रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रावणीच्या रांगोळ्या खूपच गोड.. >>>> +१११११११ Happy

सायली - सध्या काय सारे पक्षीदेखील गुलाबी थंडी एन्जॉय करताहेत का ???? Happy Wink - मस्त रांगोळ्या...

पहिल्यात तर मम्मा ला एकदम फ्लाईंग किस देतेय ते छोटू डोळा मारा स्मित+++

टीना, बाळा ती त्याचीए मम्मा नाहीये ग, प्रेयसी आहे, म्हणुन तर तो तिच्या साठी गुलाब आणतोय..:हहगलो:

हात्तीच्या..
मी अजुनही पियकर प्रेयसीच्या प्रेमाबद्दल अनभिज्ञ आहे म्हणुन मला आई लेकराचचं रेम दिसत जिथ तिथ Lol
नवी सुद्धा मस्तच..

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xaf1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/12469566_954034791349474_386180688609797970_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

सायुतै.. मस्त आहेत चिमण कुटुंब! कलाकार आहेस तु.. Happy

अ.आ .. मस्त रांगोळी.. आमच्याकडे काढली ती नाही टाकली ना इथे? मला पण वेळ नाही मिळाला Sad

चनस, शशांक जी धन्यवाद.

आत्मबंध मस्त्त्त्त्तच.:)

@आमच्याकडे काढली ती नाही टाकली ना इथे? मला पण वेळ नाही मिळाला:- अर्रर्रर्रर्रर्र! मला वाटलेलं तुम्ही टाकाल.. आता मी शोधतो,आणि टाकतो.

अग हे पक्षी मला जिवंतच वाटताहेत म्हणजे त्यांची सावली पहातोय असे वाटते.
आत्मबंध तुमच्याही रांगोळ्या सुंदर.

सायली - बुलबुल जोडी अगदी हातात हात (म्हणजे पाय हां) घेऊन बसलीये आणि त्या झाडावर सगळे गुलाबी बदाम लटकलेत ?? क्या रोमँटिक सीन ..... Happy Wink

हॅप्पी बर्ड्स Wink मस्त..
बाकी अँग्री बर्ड्स मुव्ही येतोय..प्रोमो सहीये.. बघणारे मी नक्की..
इथले सायलीचे पक्षी बघुन आता स्वस्थ बसवत नै आहे,,

चीऊ ताई थीम ची शेवटची रांगोळी.. >>>>>> मस्तए अगदी ....

नविन थीम.कमळ... ???? ते "सगळे" राजकारणावरचे चर्चापटू धावत येतील की !!!!!! Happy Wink

अगं तुझे आकार दिस्तात आणि तुझा कॉन्फिडन्स मानावा लागेल माये..
नै त मी..माझ्या चिमटीतुन काय आकार घेईल काहीच सांगता येत नै म्हणुन मला अस कै काढायची पण भिती वाटते..
कमळ सुरेख Happy

Pages