निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद आत्मधुन आणि सुशोभा.

आत्ताच दिनेशदांचा मेसेज आला. ते आंबाघाटातुन पुढे जात असताना घाटात कारवी फुललेली पाहिली.

कारवी गेल्या वर्षीपण फुललेली होती ना?

गेल्या वर्षी मी पण पेपरमध्ये की युवराज गुर्जरांच्या फेसबुकवर वाचलेले. पण तेव्हा मी त्यांना विचारले होते. ते म्हणाले पुढल्या (म्हणजे ह्या २०१५) वर्षी येतील.
मी आजवर पेपर मधेच कारवीबद्दल वाचले आहे. ह्या वर्षी बघण्याची इच्छा आहे. मुंबई जवळ कुठे जाता येऊ शकेल? मुख्य हायवेवरून सहज दिसू शकतात की आडवाटेला जावे लागेल? मुंबई-अहमदाबाद हायवे / नाशिक इगतपुरी कडे जाणार्या हायवेवर दिसतील का? फक्त २-३ मुली गाडीने गेलो तर सुरक्षित असेल की ग्रुपबरोबर जावे? कुठला ग्रुप?

सुदुपार

माधव टोपली कार्वीही फुलते? मी खुप पाहिलीय ही आंबोलीत पण फुले कधी पाहिली नाही. यंदा फुलण्याचा चान्स आहे का?

साधना, टोपली कारवी दर ७ वर्षांनी फुलते. २०१५ हे फुलण्याचे वर्ष आहे Happy इतर वर्षी तुरळक फुले असतात,

अन्जू, माझा फोटो कासचा आहे पण सातार्‍याच्या आसपास, कोकणात उतरणार्‍या अनेक घाटात दिसते टोपली कारवी. Pleocaulus ritchiei असे शोधून बघ.

माधव मस्त प्रचि.. यावर्षी जायला हवे कासला..
टूरिस्ट लोकांनी तुडवलेली फुलं बघून राग राग होतो अगदी Sad

साधना, गावी सांगून ठेव त्या टोपल्यांवर लक्ष ठेवायला.
मी आंबा घाटात बघितली कारवी, ती घाटभर नाही, मधेच तीन चार किलोमीटर परीसरात आहे. बर्‍याच कळ्या होत्या, अजून मुख्य बहर यायचा असेल.

कोल्हापूर - मलकापूर या प्रवासात बरेच मोर, अगदी रस्त्याच्या कडेला दिसले. नेहमी बघतो त्यापेक्षा बरेच गुटगुटीत दिसले. पंचगंगेच्या पुलाच्या आसपासच्या झाडावर बरेच पोपटही दिसले. ही झाडे मी नेहमी निष्पर्णच बघितलीत !

बाकी श्रीलंकेतील पक्ष्यांबद्दल.. ओघात लिहीनच !

कोल्हापूर - मलकापूर या प्रवासात बरेच मोर, अगदी रस्त्याच्या कडेला दिसले. नेहमी बघतो त्यापेक्षा बरेच गुटगुटीत दिसले. पंचगंगेच्या पुलाच्या आसपासच्या झाडावर बरेच पोपटही दिसले.

अहाहा किती मस्त.

टोपली कारवी कुठे दिसतात ह्या माहितीसाठी धन्यवाद, माधव आणि दिनेशदा.

कास पठार बद्द्ल कोणी सांगेल का? कधी जाऊ शकतो ते फुललेआहे का?<< दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोंबर मधे फुलते पण यंदा अपुरा पाऊस झाला आहे त्यामुळे नाही सांगता येणार

आंबोलीला आहे टोपली कारवी. मी १७ ला जाणार तेव्हा पाहिनच. पण आधी सांगुनही ठेवते. आंबोलीच्या जंगलात मोठी कारवीही आहे बहुतेक. मी यंदा सुकलेली झाडे पाहिलेली मे महिन्यात असे अंधुकसे आठवतेय.

श्री लंकेत दिसलेला चाफा. आकाराने माझ्या ओंजळीएवढा होता.

srilankan chafa.JPG

बरेच फोटो आहेत असे. अंगोलाला गेल्यावर लिहायला सुरवात करतो.

कास पठार पर्यटकांसाठी खुले झाले आहेत व काही प्रमाणात फुले फुलली आहेत असे ह्या रविवारच्या मटात होते.

आदोजो खरच ग तो याक पाहून कससच झाल. खरच तिथल जनजीवन खडतर आहे.

कारवी खुप सुंदर दिसतेय. लोणावळा-खंडाळ्यात वगैरे दिसेल का?

निरू तुम्ही फोटो बरोबरच लिहीताही चांगले. तेव्हा आता लिहायला घ्या.

सगळ्यांच्याच पोस्ट आणि फोटो मस्त.

Pages