पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हॅनिलाची शेंग मधोमध कापून एका साखरेच्या डब्यात घालून ठेवायची. ती साखर ज्या पदार्थात वापराल त्याला व्हॅनिलाचा सुगंध येतो :).

स्टील कट ओट्स आणलेत. अजिबात नीट शिजत नाहीत. ज्वारी बाजरीसारखे दिसतायत.
नेहमीच्या ओट्स सारखे करायचे ना? की याची काही वेगळी पद्धत असते.

स्टील कट ओट हे स्टीम रोल्ड नसल्याने शिजवायला जास्त वेळ लागतो. पाण्याला उकळी आली की ओट्स घालायचे. आच मंद करुन २० मिनीटे. मग दूध घालून अजून १० मिनीटे. १ कप ओट , ३ कप पाणी, १ दूध

ओह बाप्रे इतका वेळ लागतो? मनात विचार आला कुकरला शिट्टी लावून दलियासारखे शिजवून घ्यावे काय? Happy

प्रेशर कुकरमधे करता येते. पण तरी प्रेशर येण्यासाठीचा वेळ आणि रिलीज करायचा वेळ धरला तर सगळे मिळून फार फरक पडत नाही. रात्रीच्या वरण भाताच्या कुकरच्या जोडीला शिजवून घेवून सकाळी दूध घालून खायचे असे केल्यास मात्र सोयीचे पडते.

रात्रीच्या वरण भाताच्या कुकरच्या जोडीला शिजवून घेवून सकाळी दूध घालून खायचे असे केल्यास मात्र सोयीचे पडते.>>>
येस गुड आयडिया. कारण सकाळी प्रचंड भूक लागली असताना एवढा धीर धरणे शक्य नाही. Proud

अंजली, स्वाती म्हणताहेत तसं स्टील कट ओट्स शिजायला भरपूर वेळ लागतो. एका मैत्रिणीच्या सांगण्यानुसार ओट्स तुपात परतून मग उकळीचं दूध्-पाणी घालून शिजवते. झाकण ठेवून साधारण ४० मिनिटांत मऊ शिजतात. लगदा होत नाही. उपम्यासारखा करायचा तर पाण्यात शिजवते. १ कप ओट्स साधारण साडेचार कप पाणी. (फोडणी मिसळल्यावर वरून थोडं आणखी.) ब्रेकफास्ट पॉरिजसाठी १ कपाला अडीच कप दूध अडीच कप पाणी.

रात्रभर भिजवून सकाळी ब्रेकफास्टाला तयार होणार्‍या स्टील कट ओटस्ची रेसिपी वाचली होती. लिंक सेव्ह केलीय. सापडवून देते.

अरे वा मृण्मयी खूप खूप धन्यवाद लिंकसाठी. आता टेन्शन गेले एवढे ओट्स संपणार कसे म्हणून?
स्टील कट ओट्स, रोल्ड ओट, ओट्मील किती हे प्रकार Happy Happy

सध्या स्वैपाक बाई सुट्टीवर आहे. माझ्या उजव्या मनगटाला कंप्लिट रेस्ट सांगितलीये. डबा मागवते आहे पण उन्हाळा अति त्रासदायक होतोय. यासाठी रोजच्या जेवणात थंडावा देऊ शकतील असे पदार्थ ज्यासाठी उजव्या हाताने काही फार करावे लागणार नाही असे आहेत का?
किंवा मग रेडिमेड?
मला चिरणेही जमत नाहीये.

गल्ली चुकली असेल तर योग्य गल्लीत सोडा...

नी, नाचणीसत्त्व आणून ठेव. जेवताना वाटीभर करून घेता येईल. नाचणीची ताकातली आंबीलही छान लागेल किंचित लसूण लावून. चालत असेल तर कॅन्ड ना दु आणून आणि कोकम आगळ त्यात घालून सोलकढी.
जाता-येता पिता येतील अशी सरबतं चालतील का तुला? जेवणाला ऑप्शन नाहीच हा, पण थंडावा मिळेल. आवळा सरबत (मिळत असेल तर "योजक" चं) कोकम सिरप वगैरे..

फोडणी घातलेला दही भात मस्त वाटतो उन्हाळ्यात. माझं फेवरेट लंच.
माझी पद्धत - थंड दही भात थोडं दूध घालून जरास्सा पातळ कालवायचा. त्यात मीठ , थोडी साखर , आलं, डाव्या हाताने जमलीच तर काकडी किसून त्यात घालू शकतेस. फोडणीत जिरे, मोहरी, कढीपत्ता, दाणे तळून, आणि कुटाची मिर्ची. गार झाल्यावर भातावर घालून कालवून खायचा! यम्मी लागतो !!

हे मस्त आहे.
मला दूधवाले पदार्थ नको होतात उन्हाळ्यात. दहीवाले मस्त.

ना अंबिल उकडीसारखीच करायची असते ना फक्त पातळ अशी?

नाचणीच पिठ, पाणी, लसुण अस एकत्र करुन छान उकळी येई पर्यंत शिजवायच. सतत हलवत रहाव लागत.
पिठ शिजल अस वाटल की गॅस बंद करुन मिठ घालुन गार होऊ द्यायच पण हे पातळसर (पळीवाढ) ठेवायच.हव तेव्हा पाव ते अर्धा ग्लास अंबिल आणि उरलेला ग्लास थंड ताक अस घालुन प्यायच.
शिजवलेल पिठ २ दिवस फ्रिज मध्ये ठेउन लागेल तस वापरत येत.

हो चाकवत करताना ( पातळ भाजी ) ताक घाला, छान लागते. शेपू सुद्धा ताक घालुन छानच लागतो. अर्थात, शेपू माझा फेवरीट, कसाही करा.

ताकातली भेंडी, ताकातला पालक, ताकातला चाकवत, कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालून केलेली कढी वगैरे...

व्हीट ब्रॅन किंवा गव्हाचा कोंडा मुख्य घटक पदार्थ म्हणून वापरलेला अशा रेसिपीज आहेत का? विपूत कळवल्यात तरी चालतील. पोळी, भाकरीच्या पिठात गव्हाचा किंवा ओट्सचा कोंडा घालतच असतो. परंतु त्या व्यतिरिक्त काही रेसिपीज असतील तर कृपया द्याव्यात. धन्यवाद!

कोंडा, भोकरे आणि गूळ घालून ते मिश्रण मंद आचेवर खापरात भाजून खातात. रायगड भागातला तो खास पदार्थ आहे.

लापशीचा गूळ घालून शिरा करतानाही कोंडा घालतात.

( मला इथे मैदाच मिळतो. कोंडा वेगळा ऑरगॅनिक फूड विभागात मिळतो. तो घेऊन मी मैद्यात मिसळतो. )

जयू, दूध कुठल्या कारणानी नासलंय ते कळल्याशिवाय नासलेले दूध वापरू नये. त्यात काही अपायकारक घटक ( किटक, केमिकल ) पडलेले असायची शक्यता असते.

दिनेशदा, धन्यवाद. शक्यतो अगोड पदार्थ हवेत हे लिहायला विसरले. मावशी कोंड्याची थालिपीठं करायची, पण ती पाकृ माहीत नाही. कोंड्याचा उपमाही करतात असे ऐकलेय. व्यवस्थित पाकृ मिळाली तर त्यानुसार करता येईल.

कोंड्याची उकड चांगली लागते. ताकातली लापशी पण छान लागते.
व्हिट ब्रानमध्ये १:१ प्रमाणात साधी कणिक मिसळून त्यात भाज्या वगैरे घालून थालिपीठ/ पराठे छान होतात.

दिनेशदा, जास्त गरमीमुळे दुध नासलेले. मला हवी ती रेसीपी सापड्ली.पण घावन करायला तांदुळ पीठ नव्हते म्हणून साखर घालून कलाकंद केला. छान झाला होता.

अकु, कुठल्याही पदार्थात कोंड्याचे फार प्रमाणही ठेवू नये. त्यानेही पोटाला त्रास होईल. तसेच असे पदार्थ फार कोरडेही असू नयेत ( पाण्याचे प्रमाण जास्त असावे. )

Pages