मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयने स्पष्ट सान्गीतले तरी म्हसोबा ( दाभोळकर) म्हणतो म्हणुन् प्रयत्न सोडणार नाही असे म्हणते>> काय सांगीतलं जयने जुईला? म्हसोबाचा नवीन प्लॅन आहे की काय कुठला?

दाभोळकरांनी जुईला सांगितल की "प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे" या उक्तीप्रमाणे "प्रयत्ने उसासे टाकता जय गळासि सापडे" तेव्हा बालिके उसासे टाकण सोडु नकोस, हार मारु नकोस, इ. इ.

दाभोळकर इतक्या चिरकुट हालचाली करतात मुलीच्या आयुष्यातुन जावयाला हाकलण्यासाठी? हे तर आजकाल तिसरीतली मुल करतात..

कालचा भाग अचाटच होता.

जुई आत्महत्येचा विचार बोलून दाखवते त्यामुळे जय माघार घेतो आणि तिला लग्नाचे वचन देतो. हे चोरून ऐकत असलेली रजनी संतापाने आणि अपमानाने पेटून उठते. ती आत्ताच्या आत्ता ये असा मेसेज जयला देते. मी हे सगळं सरांना सांगणार आहे. त्यावर जय तिच्या पाया पडण्याचंच बाकी ठेवतो.

तेव्हां रजनी त्याच्यासमोर प्रपोजल ठेवते की जर त्याने त्या मूर्ख आणि बावळट जुईचा विचार सोडून रजनीशी लग्न केले तर हे गुपीतच राहील. जयपुढे आता पर्याय उरलेला नसतो. तो तिलाही होकार देऊन बसतो. तिकडे जुई आनंदात असते. ती जयला घरचा पत्ता विचारते. तेव्हां (आता एक्सपर्ट झाला असल्याने) जय म्हणतो की आमचे घरमालक आणि सरांच्या आईची चांगलीच ओळख आहे. त्यामुळं तू तिथं आलीस तर आपलं बिंग फुटेल.

मग जुई त्याला संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर बांद्रा रेल्वेस्टेशन वर बोलावते. पण त्याच वेळी रजनीलाही त्याला बोलवायचं असतं आणि आदिती तर वाट पाहणारच असते.

आता पूढे..

कापोच्या, मनचं जुगवुन नै ना टाकलस हे वरती? Uhoh
हुश्श्य.......
आयला असेच सुरु केलेल असेल या सिरीयलीत, तर बघणे तत्काळ बंद करावे लागणार... तो स्लॉट लिंबीच्याच परवानगीने बातम्या अन डिस्कव्हारी बघायला वापरता येईल..... Proud :नाचणारी बाहुली:

आधी पब्लिकला येडे करुन आता झीवाले स्वतःही येडे झालेत.

झी चं काही सांगता येत नाही. दाखवतीलही. Lol
लेखकु ला पुढे काही सुचले नाही आणि इथे कुणी आतला मेंबर असेल तर पुढच्या एपिसोडात हे दिसलं तर आश्चर्य वाटू नये. Proud

स्वस्ति, मुग्धा धन्स. Happy

कापोचे, भारी लिवलयंत.. मला पण वाचता वाचता असं खरोखर दाखवलंय की काय? मग किमान कालचा एपि तरी बघायलाच पाहिजे असं वाटायला लागलं पण पुढच्या पोस्टी वाचून पाणी पडले वाटण्यावर..

माझ्याकडे वायआर डीटीएच वर सगळ्या चॅनेल्सचे पुढच्या दोन तीन आठवड्यांचे एपिसोड्स दिसतात.
यन्ना रास्कला

जय एवढ्या पटापट हालचाली करेल, एवढे झटपट निर्णय घेईल आणि एवढं धडाधड बोलेल , यात एकदाही त्याने अदितीकडे उपेक्षितांचे अंतरंग टाईप याचना करणारा कटाक्ष टाकला नाही आणि तिनेही त्याच्याकडे "घरातलं तेलमीठ संपले, आता पगार होईपर्यंत अन्न नाही' टाईप उत्तरकटाक्ष दिला नाही यावर माझा विश्वास नसल्याने कपोचे यांची पोस्ट अ आणि अ च वाटली होती. Proud

कालचा भाग भयानक पकाऊ होता. मान्य आहे की एखाद्या व्यक्तीमुळे मनावर दडपण येऊ शकते, पण म्हणून तेच तेच रटत रहायचे?:अओ: त्या बावळट्ट जुईने काल हाईट केली. जाम बोअर करते ती कधी कधी. अदितीबाई सहनशीलतेच्या मुर्तीमन्त परीमाण आहेत. जयने तोन्डात मीठाची गुळणी घेतली असावी, नाहीतर २ मिनीटा साठी सारखी फोन करणारी जुई, जयशी पसारा मान्डल्यासारखी बोलत बसते. एकदाही हा रान्जण तिला ठामपणे सान्गत नाही की तुला हे जमलेच पाहीजे. आणी या मुर्खाच्या जागी दुसरे कोणी कणखर असते, तर त्यानी आधी जुईला विचारले असते की म्हसोबा तुला, मी केबिनमध्ये नसताना काय बोलत होता? कारण म्हसोबाच गट्टु ( अडेलतट्टु) ला सान्गतो की प्रेझेन्टेशन पहायला ये. आणी गट्टोबा हे जय समोर बोलुन दाखवतात. जयच्या जागी दुसरा असता तर त्याने जुई समोरच म्हसोबाला उघड पाडल असत. येडचॅप हिरो कुठला!:राग:

परमेश्वरा !!!!!
अरे हे काय ऑफिस आहे का वेड्यांचा बाजार .......

.2225474499_emoticons_xlarge.gif

कसली बावळट आहे ती जुई , दोन थोबाडीत ठेवून ठेवून द्याव्याश्या वाटतात face-slap.gif

आणि कुठल्याही एपिसोडमधे किमान १०० वेळा तरी 'प्रेझेन्टेशन' हा शब्द आलाच पाहिजे असा काही नियम आहे का ?

अरे हे काय ऑफिस आहे का वेड्यांचा बाजार >>> बालवाडी आहे, बालवाडी! नुसती फालतूगिरी चालली आहे.

घरचे भक्तीभावाने बघतात म्हणून परत एकदा चिडचिड झालेली बाहुली Angry

'घरातलं तेलमीठ संपलं, आता पगार होईपर्यंत अन्न नाही' टाईप उत्तरकटाक्ष दिला नाही >>> Biggrin

सुभा या मालिकेत काय करतोय या विचाराने राहून राहून नवल वाटतंय...

सुभा या मालिकेत काय करतोय या विचाराने राहून राहून नवल वाटतंय...>> +१०० Sad
दर महिन्याचा चहाचा खर्च सुटण्यासाठी करतोय तो ही मालिका असं वाटतं.

सुभा असतो कुठे फारसा? आधी कट्यारमध्ये बिझी होता, आता बंध नायलॉनचेमध्ये... मला अस वाटायला लागलय की झीवाले नव्या चेहर्‍यांना खपवण्यासाठी एक जुना, प्रॉमिसिंग चेहरा ठेवतात मालिकेत.. म्हणजे आज तरी तो दिसेल, त्याचा अभिनय बघायला मिळेल या आशेने लोक बघतील.. जस या मालिकेत सु भा, पआमु मध्ये गिरीश ओक इ इ

सेम गोज फॉर राजन भिसे किंवा नव्या मालिकेत ती बोरिंग भूमिका स्वीकारलेले गिरीश ओक.
*अर्धवट पोस्ट झाली होती पोस्ट.

शेवटी , त्या जुईच्या प्रेजेंटेशन मुळे हे तरी कळलं की नक्की कसलं प्रेजेंटेशन देतात ही लोक .
देव टूर्स फक्त ईतर कंपन्यांच्या टूर्स अरेन्ज करतात का ? स्वत:च्या अशा काही नाही ??

देव टूर्स त्यान्च्या क्लायंट्स साठी काहीही करतात .
अदितिमॅडमना भेटलात तर बर होईल , रजनी मॅडम जरा फटकळ आहेत.
फक्त कदम काकांकडे चेक वेळेवर पोचेल याची व्यवस्था करा.

मिटींग मिटींग खेळू गडे असा भाग होता कालचा. आमची लय लय भारी टूरिंग कंपनी असा फिल यावा म्हणून सगळ्यांच्या समोर वितभर उंचीच्या मिनरल वाटरच्या बाटल्या होत्या. त्यातलं पाणी फक्त जुईच प्यायली. भितरी कुठची ! या बाटल्या ठेवण्यामागची प्रेरणा म्हणजे..'धूमधडाका' मधे लक्ष्या 'ए मूड' असं म्हणून दिग्दर्शकाच्या भूमिकेत हातवारे करत शिरतो, तो सीन ! कोणाचा बॉस लय भारी असा मिटिंग चा झेंडा होता. दोन-दोन चे गट पडले होते. प्रत्येकाने आपल्या बॉस ला समजूतदार, हुश्शार, मनमिळावू, कामाची संपूर्ण माहिती असणारा असं म्हणायचंच्च होतं. या सिरीयल चा सस्पेन्स मला समजला असून, पुढील ओळ ही स्पॉयलर समजून वाचावी. घनाची आई ही एका वधूवर सूचक मंडळाची एजंट असून, तिला या वर्षाअखेरीस तीन जोड्या जमवायचे टारगेट दिले आहे. त्यानुसार ती गट्टू-आदिती, जय-जुई, रजनी-आणि तिचा तो जुनियर (नाव विसरलो) ह्यांच्या जोड्या जुळवायच्या भानगडीत आहे. लब्बाड !
प्रत्येक वाक्यात प्रेझेंटेशन, समजूतदार, क्लायंट हे शब्द किमान एकदा आले नाहीत, तर डायलॉग पास होत नाहीत असं वाटतंय. अधून मधून ही सिरीयल डोळ्या-कानावर पडत असते.काल अख्खा एपिसोड पाहून धन्य जाहलो. पूर्ण एपिसोड पाहिल्याबद्दल आज इथल्या राउंड अबाउट ला माझा सत्कार ठेवला आहे. त्याचं "प्रेझेंटेशन" माबोवर निवांत पाठवीनच. फक्त क्लायंट ने ते अप्रूव केलं पाहिजे. पण ते होईल याची मला खात्री आहे, कारण आमच्या रजनी मॅडम खूप हुशार आहेत, त्या काम छान समजून सांगतात, आणि कडू पण बोलत नाहीत.

Pages