
रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
 " वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "  या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन  येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
 .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
 .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण  आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही.. 
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
 
 
अतिशय सुंदर फोटो.
अतिशय सुंदर फोटो.
निगकर्स, प्लिज हेल्प. मी दोन
निगकर्स, प्लिज हेल्प. मी दोन महिन्यापूर्वी ३-४ रोपे बाल्कनीत लावली होती. त्यातल्या २ जास्वंदीच्या रोपांवर लेडीबग्ज सारखे काळे कीडे आले आहेत. त्यांनी दोन्ही रोपांची वाट लावली. सध्या मी कीड लागलेली बरीचशी पाने काढून टाकली आहेत. कुठले औषध मारावे लागेल का? प्लिज सांगा. मी बिगीनर आहे या सगळ्यात.
आणि हे किडे फक्त जास्वंदीवरच आले. बाकी शेजारच्या रोपांवर कसे नाही गेले ?
लिक्विड सोपचे अगदी सौम्य
लिक्विड सोपचे अगदी सौम्य द्रावण करून फवारा, नक्की उपयोग होईल. हींग, हळदीचे द्रावणही वापरता येईल. हे सतत म्हणजे किड जाईपर्यंत करावे लागेल.
मस्त टीप दिनेशदा.. आता अजुन
मस्त टीप दिनेशदा..
आता अजुन माझा पण एक प्रश्न..
जास्वंदाला माकोडे भरपुर लागतात आणि सोबत पांढरं काही तरी असत..काय मला नक्की सांगता नै येत आहे. बुरशी नै म्हणता येईल चुन्यासारखं असत काही तरी पण त्यामुळे झाडाची वाढ खुंटून जाते आणि फुल फुलण्यापूर्वीच गळून जातात नै तर खुरडल्यासारखे उगवतात यावर सुद्धा उपाय सुचवा..मी माझ्या घरचे बरेच झाड उपडून फेकलेत यामुळं. आणि हि किड कि काय ते अगदी मुळापर्यंत जाऊन पोहचलेली असते
सायली, माहितेय कोकिळा व्रत.
सायली, माहितेय कोकिळा व्रत. आई पूर्वी करायची.
कळस, फोटो खूप गोड पाने आणि फुल दोघांचाही.
गावाहून सोनटक्का तीन
गावाहून सोनटक्का तीन वर्षापूर्वी आणला, सर्व रोपे सुकली.
एक वर्षापूर्वी एका हॉटेलात खूप सोनटक्का लावला होता आजूबाजूला. तिथे आम्ही जातो बऱ्याचदा तर त्यांना विचारले द्याल का रोपे, त्यांनी आनंदाने दिली. मी बऱ्याच कुंडीत लावली रोपे. बहिणीकडे फुले यायची माझ्याकडे नाही. एका कुंडीत मात्र पाऊण महिन्यापूर्वी बारीक कणीस दिसायला लागले, मी रोज बघायचे. आज अखेर एक फुल दिसतंय (किंचित उमललंय).
नवरा म्हणाला येउदे, तुझी मेहेनत फळाला. आज मी खुश. कुंड्या लहान आहेत.
मला सोनटक्का खुप आवडतो पण
मला सोनटक्का खुप आवडतो
पण सहजा सहजी नाही मिळत
रिया एकाच कुंडीतील रोपाला
रिया
एकाच कुंडीतील रोपाला आलेय, बाकी सुकतायेत. :(.
येईल गं सगळ्या
येईल गं सगळ्या रोपांना.
उन्हात आहे का ते रोप? उन्हाने फरक पडतो का?
जाणकार मंडळींनो प्लिज वाचवा त्या रोपांना. मला सोनटक्का खुप आवडतो.
नाही ऊन थोडा वेळ असतं. अग
नाही ऊन थोडा वेळ असतं.
अग जागुने सांगितलं इथे कि कुंड्या लहान असल्या की हा प्रॉब्लेम येतो. मोठ्या हव्यात पण माझं ग्रील लहान आहे. बहिणीकडे मोठ्या आहेत त्यामुळे तिला हा प्रॉब्लेम येत नाही.
थँक्स दिनेशदा. प्रयोग करून
थँक्स दिनेशदा. प्रयोग करून बघते.
टीना, त्यावर पण तोच उपाय आहे.
टीना, त्यावर पण तोच उपाय आहे. द्रावण मात्र अगदी सोम्य करायचे, म्हणजे झाडाला त्रास होत नाही.
अन्जू, कुंडीतली माती घट्ट झालीय का ? ती मोकळी करायला हवी. रोपांची गर्दी झाली असेल तर ती पण कमी करायला हवीत. या दिवसात सोनटक्का भरभरून फुलेल.
मी खाली सोसायटीत ती रोपे
मी खाली सोसायटीत ती रोपे लावायचा विचार करतेय. आता खाली रान साफ केलेय पण काही ठिकाणी लाद्या टाकणार आहेत. बघुया.
अभिनंदन अन्जु ताई.. मी समजु
अभिनंदन अन्जु ताई.. मी समजु शकते तुझा आनंद.. मी सुद्धा सोनटक्याच्या फुलांच्या प्रतिक्षेत आहे ग..
रंग कोणता आहे, फोटो प्लीज..
दिनेश दा मस्त उपाय सांगीतलात..
फोटो मला नाही टाकता येत
फोटो मला नाही टाकता येत इथे.
पांढरा रंग. कणीस दिसल्यापासून मला तुझी आठवण येतेय सायली.
फोटो रात्री किंवा उद्या
फोटो रात्री किंवा उद्या नवऱ्याच्या मदतीने टाकेन.
सायली तुझ्या मेहेनातीला पण नक्की फळ येईल. शुभेच्छा.
टीना, जवळ नर्सरी असेल तर
टीना, जवळ नर्सरी असेल तर त्याच्याकडे जाऊन जास्वंदीचा प्रॉब्लेम सांग. त्यांच्याकडे झाडांचा शॅम्पू आणि कसलेसे क्रिस्टल्स असतात त्याने तो पांढरा रोग जातो. दर दीड दोन महिन्यांनी ते फवारावे लागते.
कळस, अप्रतिम फोटो. अंजु ,
कळस, अप्रतिम फोटो.
अंजु , सोनटक्क्यासाठी खरचं अभिनंदन. मजा आली असेल ना रोज थोड थोड वाढणार कणीस बघायला ? फोटो टाक.
हो हेमाताई पण फारच लहान कणीस
हो हेमाताई पण फारच लहान कणीस आहे आणि एकच फुल दिसतंय, नवसासायाचे. पण नक्कीच खुश आहे मी. थांकू.
नवरा एरवी कुंड्याकडे ढुंकूनही पाहत नाही, त्याला ते कोकणातल्यासारखं आजूबाजूला मनसोक्त फुले, फळे वाढताना बघायची सवय पण कणीस बघितल्यावर आनंद झाला त्याला म्हणाला तुझ्या मेहेनतीला फळ मिळूदे, फुल येऊदे. .
 .
असो मी आवरते माझं पुराण.
माझी पण आठवण काढ गं
माझी पण आठवण काढ गं
रिया मला सांगतेयस का, नक्की
रिया मला सांगतेयस का, नक्की काढेन :).
अग सायलीची आणि माझी दोन तीनदा न येणाऱ्या सोनटक्कयावर चर्चा झाली होती, इथेच. म्हणून मला तिची आठवण येत होती.
अन्जू, पांढरा सोनटक्का जरा
अन्जू, पांढरा सोनटक्का जरा कमीच दिसतो, पिवळा मात्र खूप असतो सगळीकडे.. माझ्यामते तो लहान कुंडीत लावू नये कारण तो खूप वाढतो. आमच्या घरी ऑलमोस्ट ६ ते ७ फूटाची झुडपं आहेत सोनटक्क्यांची आणि त्यांना प्रचंड बहर येतो.. त्यामुळे कुंडीपेक्षा जमीनच मानवते त्याला..
अन्जु ताई माझी आठवण आली.. आणि
अन्जु ताई माझी आठवण आली..:)
आणि तु आणि मी समदुख्खी बर्का... माझ्या नवर्याला अजुन शेवंती आणि झेंडु मधला फरक कळत नाही..
हो आत्मधून. मी पिवळा सोनटक्का
हो आत्मधून.
मी पिवळा सोनटक्का इथेच बघितला फोटोत. पांढरा बऱ्याच ठिकाणी बघितलाय.
सायली . माझ्या नवऱ्याला ओळखता
सायली :D.
माझ्या नवऱ्याला ओळखता येतात फुले पण त्याला कुंडीत बघणे मानवत नाही, पण काय करणार. शहरात अशीच हौस करायला लागते. ज्यांचे बंगले असतील तिथे ठीक.
माझ्या नवर्याला अजुन शेवंती
माझ्या नवर्याला अजुन शेवंती आणि झेंडु मधला फरक कळत नाही.. >>>> आमच्या कडे तर सगळाचं आनंदी आनंद आहे या बाबतीत
हो तो म्हणतो चपटा झेंडु
हो तो म्हणतो चपटा झेंडु आणलाय आणि आपण पिशवी बघावी तर शेवंतीची फुलं असतात..:हहगलो:
Zendu ani shevanti na ka yeu
Zendu ani shevanti na ka yeu olkhayala pan tyala sayali barobbar yete Ki nahi olkhayala( sayali halke ghe)
हेमा ताई
हेमा ताई
हेमाताई दिनेशदा, माती मोकळी
हेमाताई
दिनेशदा, माती मोकळी केली आणि रोपेपण वेगवेगळ्या कुंडीत लावली आहेत आता. आता नाहीये रोपांची गर्दी. रोपं थोडीच आहेत आता.
Pages