पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी, कोलंबी नाहीच केली मटणाचा रस्सा बनवला. मस्त चव येते.

झंपी, आता संपलेत पुढच्या वेळी गावावरून आले की पाठवून देईन.

धनकुलि हो मला स्पन्ज डोसाच हवा आहे. म्हणजे तशी कृती माहिती आहे पण फक्त बॅटर कसे तयार करायचे माहिती नाही. अनुभवी टिप्स हव्या आहेत.

हो असाच पण जास्त जाळी येते. मला ह्याच्या बॅटर बद्दल सांगतेस का आरती थोडे आणि तांडळाच्या निवडीबद्दल धन्यवाद.

आज आमच्यकडे १५ जण जेवायला आहेत, पनीरबटरमसाला दालमाखणी, जिराराईस आहे.
मला मैदा+कणिक रोटी साध्या तव्यावर बनवता येइल का? तंदुरी सारखी किंवा नान?
माझ्याकडे अवन तंदुर दोन्ही नाहीए Sad

Peanut butter is easily available in India, 2-3 brands in two varieties (smooth n chunky). Peanut butter is roughly a peanut paste - butter like consistency. Recipe for peanut butter is available in Ruchira .

काहीच चव नसते पीनट बटरला आणि कॅलरीज भक्कम. त्यापेक्षा आपली शेंगादाण्याची चट्णी परवडली. पण ती शिकरणीत घालू नकोस रे काउकुमार.

पीनट बटर व चॉकोलेट चिप्स व्हॅनिला आइस्क्रीम वर घालूनही खातात.

केळीच्या शिक्रणात घाला असे नेटावर वाचले.. <<
का त्या केळीच्या शिक्रणाची वाट लावायची? नको नको.
के शि मधे गूळ घाला साखरेऐवजी. उत्तम लागते.
दाणे बिणे नको.

केरळ फेस्टीवल मध्ये मला वॅनिला पॉडचे पाकिट मिळाले. काळ्या, लांब सुकलेल्या शेंगा आहेत. त्या वापरायच्या कशा हे कोणी सांगेल काय? मी आयुष्यात पहिल्यांदा या शेंगा पाहिल्यात.

thanks अरुंधती

बकाल लागते ते पीनट बटर.
शेंगदाण्यांचा अपमान वगैरेच. -- अगदी अगदी . घरातील टीन एज ला कुठूनतरी शोध लागलेला ह्याचा .साबुदाणा खिचडी बिन कुटाची करा म्हणे , दाण्याची चटणी नको आणि इकडे पीनट बटर ब्रेड ला चोपडा अशी परिस्थिती आली होती . पण शेवटी चवीचा विजय झाला. पीनट बटर date उलटून गेल्यावर फेकून दिले .
.

अह्हा साधना!! घरी लस्सी केलीस तर शेंगेचा इंचभर तुकडा (चार ग्लासांसाठी) त्यात घाल... मंद व्हॅनिला सुगंध येईल. उन्हाळ्यात फार सही वाटतं. किंवा दूध फ्रिजमध्ये थंडगार करायला ठेवशील तर त्यात बारकासा तुकडा घालून ठेव. अगदीच अहाहा मोमेंट.

ती शेंग उघडून आतील माल सुरीने हलक्या हाताने खरवडून त्याचा लिक्विड फ्लेवर सारखाच उपयोग करायचा असतो. प्रमाण चेक करा प्रत्येक रेसीपीचे. व्हॅनिला ऑसम.

ह्या वीकांताला उपवन फेस्टिवल आहे. जस्ट सेयिन्ग.

गुजराती लोक जे ठेपले बनवतात ते बरेच दिवस (१५-२० दिवस) तसेच्या तसेच राहीलेले पाहिले. पण मी ठेपले करते (सगळी पिठे मिक्स + तेल + कसुरी मेथी) त्याचे मात्र काही दिवसांनी तुकडे पडायला लागतात.
कोणाला त्या गुजराती ठेपल्यांची (जास्त दिवस टिकणार्‍या) रेसिपी माहिती आहे का?

साधना, ती शेंग मधोमध काप. मग त्यातला जो गर असतो तो व्हॅनिला म्हणून वापरतात. ती शेंग ओलसर आहे असे धरून चालतेय.

ओहो... आज घरी जाऊन करुन बघतेच.. Happy

दुधात बुडवुन ठेवायची आयड्या छान वाटतेय.. सकाळी फ्रिजमधल्या दुधात टाकायचे आणि संध्यार्काळी घरी गेल्यावर निवांतपणे प्यायचे.. मस्तच.

स्वाती, सुकलेली शेंग आहे.

Pages