रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज काही कारणामुळे रांगोळी काढु शकले नाही..
या मागच्याच पानावरच्या पुन्हा ईथे आणते आहे थीम म्हणुन..

ही भाग १ वरुन...

मृणाल, शशांकजी आभार.. शशा़क जी तुमच्या प्रतिसादाची वाटच बघत होते..:)

मृणाल, सोप्या सोप्या रांगोळ्या आहेत ग..उगीच ओषाळल्या सारख होत मला.. Happy

मृणाल नाही ग बाई, या जगात खुप दिग्गज मंडळी आहेत, त्यांच्या पुढे माझी कला काहीच नाही..
पण उद्या मी एक खुप सोप्पी चीऊ ताई कशी काढायची ते सांगणार आहे...:)

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/t31.0-8/12491892_951475944938692_6434378069543800782_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

आत्मबंध, जरा रुड वाटेल, मला खरंच माफ करा पण तुमच्या रांगोळीचा आकार पुढच्या वेळेस बदलाल कां प्लिज, तुम्ही लग्नात किंवा कार्यात एवढ्या सुंदर रांगोळ्या काढता पण आकार जरा वियर्ड आहे.

सायु, टीना, आत्मबंध तुमच्या रांगोळ्या खुपच सुंदर आहेत. किती कला आणि पेशंस आहे तुमच्यात आणि हात खुपच स्टेबल आहेत.

सायु... सर्व गुलाब व चिवचिव... सुंदर!

पक्षी माते ने मस्कारा लावलाय..:) गोड दिसतीये:)

सायु, वा ! पाखरांचा मेळाच भरलाय अंगणात…या रंगेबेरंगी रांगोल्यांमुळे तुझ्या दारी बारोमास दिवाळी ...
आत्मबंध यांची फुलरांगोळी कुंडलिनीच्या सात चक्रांची वाटत आहे खुप कल्पक सुंदर!

ही आजची..:)

श्रावणीच्या रांगोळ्या खुपच गोड...:)
अ. आ. खुप सुरेख रांगोळी.
भुई कमळ, तुझ्या कविते सारखेच तुझे प्रतिसाद सुंदर असतात. धन्स ग!

Pages