मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता त्यालाच साकड घालायची वेळ आलीय म्हणुन आणलय त्याला >> तो तरी काय करणार बिचारा त्यांच्याकडे पण 'का रे दुरावा' हीच स्थिति आहे ...सगळी कोठारे कृपा दुसर काय Happy

अगदी हेच लिहायला आले मी श्रध्दा. तोच बिचारा दोन बायकांत अडकलाय, त्याला त्याचा प्रॉब्लेम सोडवता येईना, मै इधर जाऊ या उधर जाऊ. तो काय मदत करणार.

बोला अहंकारा सदानंदाचा येळकोट>>
हे मी सोड अहंकारा असं आइकयचे....आणि अर्थ पण लावलेला...अहंकारला सोडा आणि खंडोचाचं नाव घ्या

या मालिकेत आधी 'प्रेझेंटेशन' हा कीवर्ड होता, तो आता बदलून 'डिटेल्स' झाला आहे का? दर ५ वाक्यांनंतर एका वाक्यात हा शब्द ऐकू येतो.
एवढे मोठे उद्योगपती दाभोळकर सदान् कदा देव टूर्समध्ये पडिक असतात. बिझनेसमध्ये तोटा झाला तर ते खापर जयच्या माथी फोडणार की गट्टूच्या?
जयला बोनस आणि इन्सेंटिव्ज मिळताहेत तर अदितीचा वॉर्डरोब बदला आता.

सोडा अहंकारा च असणार ते. बोला कसं असणार Proud
मला काहीही ऐकू येतं Wink

दक्षुतै, मला ही य वेळा 'पावमे तोडा' ऐकू आलंय. मी कन्फ्युज्ड

श्र Rofl

मला तर त्या संवाद लेखकाचं कौतुकच वाटलं. पासपोर्ट, व्हिसा, एअर टिकेट्स, खाण्याचे प्रेअफरन्सेस, हॉटेल बुकिंग, टॅक्सी बुकिंग, कॅन्सलेशन्स, कॉन्फरन्स नक्की कशाची आहे, कोण बोलणार आहे, डेलिगेट्सनी नक्की काय करणं अपेक्षित आहे यातल्या कशावरही ठोस न बोलता त्याने कॉन्फरन्स थेट यशस्वीच करून दाखवली! Proud मलाही असं विनाकटकटीचं 'प्रोजेक्ट' करायला आवडेल!

- ते सगळे 'डिटेल्स' कॉन्फिडेन्शियल असतील.
- किंवा ते सगळे 'डिटेल्स' जयला (त्याच्या नशीबाने!) मिळाले असतील.
- किंवा हे 'डिटेल्स' प्रेक्षकांना दाखवायला/ समजायला हवेत असं नाही, त्यांच्यापर्यंत फक्त आणि फक्त जय दाभोळकरांमधल्या संघर्षाचे 'डिटेल्स' पोचले पाहिजेत.
- कोण बोलणार आहे, डेलिगेट्सनी नक्की काय करणं अपेक्षित आहे>> हे डिटेल्स टूरकर्‍यांना कशाला हवेत? Proud

हे घ्या जय मल्हारचं टायटल साँग.

जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…

हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…

अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी,

देव गेले जेजुरा निळा घोडा…

पाव मे तोडा… कमरी करगोटा,

बेंबी हिर, मस्तकी तुरा…

खोबर्‍याचा कुटका.. भंडार्‍याचा भडका
बोल अहंकरा, सदानंदाचा येळकोट…

जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा, जय देवा जय शिव मार्तंडा…

हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…

सदानंदाचा येळकोट

येळकोट येळकोट जय मल्हार…

हो बै मंजूडी. ते सर्व 'डिटेल्स' कॉन्फिडेन्शियलच असतील. आपण त्या 'डिटेल्स'मध्ये पडायला नकोच (असा विचार लेखकानेही केला असावा!)

डीटेल्स Lol
आदितीचा वॉर्डरोब व केसांची चप्पट्ट वळण यावर जरी दाभोळकरांनी एक कॉन्फरन्स हातकणंगल्याला घेतली आणि जयने सर्व 'डीटेल्स' वापरून 'सक्सेसफुल' करून आदितीलाच 'प्रेझेंटेशन' मधे दाखवलं तर "हो! मी का रे दुरावा बघते." असं माझ्या फेसबूक स्टेटस वर लिहेन!
Proud

आशूडी, तू शब्दखुणांमध्ये ’कूटप्रश्न’ अजाणता टाकला असशील पण आता त्याचं महत्त्व समजतंय Lol

काय ती दूरदृष्टी तुला! मान गए! Proud

त्या हातकणंगल्याच्या कॉन्फरन्सला कोण कोण जाणार? शोभडी? काकू? सारीका? रजनी? जूई? नंदिनी? आणि ती कोण सुंदर साड्या आणि त्यावर सुरेख जंजे घालणारी कलिग (नेमकं नाव आठवात नाहीये)?

हातकणंगल्याला जायचं तर नंदिनी म्हणेल तिथल्या देवस्थानांची यादी करते.
शोभडी म्हणेल, मला कॉन्फरन्ससाठी नवीन कपडे आणि दागिने हवेत. अदिती, आणून दे.
रजनी म्हणेल, जय! हातकणंगल्याला आपण बाईकवरून जाऊया.
जूई म्हणेल, जय! मला यायचंय तुझ्याबरोबर, आपण हेलिकॉप्टरने जाऊया.
अदिती म्हणेल, मला हातगाडी पण चालेल.

हां, येस्स!!
डबे घासता घासता सिरीयल ऐकली की अस्से गोंधळ होतात बै! काऽहीऽलक्षात राहत नाही बघ... इतकं काम पडतं गं बै मला...मलाच करावं लागतं ना सगळं!!

अदिती, रजनी आणी जुई या तिघीना अनुक्रमे बाईक, हेलीकॉप्टर व हातगाडीवरुन ढकलत नेणारा जय डोळ्यासमोर आला.:हहगलो:

मंजू पेटलीये! हाहा>> ही सिरीयल बघायची म्हणून काल नवरा डेंटीस्टकडची सिटींग १५ मिनिटात उरकून नऊ वाजता घरी आला. ते उट्टं काढतेय मी.

Lol
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा…बोल अहंकरा, सदानंदाचा येळकोट…> अर्थ कळला नाही याचा.

Pages