निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकीळा पुर्ण काळी असतेना>>>> हो मी पाहिली होती/होता, ती/तो , काळाशार होता. शाळेत वाचलेले की नराच्या
अंगावर ठिपके असतात.आता नीट आठवत नाही.

sontakka1.jpgsontakka2_0.jpgsontakka3.jpgsontakka4.jpg

मला फोटोचं तंत्र अजुनही नाही जमत. सेटींग वगैरे सो सो. माझा आनंद शेअर केला एवढंच कारण ह्या धाग्याने मला खुप आनंद दिला. डोळ्यांना आणि मनाला गारवा दिलाय आणि खुप माहीतीही.

अंजु , मस्त काढले आहेस फोटो. फुल ही किती गोड दिसतेय.आम्हाला ही तुझ्या इतकीच उत्सुकता होती. फोटोंमुळे मजा आली.
रच्याकने, तु फोटो छान काढतेस त्यामुळे काढत रहा आणि शेअर कर.

अंजु , मस्त काढले आहेस फोटो. फुल ही किती गोड दिसतेय.आम्हाला ही तुझ्या इतकीच उत्सुकता होती. फोटोंमुळे मजा आली.
रच्याकने, तु फोटो छान काढतेस त्यामुळे काढत रहा आणि शेअर कर.

माझ्या सो सो फोटोंना मस्त म्हटलंस म्हणून थांकू टीना. पहिले फुल देवीच्या चरणी अर्पण केलं. अनायसे शुक्रवारपण होता.

अन्जू, गोड फूल, छान आहे फोटो Happy

सर्वांना राखीपौर्णिमेच्या खूप सार्‍या शुभेच्छा!!

मला वर्चुअल करंज्या, नारळी भात चाल्तील हाँ... Happy

हो मी पाहिली होती/होता, ती/तो , काळाशार होता. शाळेत वाचलेले की नराच्या
अंगावर ठिपके असतात.आता नीट आठवत नाही.>>>
पांढरे ठिपके असतात.
आपण ऐकतो की कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. पक्के माहित नसले तरी खरे असावे
मी अनेकदा कोकिळेच्या पिल्लाला कावळा भरवत असलेले पाहिलय. फोटो काढता आला नाही अजून. ही पिल्लं लहान असताना अर्धवट अशी ओरडतात की कावळाच वाटावा.

पेशवे एनर्जी पार्क मधे गेली होती तेव्हा हे दिसलं..
नाव काय ?

खाली दिल सुद्धा असेल म्हणा पण त्या पार्क मधे अज्जिब्बात थांबायची सोय नव्हती..
एकहि झाड एकट नव्हत..

टीना, ती पीस लिली आहे. Spathiphyllum हे शास्त्रीय नाव. हे झाड इनडोअर खूप छान वाढतं कारण याला उजेड आणि पाणीसुद्धा अगदी कमी लागतं..

आणि हे कात्रजच्या राजीव गांधी अ‍ॅनिमल पार्क मधल्या तळ्याजवळील किनारेकरी..
यांच पन नाव नै माहीती मला.
फोटो भ्रमणध्वनिचा २ मेगापिक्सेल कॅमेरा Sad

काळ्या-निळ्या रंगाचा, गोड गात्या गळ्याचा जो असतो तो कोकिळ. फोटोत कधीकधी हा खुप डार्क निळ्या रंगाचाही दिसतो. पण मी पाहिलेले सगळे कोकिळ निळी झाक असलेले काळे आणि लालभडक डोळे असलेले आहेत. फक्त ब्रिडींग सिजनमध्येच याला गाता येते. एरवी हा आजुबाजुला असला तरी कळणार नाही. कावळाच वाटतो. डोळ्यांवरुनच ओळखता येतो.

का़ळपट राखाडी रंगाच्या अंगावर पांढरे ठिपके असलेल्या असतात त्या कोकिळाबाई. यांना अजिबात गाता बिता येत नाही. आमच्याकडे असलेल्या कोकिळाबाई सदैव कर्कश आवाजात कावळ्यांशी भांडत असतात. आवाज मात्र मिस्टरांसारखाच मोठा असतो.

माबोवर भरपुर फोटो आहेत दोघांचेही. चटकन मिळत नसतील तर इथे पाहा.

https://en.wikipedia.org/wiki/Asian_koel

https://en.wikipedia.org/wiki/Brood_parasite

ककु फॅमिलीतले बहुतेक लोक स्वतः घरटी न बांधता दुस-यांच्या घरट्यात अंडी घालुन पुढची सगळी जबाबदारी त्यांचा गळ्यात टाकण्यात हुशार आहेत. यात आपले चातक, पावशा इत्यादी मंडळीही येतात. फक्त कावळ्याच्याच नाही तर इतर पक्ष्यांच्या घरट्यातही हे लोक खुशाल अंडी घालतात आणि आधी त्या मुळ घरट्याच्या मालकाची अंडी बाहेर ढकलुन देऊन मग स्वतःची अंडी त्यात घालायची खबरदारीही घेतात. ककु सोडुन इतर काही पक्ष्यांमध्येही ही पद्धत आहे.

मी एक विडीओ पाहिलेला त्यात असेच एका सातभाईच्या घरट्यात कोकिळेने अंडे घातलेले. पिल्लु बाहेर आल्याबरोबर त्याने धडपड करुन घरट्यातले अजुन एक न उबलेले अंडे बाहेर फेकुन दिले. आणि त्यानंतर ती सातभाई मंडळी या पिल्लाला मोठे करायच्या उद्योगाला लागली. काही दिवसातच हे पिल्लु इतके मोठे झाले की ते घरट्यात मावेना. त्याचे आईबाबा त्याच्यापुढे लहान दिसु लागले. तरी हे पिल्लु तोंड उघडुन "मला खायला घाला" म्हणुन आक्रोश करत बसायचे आणि आईबाबा "आपले पिल्लु इतक्यातच आपल्यापेक्षाही मोठे कसे झाले?" असा अजिबात विचार न करता धावपळ करुन याची भुक भागवत बसले.

सध्या आमच्या भागात जी काही कावळे आणि कोकिळांची मारामारी चालु असते त्यावरुन कावळे शहाणे झालेत, आपापल्या घरट्यांवर लक्ष ठेऊन आहेत आणि लवकरच कोकिळांना एकतर कावळ्यांचा नाद सोडुन दुस-या पक्ष्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल किंवा मग स्वतःच घरटी बांधावी लागतील असे वाटतेय. एक कोकिळा कर्कश ओरडत पुढे धावतेय आणि तिच्या मागे दोन कावळे धावताहेत हे दृष्य रोजचेच झालेय.

साधना, छान माहिती..
कोकीळा सोडून इतर पक्षीही दुसऱ्यांच्या घरट्यात अंडी घालतात हे माहितीच नव्हतं..

साधना, छान माहिती..
कोकीळा सोडून इतर पक्षीही दुसऱ्यांच्या घरट्यात अंडी घालतात हे माहितीच नव्हतं.. >> मलापन..

काही दिवसातच हे पिल्लु इतके मोठे झाले की ते घरट्यात मावेना. त्याचे आईबाबा त्याच्यापुढे लहान दिसु लागले. तरी हे पिल्लु तोंड उघडुन "मला खायला घाला" म्हणुन आक्रोश करत बसायचे आणि आईबाबा "आपले पिल्लु इतक्यातच आपल्यापेक्षाही मोठे कसे झाले?" असा अजिबात विचार न करता धावपळ करुन याची भुक भागवत बसले.>> यावर हसू कि रडू तेच कळेना..निसर्गाचा नियम एकीकडे आणि मानवी मनाच्या भावना दुसरीकडे Sad

साधना मस्त दिलीस माहिती.. एकदा एक मिसेस (स्पॉटेड) कोकिळा विचित्र कर्कश्श आवाजात अक्षरशः घाबरवणार्‍या आवाज करणार्‍या काव काव कावळ्यांपासून जीव वाचवत, बाल्कनीतून आमच्या हॉल मधे अवतरली होती..आणी खूप वेळ शॉक मधे असल्यासारखी स्तब्ध बसून होती,खूप घाबरली होती, मग हळू हळू सावरल्यावर दुसर्‍या खोलीच्या खिडकीतून उडून गेली होती.साईझ ने बरीच मोठी होती.
आत्तापर्यन्त एकदाच हे दृष्य अनुभवलेय.. फार थ्रिलिंग होता अनुभव!!

मी पाहिलेय हल्ली कावळे यायलाच देत नाहीत कोकिळांना त्यांच्या घरट्यांच्या आसपास. सतत लक्ष ठेऊन असतात. आपण राणीबागेतही एका झाडावर कावळे आणि कोकिळेचे भांडण पाहिलेले, आठवतेय?

कावळाज हॅव इवॉल्व्ड इट सीम्स Wink

अगा.. मला तर शेवटपर्यन्त कोकिळाच दिसली नव्हती.. उजू ने पॉइंट आऊट केल्यावर ही Proud
मान उंच, वाकडी करून करून दुखायला सुद्धा लागलेली

Pages