मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे.... काय हे एकेक प्रतिसाद.. ऑफीसमध्ये आहे म्हणून नाहीतर आत्तापर्यंत हसून हसून लोळले असते घरी मी..
जय आणि त्याच्या रिअॅक्शन्स सॉलीड आणि अदितीची ( चिनूच्या चपलेसाठी) काटकसर पण मस्तच यार.. Rofl

कालचा आणी आजचा भाग अगदी निसटता पाहीला. जयचा तो येडा भाऊ, बायको, चिनु आणी अण्णान्सकट केतकर काकान्कडे रहायला आलेत वाट्ट. शोभडी अगदी घरच्यासारखी वागत होती. हे म्हणजे जमीन मऊ लागली तर कोपराने खणण्यासारखे झाले. त्या केकानी जय अदितीची भीड-भाड न बाळगता अण्णा सोडुन बाकीच्याना हाकलायला पाहीजे, तरच शोभडी आणी शोभड्या ( शोभडीचा नवरा) सुधरतील.

बहुतेक त्या शोभड्याने जे प्रमाणाबाहेर कर्ज करुन ठेवलेय, त्याचे घेणेकरी त्याला सारखे फोन करतायत असे मी परवा बघीतले होते. आता काय त्याचे विरारचे घर पण लिलावात काढले की काय? असे असेल म्हणून शोभड्या-शोभडी केकान्कडे आले असतील.

आपल्या घरा घरा मध्ये सकाळी मंगलमय वातावरण ठेवण्या साठी आपण सुरेख संगीत लावतो आणि तीच आपण मराठी माणसं संध्याकाळी आपल्या घरा घरात टीव्ही सिरिअल मधल्या कपटी बायकाचे दुष्ट संवाद आणि त्याला पूरक इरिटेटिंग थाळीमार पार्श्वसंगीत प्रदूषण ऐकत बसतो. काय म्हणावं याला?

काय म्हणावं याला?>>>>नसीब अपना अपना, दुसरे काय्?:फिदी: नाहीतर दिल लगा गधीसे ( दूरदर्शन/झी/ ई) तो परी ( कुटुम्बातल्या गप्पा, सम्वाद) क्या चीज है?

"भान सुटलं की माणसाची शोभा व्हायला वेळ लागत नाही" हे वाक्य खास शोभडीकरता इकडे आणलंय (सौजन्यः नांदा सौख्यभरे चे देशपांडे Wink )

अरे काय ते दुसर्‍या लग्नाचे गुर्‍हाळ लावलय. किती ते लाजुन आणि कोड्यात बोलणं आणि किती पर्सनल बोलाव एखाद्याविषयी माणसाने,
आम्ही अस काय म्हणालो कुणाच्या बाबतीत तरी दुसर्‍या तासाला मोरल हॅरॅसमेंटच्या नावाखाली घरी जाऊ Wink

शुकु Lol

बाहेर आउ बसली आहे माहित असूनही एका पाठोपाठ एक अदिती आणि जय मोबाईल वर येणारे फोन्स बघूनही फोन सायलंट वर टाकत नाहीत म्हणजे मूर्खपणाची परिसीमा आहे.. त्यात के काका आणि का़कू आवाजाच्या दिशेने बघत बसतात..

टाकले ना त्यांनी फोन्स सायलेंट वर? काल हापिसातले लोक्स फोनत होते त्यांना तेव्हा फोन्स लागत नव्हते दोघांचे.

शिरियलीत तर वाजताना ऐकू येत होते.. नंतर टाकले काय सायलंटवर.. खरं तर समोर एवढा खतरा दिसत असून दोन तीन वेळा फोन वाजणं दाखवणं हेच आहे हास्यास्पद ! डोक्याला हात !

एखाद्या इंडस्ट्रीचा उल्लेख करायचा असेल तर किमान माहिती घ्यायला हवी, तसे उल्लेख सिरीयल मधे यायला हवेत. त्या फिल्ड मधे काम करणारांना या मालिकेमुळे काय वाटत असेल ?

इथे माझ्यासकट बरेच जण असंच काहीसं तर म्हणून र्‍हायलेत...
लेखक-दिग्दर्शकाने ट्रॅव्हल कंपनीत कसं काम चालतं याचा `कि मा न' अभ्यास तर करायला हवा...

पंकज सावर्डेकरांच्या फारच अपेक्षा बुवा. Proud

जिथे सिरीयलच्या नावापासूनच सगळं गंडलेलं आहे तिथे कथानकाची व त्यातही इतकं सगळं व्यवस्थित दाखवतील ह्याची काय अपेक्षा करणार? प्रचंड मठ्ठ हिरो हिरॉईनमध्ये नक्की कोणता दुरावा आहे हे इतक्या महिन्यांनंतरही मला कळलेलं नाहीये. किती नवरा-बायको असे एकाच ऑफिसमध्ये शेजारी बसून काम करतात? ऑफिसनंतर कुठच्यातरी बेंचवर बसून निवांत गप्पा मारतात, घरी नवरा-बायकोसारखेच रहातायत, मग का रे दुरावा असं म्हणत रडत रहाण्यासारखं काय आहे?

नशीब मी ही तद्दन भिकार सिरीयल बघत नाही ते.

अरे हे रडगाणं गात बसण्यापेक्षा दोघांपैकी एकाने दुसर्‍या जॉब साठी प्रयत्न करावा ना. का आपल्याला कुणी जॉब देणार नाही हे माहित आहे त्यांना.

अरे हे रडगाणं गात बसण्यापेक्षा दोघांपैकी एकाने दुसर्‍या जॉब साठी प्रयत्न करावा ना. का आपल्याला कुणी जॉब देणार नाही हे माहित आहे त्यांना.

Pages