निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, हे हिमाचलातले आहेत रस्ते..
आयवी.. काही घरांवर मुद्दाम चढवलेली पाहिलीये.. दिसते छान, उपयोग काय ते माहीत नाही..
हाँ वॉल क्रीपर हा ही ऐकलाय शब्द . Happy

प्रिय मैत्रीण साधना

वाढदिवसा च्या खूप शुभेच्छा!!!

Let your birthday inspire you to acknowledge the happiness you share with all of your friends and family.

Your birthday should be a national holiday. I need a day off. Happy Birthday. Wink

Hawaaon Se Lehrna Hai Toh

Faisle Ka Intzaar Mat Kar

Watan Ki Aabro Salamat Rahe

Tu Apni Parwaah Mat Kar ....

Happy independance day!!!

आमचे पिंपळाचे झाड म्हणजे कावळ्यांची घरटं बांधण्याची लाडकी जागा. येणा-या पावसाळ्याच्या अंदाजाने उलटा हिशोब करुन एप्रिल महिन्याच्या योग्य त्या आठवड्यात ते घरटी बांधायला सुरुवात करतात.

सुरुवातीला कावळीने अंडी घातल्यानंतर खिडकीतून घरट्याकडे बघितलं कि लगेच एक जण घरट्याजवळच्या फांदीजवळ बसणार आणि दुसरा खिडकीजवळच्या फांदीवर येऊन दोघेही माझ्याकडे बघत रहाणार. थोडीशी नापसंतीची आणि इशारयाची कावकाव देखिल करणार.

त्यांना हे जाणवून द्यायचं असायचं कि जसं तुम्ही आमच्या घरट्याकडे बघताय,तसं आम्हीही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत.
हळू हळू माझ्या बघण्याला ते सरावले.पण त्यानंतर Camera घेऊन खिडकीत गेलं आणि Lens घरट्यावर रोखली कि पुन्हा प्रचंड कावकाव करायचे.

पुढे त्यांना माझा निरुपद्रवीपणा जसा कळला तसे ते कॅमे-यालाही हरकत घेईनासे झाले. त्यांच्याशी दोस्ती करण्यासाठी दरम्यानच्या काळात त्यांच्यासाठी कणकेचे गोळे खिडकीच्या सज्जावर ठेवायचा माझा कार्यक्रम चालू असायचा.

हळू हळू माझ्या निरुपद्रवीपणाची त्यांना एवढी खात्री पटली आणि आमच्यात एवढे मैत्र निर्माण झालं कि कावळा कावळी दोघेही माझ्या हातातून कणकेचे गोळे घ्यायला लागले.

कधी वर्तमानपत्र वाचण्याच्या नादात उशीर झाला तर हक्काने मागणी करायला लागले.

पुढे हीच काक दंपती बेडरुमच्या खिडकी ऐवजी हॉलची बाल्कनी,मग हॉल मधिल खुर्ची आणि मग हॉलच्या मध्यभागी कशी येऊन बसायची त्याचे प्रचि २६ व्या भागामध्ये टाकलेले आहेतच.त्या कावळ्याच्या घरटयातलं हे थोडं मोठं झालेलं पिल्लू......

घरटयात कावळ्याची पिल्लं असताना जवळच्या फांदीवर अनवधानाने आलेला हा सरडा.....
Red Neck - Garden Lizard

हा अनाहूत पाहूणा घरट्याजवळ आल्यानंतर कावळा कावळीने थैमान सुरु केले आणि कावळ्याच्या घरट्याबद्दल अज्ञानी असलेला त्या सरड्याने ह्या थैमानामुळे सहाजिकच संरक्षणासाठी असा आक्रमक पवित्रा घेतला.......

पण मग कदाचित कावळ्याच्या न्याय्य रागाची त्याला जाणिव झाली असावी. त्या रागाची दखल घेऊन मग नैतिकतेच्या मुद्दयावरती सरड्याने माघार घेतली आणि तो परतला....
त्या सरड्याच्या दुस-या एका भाऊबंदाचे अन्यत्र टिपलेलं प्रचि...... Forest Colotes

हे एक झाड़ केवळ पान,फळं एवढंच नाही दाखवत तर त्यावर अवलंबून असणारे पक्षी,प्राणी,त्यांचा वावर आणि त्यांचे एकमेकांमधले व्यवहार, नातेसंबंध सर्व काही.
केवळ एक झाड़ जर वर्षानुवर्षे हे आनंदाचे क्षण सतत देत असेल तर असंख्य झाडांनी वेढलेले घर केवढा आनंद देईल.....?
आणि प्रत्यक्ष जंगलामध्ये केलेला वास केवढं आत्मभान आणि निसर्गभान देऊन जाईल......?

निरू, खूप सुंदर भावस्पर्शी पोस्ट!! जोडीला फोटो ही तसेच्,साजेसे,, वाह!!

पिल्लू कावळ्याची चोच आणी डोळे ही चकचकीत शार्प दिस्ताहेत.. एकदम स्मार्ट लुक्स आहेत.. Happy

सरड्यांचे फोटो तर एकापेक्षाएक आलेत.. बरोब्बर भाव टिपलेत..

तुमच्या जवळ असलेल्या कॅमेर्‍याचे डीटेल्स सांगणार का??
वि पु त कळवले तरी चालेल.. मलापण घ्यायचाय नवीन..पण खूप प्रोफेशनल नको, हौशी कलाकाराच्या मर्यादित आवाक्याला साजेसा शोधतेय.. Happy

varshu di karanja ahe ka te
nil mohar barobar ahe..
Niru apratim photo ani tyahun surekh likhan.

@ देवकी..... ते मोठं दिसत असलं तरी आहे पिल्लूच..
घरट्यातून अजून बाहेर न पडलेलं... व्यावहारिक जग न पाहिलेलं, कदाचित क्रूर, निष्ठूर जगाचा अद्याप कोणताही स्पर्श न झालेलं....
बाहेरच्या जगाबद्दल (ते ही फक्त घरट्यातून दिसणार्‍या) प्रचंड कुतूहल, अफाट उत्सुकता.... ते स्मार्ट, बनचुकं दिसणारच नाही.... असच दिसणार.. भोळं, बालिश, कदाचित थोडसं वेडपट...... पण प्रचंड प्रचंड गोड... Perfectly Lovable... कुठल्याही सह्रदय माणसामधले वात्सल्य जागवणारं...
आणि ते असच होतं... दिवसभर उत्सुकतेने इथे तिथे पहाणारं आणि हे पहाताना आपला खुप खुप वेळ खाणारं..
मानही वाकडी करून बघणार मोठ्या कावळ्यासारखी..
पण नजरेत अजिबात बेरकीपणा नाही.. फक्त अपार औत्सुक्य....
(उपसंहार : नंतर त्याचा Typical बेरकी कावळा झाला..)
(पण हाही सृष्टीचाच नियम नाही कां...???)

अंजू, तामण चा फोटो मी इथे टाकला होता.. ही खूप लहान आहेत फुलं, अगदी नाजूक गुलाबी,पांढरी झाक असलेली..
त्यामुळे कन्फ्यूजन है

वर्षु, तामणच आहे हा.

आणि अभिष्टचिंतनाबद्दल माझ्या माबोकर मित्रमैत्रिणींचे अगदी मनापासुन आभार. माझा वाढदिवस माबोकर मित्रमैत्रिणींच्या ऊपस्थितीत साजरा झाला. हा वाढदिवस कायम लक्षात राहिल. Happy

Pages