Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग त्या जयच्या लॅपटॉपवर कैतरी
अग त्या जयच्या लॅपटॉपवर कैतरी सांडतय (कॉफी असेल, नैतरी त्या हापिसात सांडण्यासारखा द्रव पदार्थ तो एकच आहे, बाकी ग्लु वगैरे काही नाही दिसत कधी) रजनीच्या हातुन आणि दाभोळकरांना अशी शंका येतेय की त्याने काम टाळण्यासाठी मुद्दाम अस केलय..
अस आहे होय. पण मला वाटत कदम
अस आहे होय. पण मला वाटत कदम काका ( तावडे) पण त्याच केबीनमध्ये असतात बहुतेक. आज पाहील्यावर कळेल. पण रजनीने हे उद्योग केले असतील तर जयने तिच्यासकट जुईला पण बाहेर काढलेली बरी.
बाकी वर विचारलेले प्रश्न ( प्रोफेशनल) निर्मात्याला पडतच नसतात, त्यातुन ते कथालेखकाला तरी आधी कळलेत का हे वादाचे मुद्दे.
साई काय म्हणतोय, त्याचा सीन
साई काय म्हणतोय, त्याचा सीन बघावासा वाटतो बास. पण मी सर्फिंग करते तेव्हा नेमका तो नसतो. त्यामुळे हल्ली फिरकलेच नाही तिथे. मला लई आवडतो तो.
अस आहे होय. >>> मी जेवण
अस आहे होय. >>> मी जेवण झाल्यावर उष्टी खरकटी काढत बघितलय त्यामुळे खात्री नाही पण लॅपटॉपवर कैतरी सांडतय हे नक्की दाभोळकरांचे डायलॉग्ज उडत उडत ऐकलेत
तो साई.. "होणार सून.." वाल्या
तो साई.. "होणार सून.." वाल्या सुनिता चा भाऊ असावा.
काल ही बया वडिल उपाशी राहिले
काल ही बया वडिल उपाशी राहिले म्हणून फुरंगटून बसली होती. समोर ताट असून अन्न गार झालं म्हणून जय ला जबाबदार धरत होती.
की कुणी सोबतीला नाही म्हणून जेवणारच नाहीत.
वीट च आला मला. तरी बरं कालचा एपिसोड चुकून पाहिला. एरवी माझी आणि यांची वेळ जमत नाही. 
दाभोळकर कुक्कुलं बाळेत का?
आणि अदिती तर काय लहानच्चे कारण त्यापेक्षा इतरही महत्वाच्या गोष्टी असतात आयुष्यात करण्याजोग्या हे तिला ठाऊक नाही बहुतेक.
अरे यार, काय फालतूगिरी चालूय
अरे यार, काय फालतूगिरी चालूय या शिरेलीत.
एक काॅन्फरन्स काय यशस्वी झाली साॅरी सुरु झाली सगळे तिकडून फोन करकरून यांना शुभेच्छा द्यायला लागले. 
देव टुर्स मध्ये नक्की काय काम करतात? काॅन्फरस पण अरेंज करतात का?
निधी, एकदा भेट देउन या ना देव
निधी, एकदा भेट देउन या ना देव टुर्स च्या ऑफिसात. आम्हालाही कळेल.
या सिरेलीच शिर्षकगीत फार छान
या सिरेलीच शिर्षकगीत फार छान आहे. काल त्या किर्ती किल्लेदारने चला हवा येवु द्या मधे गायल. बाकी गाणं जितकं छान तितकीच बेकार सिरियल आहे हे नक्की.
शुभे, मला 'का रे
शुभे, मला 'का रे दुराआआवाआआआआआ' ह्याशिवाय एकही शब्द माहित नाही गाण्यातला
अग मला पण कालच कळ्ळ. पण जे
अग मला पण कालच कळ्ळ. पण जे काय गायलय त्या गायिकेने ते अप्रतिम आहे.
ह्म्म. पण तरीही कॅची नाही
ह्म्म. पण तरीही कॅची नाही वाटलं मला ते. जसं माझं फेव्हरीट आभाळ्माया. रोज रोज कसरत तारेवरची, बागड बुम नगारा पण एकवेळ कॅची आहे.
अग ते गाणं नाही ग त्या
अग ते गाणं नाही ग त्या गायिकेचा आवाज आणि चढौतार गाण्यातले.
गाण्याचे शब्द गद्यात आहेत पण गायलय मस्त. म्हणजे मला आवडल. असो
आभाळमाया, अवघाची संसार, वादळवाट यांच्या शिर्षकगीतांना तोड नाही. देवकी पंडीतचा आवाज
ओह ओके
ओह ओके
तुज्यासवे असुनी तुज्याविना
तुज्यासवे असुनी
तुज्याविना जगायचे रे कसे ?
अनोळखी नसुनी
अनोळखी मानयाचे कसे ?
अन्तरात् राहुणी अन्तर कसे नाते ?
नाते कोणते जपु अन कसे ?
हसता हसता आसु टीपणे
तुज्यासवे ......
तुज्याविना……
नकोसा तरी हवा
का रे दुरावा असा……
का रे दुरावा हा ……
थोडा विसावा ……
का रे दुरावा
का रे दुरावा
घ्या, रियाने अख्ख गाणंच दिलं
घ्या, रियाने अख्ख गाणंच दिलं लिहून.
बागड बुम नगारा >>
अगं ए, ते अगडबंब नगारा आहे ना.. 
अगं ए, ते अगडबंब नगारा आहे
अगं ए, ते अगडबंब नगारा आहे ना..>>>>>>>>>>>> हो का?

बरं ते पुढे देव गेले जेजुरा
बरं ते पुढे देव गेले जेजुरा नेला घोडा आहे की निळा घोडा आहे?
निळा घोडा आहे ते. देवाने
निळा घोडा आहे ते.
देवाने जेजूरीला नेला घोडा असा अर्थ पण लागला असेल ना गाण्याचा.
देवाने जेजूरीला नेला घोडा असा
देवाने जेजूरीला नेला घोडा असा अर्थ पण लागला असेल ना गाण्याचा. >>>> हो.
पण खंडोबाचा घोडा निळा होता?
पण खंडोबाचा घोडा निळा होता?>>
पण खंडोबाचा घोडा निळा होता?>> हो. अशी समजूत आहे
कोणीतरी तेही गाणं पूर्ण लिहा.
गुब्बे हो. काल छान गायलं
गुब्बे हो. काल छान गायलं किर्तीने ते गाणं आणि देवा तुझ्या गाभा-याला उंबराच नाही हेपण छान गायलं, आवाज छान वाटला मला तिचा काल.
निधी , मला आवडतं ते गाणं
निधी , मला आवडतं ते गाणं
घ्या -
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा
हरी मदन मल्हारी तुची प्रचंडा
अगड धुम/ अगडबंब (असं कसं असेल :अओ:) नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा
पावली तोडा कमरी करगोटा
बेंबी हिरा मस्तकी तुरा
खोबर्याचा तुकडा
भंडार्याचा भडका
बोला अहंकारा सदानंदाचा येळकोट
हे मला ऐकू आलेलं.
खंडोबाचे नवरात्र उठताना तळी
खंडोबाचे नवरात्र उठताना तळी उचलताना म्हणतात हे सगळे मिळून. त्याला चाल व संगीत देऊन फार मस्त सादर केलंय.
हो का आशू? मी आधी ऐकलेलं हे
हो का आशू?
मी आधी ऐकलेलं हे खंडोबाच्या आरतीतले शब्द आहेत
संगितामुळे मस्त वाटतंयच पण शब्दही छान आहेत
हरी मदन मल्हारी आणि बेंबी
हरी मदन मल्हारी आणि बेंबी हिरा हे कळालंच नव्हतं
मी तर पाव में तोडा कमरी
मी तर पाव में तोडा कमरी करदोटा
ऐकलं.
पुढचं ऐकू येत नसे.
अगडबंब (असं कसं असेल )>> अगं,
अगडबंब (असं कसं असेल )>> अगं, अगडबंब म्हणजे खुप मोठा.
मला पाउली तोडा कमरी करबटा असं
मला पाउली तोडा कमरी करबटा असं ऐकु यायचं.
का रे दुरावा मध्ये खंडोबा ??
का रे दुरावा मध्ये खंडोबा ??
...
Pages