निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशी सापडली तुम्हाला? >>>>>

Zingiberaceae - व्हाईट फ्लॉवर्स असा सर्च टाकून इमेजेस पहात असताना मिळाली ... Happy

अदिजो - पुन्हा एकदा तुमच्या सूक्ष्म निरीक्षणाला सलाम ... Happy ग्रेट ...

डबल तगर

मला ब्रह्मकमळ म्हणजेच ह्या कॅकटसच्या फुलांच रुप.

किती पांढरा शुभ्र रंग असतो ना ह्यांचा.

जागुतै..कित्ती जवळून आणि स्वच्छ निघालेत सगळे प्रचि..
हे फुल फक्त रात्रीच उमलत ना ? ऐकुन आहे पण पाहायची संधी मिळाली नाही कधी.. मस्तच
ती मिटलेली कळी..ते उमललेल फुलं.. क्या बात है..

जागुले.....काय सुंदर फुलं आहेत......एस्पेश्यली तगर!
कालपासून ही नवी पाहुणी यायला लागलीये. गंमत म्हणजे तिला फक्त लाडच करून घ्यायचेत. पेढा, दूध काहीच खात नाहीये. नुस्तं लाडेलाडे गुर्रर्र्म्यांव!

थँक्यु शशांक.
Verbenaceae किंवा Parrot's Beak या नावाने सर्च केल्यास वेगळीच फुले येतात.
मात्र Gmelina asiatica यानावाने शोधल्यास तशी फुले दिसत आहेत.
या लिंकवर बधारा / कोरोबी अशी नावे दिसत आहेत. मात्र लिंकवरिल दोन फोटो वेगवेगळ्या फुलाचे असावेत असे वाटतेय.

शशांक जी आणि शांकली -------- /\ -------

काय अफाट माहिती आहे तुम्हा दोघांना..
फोटो कॅमेरा मुळे पण एवढे छान येतात का?>>>>>>>>>> ओ निसर्ग चक्र.... कॅमेर्‍याला नाही हं सगळं क्रेडिट,
वर्षूकी नजरको ज्यादा क्रेडिट हय... ++++१
वर्षु दी काय गोड फुलं आहेत ती,...
टीना Rofl
जागु ब्रम्हकमळ खुप सुरेख... नितळ शुभ्र.. मी पण लावल आहे पण खुप हळु वाढ आहे...
आम्ही त्या तगर ला दुध मोगरा म्हणतो,, आणि आत्ता परवा नविन नाव कळले नंदीग्राम छान आहे ना..
मानुषि ताई खतरनाक फोटो सेशन..:)

सावली काळी शिवण मराठी नाव, शशांक जी नी दिलेल्या नावाने सर्च केले..

वर्षुताई, सावली, जागू, मानुषीताई फोटो सुंदर.

वर्षुताई मस्त कलर. मानुषीताई माऊचे डोळे डेंजर एकदम.

सायली - उगाच गैरसमज करुन घेऊ नये - शांकली, दिनेशदा, साधना, सरीवा, मेधा, जागू (कोणी राहिले असल्यास माफी असावी... Happy ) ही सगळी तज्ज्ञ मंडळी आहेत - मी आपला गुगलून काहीबाही सांगत असतो...

वनस्पतीशास्त्र असो वा अजून कुठलेही इतर शास्त्र - ही सारी महासागराप्रमाणे अतिशय सखोल आहेत - आपल्या हाताला त्याचे चार थेंब लागले तरी धन्य, धन्य ....

विनोबा म्हणतात - रसोईसारखी कला नाही आणि गणितासारखे शास्त्र नाही ... त्यांमुळे आणि पोटाचाच Happy Wink प्रश्न असल्यामुळे विविध पाककृती करणार्‍यांबद्दल कमालीचा आदर आहे ... Happy
संगीत हे परमेश्वराच्या जवळ नेणारे म्हणून त्यातील दिग्गजांसाठी शिर साष्टांग दंडवत ... Happy
बाकी रंग-रेषा यावर ज्यांची सहज हुकुमत आहे ते ही अति प्रिय आहेतच ...
उत्तम कविता आणि सिद्धहस्त लेखकांचे साहित्य ही कायमचीच मेजवानी ..
इथे मा बो वर व आंतरजालावर प्रकटणारे सारे विविध कलाकार (ज्यात वर्षूदी, अवल सारखे बरेच आहेत )
तर निसर्गातील विविध कोडी उलगडणारे, त्यातील गमतीजमती मजेशीरपणे सांगणारेही आवडीचे आहेत.. Happy
...
..
खूप मोठी यादी होतीये पण ती अशीच लांबत जाणार याची आधीच कल्पना असल्याने इथेच थांबतो..
एकंदर क्रिएटिव मंडळींबद्दल अतीव आदर व प्रेम आहेच आहे... Happy
इति ||

Shashank ji uttam post .. Khup awadali.
Sariva mast photo pahilyandach baghte / aikte aahe

विलायती एरंड म्हणजेच जट्रोफा का ? >>

हो, हा जत्रोफाच.
पण बायोडिझेलसाठी वापरला जाणारा तो जत्रोफा / मोगली एरंड वेगळा.

Botanical name: Morinda citrifolia.
Family: Rubiaceae (coffee family)
ह्याच्या फुलांचा वास खूप छान असतो.

> ह्याच्या फुलांचा वास खूप छान असतो.
हो. पुण्यात एन डी ए रस्त्यावर याची झाडे खूप आहेत. तिकडे पूर्वी आतल्या गेटपर्यंत जाऊ देत तेव्हा आम्ही तिथे फिरायला जात असू. सगळा रस्ता याच्या वासाने घमघमत असे.
याचं परिचित नाव म्हणजे नोनी. हल्ली नोनी ज्युस मिळतो तो याच्यापासून तयार करतात.

निरु सागर गोट्यांसारखं दिसतय ते फळ..
त्या नावने सर्च केल तर मीनी निशिगंध ची फुलं आणि मिनी फणस सारखी फळ दिसतायत Rofl
ईथे आलं की खुप नविन माहिती मिळते..:)

सागरगोटा खूप वेगळा असतो. मुळात त्याचे फळ म्हणजे काटेरी शेंग असते आणि आत त्या बालपणीची आठवण करून देणार्‍या सुप्रसिद्ध बिया असतात.
एकंदरीतच काटेरी झुडूप असल्याने सजीव कुंपणासाठी आदर्श आहे.

बारतोंडीचं फळ अगदी डिझायनर फळ वाटतय!
शशांक इतका विनय बरा नव्हे Light 1 >>>>>>>>>>>>उगाच गैरसमज करुन घेऊ नये >>>
तिकडे माझ्या लेखाखालीही स्वता:ला अज्ञानी वगैरे...........काय रे?

या बारतोंडीलाच हिंदीमध्ये "आल" म्हणतात ना? या झाडापासूनच पायाला लावायचा आळता बनवतात, व्हेजिटेबल डाय बनवतात.

निरु, अश्वी मस्त फोटो.. बारतोंडी,आल... वॉव नवीन माहिती मिळाली..
सरिवा, रतनजोती प्लांट पहिल्यांदाच पाहिलं..

लहानपणी आठवतंय, आई नॉन वेज करीज ना लालचुटक रंग येण्याकरता रतनज्योत वापरायची , अक्रोडाच्या झाडा च्या सालीसार्खं दिसायचं , ते आणी ही रतनज्योत सेमच आहे का ?

@ शशांक.. तू अज्ञानी?? मग आम्ही कोण रे Uhoh

Pages