Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पावाचे अनेक प्रकार असतात
पावाचे अनेक प्रकार असतात स्मित ( आमच्याकडे पावभाजीचे पाव सोडून इतर असंख्य प्रकारचे पाव मिळतात अरेरे ) पावभाजीचे पाव खरपूस भाजलेले असतील तर ते कापून त्यात दाबेली मिश्रण भरता येणार नाही. चुरा होईल त्याचा. खरपूस भाजलेले पाव म्हणजे ते चहात बुडवून खातात त्या जिरा बटरसारखे( असे सांग फिदीफिदी ). पावभाजीचा पाव मऊ, लुसलुशीतच हवा, त्याला आपण भाजून खरपूस करायचा >>
तुला एक मोठा स्टाइन भरलेला !!
आमच्याइथे पण अस्सल लादी पाव मिळत नाहीत
मला टीस्पून आणि टेबलस्पून
मला टीस्पून आणि टेबलस्पून मधला फरक कुणी सांगू शकेल का?
माझ्या मते एक चमचा साखर हे जे प्रमाण आपण वापरतो तो टेबलस्पून झाला आणि एक चमचा मीठ हे जे प्रमाण आपण वापरतो तो टीस्पून झाला.
टेबलस्पून/४ = टीस्पून
असे माझे ढोबळ गणित असते.
बरोबर का?
कटलरीच्या (हुच्चभ्रू) दुकानात
कटलरीच्या (हुच्चभ्रू) दुकानात जाऊन टीस्पून व टेबलस्पून विकत मागून पहा. सोदाहरण फरक दिसेल.
Check on flipkart or amazon
Check on flipkart or amazon for measuring spoon.
मी गुगलवर इमेजेस पाहिले आहेत
मी गुगलवर इमेजेस पाहिले आहेत पण नीट अंदाज येत नाही. प्रमाणावरुन मग एक गणित ठरवले आहे. आपल्याकडे मसाल्याचा जो सातवाट्यांचा डबा असतो त्यात एक चमचा असतो तो मला टीस्पून वाटतो आहे.
वाटण्याचा मुद्दाच येत नाही.
वाटण्याचा मुद्दाच येत नाही. ग्रोसरी स्टोअरमधे स्पून मेजर्स मिळतात. फारशी महाग नसतात. ती विकत घ्यावीत. त्यावर लिहिलेले असते टिस्पून, टेबलस्पून वगैरे.
मेजरींगस्पूनच्या हिशेबात, तीन
मेजरींगस्पूनच्या हिशेबात, तीन टीस्पून = एक टेबलस्पून.
हे मी कधीतरी गूगल करूनच शोधून काढलेलं आहे आणि नंतर घरी तपासून पाहिलेलं आहे.
स्मरणशक्तीनुसार - ५ml -
स्मरणशक्तीनुसार -
५ml - tsp
१५ ml - tbsp
http://www.flipkart.com/wonde
http://www.flipkart.com/wonderchef-plastic-measuring-spoon-set/p/itmdx9t...
स्पूनफीडिंग.
ती चमच्या वरची अक्षरे जरा ठळक
ती चमच्या वरची अक्षरे जरा ठळक दिसली असती तर फार बरे झाले असते. झूम करण्याची सोय आहे का?:दिवा:
चीझ पराठा कसा बनवावा? १.५
चीझ पराठा कसा बनवावा? १.५ वर्षाच्या मुलाला देण्यासाठी बनवायचा आहे.
The cost is 199/- (on app
The cost is 199/- (on app it's for 150/-) ( To explain my post further to check = to buy. Not just see the image; zoom or otherwise )
अमि, दीड वर्षाचा मुलगा रोल
अमि, दीड वर्षाचा मुलगा रोल खाऊ शकतो का? खात असेल तर तिखटामीठाची पोळी करून त्यावर किसलेलं चीज पसरून रोल करून देता येईल.
नाहीतर पराठ्याच्या लाटीत किसलेलं चीज स्टफ करून लाटून पराठा भाजणे. पण भाजताना चीज वितळून बाहेर येणार नाही आणि त्यामुळे पराठा करपणार नाही याची काळजी घेणे.
पोळी भाजी खातो म्हणून द्यायचा
पोळी भाजी खातो म्हणून द्यायचा विचार करतेय.
दुसरा पर्याय योग्य वाटतोय म्हणजे स्टफ वाला.
मी अमि, अफगाणी रोटी करा,
मी अमि, अफगाणी रोटी करा, दिनेश यांची पा.कृ. आहे, त्यात किसलेले चिज घाला. माझि १४ म. ची मुलगी ते खाते
अच्छा चेक करते. धन्स मंजुडी,
अच्छा चेक करते. धन्स मंजुडी, आशु
स्पूनफीडिंग >>>
स्पूनफीडिंग >>>
मला मोहनथाळ ची रेसिपी हवी
मला मोहनथाळ ची रेसिपी हवी आहे.
पालक-पनीर घरी केले जाते व
पालक-पनीर घरी केले जाते व घरचे आवडीने खातातही. पण मला स्वतःलाच ते 'नीट जमले नाहिये' असेच वाटत रहाते. तर हमखास यशस्वी पालक-पनीरची कृती कोणी दयाळु देईल काय? स्वत:ची द्या, ऐकीव द्या, लिंक द्या, काहीही चालेल. तीच तर्हा चिली-पनीरची. घरचे (बिच्चारे) काय छान झालय काय छान झालाय म्हणत खातात पण कळत असते की काहीतरी कमी आहे इथे.
सुनिधी, इथे बघ.
सुनिधी, इथे बघ.
अगं हो ती केव्हापासुन करायची
अगं हो ती केव्हापासुन करायची आहे. विसरुन गेले होते. थँक्स.
माझ्या २ केटरिंग करणार्या ओळखीच्या बाया आहेत, दोघी अप्रतिम करतात पण पाकृ. विचारु शकत नाही त्यांना.
शेझवान सॉस घरी कसा बनवायचा.
शेझवान सॉस घरी कसा बनवायचा.
दहा रु ला शेजवान चे पाकिट
दहा रु ला शेजवान चे पाकिट मिळते
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/52407 वेल इथे मी लिहीली आहे. पण शेजवान सॉस रेडी मिळतोच.
मोहनथाळ
मोहनथाळ http://www.maayboli.com/node/39160
जुन्या हितगुज वरिल मोहनथाळ
जुन्या हितगुज वरिल मोहनथाळ चि रेसिपि वाचता येत नाहि
ही नव्या मायबोलीतली आहे. हा
ही नव्या मायबोलीतली आहे. हा धागा वाचता येत असेल तर रेसिपी पण वाचता आली पाहिजे.
धन्यवाद सिंड्रेला
धन्यवाद सिंड्रेला
मी मनुस्विनीच्या कृतीने
मी मनुस्विनीच्या कृतीने मोहनथाळ केला आहे तीन चार वेळा...
कोणी काजु करी रेस्टोरेन्ट
कोणी काजु करी रेस्टोरेन्ट स्टाइल ची रेसिपी द्या ना प्लीज.
Pages