आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सुप्रभात!!
सुप्रभात!!
सुप्रभात वर्षू ....हाही रंग
सुप्रभात
वर्षू ....हाही रंग छान. फुलं जराशी मधुमालतीसारखी आहेत का आकाराने?
शशांक.. तू अज्ञानी?? मग आम्ही कोण रे>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
शशांकचं आता काही खरं नाही................
बारतोंडीची अनेक झाडे आमच्या
बारतोंडीची अनेक झाडे आमच्या समोरील टेकडीवरही (तळजाई) आहेत - त्याचे अनेक उपयोग आज समजले..
मला ते फक्त सुंगधी फुले असणारे झाड एवढेच माहित होते.
(फोटो आंतरजालावरुन साभार...)
वर्षूताई, कुठे आहेस सद्ध्या?
वर्षूताई, कुठे आहेस सद्ध्या?
वर्षू नील, खूप सुंदर आहेत
वर्षू नील, खूप सुंदर आहेत फुलं. ऑर्किड आहे का?
वर्षू नील खूप गोंडस फुलं आहेत
वर्षू नील खूप गोंडस फुलं आहेत ही..
अदिजो, हो, ऑर्किडच आहेत ती. नाम है "ascocentrum miniatum" हांई
शशांक, नोनीची फुलं अगदी
शशांक, नोनीची फुलं अगदी बुचाच्या फुलासारखी दिसताहेत ना.. वास पण तसाच आहे का?
नोनीची फुलं अगदी बुचाच्या
नोनीची फुलं अगदी बुचाच्या फुलासारखी दिसताहेत ना.. वास पण तसाच आहे का? >>> येस्स -- खूपच सुगंधी पण बुचाचा सुवास वेगळा आणि नोनीचा सुवास वेगळा ...
ओह्ह, गेलं पहिजे एकदा
ओह्ह, गेलं पहिजे एकदा तळजाईला, फुलांचा सीझन कधी असतो?
फुलांचा सीझन कधी असतो? >>>>>
फुलांचा सीझन कधी असतो? >>>>> एप्रिल - मे
विलायती एरंड म्हणजे Jatropha
विलायती एरंड म्हणजे Jatropha gossypifolia.
काल एक लिहायचं राहिलं. >>
काल एक लिहायचं राहिलं.
>> लहानपणी आठवतंय, आई नॉन वेज करीज ना लालचुटक रंग येण्याकरता रतनज्योत वापरायची , अक्रोडाच्या झाडा च्या सालीसार्खं दिसायचं , ते आणी ही रतनज्योत सेमच आहे का ?<<<
इथे जो विलायती एरंड / Jatropha gossypifolia दिला आहे, त्याची फळे विषारी असतात. तो खाण्याच्या रंगात नक्की वापरत नाहीत.
गूगलवर शोधलं, तर Boraginaceae कुळातली, हिमालयात सापडणारी Alkanna tinctoria / Alkanet नावाची वनस्पती रतनजोत म्हणून खाण्याच्या रंगात वापरतात असे समजले.
>>The root is ground to a powder and used as a natural food coloring. Vibrant red in color and look flaming hot but are not hot to taste as chili powder. The spice is used in famous Indian dishes such as Rogan Josh and Tandoori Chicken.<<
आमच्या घराच्या खिडकीतून
आमच्या घराच्या खिडकीतून पिंपळाची झाडं दिसतात. त्याला छोटीछोटी फळं येतात. झाड फळांनी लगडलं की त्याला पक्षांचा बहर येतो.
असंख्य प्रकारचे पक्षी.. खारी तर असतातच... कधी कधी वटवाघळांचीही धाड पडते...
पक्षांना वंशसातत्या साठी अन्नाची गरज तर झाडाला वंशविस्तारासाठी पक्षांची गरज...
एकदम Perfect Symbiosis...
आणि तेही आनंदी साहचर्य...
आपल्या ग्रुप सारखं...
ज्याच्याकडे जे आहे तो ते देतो.... आपल्याही आनंदासाठी आणि इतरांच्याही आनंदासाठी.....
आणि इतरांना समृद्ध करतो... स्वतःही अधिक समृद्ध होत..
Perfect Symbiosis Again....
सध्या या पिंपळावर आणि पर्यायाने आमच्या खिडकीवर पोपटांचा वावर आहे...
त्यांच्या २ भावमुद्रा तुमच्या आनंदासाठी...
प्रचि १
प्रचि २

हे पण बदलापूरचंच का? निरु,
हे पण बदलापूरचंच का?
निरु, तुमची वरची पोस्ट एकदम मस्त आहे.
नाही. ठाण्याला...
नाही. ठाण्याला...
(No subject)
निरु, तुमची वरची पोस्ट एकदम
निरु, तुमची वरची पोस्ट एकदम मस्त आहे.>>+१
निरु एकदम टपोरी भाय
निरु एकदम टपोरी भाय एक्स्प्रेशन्स आहेत मिठूचे..
निरु, तुमची वरची पोस्ट एकदम
निरु, तुमची वरची पोस्ट एकदम मस्त आहे.>>+१
सर्वच फोटो, माहिती सुंदर.
सर्वच फोटो, माहिती सुंदर.
निरु तुम्ही जितके चांगले
निरु तुम्ही जितके चांगले फोटोग्राफर आहात, तितकच छान लिहीता देखिल... क्या बात है!
तो पहिल्या फोटोतला पोपट कीत्ती रुबाबदार दिसतोय...अस वाटतय... त्याच्या समोर बाकी पोपट भाय- भाय म्हणत सलामी देतायत (रामलीला मधलं गाण)

आणि दुसर्या मधे...... अस वाटतय तो म्हणतोय, क्या राडा चल रे ला है, देऊ क्या खर्चा पानी.....:हहगलो:
वर्षु दी काय मस्त मस्त फुल
वर्षु दी काय मस्त मस्त फुल टाकतेस ग !
शशांक जी छानच प्र.ची.
वर्षू मस्त फोटो, निलूचे फोटो
वर्षू मस्त फोटो, निलूचे फोटो आणि सायलीच्या कमेंट्स दोन्ही मस्त.
रतनज्योत साधारण पातळ दालचिनीसारखे दिसते. त्याला फक्त भडक केशरी रंग असतो ( खरं तर त्याला नसतो पण ते पाण्यात भिजवले तर येतो. ) पंजाब, दिल्ली मधे वापरतात. तंदूरी चिकनसाठी वगैरे. मुंबईत क्वचितच मिळत असेल. दिल्लीला मिळते.
आज सकाळी एक नवल बघितले. दोन साधे बगळे आमच्या समोरच्या लॉनमधे, उंदरांची शिकार करत होते. माझ्या डोळ्यादेखत त्यांनी प्रत्येकी २/२ उंदीर मटकावले. ते गिळायला त्यांना बरेच प्रयास पडले. पण अखंड्च गिळले त्यांनी. शिकार करताना, मासे पकडताना जसे ध्यान लावून बसतात, तसेच करत होते ते.
दा नवलच वाटले ऐकुन, बगळे
दा नवलच वाटले ऐकुन, बगळे उंदीर पण खातात..
नवलच वाटले ऐकुन, बगळे उंदीर
नवलच वाटले ऐकुन, बगळे उंदीर पण खातात..>>> प्रथिने कुठनही मिळवायची अशी नैसर्गिक जाणीव असल्याने....
मस्त फोटो आणि इंटरेस्तिंग
मस्त फोटो आणि इंटरेस्तिंग माहिती!
@ सायली....अस वाटतय...
@ सायली....अस वाटतय... त्याच्या समोर बाकी पोपट भाय- भाय म्हणत सलामी देतायत (रामलीला मधलं गाण) हाहा हाहा हाहा
आणि दुसर्या मधे...... अस वाटतय तो म्हणतोय, क्या राडा चल रे ला है, देऊ क्या खर्चा पानी.....<<<

आमच्याकडच जास्वंदीचे फोटो....
आमच्याकडच जास्वंदीचे फोटो.... दोन वेगळे गुलाबी कलर आहेत..


जास्वंद सुंदर आहेत. मला
जास्वंद सुंदर आहेत.
मला वाटतं बगळे मासे खातातच पण इतर किटक, बेडुक आणि वेळ आलीच तर इतर छोटे पक्षीही खातात.
इथे एक लेख आहे त्यात बगळ्याने खंड्याला खाल्ल्याचे उदाहरण आहे. लेखकाशी बोलताना मलाही आश्चर्य वाटले होते.
अबोल जास्वंदी अगदी बोलक्या
अबोल जास्वंदी अगदी बोलक्या आहेत
नोनीचे औषध मिळते काहीतरी. पूर्वी खुप प्रचलीत होते.
आमच्या ऑफिसच्या एरियात खुप झाडे आहेत ही बारतोंडी उर्फ नोनीची.
वर्षूताई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Pages