणाला पाहुणे म्हणून आमंत्रित करत आहे यावरही मोठ्या बातम्या झळकत आहेत. बिल्लूची माजी प्रेयसी जेनिफर फ्लॉवर्स हिला ट्रंप पहिल्या रांगेत बसवण्याचा विचार करत होता. पण तो रद्द केला आहे. हिलरीने ट्रंपच्या विरोधकाला मार्क क्युबनला बोलावले आहे.

नुकतेच वॉशिंग्टन राज्यात एका मॉलमधे गोळीबार करून पाच लोकांना ठार मारले. लगेच आलेल्या बातमीत संशयित मारेकरी हिस्पॅनिक असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात तो तुर्की मुस्लिम होता. इथेही पुरेशी माहिती नसताना हिस्पॅनिक अशी ओळख का सांगितली गेली? हा बेजबाबदारपणा नाही का?

माध्यमांनी ह्या बातमीला बर्‍यापैकी दुर्लक्षित ठेवलेले आहे. कदाचित पाच लोकांना मारणे तेही आडगावात हे फार दखल घेण्याच्या लायकीचे वाटत नाही. हा मनुष्य झॉम्बीच कसा होता ह्यावर दोन चार ओळी आहेत इतकेच. जणू झॉम्बी झालेला मनुष्य असेल तर दुकानात गोळीबार करून मारणे फार आश्चर्यकारक वाटता कामा नये!

उद्याच्या अध्यक्षीय वादविवादात हा विषय येतो का पाहू.
न्यू जर्सी आणि न्यू यॉर्कचे अतिरेकी हल्लेही नॉर्थ कॅरोलिनाच्या काळ्या लोकांच्या आंदोलनामुळे प्रसिद्धीपासून विन्मुख ठेवण्यात प्रस्थापित माध्यमे यशस्वी झालेली दिसतात.

विकू "जवानी जानेमन" कोण म्हणणार आहे ? Lol

हिलरीने ट्रंपच्या विरोधकाला मार्क क्युबनला बोलावले आहे. >> क्युबनबद्दल ट्रंप बोललाय ते पटते.

Pages