निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

आपलं सोनटक्का या विषयावर आज बोलणं झालं ना. आता यापुढे येईल तुझी आठवण, रिया.

सायली आणि माझी चर्चा होऊन काळ लोटला.

सोबत पांढरं काही तरी असत..>>>>> टीना,त्या किडीला , मावा म्हणतात. दिनेश यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय कर किंवा हळद+ मीठ पाण्यात घालून फवारणी कर.झाड उपटण्यापेक्षा बरंच छाटून टाक.

चपटे झेंडू... मेले हसून हसून!!! ( खरंतर मी हसू नये..पण हे भार्रीये.. माझ्याहीपेक्षा Wink Proud )
ममो.. Rofl

सुप्र

चपटे झेंडू..
मेरे आई पप्पा अँटीक जोडी आहे..तिला झाडांची हौस आहे आणि पप्पांना सुद्धा..
पण त्यांना बस झाडांची हौस आहे..लावतात कस ? काळजी कशी घेतात याबाबत ते अजुनही पहिलीतच आहे..
मग एखाद्या वेळेस आई म्हणणार कि आपल्याकडं गुलाब फारच कमी आहे..अन तेवढ ऐकुन हे एखाद्या दिवशी नर्सरीमधुन भारंभार पाच सहा गुलाबाचे रोप घेऊन येणार..घरी वाफार्‍या मधे लावायला जागा आहे की नै कुंड्या आहे कि नै याच कै घेणदेणं नै Proud
मग आई त्यावर चिडचिड करणार..
एखाद कुंडीतलं मरतुकडं रोप काढायला जाणार नविन गुलाबासाठी तर हे म्हणणार नै नै मी पाणी घालतो त्याला दररोज पण झाडांना उपडू नको..गोंधळ निर्रा Lol
मग परत कुंड्यांसाठी चकरा मारणं नर्सरिमधे .. तोवर त्या झाडांना २ बहार येऊन जाणार..
आम्ही या दोघांचे भांडण , त्रागा लय एंजॉय करतो.. Wink Lol

टिना Lol

देवानं धुणं काढलं आहे ..
जिन्यामधला नवाकोरा घेतलेला गुलाब..

आणि हे शेजारच्यांकडले रायआवळे..
याला म्हणतात डिजी मधनं झुम करुन काढलेला फोटो Proud

वर्षु दी, जागु, टीना Lol :-

टीना मस्तच लिहीलयस!!! आणि फोटो पण भारी..
जागु, गुलाब सुंदर.
नलिनी काय मस्त लींक दीलीस, खजीनाच आहे..

पप्पांची बागकाम नै नै झाडांविषयीची आवड सांगितली तशी कॅमेराबद्दलची पन..
सॅमसंग चा मोबाईल आहे त्यांच्याकडे.. ५ कि ८ मेगापिक्सेल चा कॅमेरा असणार त्यात..
त्या कॅमेराला घेऊन शक्य असेल तिथे पोहचुन ते फोटो काढतात :D.. बागेबद्दल, झाडांबद्दल, पानाफुलांबद्दल थोडक्यात निसर्गाबद्दल खुप कौतुक त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांच्या मोबाईल मधले फोटो मी माझ्या लॅपटॉप मधे टाकते तेव्हा त्या फोल्डर मधे दुनीयाभराचे रंग असतात Wink
क्लीक करायच माहितीए आणि हवी ती गोष्ट गोष्ट स्क्रिनवर दिसली पाहिजे एवढी माफक अपेक्षा असते त्यांची फोटो कॅप्चर करताना आणि हाति मोबाईल नामक खेळणं..मग काय लहानाहून लहान होतात ते कधी कधी..

त्यांच्या कलेक्शन मधले काही प्रचि टाकतेय इथं.. त्यांचे काम म्हणुन त्यांच्या सिग्नेचरचा वॉटरमार्क टाकलाय. Happy

घरच्या बागेमधे केलेली फोटोग्राफीची प्रॅक्टीस.

हा अबोली रंगाचा गुलाब :

मोगरा :

घरचा आयक्झोरा / वेस्ट इंडीयन जॅस्मिन :

घरची अबोली आणि पिवळी लिली. जागु तुझ्यासाठी गं Wink

आणि हे इडीलिंबू Proud . खुप बहार येतो. खुप लिंब लागतात. पन साल एवढी जाड आहे कि हरेकवेळी आम्ही लिंबरस काढणी सोबत घेऊन बसतो Lol .. आणि आकार पन बघा ना..म्हणुन इडीलिंबू ..

अहाहा मस्त फोटो सर्वच.

गोकर्णाला सध्या बहर आहे. माझ्याकडे खूप फुले येतायेत. निळी आणि पांढरी पण पांढरी क्वचित येतात.

माझ्या सोनटक्कयाचं फुल फुललं. मी मोबाईलवरून फोटू काढलेत पण मला नीट काढता येत नाहीत. रात्री टाकेन इथे. गोड मानून घ्या.

बाकी तुम्ही कॅमेरा etc चर्चा करता ती पार मला bouncer. काही कळत नाही. Lol

टीना काय मस्त बाग आहे तुमची..
तो गुलाब कसला गोडुला आहे, तसाही अबोली रंग माझा सगळ्यात आवडता..
ईडीलिंबु ची कलम करतात ना संत्र्याला..
त्याला मुस्लीम लोकं गजनिंबु म्हणतात..
ते लोक त्याचा मुरब्बा करतात..

अन्जु ताई व्वा, उमललं का फुलं, मज्जा आहे, आज तु सारखी बालकनीत घुटमळत असशील ना! Happy

सायली, हो ग. छोटंस आहे पण चार वर्षांनी मिळाले, म्हणजे ही रोपे वर्षभरापूर्वी लावली पण आधी गावाहून आणून लावलेली सर्व सुकली. तरी फार लक्ष द्यायला जमत नाही म्हणून मी आता लावत नाही. गोकर्ण बिचारा नखरे नाही करत. लिली एकदाच आली दोन वर्षापूर्वी. आशा सोडली होती मी त्यामुळे खूप खुश आहे. गुलाब पण जगत नाही माझ्याकडे.

ग्रीन फिंगर्स नाहीयेत माझे :(.

अजून दोन कळ्या आल्यात, सोनटकयाला. :). रिया कुठे? वाच ग.

त्यात इथे पाऊस पडतोय, मस्तच.

मी मोबाईलवरून फोटू काढलेत पण मला नीट काढता येत नाहीत. रात्री टाकेन इथे. गोड मानून घ्या.>>>>>>>>>>>अंजू, दररोज काढायला लागलीस की जमेल आपोआप. तु फ़क्त सुरुवात कर. Happy

मलाही सोनटक्का खुप आवडतो. पांढरा फुलून गेला. मागच्या वर्शी पिवळा लावला आहे पण अजून फुले नाही धरलीत. रोज जाऊन पहाते कोंब येतायत का ते.

टिना अग काय हे छान काढलेत त्यांनी फोटो. ती लीली घ्यायला मला तुझ्याकडे यावेसे वाटतेय.

अन्जू लवकर टाका फोटो..
टीना, फोटोग्राफीपेक्षा भावना महत्वाच्या Happy सगळीच फुलं मस्त आहेत. लिंबाचा शेप किती गोडूला आहे <३

पंधरा दिवसांच्या भटकंतीनंतर घरट्यात परतले ... आज बेकलॉग पुर्ण केला... माहिती अन प्रचि मस्त... अंजु सारखं मी पण म्हणते .. फोटोच्या बाबतीत ... भटकंतीतले फोटो सवडीने टाकीन...

चला रायआवळ्याला कस्ट्मर मिळाला म्हणायचा..
फोटो मस्तच जागु..
बीया हाती आल्या तर देते तुला..अस करुन करुन खुप जणांचे पाकिट येणारे तुझ्याकडं जागु बघ तू..नै कै पण एवढ्यांपैकी एकीचे तर पाकिट फिंगर असतील ना .. म्हणये पाकिटात पाठवलेल्या पैकी एकीच्या तरी बीया रुजणार बघ तुझ्याडं..
आता पप्पांना सांगते तुमचे फोटो आवडले सर्वांना म्हणुन..मग ते आणखीन फोटो काढणार आणि मला पाठवणार Wink

च्यायला अजुन नै जेवली मी..भुकच लागत नै आहे..
आता गिळावं म्हणते जरासं..जबरदस्ती का होईना Sad
इकडं स्प्रे मारतोय देव केव्हाचा..झडं आहे सकाळपासुन..

इथे पण स्प्रे चालू आहे.

टिना अग सायलीने मला पाठवल्या होत्या बिया पण त्या रुजल्या नाहीत माझ्याकडे.

कधी ठाण्यात गेले तर सावली कडून घेईन. आमच्या नर्सरीवाल्याला सांगायचे म्हणजे तो काहीतरी भलतच रोप घेउन येईल.

टीना तुझ्या पोस्ट्स आत्ता वाचल्या, मगाशी फक्त फोटो बघितले. तुझ्या पप्पांनी छान फोटो काढलेत.

जागू पक्षाचं नाव काय? सुंदर आहे.

आत्मधून, रात्री नवऱ्याच्या मदतीने टाकते. त्याने शिकवलं मला पण मी अडाणी आहे त्याबाबत. Lol

अन्जु ताई, बापरे, दिर्घ प्रतिक्षे नंतर मिळालय ग फुल..
गोकर्ण खरच मायाळु असतो ग... Happy
जागु मस्त टिपलीये कोकीळा,
राय आवळे एकडे खुप नाहे दिसत, बी पेरुन ठिक ठिकाणी झाड लावली पाहिहेत..
ईकडे धो धो पाऊस पडला..
मंजु ताई तुझ्या पायाला भिंगर्‍या आहेत का ग?
कन्याकुमारीचे फोटो टाक बघु!
टीना Happy

Pages