निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जु ताई, कीत्ती गोड फुलं, आ[णि छान काढलाय की फोटो!
वर्षु दी, छान आहेत फुलं.
टीना मस्त प्र.ची,,
साधना छान माहिती.

साधना कावळे हुशार होत चाललेत. पण कोकिळा काढतीलच त्यातुन मार्ग.

अन्जू ते फोटो कसेही असले तरी त्या मागच्या तुझ्या भावना, आनंद पोस्ट मध्ये ओसांडलेला पाहताना छान वाटत आहे.

वर्षूताई मस्त फोटो.

निळाई

Happy monday afternoon to all!

Tina those are cormorants (kerala boat driver called it kalkaka).

All photos beautiful. Which is that purple flower Jagu?

It will be difficult for cuckoos to learn nest making. They never did it. They might start now, but still will take many years. Will we live long enough to see it ? They better learn fast, as it is question of life and death for them.

जागुंचे फुल शोधायला फ्लॉवर्स ऑफ इंडिया च्या साईटवर गेले. ते फुल नाही मिळाले पण हे मिळाले. काय मस्त चेहरा आहे! Happy

http://flowersofindia.net/catalog/slides/Indian%20Marshweed.html

जागू, त्या पांढर्‍या फुलाचा वेल असतो ना ? यावर्षी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, तेरडा, आघाडा, वाघनखी दिसताहेत का ? अधिक महिनाही होता.. बराच फरक पडतो त्याने !

दिनेशदा, तेरडा आघाडा आणि चिमणीचे दात म्हणते मी ते सर्व आम्ही बदलापूर पाईपलाईन रोडवर फिरायला जातो तिथे भरपूर आहेत.

साधना योग्य माहीती. कोकीळ इतकी लबाड की निसर्गतः त्यांची अंडी कावळ्याच्या आधी हॅच होतात. तसे झाले की बाहेर आलेले पिल्लु आपल्याला जास्त अन्न मिळावे म्हणुन कावळ्याची अंडी धकलुन देतात. आधी हॅच झाल्याने किंवा ढकलण्यात यश मिळाल्याने आधी कोकीळेला अन्न मिळते. कावळा खूप हूशार असतो हे शास्त्राने सिध्द केले आहे पण या बाबतीत घोडं कुठे पेंड खाते काय माहीत.

एक निरीक्षण. काही खायला असेल तर बाकीचे पक्षी आपले आपण येतात, खातात पण कावळा सर्व भाईबंधाना ओरडून ओरडून बोलावतो, खायला या. Happy .

सोनटक्का फुल झाडावर दोन दिवस ताजेतवाने राहते का? मला वाटलं जास्त दिवस राहील. दोन पहिली देवाला वाहिली आणि तिसरं ठेऊन बघूया म्हटलं तर आज कोमेजलं Sad .

<< जास्वंदाला माकोडे भरपुर लागतात आणि सोबत पांढरं काही तरी असत..काय मला नक्की सांगता नै येत आहे. बुरशी नै म्हणता येईल चुन्यासारखं असत काही तरी पण त्यामुळे झाडाची वाढ खुंटून जाते आणि फुल फुलण्यापूर्वीच गळून जातात नै तर खुरडल्यासारखे उगवतात यावर सुद्धा उपाय सुचवा..मी माझ्या घरचे बरेच झाड उपडून फेकलेत यामुळं. आणि हि किड कि काय ते अगदी मुळापर्यंत जाऊन पोहचलेली असते >>

टीना, माझ्या जास्वन्द ला पण अशीच पान्ढरी कीड लागली होती. ९५% झाड छाटून टाकले, उरलेले ओल्या कपड्याने पुसुन काढले. आता मस्त फुट्ले आहे... फुले येतात. मी सतत लक्ष ठेवते.. जरा कीड दिसली कि लगेच पुसुन काढ्ते..

केपी, कावळे होताहेत हुशार. जर झाडावर कावळ्याचे घरटे असेल तर एक कावळा कायम बाजुला बसुन असतो. साथी हाथ बढाना गाण्याच्या चालीवर एकाला उडुन जायचे असेल तर आधी दुसरा येतो त्याची जागा घ्यायला. आम्ही गेले तीन चार वर्षे लक्ष ठेऊन आहोत कावळ्यांवर आणि कावळे कोकिळांवर Happy

Bignonia gracillis ही मला माहित असलेली वाघनखी. दिनेश आणखी कुठली फुले म्हणत असतील तर माहीत नाही.

काल मी चीनमधला एक कार्यक्रम बघत होतो. आपल्याकडे जसे झाडावर पांढरे ढेकूण असतात तसे तिथे पिवळे असतात. त्यांची ते रितसर जोपासना करतात ( त्याची अंडी गोळा करतात, मग पानांच्या पोकळ पोटल्या बांधून त्यात ती ठेवतात, मग त्या पोटल्या झाडावर टांगतात. ) मग त्यांची घरे झाली कि ती गोळा करतात ( घरे म्हणजे आपल्याकडे झाडावर पांढरा थर दिसतो तसेच ) मग तो लगदा उकळतात... आणि त्यापासून मेण तयार करतात..

त्या किड्याचे नाव बघतो गुगलून आता.

Pages