मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूडे, हातकणंगल्याला कोण कोण जाणार हा काय प्रश्न आहे? देव टूर्समधून एक गट्टू सोडला तर टूरवर कुणी जातं का?
तू ही मालिका लागल्यावर डबे घासणं थांबव आणि नवर्याला सगळे डीटेल्स देत जा केतकर काकूंसारखे. म्हणजे त्याची धावपळ कमी होईल. Wink

सर्व प्रतिसाद भारी.
आशूडी.. अगदी अगदी.
मला वाटलं जय ला आॅस्ट्रेलिया ला पाठवतील .तो प्रोजेक्ट हॅंडल करत असतो ना! तर इथे इतके दिवस डिटेल्स ,वेळ खूप कमी आहे हे ऐकू येत होतं आणि डायरेक्ट अभिनंदनाचे फोन .मधल्या काहीच स्टेप्स नाही. प्रवास ,हॉटेल स्टे ई .त्यासाठी देव टूर ने काय काय केलं..ते काहीच नाही फक्त अभिनंदन ते ही सगळीकडून. मार्केट मध्ये देव टूर चं खूपनाव झालं म्हणे.! आॅ.? कसं काय...

एडीएम चा धंदा आहे आपल्या स्टाफला टूरवर कॉन्फरेंसला पाठवायचा... तसे झाल्याने त्यांच्या हाफिसात कोणीच नसते म्हणून कॉफी प्यायला अ.दा. इकडे येऊन बसतात. बरं यांच्या स्टाफची सगळी माहिती रोकडे नामक एका तिसर्‍याच माणसाला असते. तोही काम करत नाही म्हणून जय सर्व्हीस द्यायला उत्सूक असलेल्या काही तरूणांना हाताशी धरून रोकडेला काढून टाकतो.
...
त्याअर्थी अ. दा. साहेबानी त्यांच्या स्टाफचे डिटेल्स बाजारात रद्दी विकावी तसे विकून टाकलेत. आणि हे तरूण रद्दी विकत घेऊन त्यातून हे डिटेल्स पुरवीत असतील असा संशय आहे...

हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…बोल अहंकरा, सदानंदाचा येळकोट…> अर्थ कळला नाही याचा >>>>> ते अरि मर्दन मल्हारी तूची प्रचंडा असं आहे....

या धाग्यावर खंडोबा येणारच. मालिकेचा कंप्लीट खेळखंडोबा झाला आहे Proud

मंजूडी, आशूडी (आणि शोभडी Wink ) रॉक! माझं नाव पण रूपडी करून घ्यावं हा विचार विचाराधीन Lol

आता काय देव टूर्स हातकणंगल्याला टूर्स पाठवायला लागले??? Uhoh

रजनी म्हणेल, जय! हातकणंगल्याला आपण बाईकवरून जाऊया.
जूई म्हणेल, जय! मला यायचंय तुझ्याबरोबर, आपण हेलिकॉप्टरने जाऊया.
अदिती म्हणेल, मला हातगाडी पण चालेल. >>
यातल्या 'डीटेल्स' मधे किंचित करेक्शनस..

रजनी म्हणेल, जेय!! हातकणंगल्याला आपण बाईकवरून जाऊया. (यावर जयच्या मनात अंतर गुणिले त्याच्या बाईकचं किमीपरलिटर चा हिशेब सुरू.. तरी चेहरा शांत.)
जूई म्हणेल, ज.य.. मला यायचंय तुझ्याबरोबर, आपण हेलिकॉप्टरने जाऊया. (यावर जयच्या मनात आता या शरीराने वाढलेल्या आणि मेंदू विकसितच न झालेल्या मुलीचं भविष्य काय या विचारांचे वादळ. तरी चेहरा शांत.)
अदिती म्हणेल, जय, ऐक ना.या महिन्यात चिनूला स्लिपर घ्यायचीये. आपल्याला पैसे जपून वापरायला हवेत. आपण हातगाडीवर जाऊ. थोडा वेळ तू ढकल थोडा वेळ मी ढकलेन. केतकर काका आणि आण्णांनाही बसवू. तेवढच त्यांचं फिरणं होईल! (आपल्या ब्रिलियंट बायकोला कुठे ठेवू आणि कुठे नको असं जयच्या मनात सगळं पिरेम उचंबळून आलेलं.. तरी चेहरा शांत. )

अदिती म्हणेल, जय, ऐक ना.या महिन्यात चिनूला स्लिपर घ्यायचीये. आपल्याला पैसे जपून वापरायला हवेत. आपण हातगाडीवर जाऊ. थोडा वेळ तू ढकल थोडा वेळ मी ढकलेन. केतकर काका आणि आण्णांनाही बसवू. तेवढच त्यांचं फिरणं होईल! (आपल्या ब्रिलियंट बायकोला कुठे ठेवू आणि कुठे नको असं जयच्या मनात सगळं पिरेम उचंबळून आलेलं.. तरी चेहरा शांत. )>>>>>>:हहगलो: अरे देवा! अशक्य आहेत या मुली.

आशू Lol

अदिती म्हणेल, जय, ऐक ना.या महिन्यात चिनूला स्लिपर घ्यायचीये. आपल्याला पैसे जपून वापरायला हवेत

>>>> Rofl Rofl Rofl Rofl

Rofl Rofl Rofl

Rofl Rofl

Rofl

तू ही मालिका लागल्यावर डबे घासणं थांबव आणि नवर्‍याला सगळे डीटेल्स देत जा केतकर काकूंसारखे

>>> Biggrin

चेहरा शांत! Rofl

स्लीपर घेण्यासाठी बचत!? अरे हा जय काय डेली वेजेस वर आहे का?

आशुडी Rofl Rofl

अरे हा जय काय डेली वेजेस वर आहे का? >> ज्या हिशोबाने ते आण्णांच्या ऑपरेशनसाठी अजुन पैसे साठवतायत म्हणजे नक्कीच तसं असणार Proud

च्च! गट्टू त्याला पर प्रेझेंटेशन पैसे हातावर टिकवत असणार. म्हणून असा असतो त्याचा चेहरा.

काल दादूटल्याने 'माझ्यावर खूप कर्ज झालंय' असं सांगून जयला मिळणारा बोनस मार्गी लागेल याची व्यवस्था चोख करून ठेवली आहे. जयादिती पुन्हा कंगाल! दादुटल्याकडे कर्जाचे 'डिटेल्स' मागायला हवेत केकांनी. शोभडी मस्त प्रेझेंटेशन देईन त्यांना. आण्णा नेहमीप्रमाणे स्थितप्रज्ञ!

<<दाभोळकरांचा धंदा.... आपल्या सगळ्या कर्मचार्‍याना देशोदेशी फिरायला पाठवणे..>> मी देशोधडी वाचलं . बाकी ते दुसर्यांच्या कर्मचाऱ्यांना ( जय ) मात्र देशोधडीला लावायला निघाले आहेतच. अगदी कंबर कसून वगैरे. बाकी तो साई एक नंबरचा आखाड सासरा आहे . उभा राहून काहीतरी रजनी- बीजानि वर आणि इतर पण मौलिक कोमेंट्स करत असतो Happy

आशूडी Lol Lol

ऑफीसमधे असून चेहरा शांत नाही ठेवू शकले जय सारखा Wink

जय अगदी सोशिक सूनअगदी, अलका कुबल नंतर तोचं Wink

भयानक !!!
ऑफीसमधे असून चेहरा शांत नाही ठेवू शकले जय सारखा >> + १०००

मी एका बोरिंग कॉन-कॉल मध्ये होते , म्हणून इथे फेरफटका मारायला आले Happy
नशिब फोन म्युट होता .

Happy Happy

दक्षिणे, ते तुझं इंटरप्रिटेशन झालं. मख्ख, कोरा, निर्विकार, साधा असे विविध चेहरे जय आपल्या अभिनयकौशल्याने साकारतो.
मंजूडे, दादाला म्हणाव एक रूपया जरी स्वत:च्या खिश्यातून खर्च केल्याची पावती दाखवलीस तर 'शोभाशी लग्न' या गुन्ह्यात तुला माफीचा साक्षीदार करून कर्जमाफी मिळवून देऊ. स्वतःचा पगारही चुकून बँकेत जमा होत असल्यासारखा याचा चेहरा. याला कसली कर्जं? Proud

आशू Rofl

अरे असं काय करताय.. दादुटल्यानी नाही की घर घेतलं विरारला. त्याचं कर्ज नाही का त्याला..

अरे असं काय करताय.. दादुटल्यानी नाही की घर घेतलं विरारला. त्याचं कर्ज नाही का त्याला..>>> डोम्बल त्याच. तिथे पण त्याने आणी शोभडीने अण्णाना लुटल. आणी अण्णा, हमे तो लुट लिया म्हणत आम्बट चेहेरा करुन बसले. त्या दादुटल्याला मला बरच काही सुनवायच आहे, त्या आधी मख्ख, स्थितप्रज्ञ जयलाच सुनवेन म्हणते.:फिदी: इकडुन अदिती बाई आहेतच दिराला मदत करायला रिकामटेकड्या.:राग:

पण शोभा आणि केतकर काका एका घरात आले ना तर मालिका बघण्यामागे कैतरी कारण तरी निर्माण होईल. Proud अर्थात ही भाबडी आशा मला होसुमियाघमध्ये सुनिता v/s शशिकला अश्या सामन्याबद्दलही होती, पण तिथे घोर निराशा पदरी पडली..

Pages