निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं मानुषी, तसेही भारताबद्दल घोर अज्ञान अजूनही बर्‍याच देशांत आहे, पण हेही खरे कि आपल्याला कल्पना नसेल अश्या देशात भारताबद्दल आपुलकी देखील आहे. ( अगदी पटकन आठवले ते मीना प्रभुंच्या दक्षिण अमेरिकेतील रविंद्रनाथ टागोरांच्या पुतळ्याबद्दल. )

इथे चिनी चॅनेलवर त्यांच्या द सिल्क रोड या नृत्य नाट्याबद्दल कार्यक्रम सध्या दाखवताहेत, त्यात चिनी मुलींनीच भारतीय नृत्ये ( अगदी कथ्थक, भरतनाट्यम, मणिपुरी ) केली आहेत आणि ती अत्यंत ग्रेसफुली केली आहेत.

हो दिनेश ......इंग्लन्डमधे शेक्स्पियरच्या घराच्या मागच्या अंगणात आहे ना टागोरांचा पुतळा.
तो पुतळा बघून खूप अभिमान वाटला होता तेव्हा.

गुलाब, चिंचा मस्त! वर्षू , वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!

या विकेंडला फिल्ड ट्रिप म्हणून मेडीकल म्युझियमची बाग बघायला गेले होते. औषध म्हणून उपयोगी असणारी जवळ जवळ शंभर झाडे आहेत. त्यातील ५०% झाडे नेटिव अमेरीकन संस्कृतीत औषधासाठी वापरली जाणारी आणि बाकीची युरोप, आशिया आणि साऊथ अमेरीकेत वापरली जाणारी. बागेची जागा म्युझियमची आहे मात्र बाग लावून ती सांभाळण्याचे काम वॉलेंटियर्सनी केलेले आहे. आमची गाईड रिटायर्ड पॅथॉलॉजिस्ट होती. त्यामुळे खूप छान माहिती मिळाली. अ‍ॅस्परीनची कहाणी ऐकली आणि अ‍ॅस्परीनचे झाड (युरोपिअन मिडोस्विट - Spiraea ulmaria) बघितले. माहिती ऐकायच्या नादात फोटो काढणे राहूनच गेले. पुन्हा एकदा खास फोटो काढायला जाईन.

सागरगोट्याची शेंग...
IMG_20150727_212652632.jpg

ही उकललेली शेंग..
IMG_20150727_212546458.jpg

सागरगोट्याची काटेरी फांदी..
_IMG_000000_000000_4.jpg

आणि ही पानं...
IMG_20150727_213950551.jpg

सुप्रभात निगकर्स
निरु...सागरगोटयाची शेंग पहिल्यांदाच पहातेय.

सध्या अंगणातल्या कडुलिंबावर खूप पक्षांचा वावर जाणवतोय. सुंदर गायन चालू असते सकाळी.
पण हा वृक्ष खूप मोठा असल्याने कुठूनही प्रयत्न केला तरी पक्षी कधी तरी फक्त दिसतात. पण फोटो नाही काढता येत.
इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या शीळ ऐकू येतात!
कावळे चिमण्या साळुंक्या होले बुलबुल, सनबर्ड्स, पोपट हे आणि अनेक पक्षी असतात.
सध्या एक चिमणीपेक्षा मोठा पिवळ्या पोटाचा...पण शिंजिर किंवा सनबर्ड नाहीये तो. झाडात अगदी अगदी कुठेतरी खोल गाभ्यात फांद्यापानांच्या गर्दीत बसून मस्त शीळ घालत असतो.

मी पण पहिल्यांदाच पहातेय सागरगोटयाची शेंग .

आमच्या कडे सध्या अशोक फ़ळांनी लगडलाय जांभळ्या रंगाच्या लिंबोण्याचा आकारच्या फळांचा नुसता खच पडलाय.

सध्या एक चिमणीपेक्षा मोठा पिवळ्या पोटाचा...पण शिंजिर किंवा सनबर्ड नाहीये तो. झाडात अगदी अगदी कुठेतरी खोल गाभ्यात फांद्यापानांच्या गर्दीत बसून मस्त शीळ घालत असतो.>>>>> कॉमन आयोरा असणार हा - खूपच सुरेख शीळ घालतो आणि गंमत म्हणजे बदलणार्‍या असतात त्या ट्यून्स ...

common_iora__male_copy1.jpg

(फोटो आंतरजालावरुन साभार....)

अर्रे .........येस्स्स्स्स.
काय शशांक अगदी आमच्या लिंबावरचाच पक्षी टिपलायस! (नेटवरचा असला तरी!)
गंमत म्हणजे बदलणार्‍या असतात त्या ट्यून्स ...>>>>>>>> हो ना......आधी मला वाटलं ते गाणारे वेगवेगळे पक्षी असणार नंतर लक्षात आलं की हाच फसवतोय! :स्मितः

Happy

अतिशय सुरेल शीळ घालणार्‍या पक्ष्यांच्यात याचा नंबर फार वर आहे. रेड व्हिस्कर्ड बुलबुलही गोड शीळ घालतो.

आमच्या कडे सध्या अशोक फ़ळांनी लगडलाय जांभळ्या रंगाच्या लिंबोण्याचा आकारच्या फळांचा नुसता खच पडलाय >>> माझ्या ऑफिसजवळ पण.

http://youtu.be/2PcyvkmWnDA
हातासरशी ...शशांक ..ही लिंक उघड्तीये का बघ ..प्लीज
यातला कोकिळेचा आवाज सोडून एक कर्कश्य आवाज कुणाचा?
मला पक्षी दिसत होता पण सेलफोनात विडिओ नीट नाहीये.

ओक्के..पण शशांक घरी जाऊन नक्की सांग हं.
माझ्या जॉगिंग ट्रॅकवर असतो हा ...पण आयपॅड कॅरी कसं करणार ना? म्हणून सेल्फोनात ट्राय केलं.

काल आमच्याकडे एक पक्षी " मी सुग्रीव, मी सुग्रीव" असा गात होता Happy

या सागरगोट्याच्या शेंगा, श्रीरामपूरला भरपूर आहेत ! पण त्यांना काटेही खुप असतात शेंगाना आणि झुडुपालाही.

भिन्ति ला चिट्कुन वेल वाढ्ते त्या वेली च नाव सुचवु शकेल का कोणी ?

आयव्ही म्हणतात त्याला. नेटवर गुगलुन पाहा तुम्हाला हेच नाव अभिप्रेत आहे का ते.

निलु गुलजार, तुमच्याकडे सागरगोट्याच्या बिया मिळतील का? किंवा जिथे मिळतील अशी जागा? मला शेताला कुंपण म्हणुन हे वापरायचे पण आमच्या गावी याच्या बीया मिळत नाहीत.

मानुषी, या पिवळ्याचे नाव आयोरा (iora).

वर्षू, मला खुप आवडेल थायलंडला यायला.

इथे डोंबिवलीत आईच्या सोसायटीच्या समोर होतं सागरगोट्याचं झाड. आता तोडलं Sad . बाग वाढवणार आहेत तिथे. म्हणजे नाना-नानी पार्क आणि आईची सोसायटी ह्यामध्ये gap होती, काही झाडे होती, सागरगोटा, बोर etc. ती तोडली आणि आता बाग विस्तार करतायेत.

शशांकजी मस्त पक्षी.

@ साधना ताई...
निरु गुलजार, तुमच्याकडे सागरगोट्याच्या बिया मिळतील का? किंवा जिथे मिळतील अशी जागा? मला शेताला कुंपण म्हणुन हे वापरायचे पण आमच्या गावी याच्या बीया मिळत नाहीत.<<<<<<
हो मिळतील की... पण आता सिझनला.. Happy
मी सागरगोटा लावला तो कल्याणच्या पाठारे नर्सरी मधून घेतला होता..

आमच्या पिंपळावर दरवर्षी नियमितपणे येणारी हळद्या पक्षाची (Golden Oriole) जोडी....
अतिशय उत्सुक आणि कुतूहलाने इकडे तिकडे पहाणारा पक्षी....
Female 01..
Golden Oriole Female 1.jpg
त्याच बाईसाहेब कान खाजवताना...
Golden Oriole Female 2.jpg

थोडे पानाआड दडलेले त्यांचे अहो....

Golden Oriole Male 2.jpg

कोण म्हणतो की पक्षीराज गरुडच त्याच्या साम्राज्याची पहाणी करतो....?
हम भी कुछ कम नही.... शेवटी काय... Attitude Matters..

_IMG_000000_000000_5.jpg

Mast photo... Sadhana, sagaragoTe mhaNajech biyaa. Tyaachaa naisargik prasaar bahutek Te paaNyaatun vahaat jaaoonach hot asel. KuThalaa paxee vaa prasNee Te khaat asel ase vaaTat naahee.

निरु गुलजार मस्त फोटो.
मंडळी मी दिलेली लिंक .. जे उघडू शकतात..............पहा ना. कोणता पक्षी आहे हा?
तो आयोरा वेगळा शीळ घालणारा, आणि हा लिंकेतला वेगळा....प्लीज बघून सांगा.

निरु सागरगोट्याचे झाड खुप सुंदर आणि हळद्याचे फटो खुप भारी..

जागु गुलाबी फुल कीत्ती गोड..

मानुषी ताई मज्जा आहे तुझी, पक्षी सम्मेलनच भरत तुझ्याकडे..

अतिशय सुरेल शीळ घालणार्‍या पक्ष्यांच्यात याचा नंबर फार वर आहे. रेड व्हिस्कर्ड बुलबुलही गोड शीळ घालतो.+++ मस्तच

Pages