पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही मुळ्याची भाजी कोणताही उग्र वास न येईल अशा बेताने बिनधास्त डब्यात नेतो. भाजी करून ती कोमट झाल्यावर टपरमधे भरली की १५-२० मिनिटं टपर वार्‍यावर (म्हणजे खिडकीत!! Wink ) ठेवायचा झाकण न लावता. सगळा वास नाहीसा होतो. माझा नवरा चवीच्या नि वासाच्या बाबतीत कमालीचा चिकित्सक आहे, त्यालाही वास जाणवत नाही अजिबात! भाजीत मूगडाळ घातलेली असते, ती आदल्या रात्री भिजत घालून मग फोडणीत किंवा आधी मुळा आणि मग लगेच त्यावर डाळ अशा प्रकारे करतो.
हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या लाल तिखटाऐवजी,

आणि कोरडी चटणी करताना मुळ्याचा कीस फोडणीवर परतायच्या आधी बाऽऽऽरीक चिरलेला कांदा परतून मग मुळा परतायचा आणि तिखट-मीठ साखर वगैरे घालून शेवटी तीळ पेरून गॅस बंद. डीटेल रेस्पी साबांना विचारली पाहिजे.

Double post

अगो, फिश अमेरिकेतला असो किंवा कुठलाही. तो फ्रेश असेल तरच वास येत नाही. फ्रोजन किंवा रेफ्रिजरेटर्मधल्या फिशला वास येतोच.

लुंजी च्या रेसिपी मध्ये पेरूच्या लोणच्याचा ओझरता उल्लेख आहे पण मायबोलीवर नाही सापडलं पेरूचं लोणचं. कृपया पाककृती मिळू शकेल का?

गायू, पेरू पिकलेला पण फार नरम न पडलेला असा घेऊन त्याच्या फोडी करायच्या. त्यातल्या बिया काढायच्या.
मग त्याचे कैरीप्रमाणेच लोणचे करायचे. ( साखर वा गूळ घालायचा नाही ) पण लिंबू पिळायचे.

पेरू किसूनही करता येते.

दिनेशदा कैरीच्या लोणच्याचा घरगुती मसाला चालेल का वापरला तर? आणि लिंबू शेवटी पिळायचे का? पेरूची किसून चटणी खाल्लीये, ती मस्त लागते!

पालक-सुप्,पराठे,वरण्,पालक-शेपु भाजी,पालक-शेपु वरण्,पालक-डिप्,पातळ भाजी
ब्रोकोली-- चेडार-ब्रो सुप्,ब्रो-मुग डाळ भाजी, ब्रोकोली-रॅन्च डिप्,ब्रोकोली पराठे

ब्रोकोली-- चेडार>> रेसिपी प्लिज Happy
सुपाची पण

ब्रोकोली-रॅन्च डिप् >> ई का हय? कसं करतात हे? पहिल्यांदा ऐकलंय मी नाव

ब्रोकोली स्वच्छ धुवून कोरडी करून लोणी / तेल / तुपात थोडी परतून, वरून मीठ मिरपूड भुरभुरून (वरून मिक्स हर्ब्ज / ओरेगॅनो, बेसिल इ. घालू शकता). स्वाद वाढवायचा असेल तर लसणाची पाकळी ठेचून घालणे.

थाई करीमध्ये ब्रोकोली

पालक - सूप, दालपालक, पालक रायता, पचडी, पालकाच्या विविध प्रकारच्या भाज्या (बरबटी, ताकातली, परतून, लसूणी, पालक-बटाटा, पालक चना, आलूपालक वगैरे), पालक राईस, पालक पास्ता, पालक घालून डोसा / धिरडी / पराठे, पालक पुऱ्या वगैरे.

मूग - पिवळे - उसळ / आमटी
हिरवे मूग मोड आणून - सलाद, कोशिंबिरीत कच्चे / वाफवून, रायता - चाट - भेळ यांत. मुगाची आमटी / उसळ / मुगामोळो. मूग मिक्सरातून काढून धिरडी / डोसे / पराठे, उपमा - पोहे - नूडल्स - पास्ता वगैरेंमध्ये. मूग घालून तांदळाची खिचडी / पुलाव वगैरे. मुगाचा ढोकळाही करतात बहुतेक. खात्री नाही.
मोड आलेले हि मूग घालून सूप
भाज्यांमध्ये सहज ढकलता येतात.

ब्रोकोली-रॅन्च डिप् >> रिया! ते घाईत लिहल म्हणुन एकत्र लिहलय ,मला म्हणायच होत कच्ची बोर्कोली फ्लोरेट रण्च डिप मधे बुडवुन खायची (क्राफ्ट्,हिडन व्हॅली ब्र्ण्ड चे मिळतात) भारतात मिळतात का ते माहित नाही तिथे जातो तेव्हा सॅलेड खाण्याच योगच नाही येत.पण मिळत असावे

चेडार-ब्रोकोली सुप रेसिपी विपुत देते.

रीया, पालकाची भाजी मामीन्च्या पद्धतीने करुन बघ, आवडेल.
मी पालक पराठा असा करते. पालकाची २ मुठ पाने+१ टॉमेटो + कोथिम्बीर पालकाइतकीच+ लसुण पाकळ्या ४ ते ५ + १ गाजर ( उपलब्ध असल्यास) किन्वा थोडा कोबी हे सर्व मिक्सरमध्ये वाटुन त्यात कणिक+ २ चमचे बेसन, थोडा ओवा+तीळ असे घालुन पीठ भिजवुन पराठे करते. प्युरी करायची नसल्यास पालकासहीत बाकीचे कणकेबरोबरच फुड प्रोसेसरमध्ये फिरवुन कणिक मळायची.

प्रीति धन्यवाद. यात मी हिरवी मिर्ची पण घालते. पण ती लहान मुलान्साठी टाळायची असल्यास थोडे तिखट घालता येते.

रीया, पालकाच्या पराठ्यासाठी कणिक भिजवताना त्यात शिजवलेली मुगाची डाळ घालू शकतेस. एकदम लुशलुशीत पराठे होतात.

ब्रोकोली फ्लोरेट्स अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ती गुंडाळी पापडाच्या जाळीवर हाय फ्लेमवर ३-४ मिन. ठेवायची. धूर, जाळाजाळी न करता मस्त रोस्टेड ब्रोकोली तयार होते. ती कशासोबतही साइड डिश म्हणून चांगली लागते.

ब्रोकोली फ्लोरेट्स अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ती गुंडाळी पापडाच्या जाळीवर हाय फ्लेमवर ३-४ मिन. ठेवायची. धूर, जाळाजाळी न करता मस्त रोस्टेड ब्रोकोली तयार होते. ती कशासोबतही साइड डिश म्हणून चांगली लागते.
>>
वॉव! लिंबू पिळून मिठ लावून पण खाता येईल ही तर Happy
थँक्स

रीया, ब्रोकोली आणि रीया स्वत: पराठे बनवते हे इतकंच मला चक्कर यायला बास आहे. Wink

गुड लक रीया. ब्रोकोली उकळत्या पाण्यात पाच मिन्टं उकळून हे माझं नॉन वेजी डेजला ग्रीन साईड असतं. टच वुड दोघी पोट्टी ब्रोकोली खातात आणि प्रिफरेबली फार फ्लेवर्ड नसली तरी त्यांना चालते. वेळ असेल तर मी उकडून झाल्यावर थोडं तूप किंवा बटर वर लसूण पाकळी आणि मिरपूड घालून ब्रोकोली परतून मीठ घालून वाढते.

ब्रोकोली ओव्हनला ऑऑ ,मिठ वरतुन लाल मिर्च्याची जाड भरडपुड टाकुन ग्रिल करायची मस्त लागते... ब्रोकोली
फार शिजवुन चान्गली लागत नाही, जरा क्रन्च राहिल अशी चान्गली लाग्ते.

नॉन-व्हेज पदार्थांमध्ये ओले काजुगर वापरायचा विचार आहे. >>>>> चिकन-मटन ,शिजताना त्यात कांदा-खोबरे वाटण घालण्यापूर्वी ५ मिनिटे सोललेले काजूगर घालावे.नंतर वाटण घालावे.

माहितीबद्दल धन्यवाद देवकी. माझा विचार मोठ्या कोलंबीचा रस्सा बनवायचा आहे त्यात ओले काजुगर घालू शकतो का?

अहो नरेश माने त्यात काय विचारताय. घाला बिंधास. कुठल्याही डिशमध्ये घाला आणि आधी शाही जोडून सर्व्ह करा.

शाही कोळंबीचा विजय असो. Happy

जाळीदार आणि जाड फक्त एकाच बाजूने भाजलेले आणि वर पोडी (डाळीपासून बनवलेली चटणी) घातलेले डोसे कसे करायचे?

घाला बिंधास. कुठल्याही डिशमध्ये घाला>>>> ओ, कोलंबीचा मसालेदार प्रकार केलात तर मस्त लागतात काजू.
बाकी रश्श्यात नाही माहीत.

Pages