Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती घडलंय बिघडलंय. टिकल ई
ती घडलंय बिघडलंय.
टिकल ई टीव्हीवर रविवारी सकाळी असायची ११ वा.
बाणे, भुंडे, पावर अशी नावं असायची सर्वांची. एक मिटींग.
एक सर्वमान्यांच्या गप्पा. एक प्रहसन आणि नंतर गोंंधळ. शेवटी त्यागराज खाडीलकरचं गाणं. असा बाज होता कार्यक्रमाचा.
मक्याला याच कार्यक्रमाने ब्रेक दिला.
https://youtu.be/rQ8MViczMno
शब्दाली थॅन्क्यु, थॅन्क्यु (
शब्दाली थॅन्क्यु, थॅन्क्यु ( गालगुच्चे घेणारी बाहुली) चूकुन दोन सिरीयली मी एकत्र केल्या ( डोक्यावर टपली मारुन घेणारी बाहुली)
एक प्रश्नः अदितीचे वडील त्या कंपनीत येत जात असतात ना, मग ते सांगत नाहीत की अदिती-जय नवरा बायको आहेत ते?>>>>> दाभोळकर उर्फ म्हसोबाला लाज वाटत असते की जय हा त्याचा जावई आहे, म्हणून आणी मुलगी पण पळुन जाऊन अशा गरीब मुलाशी लग्न करुन नोकरी करते याचा त्याला राग असतो म्हणून तो सान्गत नाही की जय हा त्याचा जावई आहे
शब्दाली थॅन्क्यु, थॅन्क्यु (
शब्दाली थॅन्क्यु, थॅन्क्यु ( गालगुच्चे घेणारी बाहुली) >>>
१० दिवसात ७०० लोकांना
१० दिवसात ७०० लोकांना ऑस्ट्रेलियाला नेतोय जय. पण एकदा तरी त्याने हा प्रश्न विचारला का की त्या सर्वांचा व्हिसा तयार आहे का ते?
आय होप विचारलं असेल आणि मी मिसलं असेल.
१० दिवसातला एक दिवस तर अय्या जय इश्श जय बरंय बाबा जय वर गेला. तो आणि रजनी अजून डेडलाईन्स ठरवत आहेत!
इतक्या मोठ्या प्रकरणासाठी सगळ्यांनी काम करायला हवं. तर ते सोडाच, जुई आणि अदितीचा जीव वरखाली कारण रजनी जयबरोबर आहे! ही काय रोमान्सची वेळ तरी आहे का? आणि होतकरू तरुण ऑस्ट्रेलियन मुलं त्यांना मदत करणार आहेत का हॉटेल बुक करण्यासाठी? ऑस्ट्रेलियात कॉन्फरन्स कुठे आहे, हॉटेलं कुठे आहेत, यायचं-जायचं कसं यातला एक तरी प्रश्न तरी विचारला का? आणि सातसातशे लोक जमवून नक्की करणार तरी कायेत? कसली कॉन्फरन्स आहे दाभोळकरांची इतकी मोठी? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही कारण इतका अभ्यास आणि वेळ देतच नाहीत लेखक!

आपल्याला झेपेल इतकाच घास घ्यावा असं का नाही सुचत या लोकांना?
पूनम.. फारच बाई अपेक्षा
पूनम.. फारच बाई अपेक्षा तुझ्या..
या मालिकेत काहीही लॉजिकल नाहीये.
बाकी तुझ्या संपूर्ण पोस्टला मम आणि
सातसातशे लोक जमवून नक्की
सातसातशे लोक जमवून नक्की करणार तरी कायेत? कसली कॉन्फरन्स आहे दाभोळकरांची इतकी मोठी? >>> जी ते तडकाफडकी कॅन्सलही करायला निघाले होते...
पूनम, परफेक्ट!
घरच्यांची आता अशी परिस्थिती आहे, की इतर एखादी मालिका एखादा दिवस चुकली तरी चालेल, पण का रे दुरावा चुकता कामा नये...
दाभोलकारांचा नक्की काय बिझनेस
दाभोलकारांचा नक्की काय बिझनेस आहे. साय्ख्या ट्रिप्सच करत असतात. पण मालिका मस्त आहे.
दाभोलकारांचा नक्की काय बिझनेस
दाभोलकारांचा नक्की काय बिझनेस आहे.>> एम्लाॅईंना टुर वर पाठवायचा.
आपल्याला झेपेल इतकाच घास
आपल्याला झेपेल इतकाच घास घ्यावा असं का नाही सुचत या लोकांना?

>> पूनम मी चुकून घास च्या ऐवजी वास वाचलं
तेही आहेच की दक्षे!
तेही आहेच की दक्षे!
पण मालिका मस्त आहे. >>>
पण मालिका मस्त आहे. >>>
पुनम अतिशय कहीच्या काही
पुनम अतिशय कहीच्या काही अवास्तव अपेक्षा आहेत तुमच्या.
पण मालिका मस्त आहे. >>>
मलाही ते वाक्य वाचून असंच
मलाही ते वाक्य वाचून असंच झालं होतं
बेसिक में इतके खंडीभर लोचे होऊनही आवडतेय मालिका लोकांना. काय बोलणार आपण तरी! आणि दिग्दर्शक-लेखक तरी का कष्ट घेतील. वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह!
अरे आपण ऑफिस मध्ये काम करतो
अरे आपण ऑफिस मध्ये काम करतो काही आठवणी, पाय खेचणे, काही एन्जोयमेंत बरे वाटते.. काकांनी दिलेले सल्ले बरे वाटतात.. हा प्लस ... तसा negative पण आहे पण दुर्लक्ष्य.....
दाभोलकारांचा नक्की काय बिझनेस
दाभोलकारांचा नक्की काय बिझनेस आहे. +१
आजपर्यंत मालिका, सिनेमातल्या
आजपर्यंत मालिका, सिनेमातल्या इंडस्ट्रीयलिस्ट्सचे बिझनेस कळलेत का कधी? तिकडे गोखल्यांचा गृहउद्योग आहे म्हणतात पण कधी दाखवलीय बाकरवड्या बनणारी फॅक्टरी? ऑफिस म्हणजे येउन जाउन श्रीच केबीन इतकच बाकीचा स्टाफ म्हणजे मनिष आणि नंदु.
बोअर व्हायला लागलीये ही
बोअर व्हायला लागलीये ही मालिका....
कोतबो.....
अन तर्कशून्यतेबाबत तर यांनी बॉलिवुडच्या हिंदी सिनेमांनाही मागे टाकायचा चंग बांधलाय.
एनिवे... रजनी/ कला वगैरे खलनायिकाच जास्त भाव खाऊन जाताहेत अॅक्टिंगमधे.
तिकडे कलाच्या अभिनयासमोर जान्हवी अन इतर फिक्क्या पडल्यात.
जान्हवीचे (पक्षी लेखकाचे) कान उपटुन जान्हवीला आता स्वतःच्या घरात बसवले पायजेल. अन त्या चिन्ट्या का पिन्ट्याला करुदे ना संसार, कशाला सारखी लुडबुडायला जाती मधे मधे इतका अपमान करते ती कला तरी?
मी वैतागलोय.
कारण हे सगळे मला सक्तिने बघायला लागते. रात्री साडेअकरा शिवाय टीव्हीचा रिमोट मला मिळत नाही.
>>>> तिकडे गोखल्यांचा
>>>> तिकडे गोखल्यांचा गृहउद्योग आहे म्हणतात पण कधी दाखवलीय बाकरवड्या बनणारी फॅक्टरी? <<<<<
(या एका मुद्याकरता मात्र मी झीला १०० पैकी १०० मार्क देतो).
ओ ताई, ही झी मराठी आहे म्हणल.... डिस्कव्हरीच हाऊ इट मेड कार्यक्रम नैये फॅक्टर्या दाखवायला....
फ्याक्टर्या बघायच्या तर डिस्कव्हरी लावा........
छान छान कपडे, मेकअप, दागिने बघायचे तर झी मराठी लावा.
शुद्ध साजुक तुपातील पेठी भाषा ऐकायची तरी झी मराठी लावा....
आणि जे काही असतं ते कायम भलं
आणि जे काही असतं ते कायम भलं मोठंच असतं. पण दिसताना अजिबात तसं दिसत नाही.
ओ ताई, ही झी मराठी आहे
ओ ताई, ही झी मराठी आहे म्हणल.... डिस्कव्हरीच हाऊ इट मेड कार्यक्रम नैये फॅक्टर्या दाखवायला.... >>>> काका अगदी सारण कस करतात तेव्हापासुन नका दाखवु पण कधीतरी यांच्या गृहउद्योगात नक्की काय काय बनत हे तरी कळुद्या.. नुसत्याच गप्पा यु.एस च्या क्लाएंटच्या. यु एसला नक्की काय पाठवायचय?
शुद्ध साजुक तुपातील पेठी भाषा ऐकायची तरी झी मराठी लावा.... >>>> "तु माझ्याशी अस का करतोस?" "आता ती माझी जवाबदारी आहे" पेठेत अस मराठी बोलल जात?
शुद्ध साजुक तुपातील पेठी भाषा
शुद्ध साजुक तुपातील पेठी भाषा ऐकायची तरी झी मराठी लावा....>>>> राँग राँग आपलं ते.. राग... राग...
हा रंग तुझ्यावर छान दिसतो... हे बरोबर? की हा रंग तुला छान दिसतो हे बरोबर? तुझ्यावर ही "तुझपे" ची नक्कल झाली. तीपण चुकीची. कसलं पेठी मराठी! ० मार्क्स!
प्रज्ञा९ हा रंग तुझ्यावर
प्रज्ञा९ हा रंग तुझ्यावर खुलुन्/उठुन दिसतो हे बरोबर आहे
मी दिलेली दोन उदाहरण मराठीच्या कत्तल आहे.
तुझ्यावर हा रंग खुलुन/उठुन
तुझ्यावर हा रंग खुलुन/उठुन दिसतो, ह्याच्यापेक्षा तुला हा रंग छान दिसतो हे कानाला जास्त चागलं वाटतं.
मुग्धाचे आधीचे मुद्दे बरोबर आहेत.
अहो मान्य तुमचे, पण इतर
अहो मान्य तुमचे, पण इतर वाहिन्या बघितल्यावर हे कितीतरी बरे वाटते.

अस्सल पेठी आता मी देखिल विसरलोय
तेव्हा दुधाची तहान ताकावर भागवुन घेतो इतकेच.
दाभोळकरांचा धंदा.... आपल्या
दाभोळकरांचा धंदा.... आपल्या सगळ्या कर्मचार्याना देशोदेशी फिरायला पाठवणे.. आणि त्यासाठी स्वतः पॅकेज- टूर आखत बसणे... त्यामुळे त्यांच्या कंपनीत कुणीच नसतं म्ह्णून ते स्वतः अदितीच्या कंपनीत बसून असतात दिवसभर,,
लिंबुकाका पुण्याच्या पेठी
लिंबुकाका पुण्याच्या पेठी भाषेचा अपमान आहे हो हा...
त्यांच्या कंपनीत कुणीच नसतं
त्यांच्या कंपनीत कुणीच नसतं म्ह्णून ते स्वतः अदितीच्या कंपनीत बसून असतात दिवसभर,,>>>
(No subject)
त्यांच्या कंपनीत कुणीच नसतं
त्यांच्या कंपनीत कुणीच नसतं म्ह्णून ते स्वतः अदितीच्या कंपनीत बसून असतात दिवसभर,,>>>

त्यांच्या कंपनीत कुणीच नसतं
त्यांच्या कंपनीत कुणीच नसतं म्ह्णून ते स्वतः अदितीच्या कंपनीत बसून असतात दिवसभर,,>>>:फिदी: आणी वरतुन रजनी आणी जूईला पण बसवतात त्या केबीनमध्ये.
जयच्या खान्द्यावर रजनीचे ओझे, रजनीचे ओझे
आज काहीतरी अजब घडणारे. जय वैतागतो आणी त्याच वेळेस दाभोळकर येतात. काहीतरी बोलतात, मदत वगैरे करु का. हा येडा जय एकदाच त्या जुई आणी रजनीला ठणकावुन का नाही सान्गत की माझ्यावर लाइन मारु नका, मी लायसेन्सधरी आहे. ( दिसत नसले म्हणून काय झाले) का मी नाही त्यातला, बोल्ट लावा आतला असे त्याला करायचे आहे? तरी तो साई वेगवेगळ्या प्रकारे बोलुन सुचवतो, पण हे ध्यान काही सुधरत नाही.
Pages