आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
टिने तुझे प्रतिसाद.... बापरे
टिने तुझे प्रतिसाद.... बापरे हसुन हसुन वाट लागते.
सध्या ह्या गुलाबी फुलांनी झाडं बहरलेले दिसत आहेत...
ह्याचे नाव काय?
गुलाबी कॅशियाच ना हा?
गुलाबी कॅशियाच ना हा?
>>गुलाबी कॅशियाच ना हा?>> हो!
>>गुलाबी कॅशियाच ना हा?>>
हो!
जागू............माझा
जागू............माझा प्रश्न
अंगणातल्या पेरूच्या झाडाला अगणित पेरू आलेत. पण सगळ्यात आळ्या तरी, किंवा कापल्यावर आतून लिब्लिबीत खराब तरी. उपाय सुचवा.
आयला,आॅस्ट्रेलिअन बाॅटल
आयला,आॅस्ट्रेलिअन बाॅटल प्लांट अन ते ही यवतमाळात माझ्याकडे.. अर्रे व्वा..धन्यवाद शशांक
जागु अन मानुषी..म्हणुन बेसिक पासुन सुरुवात करावी
Windows Office Picture Manager मधे साईझ कमी करता येते.. १५३केबी च्या खाली असावी साईझ फोटोची..
आणि मानुषी ते अपनेआप गायब नै होत कै..तुम्ही जर त्यातुन डीलीट केले तर ते दिसत नाही..
निसर्ग चक्र, चाफा नै आहे तो..पान बघा त्याची..
पुर्ण फुललेला फोटो नै ना माझ्याकडे . हा एकच होता.. तो पण चार वर्षांपूर्वीचा आहे..
आहा..मस्तच.. सायली शेवटचा
आहा..मस्तच..
सायली शेवटचा प्रचि मस्त आलाय
अशी पिवळी फुल पण असतात न..
मानुषीतै, एकच ऊपाय आहे, पेरु
मानुषीतै, एकच ऊपाय आहे, पेरु लहान असतानाच प्रत्येकाला एक प्लॅस्टिक पिशवी बांधून ठेवायची (थोडी लूज, म्हणजे पेरुच्या वाढीला जागा राहते, पण देठाजवळ अगदी घट्ट हवी.) पाणी लागलं नाही की आपोआप अळ्या होत नाहीत आणि लिबलिबीत पण होत नहीत.. बघा ट्राय करून..
(No subject)
बहुतेक पहिल्यांदाच
बहुतेक पहिल्यांदाच
(No subject)
व्वा मस्त गप्पा.. जागुले
व्वा मस्त गप्पा.. जागुले प्रॉब्लेम सॉल्व झाला का तुझा??
वैशाली, सुंदर पक्षी .. कोण आहे बोले तो??
शेवटचा बुलबुल आहे का???
बार्बेट...तांबट..मुंबई
बार्बेट...तांबट..मुंबई चा
पक्शी
हो हे पिशवी बांधायचे प्रयोग
हो हे पिशवी बांधायचे प्रयोग आम्ही सिताफळावर करायचो. पण हवा येण्यासाठी त्याला एखादे होल ठेवावे लागते ना?
वैशाली मस्त फोटो.
नाही टिना अग जातात फोटो कालांतराने. माझाही अनुभव आहे. डिलीट नाही केले तरीही. मी सुरुवातीला तसेच टाकायचे. बरेच गेले ते फोटो.
जागू, मी तरी कधी छिद्र पाडलं
जागू, मी तरी कधी छिद्र पाडलं नाही, पण पिशवीला खालच्या बाजूला पाडू शकतो म्हणजे पाणी वरूनच ओघळून जाईल.. आमच्याकडे केळीच्या लोंगराला मोठं पोतं बांधून ठेवतात कारण माकडांपासून संरक्षण
काय गुलाबी कॅशिया..... खरच
काय गुलाबी कॅशिया..... खरच का? अस असेल तर व्वा!
पण पाने गुलमोहरा सारखीच आहे (आकाराने मोठी आहेत)
टिना:)
पेरु म्हणजे जिव की प्राण, पण तसेही पावसाळी पेरु चविला पानचट असतात.. ते खुप हिरवे कंच असताना
खाल्ले तरच छान लागतात,, पण आत्मधुन नी छानच उपाउ सांगीतला आहे..
वैशाली खुप सुंदर पक्षी...
पहिल्या दोन प्र.ची. मधे त्या पक्षाचे भाव म्हणजे..
शी बाई, ईतका छान मेक अप केलाय आणि आत्ता येतो म्हणुन कुठे गेलेत हे कोण जाणे...
मस्तच फोटो आलेत
मस्तच फोटो आलेत पक्ष्यांचे.
पावसाळ्यात पेरू असेच लिबलिबीत होतात. ते गळून त्यांच्या बिया वाहून जाऊन त्या रुजाव्यात अशी योजना असावी निसर्गाची.
हल्ली बहर हीचा पण ना? रान जाई
हल्ली बहर हीचा पण ना?
रान जाई / श्वेतांबर,,...
जागू, घरचा पिकासा तर आहे ना ?
जागू, घरचा पिकासा तर आहे ना ? घरून त्याच्या लिंन्क्स कॉपी करून घ्यायच्या. मजकूर ऑफिसामधून लिहायचा. दोन्हीकडचा रिकामा वेळ ( तूझा !!!! ) सत्कारणी लावायचा !
पावसाळ्यात पेरू असेच लिबलिबीत
पावसाळ्यात पेरू असेच लिबलिबीत होतात. ते गळून त्यांच्या बिया वाहून जाऊन त्या रुजाव्यात अशी योजना असावी निसर्गाची.+++ हा असच असेल कदाचित.
आत्मधून करून बघीन हा उपाय.
आत्मधून करून बघीन हा उपाय. धन्यवाद.
टिने..........मायबोलीवर मायबोलीवरूनच अपलोड केलेले फोटो कालांतराने आपोआपच डिलिट होतात. आपण डिलिट न करता ही!
म्हणूनच जर पिकासावरून टाकले तर कायम रहातात.
वैशाली फार सुंदर आलेत फोटो.
माबोवर आपल्या खाजगी जागेत
माबोवर आपल्या खाजगी जागेत किती फोटो टाकावेत याचे लिमिट आहे. (फक्त ५० एम्बी जागा आहे) ते लिमिट ओलांडून पुढे जाताना बहुतेक सिस्टिम मागचे फोटो स्वतःच डिलिट करत असावी.
जागु माझ्याकडेही ऑफिसात पिकसा नाहि आणि घरी गेल्यावर एवढा वेळ मिळत नाही म्हणुन तर मी फोटो टाकत नाही.
खरे म्हणजे माझ्याक्डे ऑफिसात पिकासा अपलोड नाहीय पण शेअर आहे. त्यामुळे घरुन अपलोड करायला लावले तर ऑफिसातुन माबोवर टाकता येतील. तुझ्याकडे बघ पिकासा उघडते का ते. जर उघडत असेल तर तुला फोटो अपलोड जरी करता आले नहई तरी शेअर करता येतिल.
मानुषी आमच्याकडे अप्रिल-मे मध्ये बहर येतो पेरुंचा. गावी तर नुसता सडा पडतो पिकलेल्या पेरुंचा रस्तोरस्ती, उंबरांचा पडतो तसा. काळे कुत्रेही त्या पेरुंकडे बघत नाही. आणि इथे मुंबईत १०० रुपये किलो. जांभळे ४०० रुपये किलो. परत वाचा रु. ४००. :रागः
तुझ्या पेरुंना जरा हलव गदागदा आणि सांग की बाबांनो मे मध्ये बहर आणा. जुलै मध्ये आणलात तर मला नाही मिळायचे तुम्ही.
गुड आय्ड्या
गुड आय्ड्या साधना.............तुझ्या पेरुंना जरा हलव गदागदा आणि सांग की बाबांनो मे मध्ये बहर आणा. जुलै मध्ये आणलात तर मला नाही मिळायचे तुम्ही. स्मित>>>>> हेही करून बघीन. हे तर आत्मधूनच्या उपायापेक्षा सोप्पं!
आणि तसंही या पावसाळी हवेत पेरू खायची मज्जा नाही. ती मेमधेच.
ओह... माझी 50mb ची लिमीट अजुन
ओह...
माझी 50mb ची लिमीट अजुन संपायला भरपुर अवकाश आहे म्हणुन तस असाव..
बाकी मी अजुनतरी पिकासामधुन केलेले नाही लोड..कराव का ?
वैशाली आणि सायली , दोघींनीही टाकलेले प्रचि आवडलेत मला
सुदुपार निगकर्स मस्त गप्प्पा
सुदुपार निगकर्स
मस्त गप्प्पा आणि मस्त मस्त फुलान्चे फोटो पाहुन खुपच फ्रेश वाटले...
सर्व फोटो, माहिती
सर्व फोटो, माहिती सुरेख.
वैशाली, तो पहिला पक्षी फार सुंदर.
फोटोच्या बाबतीत माझाही हाच
फोटोच्या बाबतीत माझाही हाच problem आहे.साईज कमी करताना clarity खूप कमी होऊन जाते आणि मूळ फोटोची मजा येत नाही.
सागरगोट्याच्या एका शेंगेचा आणि पानांचा फोटो खूप छान clear होता,पण अपलोड करताना सगळी clarity निघून गेली.
पिकासावरती कशी लिंक द्यायची कोणी मार्गदर्शन करु शकेल का प्लीज ?
इथे किंवा माझ्या विपू मध्ये.
आमच्या बागेतील
आमच्या बागेतील रानफुलं....Silver Cockscomb...
फुलाची उंची फक्त 1.5 सेंटिमीटर...
आणि त्यावरचा Wasp....
मी आत्ता ऑफिसात पिकासा उघडले.
मी आत्ता ऑफिसात पिकासा उघडले. त्यात माझ्या मोबाईलवरचे सगळॅ फोटो अगदी व्हॉट्सापवरचे फॉरवर्डही दिसताहेत. मी मोबाईलवर गुगल सिंक केलेले आणि सिस्टिमने ऑटो बॅकप केले. त्यामुळे ते बहुतेक आपोआप प्पिकासावर आले.
जागु तु बघ तुझे पिकासा उघडून.
अता फोटो दिसताहेतच तर एक चिकटवते
ये कश्मिर है...
खालच्या फोटोत कोणी जगप्रसिद्ध लोकं दिसताहेत का ते शोधा -
काश्मिरमध्ये रोल्स रॉईस दाल लेकमध्ये फिरतात
ह्म्म.. परत जायचेय काश्मिरला.. कधी?? माहित नाही.
ह्या रानफुलाला आम्ही लहानपणी
ह्या रानफुलाला आम्ही लहानपणी चिमणीचे डोळे म्हणायचो, त्यात आतून काळे बी बाहेर पडतेना. वरच्या टोकांना चिमणीचे दात.
सासरी नवरात्रात ह्या फुलांना फार महत्व आहे, झेंडूबरोबर ह्याची माळ करतात देवीला आमच्याकडे.
अरे वा. हे माहिती नव्हते...
अरे वा. हे माहिती नव्हते...
Pages