रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मुग्धटली, शब्दाली : - तस काहिहि नाही हो. कलश नुसता ठेवायचा, तो त्यात ठेवालाय.

आत्मबंध सप्तपदी छानच, पुर्वी टाकलेली ना धाग्यावर?

रच्याकने, बोगन वेलीया थीम च्या रांगोळ्या कोणाला दिसत नाहीये का?
टीना चा च प्रतिसाद आलाय फक्त.. Sad Sad Sad

बोगन..आणखी रंग टाक ना गं वेगवेगळे..
आर्टिस्ट चि लिबर्टी वापरुन नसलेले रंग सुद्धा टाक त्यात..
बरेचदा ह्या कल्पना वास्तविकतेपेक्षा जास्त आनंद देऊन जातात Happy

@आत्मबंध सप्तपदी छानच :- धन्यवाद Happy

@पुर्वी टाकलेली ना धाग्यावर? :- ती ही नव्हे. ही आज केलेली, तिच्याशी सिमिलर आहे.

आभार शशांकजी...:)
शोभा कुठल्याही रांगोळ्या टाकु शकतेस.. टीना बरोबर बोललीस..
ज्याच श्रेय त्यालाच मिळाल पाहिजे..:)

इटुक्ल्या पिटुकल्या रांगोळ्या. देखील गोड आहेत.
हळदी कुंकवाच्या वेळची सजावट पण छान आयडीया .

अ.आ, भुईकमळ मना पासुन आभार... बोगन बेलीया ची थीम सुरु केल्यापासुन खुप कमी प्रतीसाद येत होते,
म्हणुन वाटत होत की ही थीम उगीच निवडली का? पण आज तुम्हा दोघांचे प्रतिसाद वाचुन खुप आनंद झाला.. Happy

चनस, रोज काढत जा रांगोळ्या , म्हणजे सराव होईल..

मस्त गं ...
अग बरीच जण रोमात असतात म्हणून प्रतिसाद देण जमत नाही याचा अर्थ ते आवडलं नै असा होत नै बर का..
सायली तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है Happy

ह्या मी काढलेल्या इटुक्ल्या पिटुकल्या रांगोळ्या.. फोटो क्वालिटी फार चांगली नाहीय >>>>> पण रांगोळी क्वालिटी सुर्रेख आहे हां .... Happy

सायु - सुर्रेख रांगोळ्या ... Happy

Pages