निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली बर्मीज पिंक कासिआ
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Burmese%20Pink%20Cassia.html

सगळे फोटो मस्त! काल आणि आज मस्त पाउस पडतोय. सतत दिवसभर नाही पण मधेच एकदम गच्च भरून येते (बॉम्बे चित्रपटातल्या तू हि रे गाण्यासारखा) ५-१० मिनिटे धो धो वारा पाउस आणि मग १-२-३-४ तास आराम. Happy

दिनेशदा रिकामा वेळ??????????????

साधना अग आधी होते तसे माझ्याकडे शेअरींग ओपन व्हायची. तेव्हा निदान घरून अपलोड करुन इथे शेअर करता यायचे. पण आता शेअरींग पण बंद झालय. जाऊदे आता कधी घरी वेळ मिळेल तेव्हाच इथे फोटो लोड करत जाईन.

आणि आम्ही यांना कोंबडीचे फुल म्हणतो.. Lol
निरू मलापन हिच गोष्ट जीवावर येत.. निदान 2.50mb चे प्रचि असतात.. त्यांना एवढ्या कमी साईझ मधे बसवण्यात clarity ची पुर्ण वाट लागुन जाते Sad
मला पन शिकवा पिकासा मधे कसे लोड करायचे पिक ते.इथ धागा आहे न कुठतरी..लिंक द्या प्लीज..

पिकासावर फोटो अपलोड केल्यावर प्रथम अल्बम पब्लिक करावा लागेल. त्यानंतर लोगड इन असताना फोटो उघडावा. उजव्या हाताला फोटोच्या नावाखाली आणि माहितीखाली, इमेज शेअर साठी माहिती येते. त्यातल्या "embed" च्या घरातले सगळे कॉपी पेस्ट करावे. मी एकदाच केले आहे. पण माझ्या पोस्तमध्ये फोटो खूपच छोटा दिसतो. व्यवस्थित आकारात येण्यासाठी काय करावे हे शोधावे लागेल. एकुणातच खूप मारामारी आहे. Happy

निरु, मस्त प्रचि.
टीना, आम्ही कोंबडा म्हणायचो शाळेत असताना Wink
रच्याकने यालाच कुर्डू पण म्हणतात.. Scientific Name : Celosia argentea
कदाचित ती कहाण्यांमधली केनीकुर्डूची भाजी हिच असेल.

एम्बेद च्या खाली सिलेक्ट साईज असते, तिथे बाय डिफॉल्ट थंबनेल असते. ते जर तुम्ही बदलले नाहीत तर इमेज अगदी लहान येणार. सो ते एक्दा बदलुन पाहा.

आणि मग ती एम्बेडमध्ये जे काय आहे ते कोपी करुन paste करायचे

img src=" " हे लिहुन मग ते < > ह्या कंसात टाकले की झाले. आता मी इथे तसे केले तर मशिनला वाटणार मी फोटो टाकतेय... म्हणुन करत नाही. पण होप लोकांना कळले असेल मला काय म्हणायचे ते. " " मध्ये मी गॅप दिलीय. तशी गॅप द्यायची नाही. "" ह्यामध्ये जे काय एम्बेडमधुन आणलेय ते पेस्ट करायचे.

<आयएमजी एसआरसी="https://lh3.googleusercontent.com/-fZwbQApi5tI/VQQay5IbjDI/AAAAAAAAFgg/BzRH0EzkL_8/s800-Ic42/DSC02307.JPG">

हे मी खाली इंग्रजीत लिहिले तेव्हा हा फोटो दिसायला लागला. मध्ये जे दिसतेय ते एम्बेडमधुन कॉपी केले. त्याआधी सिलेक्ट इमेजमध्ये जाऊन लार्ज साईज सिलेक्ट केली.

(हा फोटो घराशेजारच्या तळ्यातला आहे हा, मागच्या पानावरच्या काश्मिरमधला नाही Happy )

आत्मधून | 29 July, 2015 - 19:34 नवीन
अजून एक Red Velvet Celosia आहे, त्यालाही कोंबडाच म्हणायचो >> आम्ही पन Lol माझ्यासाठी अजुन पन दोन्ही फुल कोंबडेच आहे Proud

रेड वेल्वेट सेलोशिआ म्हणजे कोंबडा किंवा मखमल. याचे खूप सुंदर मखमली गडद लालजांभळ्या रंगाचे आणि रुंद त्रिकोणी असे तुरे असतात. यांचा उपयोग फुलांच्या वेण्या आणि हारांमध्ये शोभेसाठी करतात. या तुर्‍यांच्या मुळातून अगदी लहान आणि काळ्या अश्या खूप बिया निघतात.
राजगिरा हाही माठासारखाच दिसतो पण याची पाने कमी लाल आणि थोडी टोकदार, कमी गोलट असतात. शिवाय थोडी चरचरीतही असतात. लाल माठाची भाजी मऊ होते तशी राजगिर्‍याची होत नाही.
अ‍ॅमॅरॅन्थ कुळातील हे प्रकार आहेत.
मागील पानावरच्या फोटोतील झाडाला आम्ही कुरडू म्हणतो. ह्याच्या अगदी कोवळ्या पानांची भाजी होते. केनी-कुरडूतली कुरडू हीच.

<आयएमजी एसआरसी="https://lh3.googleusercontent.com/-bs9LbWf3JXs/VbjDYJYTdII/AAAAAAAAB24/wWX7HPALn3I/s400-Ic42/20130831_153139.jpg" height="300" width="400" />

जमले का??? :-o
हे माहीमच्या निसर्ग उद्यानातील फुल. बहुतेक लाजाळू.

आणि ही आणखी काही... निसर्ग उद्यानातील...


अबोलीसदृश्य पण हिरवा रंग.

जमलं जमलं!! धन्यवाद साधना.
कमळाचे गुलाबी, पिवळा आणि हिरवा हे कॉम्बो सुंदर दिसते आहे.

टॅढ्यँटॅढ्यॅ..टॅढ्याढॅ..
जमल कि नाय.. अर्रे.. मी ज्या शाळेत शिकते त्या शाळेची हेडमास्तरीन एवढी सॉल्लीड्ड हाय कि जान ले लेगी पर सिखा के छोडेगी .. तिच्या भितीन आम्ही लेकर ट्युशन न लावताच सब शिकुन घेतो..
ऐकल ना Wink

हा बघा सत्कार समारंभासाठी घेतलेला गुलाब Wink
हेडमास्तरीन बाई..स्विकारावा .. Wink फोटू

सगळंच लई ग्वाड...

सगळे विद्यार्थी पहिल्या फटक्यात फर्स्ट क्लास फर्स्ट आले की....... Happy

गुलाब तर लईच भारी.

vt220, तो दुसरा धोतरा असावा बहुतेक आणि त्याच्या खाली चित्रक.

टिना, ते पहिले निवडूंगाच्याच फॅमिलीतले आहे. युफोर्बिया.

Pages