पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंखचटणी - दहीवडे, चाट प्रकार, तिखट कचोरीसोबत किंवा भेळेत वापरता येईल. इतर काही खपवणूक युक्ती असल्यास कल्पना नाही.

http://articles.mercola.com/sites/articles/archive/2015/03/21/apple-cide...

http://hair.allwomenstalk.com/recipes-for-homemade-hair-growth-treatment...

https://en.wikipedia.org/wiki/Apple_cider_vinegar

नन्दिनी, मी सहज वाचले तर हे वरचे सापडले. मी पण हे व्हिनेगर कधी वापरलेले नाहीये. पण याच्या रेसेपीज दिसेनात कुठे.

नंदिनी

अ‍ॅपलसायडर व्हिनेगर लिंबाऐवजी वापरता येईल. उदा- पनीर करायला, किंवा कुठल्याही सॅलड ड्रेसिंगसाठी.
किंवा त्यात पाचपट पाणी घालून केस धुवायलाही.

सोपे सॅलड ड्रेसिंग
अ‍ॅपलसायडर व्हिनेगर + मिरपूड + ऑलिव्ह ऑईल + थोडेसे ओरेगॅनो हाताने चुरुन + मीठ + साखर + बेसिलची दोन तिन पानं चिरुन

सोपा हेअर पॅक
अ‍ॅपलसायडर व्हिनेगर + नारळाचे दूध + ऑलिव्ह ऑईल + कोकोनट ऑईल. हमखास आणि उत्तम हेअर पॅक आहे हा.

नंदु, हे व्हिनेगर सॅलड ड्रेसिंगमध्ये वापरतात, तसेच मीट कूक करतांनापण. वापरतात. सॅलदला फ्रुटी फ्लेवर द्यायला, रोस्टीबरोबर डिप म्हणून (थिक असेल तर) देता येते. कूकिंग़ करून पाहिले नसल्याने काही सांगु शकत नाही. काही कूकरी शोज मधे एखादा कप वगेरे वापरतांना पाहीलयं.

रीया, रूचिराचे पुस्तक घे. Proud

बूंदी रायता : दही घे, त्यात बुंदी घाल. मिठ, तिखट चाट मसाला पुदिना कोथींबडाळ्वगैरे आवडीनुसार घाल आणि खा.

रीया, मी बुंदी रायता करताना पातळ दह्यात हलदीरामची तिखट-मीठ असलेली बुंदी, बारीक चिरलेला कांदा, मीठ, जीर्‍याची पुड, कोथिंबीर आणि किंचीतशी साखर घालते. (बर्‍याचदा साधं मीठ थोडं आणि थोडं आमच्या साबांनी बरेच जिन्नस घालून केलेलं मीठ असं एकत्र करून घालते)

एपल सायडर नुसते रोज प्यालो मध टाकून तरी मस्त.

पोट साफ,;)

धन्यवाद चिख चटणी उपाय पण ती दही वडे , चाट करूनच उरलीय.
फ्रीज मधेच ठेवते.

बुंदी रायता करताना बुंदी आधी एकदा पाण्यात टाकून निथळून मग दह्यात घालायची म्हणजे दही सगळं शोषलं जात नाही. मिनीची युक्ती आहे ही.

बुंदी रायत्याचं माझं आवडतं व्हेरिएशन म्हणजे तिखटमीठवाली बुंदी अगोदर पाण्यात किंवा ताकात भिजवायची. दही घुसळून त्यात पुदिना चटणी / हिरव्या मिरचीचा थोडासा खर्डा, चाट मसाला, चवीनुसार मीठ / सैंधव, जिरेपूड घालायचे. स्मूथ होईपर्यंत मिक्स करायचे. त्यात भिजलेली बुंदी घालायची किंवा बुंदीत हे दही ओतायचे. अलगद हाताने मिक्स करायचे. बुंदीबरोबर काहीवेळा एक मसालाही येतो छोट्या पाकिटात. तो किंचितसा भुरभुरायचा. बुंदी रायते फ्रीजात ठेवायचे. गार सर्व्ह करायचे.

सिंडी, अकु तुम्ही बुंदी पाण्यात भिजावायची म्हणताय म्हणजे मऊ होवू द्यायची का? सॉरी अगदीच तो हा प्रश्न असेल तर.

बुन्दी डायरेक्ट द।यात भिजवल की काहीवेळाने फार गचका गोळा होतो( पाणि घातल की होत बरोबर काय ते) तस होवू न देता पटकन मुरलेला रायता करायचा असेल तर आधी कोमट पाण्यात बुन्दी घालायची.

सीमा, मी बुंदी मऊसर होऊ देते. फार पाणी नाही घालायचं. बुंदी जेमतेम भिजेल इतपतच. मग गचका गोळा नाही होत. घरी ज्येना असल्यामुळे त्यांना रायत्यातली बुंदी कुरकुरीत नको वाटते.

बुंदी पाण्यातून लगेच गाळणीत काढली की गिचका होत नाही.
चिख चटणी - आमटीत वा चिंचवणी/ गुळवणी/चिंचेच सार मध्ये खपेल....

रोचीन, १६ वेगवेगळे पदार्थ आहेत. मी मागे इथे कुणालातरी (अरुंधती किंवा शैलजाला) लिस्ट दिली होती.
आता मला आठ्वत नाहित सगळे घटक - साधे मीठ, खडे मीठ, सैंधव, जीरे, मीरे, सुकवलेला पुदिना, सुकवलेली कोथिंबीर इतकेच पदार्थ आठवत आहेत.
परत एकदा साबांना विचारून सांगते.

मला तम्बिटाच्या लाडवाची रेसिपी हवी आहे.. डाळे न तांदूळ दोन्ही प्रकारची...
कोणाला माहित असेल तर नीट प्रमाणासकट टाका ना ईथे..

अकु, मंजुताई,प्राजक्ता धन्यवाद. करून बघते आणि सांगते. अज्जिब्बात नीट न जमलेला रायता आहे हा माझा.

आमची बुंदी रायत्याची पद्धत :

दहयात पाणी, मीठ आणि थोडीशी साखर घालून नीट फेटावे. त्यात पाणीपुरी मसाला/ जलजिरा मसाला घालून पुन्हा हलवावे.
एका पातेल्यात पाण्याला उकळी आणून गॅस बंद करायचा आणि त्यात बुंदी घालून झाकण ठेवणे. 2 मिनिटाने चहाच्या किंवा तत्सम बारीक गाळणीने बुंदी गाळावी आणि चमच्याच्या पाठीने हलकेच दाबावे. असे केल्याने जास्तीचे पाणी निघून जाते.ही बुंदी दहयात घालावी.हा राइता serving bowl मध्ये ठेवल्यावर वरून जिरे पाऊडर आणि लाल तिखट घालावे.

खारी बुंदी मी डायरेक्ट जाडसर ताकात टाकते, जेवायला बसायच्या ५ मिनिटं आधी आणि त्यात तिखट, जिरे, चाट मसाला टाकते, कधी कोथिंबीरही आणि कालवते.

Pages