रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
श्रिखंडी रंगाचा चाफा मस्त
श्रिखंडी रंगाचा चाफा मस्त दिनेशदा.
सायली रंगाला नाव छान दिलंस.
प्राजक्त बघुन नेहेमीच 'टपटप पडती अंगावरती, प्राजक्ताची फुले', आठवतं.
अन्जु ताई:)
अन्जु ताई:)
सायली प्राजक्ताला घेऊन आली..
सायली प्राजक्ताला घेऊन आली.. मस्त फोटो
सायली प्राजक्ताला घेऊन आली.
सायली प्राजक्ताला घेऊन आली. >>> श्या! माझं वाक्य वाया गेलं
खूप दिवसांनी जागूची (प्राजक्ता नाव आहे तीचं) पोस्ट आली आणि लगेच प्राजक्ताचे (फुलांचे) फोटो पण आले म्हणून म्हटलं होतं मी ते.
ओह.. सॉरी माधव. बिचार्या
ओह.. सॉरी माधव. बिचार्या सायलीला वाईट नको वाटायला म्हणून लिहिलं मी
अन्जु तई, माधव आणि आत्मधुन
अन्जु तई, माधव आणि आत्मधुन आभार..
वाईट कशाला वाटेल :), जागुचे फोटो आणि त्यावरची कमेंट नेहमी सुरेखच असतात..
मागे तोरणांत असणार्या
मागे तोरणांत असणार्या धान्यांच्या लोंब्या खिडकीला लावून ठेवल्या होत्या.ते पाहून मार्च-एप्रिलमधे शेजारणीने लोंब्यांचा भलामोठा जुडगा दिला,त्यातल्या लोंब्या ३ खिडक्यांना लटकवून चिमण्यांची ये जा पहात होते.चिमणी आणि चिमणा दोघेच येतात.पण मस्त वाटते.
मेमधे चिमण्यांसाठी एक घर घेतलंय.वाट पहातेय,कधी चिमण्या अंडी घालायला येतील.
त्या घराशेजारीच एक वाटी ,फेव्हीक्वीक लावून ग्रील्मधे बसवलीय.त्यात तांदूळ + बाजरी भरली आहे.त्यांना प्रथम बाजरी नको वाटली,सगळे तांदूळ फस्त केले गेले.एक डोळा आमच्यावर ठेऊन मस्त खात असतात.दहावेळा येतात दाणे टिपायला .
आजच कबूतर आले आणि ती वाटी उलथवून गेले. नंतर लक्ष्मीनारायण (चिमणी चिमणा) आले तर वाटी नाही.नवर्याने परत वाटी बसवली,धान्य घातले ,पाठ वळते तोच चिमण्या आल्या.
खूप छान वाटतेय.कुंडीत भाताचे दाणे रुजले आहेत.बघू नंतर ,त्याला लोंब्या लागतात की नाही.
हो जागू ताई....
हो जागू ताई....
प्राजक्ताच्या फुलांचं बारसं
प्राजक्ताच्या फुलांचं बारसं झालंय= जागु ची फुले
चाफा केव्हढा मोठ्ठा आहे साईझ ने.. श्रीखंडी रंग.. अगदी!!!
सायली , प्राजक्ता ,जागु सगळच
सायली , प्राजक्ता ,जागु सगळच सही.
जागूताई, आज मटा पुरवणीत आलेला
जागूताई, आज मटा पुरवणीत आलेला "रानफुलांच्या वाटेवर" लेख तुमचाच का....?
श्री लंकेत काढलेल्या काही
श्री लंकेत काढलेल्या काही क्लीप्स आताच यू ट्यूबवर अपलोड केल्यात. त्या लिंक्स देतोय..
https://youtu.be/6aNaVA_sG1I Airport to Nuwara Eliya Road
https://youtu.be/Fc4LDx1tRXs Bakers Fall
https://youtu.be/EluKwqP3z4M Kandy Cultural Show 1
https://youtu.be/iEkTec-M1_I Kandy Cultural Show 2
https://youtu.be/oXF1jCebvwU Kandy Cultural Show 3
https://youtu.be/qtXM1VDhMmM Kandy Cultural Show 4
https://youtu.be/3OvZ8V8n7wk Kandy Cultural Show 5
https://youtu.be/j-6mN76D6kU Returning from Norton Plains
https://youtu.be/nnUNwsNIT_A Returning to Kandy
https://youtu.be/F-8quzMcWFk View from top of Sigiriya
https://youtu.be/hj2PE2cHmV4 Way to Sigiriya 1
https://youtu.be/RNVxhd5a73M Way to Sigiriya 2
छोट्या छोट्या आहेत क्लीप्स,
छोट्या छोट्या आहेत क्लीप्स, पटकन बघून होतील. सविस्तर मग लिहीनच.
हो निरूजी माझाच लेख आहे. अरे
हो निरूजी माझाच लेख आहे.
अरे काय जागू-प्राजक्ता चर्चा चालू आहेत इथे
लेख थोड्या वेळात माबोवर टाकते.
अभिनंदन जागु...
अभिनंदन जागु...
हे झाड कुठले? चंद्र कोरी
हे झाड कुठले? चंद्र कोरी सारखी पाने आहेत.. आणि सगळ झाड पिवळ्या तुर्यांनी बहरले आहे..:)



नि.ग. प्रेमिंनी सांगितल्या
नि.ग. प्रेमिंनी सांगितल्या नुसार ऑस्ट्रेलियन बाभुळ.
ओके जागु.. धन्स.. बाभळीचे असे
ओके जागु.. धन्स.. बाभळीचे असे पण रुप असते आजच कळले, ते झाड मात्र काहीसे निलगीरी सारखे वाटत होत..
जागू, ही वेडी बाभूळ नाही
जागू, ही वेडी बाभूळ नाही बहुतेक. मरठी नाव आठवतच नाहि आहे.
Acacia auriculiformis
साधना नी सांगीतल्या प्रमाणे
साधना नी सांगीतल्या प्रमाणे earleaf acacia नावाने सर्च केले तर हेच झाड दिसते आहे.
मराठी नाव अकाशिया ,ऑस्ट्रेलीयन बाभुळ असे दिसत आहे
जागु तु सांगीतल्या प्रमाणे ९व्या भागात चर्चा आहे याची.. आणी शांकली ची ही पोस्ट
>>>>ही ऑस्ट्रेलियन बाभूळ आहे. सध्या खूप फुललीये ही सगळीकडे. डॉ. डहाणूकरांच्या शब्दांत म्हणायचं तर पिवळ्या फुलबाज्याच लागलेल्या असतात!
पिवळ्या फुलबाज्या खुपच आवडला हा शब्द..:)
खुप दिवसांनी आली..रोमात
खुप दिवसांनी आली..रोमात होती..
मस्तच प्रचि आणि माहिती..
जागु तुला झब्बु..
मी निव्वळ फुलात असते या दिवसात म्हणुन आई मला फुलराणी म्हणते

वेड्या आईची वेडी हि माया..
मस्तच ग टीना.. सुवास ईथवर
मस्तच ग टीना.. सुवास ईथवर पोचला बर्का..
ए माझी आई पण मला फुलराणीच म्हणते.. आणि कधी कधी रागावते पण मुलांकडे लक्ष कमी फुलांकडे जास्त म्हणुन..
प्राजक्ताची फुलं कित्ती सुंदर
प्राजक्ताची फुलं कित्ती सुंदर असतात नाही.
मी जाई-जुईच्या फुलांच्या सुवासाबद्दल, गुलाबाच्या देखण्या रुपाबद्दल बरच काही लिहू शकते.
पण प्राजक्त, माझ्यामते तो फक्त अनुभवण्यासाठी आहे., त्याची अनुभती मला शब्दात नाही मांडता येत.
नेहमी प्राजक्त बघुन मी मोहरून, हरखुनच जाते.
मेरी भी रिक्षा, बडे दिनो
मेरी भी रिक्षा, बडे दिनो बाद
http://www.maayboli.com/node/55224
ओके मी पोस्ट दुरुस्त करते.
ओके मी पोस्ट दुरुस्त करते.
टिना
तुझी आई तुला फुलराणी म्हणते ना माझा नवरा फुलवेडी म्हणतो मला.
हे ही तो प्रेमानेच म्हणतो.
earleaf acacia ऐरोली ते
earleaf acacia ऐरोली ते तुर्भे मार्गावर बरीच दिसतात. माझी मैत्रीण फुलांनी वेडी झाली होती पण माझा तिकडे जाण्याचा योग जवळपास महिन्याभराने आला. तोपर्यंत बहर बराच कमी झालेला. आमच्या सोसायटीत एक आहे पण खूप जास्त बहर नाही त्याला. पानं मात्र सुरेख वाटतात.
सध्या एका निर्गुंडीला फुले आली आहेत. तुरे खूपच उंचावर आहेत आणि फुले एकदम छोट्टीशी आहेत. पण जाता येता रस्त्यावर जांभळे ठिपके पडलेले दिसतात. एकदा हातात घेऊन पहिले तर एका नखावर ३-४ मावतील इतकी लहान!
श्रीखंड रंग मस्त! बाकी चित्रे सुरेख!
earleaf acacia / ऑस्ट्रेलियन
earleaf acacia / ऑस्ट्रेलियन बाभुळ छान दिसतं, भराभरा वाढतं म्हणुन खुप ठिकाणी लावलं जातं. पण यामुळे पाण्याची पातळी कमी होते असे ऐकले आहे. शिवाय हे इथले नसल्याने सहसा पक्षी त्यावर घर बांधत नाहीत. अलिकडे एकदा कावळ्याचं घरटं मात्र दिसलं होतं त्यावर. मात्र मधमाश्या खुप असतात या झाडावर.
पण यामुळे पाण्याची पातळी कमी
पण यामुळे पाण्याची पातळी कमी होते असे ऐकले आहे. >>> ओहो! हे धोकादायक आहे!
पण एक संभ्रमीत करणारी गोष्ट...
मागे सातार्याला गाडीने जाताना हायवेला एक प्रकारची झाडे ओळीने लावलेली होती. ड्रायव्हर कोकणातला होता. तो म्हणाला पटापट वाढतात म्हणून कोकणातसुद्धा बर्याच रस्त्यावर लावलेली आहेत. पण ती लावल्यापासून विहिरी आटायला लागल्यात. पण नंतर केरळात जायचा योग आला. तिथे चहाच्या मळ्यात तीच झाडे लावलेली दिसली. तिथला ड्रायव्हर म्हणाला ते झाड आर्द्रता शोषते. पावसात जास्त पाणी शोषून मग उन्हाळ्याच्या दिवसात ते पाणी परत सोडते (म्हणजे काय आणि कसे माहित नाही). त्यामुळे मुद्दाम चहाच्या मळ्यात लावली जातात.
सावली छान माहिती.. vt220
सावली छान माहिती..
vt220 अमेझींग, पण माहिती नाही, जाणकार सांगतील..
दा, यु ट्युब चा प्रोब्लेम आहे, घरी जाऊन लींक बघते.
ऑस्ट्रेलियन अकॅशिया: फोटोत
ऑस्ट्रेलियन अकॅशिया: फोटोत याची जी चंद्रकोरीसारखी पाने दिसत आहेत, ती खरी पाने नसून रुपांतरीत देठ असतात. याचे रोप जेव्हा अगदी लहान असते, त्यावेळी याची संयुक्त पाने पहाता येतात.नंतर ती येत नाहीत.
पटकन वाढणारे म्हणून याची लागवड केली गेली, पण आता त्याला इथले हवामान चांगलेच मानवल्याने नको इतके फोफावले आहे.
Pages