मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित Lol

मित, हे 'डिटेल्स' इथे लिहिल्याबद्दल तुमचे आभार Wink

काल त्या साईने मस्तपैकी एका दगडात दोन पक्षी मारले.

यांनी आख्खी मालिकाच 'प्रेझेंटेशन' स्वरूपात तयार केली असती तरी चालण्यासारखं होतं. उगा दररोजच्या अर्ध्या तासाच्या एपिसोडचा फुकाचा खर्च केलाय! Biggrin

>>>यात एकदाही त्याने अदितीकडे उपेक्षितांचे अंतरंग टाईप याचना करणारा कटाक्ष टाकला नाही आणि तिनेही त्याच्याकडे "घरातलं तेलमीठ संपले, आता पगार होईपर्यंत अन्न नाही' टाईप उत्तरकटाक्ष दिला नाही>>>:खोखो:
अगदी अगदी अचूक

मित Proud काल अदितीबाईने, त्या माठ आहेत हे परत सिद्ध केले. जयने वारन्वार आउ ( होणार आहे मोठा बाऊ) च्या कल्पना भरारीविषयी सान्गुनही ही बाई म्हणते की आउ आणी सरान्च्या मनात तसे काही नाही. बायकाना सिक्स्थ सेन्स असतो, पण ही हुश्शार, स्मार्ट, तडफदार बाई कुण्णा म्हणजे कुण्णाचेच ऐकत नाही. म्हसोबा उर्फ बापावर प्रचन्ड विश्वास. जय हे कोणाशी बोलु पण शकत नाही. कोणाशी बोलणार? कदम काकाशी? ते असे रीअ‍ॅक्ट होतात की जसा या दोघान्चा आताच ताजा ताजा डिव्होर्स झालाय. ते ओरडले की ऑफिसमधले सगळे मीअर कॅट्स ( थॅन्क्स टु ललिता प्रीती फॉर धिस नेम) ताडकन उठतात.

तर, नन्दिनी आणी जुई त्यान्चा पाचकळपणा सोडणार नाही.

अदिती आणी जय त्यान्चा मुखदुर्बळपणा सोडणार नाहीत.

आणी आपण सारे वेडे, कधीतरी ही सिरीयल सुधरेल अशी आशा सोडणार नाही.:फिदी:

काल अदितीबाईने, त्या माठ आहेत हे परत सिद्ध केले.>> अगदी अगदी .
मुद्दामून त्या गट्टु ची तारीफ करते आणि सारखं आपलं " सर , तुम्ही माझे चांगले मित्र आहात "
अग बयो , त्या आउ " क्यो ना ये दोस्ती रिश्तेदारी मे बदली जाये " मोड मध्ये आहेत , हे माहित असूनही कशाला आगाउपणा करतेस .

पण दु:खात सुख अस की जयला वास्तवाची जाणीव आहे.. तो आदुला समजावतोय की आउंच्या मनात काय चालु आहे, पण तिची बुद्धी अधु झालीय. आता एकदा आउंनी "तु........... गट्टु आपल अविनाशशी लग्न करशील आदिती?" अस विचारल डायरेक्ट की उघडतील तिचे डोळे.

ता. क. तु नंतरची टिंब हा आउंच्या बोलण्यातला पॉज धरावा.. तिला असे लाँग पॉजेस घेउन डायलॉग्ज म्हणायची सवय आहे.

हे माहित असूनही कशाला आगाउपणा करतेस ..कारण तिने आगाऊपणा नाही केला तर कसं सिध्द होईल ती माठ आहे म्हणून ?
जय आणि आदिती ला समोर बसवून दोन सणसणीत ठेवून द्याव्यात असं वाटलं कालचा एपि पाहून..!
तिच्या सोबत घरी येत नाही आणि ती निघून गेल्यावर एकटाच आॅफिसमध्ये विचार करत बसतो दुःखी होऊन. त्याला आदिती ला सुनावता येत नाही का?असं का बोललीस अविनाश बद्दल. माहित आहे ना ..काय विचार आहेत आऊंचे? मग जरा विचार करून नाही बोलता येत.इ.इ.....
आणि इकडे ती घरी येते तर काकू म्हणतात ..अरे आदिती आलीस.. अरे देवा हा काय प्रश्न आहे ? दिसत नाही का आलीये ते..आणि लगेच मागून जय टपकतो..
अ आणि अ आहे ही सिरीयल. कालचा भाग दुर्देवाने पहावा लागला जेवता जेवता. नाहीतर रोज त्या वेळेत जेवण होऊन आवराआवर चालू असते.मग फक्त कानांवर अत्याचार..
एकदाचा यांचा सो कॉल्ड दुरावा संपवून ही मालिका बंद करायला हवी. उगीच ३डी बंद करताय

जय आणि आदिती ला समोर बसवून दोन सणसणीत ठेवून द्याव्यात असं वाटलं कालचा एपि पाहून..!>>>
++११११
किती तो माठपणा!

एकदाचा यांचा सो कॉल्ड दुरावा संपवून ही मालिका बंद करायला हवी. >>>> दुरावा आहे तो अधु आपल अदु आणि तिच्या पप्पांमध्ये.. जय आणि आदिती दुरावा असुनही एकत्र हापिसात येतात बर्याचदा, येवढा मोठा धोका पत्करलेला असुनही हापिसातुन घरी जाताना बाहेर निवांत गप्पा मारत बसतात. नशिब तर असल जोरदार की हापिसातले बाकीचे लोक हापिस सुटल्यावर मुकाट आपापल्या दिशांना निघुन जातात, कुण्ण्णालाही यांच्या भेटण्याच्या एरियात काम निघत नाही, मित्र, मैत्रीणीला भेटायला जायच नसत... त्यांच्यात कुठला आलाय दुरावा?

हो ना मुग्धटली अगदी बरोबर. यांच्यात काय दुरावा आहे हेच कळत नाहीये मला. नेहमी एकत्र तर असतात.. टायटल पासूनच गंडलीये सिरीयल.

येवढा मोठा धोका पत्करलेला असुनही हापिसातुन घरी जाताकोणीही बाहेर निवांत गप्पा मारत बसतात. नशिब तर असल जोरदार की हापिसातले बाकीचे लोक हापिस सुटल्यावर मुकाट आपापल्या दिशांना निघुन जातात, कुण्ण्णालाही यांच्या भेटण्याच्या एरियात काम निघत नाही. >> +1 मुग्धा.
रस्त्यावरच्या बाकावर बसून गप्पा मारत बसतात तेव्हा कोणीही पाहत नाही आणि कसला प्रोग्राम ठरवून नाहीतर सेलिब्रेशनसाठी कुठे रेस्टॉरंट नाहीतर काॅफी शाॅप मध्ये गेले की कोणीतरी तिथे टपकतं.

आशु Lol Wink

@बन्या...तुमचा संताप अगदी योग्य आहे हो.
पण टीवी फोडू नका हो..त्या माठ जय आणि आदिती मुळे आपल्याला नुकसान कशाला नै का.?ही सिरीयला ज्यांना बघावी (च) लागते , त्यांनी 'आलिया भोगासी असावे सादर' ऐसे म्हणून शांत रहावे.. संताप, उद्विग्नता..इ.इ. नी आपले स्वतःचे नुकसान होते हे जाणावे.

एका अर्थी बरोबर आहे म्हणा, गृहिणी ज्यांनी कधी ऑफिस नामक प्रकार पाहिलेला नाही (उदा: माझी वृद्ध आई)
त्यांना ते खुप वेग्लळ वाटत

माझ्या मेडने मला विचारलं होतं की तुम्ही office मध्ये असाच timepass करता का? अ ओ, आता काय करायचं
>>>>>:हाहा:

वाहत्या नळाखाली एका झटक्यात भान्डी धुणार्‍या आणी एका फटक्यात केरवारे करणार्‍या बायकाना या कारेदुचे लाईफ म्हणजे मज्जानी लाईफच वाटले असेल.:फिदी:

तर अदिती बाई नेहेमीप्रमाणे आपल्या माठगिरीचे प्रदर्शन घडवुन मिटिन्ग मिटिन्ग खेळतात., गट्टु ( कोणावर लट्टु?) नेहेमी बाहेरच जेवायला बघतो. जय, एरन्डेलचे डोस रिचवत रहातो. रजनी फटाक्यासारखी फुटत रहाते आणी नन्दिनी पाचकळ पणा करत रहाते. चालू द्या.:फिदी:

ही लोक टूर्स मध्ये काम करतात की कुठल्या राष्ट्रीय सुरक्शा आयोगात .
प्रोजेक्ट मध्ये कॉन्फिडेन्शियल ठेवण्यासारख काय .

नविन एक पात्र आलं - ह्रिशिकेश .
आदितीला - आदू आदू करतो - आता गट्टू वैतगला आहे .

to
Hrushikesh toMDaavar expression aadhi aani toMDatun shabd nantar baaher kaDhat hota.

Pages