निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षुताई happy birthday.

अहाहा दोन्ही जास्वंद फार सुरेख, कलरफुल.

काही वर्षांपुर्वी नोनीचा खुपच गाजावाजा झाला होता, पण ते बहुदा मार्केटींग जिमिक असावे. कोकणात हि झाडे पुर्वापार आहेत, चाणाक्ष कोकणी माणसांनी त्याचे औषधी गुणधर्म, खरेच असते तर नक्कीच शोधून काढले असते.

वर्षु दी वा दि हा शु..
जास्वंद खुपच गोड..
नोनी हे मला इथे नि.ग व र कळले.. Happy पुर्वी काहीच माहिती नव्ह्ते..

थांकु थांकु फ्रेंड्स... Happy
यू मेड माय डे!!!! Happy Happy

इथे गणपतीची विविध रूपं प्रत्येक मंदिरांतून दिसत आहे.. हे बाप्पा बरेचसे आपल्या बाप्पाशी मिळते जुळते वाटले
गणपती , इंटरनॅशल गॉड झालेत म्हणायला हरकत नाही असं वाटतंय.. कित्येक फॉरिनर्स हौसेने गणपतीचे टॅटू ,टी शर्ट्स,मिरवताना दिसले..

स-सा.. किती सुंदर रंग आहे गुलाबांचा.. छान निरोगी . हसतमुख आणी फ्रेश दिस्ताहेत

आपकी मेहनत रंग लाई है Happy

दिनेश, अगदी आवर्जून पाहण्यालायक आहे हा भाग..

मला मात्र महिन्याभरात एक ही भारतीय चेहरा दिसला नाहीये.. आमचे सोडून Proud त्यातून इथल्या सर्व लोकां नी, मी थाय ओरिजिन ची (च) आहे अशी खात्री स्वतःच पटवून घेतलीये Uhoh
सक्काळी सक्काळी खा आणी गोड गोड ( Wink ) बोला

ससा मस्त गुलाब.. काय केलेस इतकी फुलं फुललीत..
वर्षु दी ती चायनीज चिंच एकडे पण मिळते.. गोड असते ना...

केना आणी त्याला आगलेले पिटुकले फुल..:)
KENA.jpg

ससा ..मस्त आहेत गुलाब. काय मशागत केली?
वर्षू चिंगराय छानचे.......पण सुन्सान?
आणि गणपती इन्टरनॅशनल झालेत हे बघून मज्जा वाटली.
थोडं विषयांतर.........अगं माझ्या लेकीच्या गाडीच्या डॅशबोर्डवर एक सुंदर चिमुकला गणराय आहे. (आपल्या पुण्यात घेतलेला.) तर एक दिवस तिची पाकिस्तानी मैत्रिण गाडीत पुढे बसायला लागली आणि डॅशबोर्डवरचा चिमुकला बसलेला गणराय बघून एकदम ऑ माय गॉड........ये क्या है यहाँ? म्हणत दचकून एकदम गाडीत ठेवलेला पाय चटकन बाहेर घेऊन ...बाहेरूनच मूर्तीकडे बघत चकित होऊन बघत उभी राहिली. मग बसली गाडीत.
पण मग तिला आपल्या गणरायांविषयी थोडं सांगितलं.
पण बघ ना आपल्याला (म्हणजे मला तरी) वाटतं...........एवढा शेजारी देश, तिथे निदान गणपतीविषयी माहिती तरी नक्की असणार..........या इन्टरनेटच्या युगात.
मला तर वाटलं होतं की आपला फेमस गणपती उत्सव सुद्धा माहिती असणार शेजारी देशात. पण..............

वर्षु चिंचा झकास.

सायली , या पानांची भजी करतो आम्ही. पिटुकले फुल मात्र गोड दिसतेय.

मानुषी, अगदी करेक्ट.

सगळ्या ना थँक्यु...... कलमी आहे झाड... खुपच लहान आहे हि झाड.. पण फुल खुप मोठ येत... फोटो वरुन कळतच असेल.. Happy

देवकी,मनुरुची थांकु.. Happy

सायली , या चीन च्या नाही, थायलँड च्या लईच्च फेमस चिंचा आहेत.. जमल्यास घेऊन येईन.. Happy
पिटकु फूल क्यूट आहे..

हहहा मानु.. बिच्चारे काहीच एक्स्पोजर नसेल मिळत का पाकिस्तान मधे?? निदान बॉलीवुडी सिनेमातून तरी
बघायला मिळतंच असेल नं??

अगं चायनीज लोकांना दिवाळीत काढलेली दाराबाहेर ची रांगोळी, पणत्या म्हंजे चेटूक बिटूक वाटायचं .. मॅनेजमेंट ला कंप्लेंट्स वगैरे देऊन यायचे .. Happy कोणाला काय वाटेल नं काय नेम न्हाय!!!

चिंगराय , सुनसान तर नै पण फार पॉप्युलेटेड पण नाही.. नॉर्दनमोस्ट शहर आहे.. तिथून एक छुटका सा, ५० मीटर लांबीचा ब्रिज पायी अथवा कार किंवा सायकल ने पार केला कि सरळ बर्मात एंट्री.. Happy

वर्षू... बर्मात पण जा ! आणि मस्त फोटो काढ.

मानुषी, हे पाकी मुलीचे नाट्क असणार. कारण आपले चित्रपट तिथे सर्रास बघतात. देव वगैरे माहित असते त्यांना.

फोटो मस्तच सर्व.

मानुषीताई, दिनेशदा म्हणतात ते करेक्ट आहे. आपला बाप्पा माहिती नाही असं होणारच नाही, शेजारच्या देशात.

दिवाळीत काढलेली दाराबाहेर ची रांगोळी, पणत्या म्हंजे चेटूक बिटूक वाटायचं .. मॅनेजमेंट ला कंप्लेंट्स वगैरे देऊन यायचे . काय सांगते वर्षू? फनी आहे हे.
दिनेश..........नाटक नाही. मी त्या मुलीला आरपार ओळखते. ती गेली १०/१२ वर्षं तिकडेच उसगावी आहे.
तिला हेही माहिती नव्हतं की भारतात खेड्यापाड्यात सुद्धा बायका टू व्हीलर चालवतात.
वर्षू... बर्मात पण जा ! आणि मस्त फोटो काढ.>>>>>>>>>>>>>>>> +१००

Pages