Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08
या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके दिनेशदा. थँक्स.
ओके दिनेशदा. थँक्स.
केळीच्या गाभ्याचे काय प्रकार
केळीच्या गाभ्याचे काय प्रकार करता तुम्ही? इथल्या एका इं ग्रो मधे पहिल्यांदा दिसला म्हणून मोठा तुकडा आणला . एकदा पारंपारिक 'पचडी' केली. अजून अर्धा उरलाय त्याचं काय करता येईल ?
पोरियल करतात. कढीपत्ता-नारळ
पोरियल करतात. कढीपत्ता-नारळ घालून केरळी भाजी. मी स्वतः केलेले नाही, खाल्ले आहे. आवडले होते.
)
मागे मास्टरशेफ इंडीया वर ह्याचे कटलेट पाहिले होते (ना खाल्ले ना केले
कढीपत्ता-नारळ घालून केरळी
कढीपत्ता-नारळ घालून केरळी भाजी. <<
यावरून आठवले. महेश लंच होममधे मल्लिपुरम व्हेज (मलंहो मधे मी व्हेज का खाते म्हणत तु क देऊन झाले की पुढचं वाचा) नावाची एक मिक्स भाजी मिळते. ग्रेव्ही भन्नाट असते. नारळ-हिरवीमिरची आणि कढीपत्ता अशी चव अगदी व्यवस्थित कळते पण बाकी कृती कळत नाहीये. तसेच ग्रेव्ही ताज्या हिरव्या रंगावरच असते हे कसे काय जमवतात तेही समजत नाही.
कुणी पाकृ देऊ शकेल का?
http://www.yesrajagroexports.
http://www.yesrajagroexports.com/dehydrated-fruits.html
हे पुण्यात आहे. त्यांच्याकडे बरीच फळे, भाज्या वगैरे सुकवलेल्या स्वरुपात मिळतात. पुण्यातल्या कुणी वापरून पाहिलय का?
अमि, यांच्याकडच्या नाहीत पण
अमि,
यांच्याकडच्या नाहीत पण काही फळांच्या स्लाईसेस मी खाल्ल्या आहेत. चव राखलेली असते. फक्त साखर वेगळी लावली आहे का ते बघून घ्यायचे.
सुकवलेली फळे जास्त प्रमाणात खाल्ली जातात ( उदा १ चिकू आपण खात असू तर स्लाईसेस २/३ चिकूच्या खाल्ल्या जातात. ) म्हणून काळजी घ्यायची.
नी, साधारण असे दिसत होते का
नी, साधारण असे दिसत होते का ?
http://www.vegrecipesofindia.com/banana-peel-thoran/
Description is of Gravy veg
Description is of Gravy veg and photo looks to be dry veg .
मायबोली वर पुर्वी एका फुड
मायबोली वर पुर्वी एका फुड ब्लाॅग बद्दल वाचले होते. पण मी नाव विसरले आहे. त्याचे नाव कुणाला माहीत असेल तर कृपया ईथे लिहा. अजुन माहीती म्हणजे लेखक मराठी असुन वास्तव्य आखाती देशात होते / आहे. फोटोग्राफी अप्रतिम होती. व्हेज / नाॅनव्हेज सर्व पाककृती होत्या. प्लीज माहीती असेल तर सांगा.
मिसळपाववरील गणपाचा ब्लॉग का
मिसळपाववरील गणपाचा ब्लॉग का आभा?
http://kha-re-kha.blogspot.in/
केळीच्या गाभ्याचे काय प्रकार
केळीच्या गाभ्याचे काय प्रकार करता तुम्ही?>>मेधा, मंगलोरमधल्या समोरच्या राव आंटी या केळीच्या गाभ्याची एक अफलातून भाजी करायच्या. त्यांच्याकडून त्याची रेसिपी लिहून घ्यायचं राहूनच गेलं. पण ओलं खोबरं आणि लाल मिरची होते इतकं आठवतंय.
इकडे तमिळनाडूमध्ये आल्यावर कूटू (वर दिनेशदांनी सालीच्या भाजीची लिंक दिली आहे, केळीच्या गाभ्याची पद्धत थोडी वेगळी) पोरीयल आणि सूप बर्याचदा खाल्लंय. पोरीयलमध्ये मूगडाळ आणि ओलं खोबरं घालून कोरडी भाजी करायची. (थोडं ताक पण घालायचं) कूटूला थोडं ग्रेव्ही जास्त ठेवायची.
मला या गाभ्याचं सूप फार आवडतं. करायलाही फार कटकट नाही
मंजुडी, येस्स्स्स!!!!!
मंजुडी, येस्स्स्स!!!!! मनापासुन घन्यवाद . बरेच दिवस शोधत होते.
नंदिनी, या सूपची रेसिपी दे ना
नंदिनी, या सूपची रेसिपी दे ना प्लीज.
मला आग्री चिकन रेसिपी हवी आहे
मला आग्री चिकन रेसिपी हवी आहे कुणाला माहित असेल तर कृपया टाका
मला गाकर कसे बनवायचे सांगेल
मला गाकर कसे बनवायचे सांगेल का कोणी?
मला गाकर कसे बनवायचे सांगेल
मला गाकर कसे बनवायचे सांगेल का कोणी?>>>>>> लाल भोपळा साल काढून ,भांड्यात पाणी न घालता कुकरमधून शिजवून घे.कुकर थंड झाल्यावर ,भोपळ्यात, गूळ मिक्स करून गॅसवर ठेव. गूळ वितळला की गॅस बंद करून मिश्रण थंड झ्याल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून पुरीसाठी करतो तसे गोळे कर.प्लॅस्टीकच्या पेपरला तेलाचा हात लावून हाताने थाप आणि तेलात तळ.काहीजण कणीक घालतात.आमच्याकडे तां.पी. वापरतात.
देवकी ही घारग्याची रेसिपि
देवकी ही घारग्याची रेसिपि आहे!
गाकर करताना जरा जास्त तेल ,मिठ्,ओवा किन्चित जिर्,मिठ घालुन कणिक भिजवायची,भिजवलेल्या कणकेचे थापुन चान्दक्य करायच्या आणि तव्यावर तेल्/तुप सोडुन भाजायच्या...आम्ही यालाच गाकर म्हणतो.
देवकी ही घारग्याची रेसिपि
देवकी ही घारग्याची रेसिपि आहे! >>>>> हो प्राजक्ता! बरोबर आहे तुमचे. माझाच गोंधळ झाला.धन्यवाद!
सॉरी वेल !
दिनेश, याच्या जवळ जाणारी पण
दिनेश, याच्या जवळ जाणारी पण अजून भरपूर मसाला/ घट्ट ग्रेव्ही(?) असते आणि रंग हि र वा असतो.
राजसी, ग्रेव्ही म्हणजे खूप पातळ असं नाहीये. घट्टसरच असते.
म्हणजे त्यातून भाज्या वेगळ्या काढल्या तर जे उरेल ते नारळाच्या ओल्या पण जरा घट्ट चटणीची कंसिस्टन्सीचे असेल. त्यालाही ग्रेव्हीच म्हणतात ना?
श्या मला योग्य शब्द नाही सापडत.
गाकर म्हणजे थोडा रवा घालून
गाकर म्हणजे थोडा रवा घालून कणीक घट्ट भिजवून थापून केलेल्या जाड रोट्या असतात. चुलीवर किंवा शेगडीत भाजतात. भाजलेले गाकर कुस्करून तूप आणि गूळ घालून लाडूही करतात. त्याला चुर्म्याचे लाडू म्हणतात.
(*तव्यावर नव्हे तर थेट चुलीवर किंवा शेगडीवर भाजतात अशी सुधारित माहिती घरच्या एक्स्पर्टने दिली.
)
नीधप, आमच्याकडे कच्च्या
नीधप,
आमच्याकडे कच्च्या केळीची भाजी अशी करतात.साल काढून केळी चिरून पाण्यात घालावी.फोडी छोट्या चौकोनी असाव्या.राई,हिंगाची (हवं तर कढीलिंब) फोडणी करून फोडी पाणी घालून शिजवाव्या.थोडुसाच कांदा,२-३ मिरीदाणे,हि.मि.,ओले खोबरे ,पाणी न घालता एकत्र वाटावे. हे वाटण फार नसते.दीड-दोन चमचे वाटण असते. फोडी शिजल्याकी हे वाटण घालावे.२चिमूट साखर घालावी.वरून कोथिंबीर.फोडीतील पाणी एकदम आटवू नये.बेताचे राहू द्यावे.भाजी एकदम सुकी नाही होत आणि हिरवट रंगाची असते.
या प्रकारे मिक्स भाजी पण
या प्रकारे मिक्स भाजी पण करतात का? त्या भाजीत सगळ्या भाज्या असतात आणि भरपूर वाटण असते.
नाही .ह्या प्रकारे मिक्स भाजी
नाही .ह्या प्रकारे मिक्स भाजी नाही करत.
त्या भाजीत सगळ्या भाज्या असतात आणि भरपूर वाटण असते....खतखते ह्या प्रकारात मिक्स भाज्या असतात.पण ती भाजी हिरवी नसते.
देवकी, मला खतखते माहितीये.
देवकी, मला खतखते माहितीये. मीच टाकलीये रेसिपी त्याची इथे.
स्वाती एकदम बरोबर! थेट चुलित
स्वाती एकदम बरोबर! थेट चुलित किन्वा शेगडित भाजतात..नसेल तर तव्यावर!
गाकर = गव्हाची
गाकर = गव्हाची भाकर.
सिंपल.
ओवा बिवा ऑप्शनल. कणीक घट्ट भिजवा. लाटून तव्यावर. मग भाकरी सारखेच निखार्यास लावा.
वरच्या मांड्याला चिमट्या काढून त्यात लोणकढे तूप. मग सोबत काहीच नसले तरी चालते.
>> गाकर = गव्हाची
>> गाकर = गव्हाची भाकर.
बरोब्बर.
>> लाटून तव्यावर
चूक! भाकरी थापतात आणि गाकरही. लाटून, ओतून, उडवून, सारवून वगैरे केलेल्या पदार्थाला भाकरी म्हणत नाहीत.
चूक! भाकरी थापतात आणि
चूक! भाकरी थापतात आणि गाकरही.>> ++१
रोट असतो तो. नीट थापायचा. एकसारखा. आणि व्यवस्थित मोखार भाजायचा. मोखार म्हणजे कच्चा नको, अधिक जळका नको, कड नीट भाजली जावी, मधेच ओला गिच्च नको असा.
येस! आम्ही पण तेल लावुन
येस! आम्ही पण तेल लावुन थापतोच!... माझ्या सासुच्या मते पुरुषाना लाटा-बिटायला जमत नाही त्यामुळे हा पदार्थ पुरुषवर्गाची निर्मिती!... माहेरुन वेगळा मतप्रवाह आहे...पोळ्या लाटताना लावायला घेतलेली परातीत घेतलेली कणीक उरली की त्याचा गाकर करायचा.
>> माझ्या सासुच्या मते
>> माझ्या सासुच्या मते पुरुषाना लाटा-बिटायला जमत नाही त्यामुळे हा पदार्थ पुरुषवर्गाची निर्मिती

Pages