निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, साधना - मी फोटोसोबत, शास्त्रीय नावाच्या पाट्या होत्या, त्यांचे पण फोटो काढलेत. आता सवडीने टाकतो.

आणि जिप्स्या जिप्स्या काय म्हणताय...

सान्वीचे बाबा म्हणा Happy

>>>>ओळखा पाहू..>>>>>आसनगाव जवळचा माहुली ??>>>> खरतर मलाच नाही माहित!! Blush पण बहुतेक हेच असावे... इगतपुरीकडून ठाण्याकडे येताना हायवेवर दिसलेले दृश्य... काय मस्त कोरले आहेत डोंगर! आणि त्यात सूर्याचा छायाप्रकाशाचा खेळ! निसर्गाची किमया!!

पावसातल Mordor डोळा मारा खो खो>>> हे mordor काय?

आणि हा वाटेवरला

Oh! Tina I haven't read or even seen lord of the rings!
I thought some place your side near yavatmal Happy

Biggrin

नै... मी खरचं जिथं तिथं विदर्भ यवतमाळ अस नै करत..
पण मला सुद्धा आजकाल मॉरडॉर तिकडच होत कि काय अस वाटायला लागलय Lol Proud

फोटो छान, आवडला, पण मला आवडत नाहीत रायआवळे. मला नेहेमीचे आवळे खूप आवडतात. बहिणीला खूप आवडतात रायआवळे.

मामी / साधना.. मी त्या फुलाचे नाच बघितले. मॅग्नेलियाच आहे. पण मामी म्हणतेय ते निष्पर्ण झाड वेगळे ( त्याचा फोटो बी ने दिला होता ) आणखी एक मोठ्या फुलाचे झाड असते, त्याचा फोटो आर्च ने दिला होता. ( मी पण ते झाड न्यू झीलंदला बघितले होते. मी पण फोटो दिला असणार ! )

दिनेश, मॅग्नोलियासी कुळात २०० च्या वर प्रकार आहेत. फुलांपानांमध्ये फार थोडा फरक आहे, पण सगळी फुले खुप मोठ्ठी असतात आणि पाने डार्क हिरवी असतात. काही फुले सुगंधी तर काही बिनवासाची. त्यामुळे तुम्ही आणि इतरांनी पाहिलेले सगळे ब्रॉड सेन्सने मॅग्नोलियाच पण थोडा थोडा फरक असलेले.

या निष्पर्ण मेग्नेलियाच्या बिया, एका उत्खननात जपानमधे सापडल्या होत्या. त्या रुजल्या आणि त्याला फुले देखील आली होती. अटेंनबरो साहेबांनीच दाखवले होते ते.

धन्स अन्जु ताई
त्या सुपलीत कोकीळेची प्राण प्रतिष्ठा केली होती तीळ आणि साखर भरुन (कोकिळा व्रत)
तो मुसान्डा आहे का? सुंदरच आहे

Pages