निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा , मजा आली वाचायला. सायली, लिली म्हणजे तु काढलेली रांगोळीच वाटली एक सेकंद मला.>>>> Happy Happy खरंच की ... Happy

धागा मस्त रंगात आला आहे. Happy

साधना शोध शोध आणि प्लिज त्या तुझ्याकडे उगवून मला रोपे दे. मला सायलीने दिल्या होत्या पण नाही उगवल्या त्या. आणि अबोली पण पिवळी ग.

सायली माझी गुणाची बाय ग ती. Happy

Grassland yellow finch आणि Wagtail मधे कमालीचे साम्य आहे शशांक..
पण तरी मला तो येलो फिंच्च वाटतोय..
तुम्हाला वॅगटेल का वाटला ?
ग्रासलँड येलो फिंच भारतात नै का आढळत ? ( घोर अज्ञानी Sad )
विकी वर भारतातही आढळतो अस लिहिलेल पन दिसल नाही.. नुसते लाईट नको..फोकस मारा यावर प्लीज..

Grassland yellow finch आणि Wagtail मधे कमालीचे साम्य आहे >>>> मी वॅगटेल प्रत्यक्ष पाहिला आहे. फिंच अजून तरी नाही. नीट गुगलून पहा किंवा त्या वॅगटेलचे नीट प्रत्यक्ष निरीक्षण कर - तुझ्या लगेच लक्षात येईल की हा वॅगटेलच आहे.
१] वॅगटेलची सतत वर-खाली होणारी शेपटी - त्यामुळे त्याला धोबी म्हणतात - ही शेपटी टोकाला दुभंगलेली नसते

२] याची चोच ही फिंचपेक्षा नक्कीच वेगळी आहे

३] हा बहुतेक वेळी हिरवळीवर बागडत असतो (किडे शोधण्यासाठी Happy Wink )

अजून खूप प्रकारे निरीक्षण करता येईल तुला ...

जागू, तु ठाण्यात कधी येणारेस? किंवा तुझ्या ओळखीचं कुणी येणारे का?
मी बिया रुजवुन ठेवल्यात तुझ्याझाठी. त्या तुला कशा पोचत्या करता येतील आता?

साधना, तू ज्या गुलाबी फुलाचा फोटो टाकला आहेस ते उभ्या दांडोर्‍यावरच येते. ( फोटोत फांदी झुकल्यासारखी वाटतेय किंवा फोटोच आडवा केला असेल ) त्यात अनेक रंगही असतात. गुच्छाने नाहीत तरी एकावेळी दांडोर्‍यावर अनेक फुले असू शकतात ( असतातच. )

अर्रे...सर्वात महत्वाचा दुवाच सोडला मी..दुभंगलेली शेपटी.. भिंगाचा चष्मा लावावा लागणारे मला खरच.. खर तर हा फोटो जवळपास ५० ६० फुटावरुन डिजीटल कॅमेराच्या 4X झुम चा पुरेपुर वापर करुन काढला होता मी..आणि त्यावेळी थोडी सुद्धा हालचाल केली कि हा भुर्र त्यामुळ शेपटी बघताच आली नाही..पण फोटोवरुन वाटत नाहीच कि ती दुभंगुन असेल ते.. धन्यवाद..
आता पक्षीनिरिक्षणाचे पुस्तक वाचायची खुमखुमी आलीय..पण आवरते..सप्टेंबर मधे परिक्षा सरल्यावर सगळं..
फिंच ची चोच बसकी आणि गुळगुळीत आहे आणि वॅगटेल ची त्यामानाने लांब आणि टोकदार..
आता निरिक्षण करताना रंगाव्यतिरिक्त अनेक पैलु जोखता येणार..खरच शतशः आभारी आहे..

हि घ्या गडावरची बोर ..

दिनेश तुम्ही लिहिलेले बरोबर आहे. त्या उभ्या दांडो-यावर येणा-या फुलांचे पराग असेच फुलांच्या पाकळ्यांवर सांडलेले मी पाहिलेत. पण तुम्ही बाकी जे लिहिलेत जसे दांडा वाकलेला किंवा अजुन काही ते मला आता आठवत नाहीय. माझ्याकडे ह्याचे दोनच फोटो आहेत आणि दोन्ही फोटो सेम आहेत.
जिप्स्याला विचारते, कदचित त्याने काढले असतील तर. हे फोटो तिथे गेल्या गेल्या संध्याकाळी काढलेले. दुस-या दिवशी सकाळीच निघालो. त्यामुळे त्याच्याकडे फोटो असतील की नाही ते सांगता येत नाही.

हे फुल नक्कीच उभ्या दांड्यावर नाहीय. जिप्स्या प्लिज बघ रे तुझ्याकडे आहे का हा फोटो. हाऊसबोटीतला आहे, पहिल्याच दिवशीचा.

पहिला टाकलेला सनबर्ड्च होता न मग तो ? कुणी कन्फरमेशन दिलच नाही Sad

हो का ? पण बोरच आहे अग ती..

मी स्थितप्रज्ञ .. हा ही गडावरचाच प्रचि Happy

मागे मी पावसाला येत नाही म्हणुन ओरडत होती ना..माझ बोलण जरा जास्तच मनाला लावुन घेतलय बहुतेक त्याने..दोन आठवडे झाले सुर्याला आकाशात पाहुन.. आता पन बरसतच आहे.. यवतमाळला टिपुस्स नाही म्हणे Sad

बोरे काळी असतात?????? पण जागू मला ही करवंदासारखीही वाटत नाहीयेत. Happy ही ब्लॅक बेरी किंवा तत्सम कुठलीतरी बेरी असावीत.

अगं जागू, तुला माझे इमेल मिळाले नाहीये का? एकदा चेक कर बरं. तु इमेल केलेलस त्याला रिप्लाय करुन त्यात मी माझा नंबर केव्हाच पाठवलाय तुला.

टीना ने फोटो टाकलाय ती चवई.. खरं तर केळीचाच एक प्रकार. याला केळफूल आणि केळीही लागतात. केळी पिठूळ पण गोड असतात. पण हे झाड बहुदा अवघड ठिकाणी असल्याने केवळ माकडेच ती खाऊ शकतात. या केळ्यात बिया पण असतात. ( बिया, माकडे आणि अवघड जागी रुजणे.. याचा संबंध लावा बघू )

याचे पान मजबूत असते आणि वार्‍यावादळातही बरेचसे अखंड राह्ते. पावसाळ्यात ते छत्र म्हणून तसेच पत्रावळ म्हणूनही वापरता येते.

वॉव.. सुंदर नाजूक गुलाबी फूल आहे , साधना , मस्त!!

टीना , बोरं काळी का आहेत?? सावजी मसाला नै नं टाकलास त्यांवर?? Proud

मस्त चकचकीत स्लर्पी दिस्ताहेत

वर्षू, तिथे बोरावर तेल / मसाला टाकून पण खातात. रामटेक ला मी खाल्ली आहेत. बोरकूट पण असते.

शशांक, धन्यवाद..

छान माहिती दिनेशदा.. ओह नो! आता मलापन बोरकुट खायच आहे.. उकळलेल्या बोरावर किंचीत तिखट , मिठ आणि बोरकुट टाकुन मस्त लागते.. शाळेचे दिवस आठवले..

सावजी मसाला सिंहगडावर.. काहिही हं V! Lol

दिनेश, बरोब्बर संबंध आहे (बिया, माकडे आणि अवघड जागी रुजणे Lol )
टीना, अगं ती खारवलेली बोरं आहेत का? चन्या मन्या टाइप, म्हणून काळी दिसतायत बहुतेक..
पण तोंपासू आहे प्रचि :p

अगं ती खारवलेली बोरं आहेत का? चन्या मन्या टाइप >> नै अग आत्मधुन.. उकळलेलीच होती पण खुपच कमी गर होता त्यात..बियांना चिटकलेला जरासा Sad

व्वा शशांकजी नी लिंक देऊन मेजवानीच दिली आहे की.. धन्यवाद. खुप सुंदर
जागु Happy

हेमा ताई, मी अजुन इतक्या छान रागोळ्या नाही काढत हो.. Happy तरी सुद्धा आभार..

रांगोळी हुन आठवले मी एकादशीला काढलेली विट्ठलाची रांगोळी कोणीच पाहिलेली दिसत नाहीये.
फक्त हेमा ताई आणि टीना चा च प्रतिसाद दिसतोय,,
आणि कविता देखिल कोणी वाचलेली दिसत नाहीये.. (दिनेश दा, शशांक, टिना आणि हेमा ताई यांना सोडुन)

दा मागे मी पण अशी बियांचे केळाचे प्र.ची टाकले होते.. सुखद च्या शाळेत आहे ते झाड.. तेव्हा शांकली
ने खुलासा केला होता हे वेलची केळ म्हणुन. टीना ने टाकलेले प्र.ची.त्याचीच आहे का?

वेलची केळी वेगळी आणि चवई वेगळी..

वेलची केळी मुद्दाम लागवड करून जोपासतात तर चवई डोंगरावर आपोआप उगवते. चवईचे केळफूल आकाराने मोठे असते आणि भाजीवाल्यांकडे असते खुपदा. ते जास्त चवदार असते.

केळफुलाची भाजी, तुरीची डाळ घालून केलेले वडे, अख्खे केळफूल भाजून केलेले भरीत... थाई सलाद.. अन काय्काय करतात !

Pages