रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नै त मी..माझ्या चिमटीतुन काय आकार घेईल काहीच सांगता येत नै >>> अग मग खाली लिहायच, "याला कमळ म्हणतात" किंवा "हे कमळ आहे अस समजा" Lol

सायुतै कमळ आणि चिवा सगळच मस्त.

मुग्धटली,
थोडक्यात व्यक्तीचित्र अन प्राणी पक्षी याबाबत माझ्या मनाचं, डोक्याच अन हाताच कधीच पटत नै..
तिघ्घही एकसाथ भांडत असतात..हा म्हणतो अस, तो म्हणते तस न या गोंधळात हात म्हणतो हे अस्सच..घ्घ्यान्न शेक्कुन Lol Proud

अग मग म्हणुन तर म्हणाले ना.. हाताला जे वाटेल ते काढु द्यायच आणि डोक्यातल नैतर मनातल आहे तेच्च हे अस म्हणुन खाली लिहायच..

शशांकजी, जागु, टीना, मुग्धा खुप खुप आभार..
टीना, काहीह! मला नाही वाटत तुला काही अवघड आहे, जरा मागे जाऊन तु पोस्टलेल्या रांगोळ्या
बघ पुन्हा एकदा...
बरेच दिवसात तुझी वार्ली ची रा. नाही आली..

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpl1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/12473717_956367917782828_8496255109538945665_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

ग्रेट! तुम्ही रोजच रांगोळ्या काढता का?
आत्मबंधच्या फुलांच्या रांगोळ्याही अप्रतिम.
आत्मबंध म्हणजेच अतृप्त आत्मा ना?

शशांकजी, सस्मित आभार...:)
आत्मबंध म्हणजेच अतृप्त आत्मा ना? + हो.

रांगोळी अन सेज कलाकाराने आपले आयडी बदलवले एकसाथ..हाहाहा..
मस्त..डिटेलिंग..अगदी मी सुद्धा तेच म्हणणार होते शशांक..
शशांक बरेच दिवस झाले तुमच्या इस्लेट वरचे चित्र पाहुन..आज काल कमी केलं का ?

आज खूप दिवसांनी आले .. सर्वांच्या रांगोळ्या सुरेख !!!सायु अप्रतिमच!!!!आत्मबंध सुरेख !!!

सायली, त्या एक स्क्वे. फू. काळ्या तुकड्याचे रोज सोने करतेस बघ. फार मस्त प्रतिभा आहे तु झ्याकडे. आम्हा पामरांसाठी थोडे व्हिडिओज पण टाक की.

चंबु, तुमच्या भाचीला नमस्कार, शिवाजी माहाराज -----/\-------- काय सुरेख काढलीय..
दुसरी देखिल अप्रतिम.. प्लीज तुमच्या रांगोळ्या शेयर करत जा..

टीना, धनश्री, मेधावी असेच प्रतिसाद येऊ द्या.. Happy

चंबु मस्तच रांगोळ्या..भाच्याची तर छानच..
हे लाल कमळ आवडलेत मला सायु..मला गुलाबी रंग नै आवडत इतका इतर रंगांच्या तुलनेत..हा रंग खुपच उठून दिसतोय कमळाला Happy

चंबू (नीलेश) - रांगोळी सरावाची वाटत नसून चांगले सराईत दिसताहात - रांगोळीकलेत... Happy Wink खूपच सुंदर .. Happy

महाराजांची रांगोळी अप्रतिम ...

सायली - आजचे कमळ अग्दी सुंदर .... Happy

रोमात होते इतके दिवस पण रांगोळ्या न चुकता पहात होते दररोज. सगळ्याच रांगोळ्या अतिशय सुंदर. सायली आजची कमळांची ही खासच दिसतेय. खरं तर फक्त दोन कमळं पण काय दिसतायत . खरच जादु आहे ग तुझ्या बोटात. कमळं जनरली गुलाबी रंगवतात पण तुझा लाल गुलाबी रंग फरच शोभुन दिसतोय.

टीना आजची रंगसंगती मला पण खुप आवडली...
चंबू (नीलेश) - रांगोळी सरावाची वाटत नसून चांगले सराईत दिसताहात - रांगोळीकलेत... स्मित डोळा मारा खूपच सुंदर .. स्मित+१००
शशांक जी आभार, वाटच पाहात होते प्रतिसादाची..:)
हेमा ताई,ईतक्या दिवसांनी प्रतिसाद पाहुन खुप आनंद झाला..:) धन्स..

मस्त आहेत सगळ्याच रांगोळ्या , मी इतके दिवसात डोकावलेच नव्हते इथे .
मीही रोज काढते रांगोळी पण ह्या पाहून माझ्या रांगोळ्याना स्क्रिब्लिंग म्हणाव लागेल. Lol

>>चंबू (नीलेश) - रांगोळी सरावाची वाटत नसून चांगले सराईत दिसताहात << Lol
तसे नाही.. इथे ऑस्ट्रेलियात रांगोळीसाठी खुप मारामार आहे. जी मिळते ती खुप खुप महाग..
मागच्या महिन्यात नाशिकला आलो होतो, तेव्हा वेळ काढुन ३ दिवसांचे सराव शिबिर जॉइन केले. ४-५ छोट्या-मोठया रांगोळ्यांचा सराव केला (वेगवेगळे पॅटर्न्स चा विचार करत होतो, रांगोळीचा असा चित्र विचित्र आकार त्यामुळेच).आणि या रांगोळीत बायकोचा (च) हात जास्त! Wink
आणि काय सांगु.. रांगोळी पुर्ण झाल्यावर पुढच्या १५व्या मिनिटाला झाडुन स्वच्छ केली.. Sad

Pages